Ads

26 December 2021

जाणून घ्या - भारतीय वित्तीय व्यवस्था

कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो.

विकसित अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्था विकसित असते. उलटपक्षी, वित्तीय व्यवस्था न्यूनविकसित असल्यास अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेस मर्यादा येतात.

अर्थ – व्यापक दृष्टीने, वित्त म्हणजे कर्जाने दिला-घेतला जाणारा पैसा होय. अशा वित्ताची गरज व्यक्ती, कुटुंबे, व्यापारी, व्यावसायिक, उद्योगपती, शेतकरी तसेच, विविध सरकारे इत्यादींना असते.

उदा. व्यक्ती व कुटुंबांना वित्ताची गरज दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तसेच गृह बांधणीसाठी असते.

व्यापार्‍यांना वित्ताची गरज आपला माल विकत घेण्यासाठी तसेच, साठवण्यासाठी असते. तर, उद्योगपतींना आपल्या स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी वित्त आवश्यक असते.

सरकारला सुद्धा आपला चालू खर्च भागविण्यासाठी विकासात्मक कार्यासाठी तसेच, युद्धसज्जतेसाठी पैशाची आवश्यकता असते.

अशा विविध कारणांसाठी वापरण्यात येणार्‍या वित्ताच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणार्‍या व्यवस्थेस ‘वित्तीय व्यवस्था’ (Financial System) असे म्हणतात.

भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना –

वित्ताच्या कालावधीनुसार भारतीय वित्तीय व्यवस्थेचे दोन भाग पडतात.

1. भारतीय नाणे बाजार –

वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात अल्पकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला नाणे बाजार असे म्हणतात.

नाणे बाजारात कर्ज व्यवहार 1 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी होतात. मात्र, कृषीसाठी हा अल्प कालावधी 15 ते 18 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.

भारताच्या नाणे बाजारात असंघटित क्षेत्राचा तसेच, संघटित क्षेत्राचा समावेश होतो.

असंघटित क्षेत्रात सावकार, सराफी पेढीवाले तसेच, बँकेतर वित्तीय संस्थांचा समावेश होतो.

संघटित क्षेत्रात व्यापारी बँकांचा समावेश होतो. त्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो.

2. भारतीय भांडवल बाजार –

वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात मध्यम तसेच दीर्घकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला भांडवल बाजार असे म्हणतात.

भांडवल बाजारात 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात. साधारणत: 5 वर्षापर्यंतच्या कालावधीला मध्यमकालीन तर त्यापेक्षा जास्त 20-25 वर्षापर्यंतच्या कालावधीला दीर्घ-कालीन समजले जाते.

भारतीय भांडवल बाजारात वित्त पुरवठा करणार्‍या व इतर वित्तीय सेवा प्रदान करणार्‍या संस्थांमध्ये खालील संस्थांचा समावेश होतो.

1. व्यापारी बँका

2. विकास वित्तीय संस्था. उदा. IFCI, IDBI, ICICI, SFCs, SIDCs, इ.

3. विकास कंपन्या – LIC आणि GIC.

4. मर्चंट बँका.

5. म्युचुअल फंड्स – UTI

6. पतदर्जा ठरविणार्‍या संस्था CRISIL, CARE, ICRA

भांडवल बाजारात कर्ज घेणार्‍यांना (ऋणको) व कर्ज देणार्‍यांना (धनको) एकत्र आणणारे रोखे बाजार (Stock exchanges) व त्यातील दलाल महत्वाची भूमिका पार पाडतात.

भारतात बँक व्यवसायाचे अस्तित्व प्राचीन काळापासूनच असले तरी आधुनिक बँक-व्यवसाय मात्र ब्रिटिश काळापासूनच सुरू झाला.

भारतीय बँक व्यवसायाची रचना –

भारतीय बँक-व्यवसायाचे वर्गीकरण खालील दोन भागांमध्ये करण्यात येते.

1. असंघटित बँक व्यवसाय

यामध्ये सावकार व सराफी पेढीवाले यांचा समावेश होतो.

उदा. भारतात पूर्वीपासून कर्ज व्यवहार करणारे महाजन, सेठ, श्रेष्ठ, शेट्टी, चेट्टियार, सराफ इ.

RBI ने सावकार व सराफ पेढीवाल्यांना संघटित क्षेत्रात आणण्याचे बरेच प्रयत्न केले असतांना सुद्धा ते या क्षेत्राचा पूर्ण हिस्सा बनू शकले नाही.

2. संघटित बँक व्यवसाय

संघटित क्षेत्र हे RBI च्या नियंत्रणाखाली असून त्यात सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो.

भारतीय नियोजन आयोग

   भारतीय नियोजन आयोग, इ.स. १९५० मध्ये स्थापन झालेली भारत सरकारची एक संस्था आहे जिचे प्रमुख कार्य पंचवार्षिक योजना तयार करणे हे आहे.

◾️भारतीय नियोजन आयोग जबाबदाऱ्य

देशातील संसाधनांचा अभ्यास करणे.

या संसाधनांचा प्रभावी आणि संतुलित वापर करण्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे.

प्राथमिक गरजा समजून घेणे, आणि योजनांसाठी संसाधने पुरविणे.

योजना व्यवस्थित चालवण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री पुरविणे.

योजनांच्या प्रगतीचा नियमित काळाने आढावा घेणे.

आर्थिक विकासात बाधा टाकणाऱ्या गोष्टी शोधणे.

◾️भारतीय नियोजन आयोग इतिहास◾️

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना इ.स. १९३८ मध्ये भारताची सार्वभौमत्वाकडे वाटचाल करणारी पहिली प्राथमिक स्वरूपातील अर्थयोजना तयार केली. तिचा मसुदा मेघनाथ सहा यांनी तयार केला. ब्रिटीश सरकारनेही अधिकृतरीत्या एक योजना मंडळ स्थापन केले या मंडळाने १९४४ ते १९४६ मध्ये काम केले. उद्योगपती आणि अर्थशास्त्रज्ञ यांनी १९४४ मध्ये स्वतंत्रपणे तीन विकास योजना तयार केल्या.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, नियोजनाचे औपचारिक रुप अवलंबिले गेले आणि त्यादृष्टीने भारताच्या पंतप्रधानांच्या हाताखाली १५ मार्च, इ.स. १९५० नियोजन आयोगाची स्थापन करण्यात आली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. नियोजन आयोगाची व्युत्पत्ती भारताच्या घटनेत किंवा संविधानात नसली तरी ती भारत सरकारची एक संस्था आहे.

शेतीच्या विकासावर जोर देणारी पहिली पंचवार्षिक योजना १९५१ मध्ये प्रकाशित करण्यात आली आणि त्यानंतरच्या दोन पंचवार्षिक योजना १९६५ पर्यंत तयार करण्यात आल्या. भारत पाक युद्धामुळे त्यात खंड पडला. सलग दोन वर्षे पडलेला दुष्काळ, रुपयाचे अवमूल्यन, एकंदर वाढलेली महागाई आणि संसाधनांचा क्षय यामुळे नियोजन प्रक्रियेत अडथळे आले आणि १९६६ ते १९६९ मधील तीन वार्षिक योजनांनंतर, चौथी पंचवार्षिक योजना १९६९ मध्ये तयार करण्यात आली.

केंद्रातील राजकीय परिस्थितीत सारख्या होणाऱ्या बदलांमुळे आठवी योजना १९९० मध्ये तयार होऊ शकली नाही आणि १९९०-९१ व १९९१-९२ ला वार्षिक योजना तयार करण्यात आल्या. आठवी योजना शेवटी १९९२ मध्ये रचनात्मक बदल नीतीच्या प्रारंभानंतर तयार करण्यात आली.

पहिल्या आठ योजनांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील मुलभूत आणि अवजड उद्योगांमध्ये प्रचंड गुंतवणूक करण्यावर भर होता, पण १९९७ च्या नवव्या योजनेनंतर, सार्वजनिक क्षेत्रावरील जोर कमी होऊन नियोजनाबद्दलचा विचार ते फक्त सूचक स्वरूपाचेच असावे असा बनला.

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय.


🅾अलाहाबाद बैंक - कोलकाता

🅾 बैंक ऑफ इंडिया - मुंबई

🅾 बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे

🅾 केनरा बैंक - बैंगलोर

🅾 सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई

🅾 कॉरपोरेशन बैंक - मंगलौर

🅾 देना बैंक - मुंबई

🅾 इंडियन बैंक - चेन्नई

🅾 इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई

🅾 ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली

🅾 पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली

🅾 पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली

🅾 सिंडिकेट बैंक - मणिपाल

🅾 यूको बैंक - कोलकाता

🅾 यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई

🅾 यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता

🅾 विजया बैंक - बैंगलोर

🅾 आंध्रा बैंक - हैदराबाद

🅾 बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

गुंतवणुकीचे प्रकार.

१) कंपन्याचे भाग भांडवल

२) मुच्युअल फंडाचे वा युनिट ट्रस्टचे युनिट्स

३) बॅंकातील चालू वा बचत खाती किंवा मुदतीच्या ठेवी

४) पतपेढ्या, चिट फंड, क्रेडिट सोसायट्या यांतील ठेवी

५) भिशी योजना

६) शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या विमा योजना

७) पोस्ट खात्यातील विविध अल्पबचत योजना

८) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

९) प्रॉव्हिडंट फंड

१०) वैयक्तिक विमा योजना

११) सरकारने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी बाजारात विक्रीसाठी आणलेले कर्जरोखे

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠म्युचुअल फंड.💠💠

🅾म्युचुअल फंड म्हणजे सहसा तज्ञ मंडळीकडून सांभाळल्या जाणाऱ्या अशा पैशांचा स्त्रोत जो की, एखाद्या गुंतवणूकदारांच्या समूहाकडून आलेला असतो.

🅾म्युचुअल फंडाचे प्रबंधक पुष्कळ गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात व तो विविध रोख्यांमधे जसे की, शेअर, रोखे बंध किंवा बाजारातील अन्य विकाल्पांमधे अथवा या सर्वांच्या मिश्र योजनेत गुंतवतात.

🅾यात फंडांचे गुंतवणुक उदिष्ट ठरलेले असते. संयुक्तरीत्या म्युचुअल फंडाकडून जो पैसा सांभाळला जातो त्यास सहसा खाते (पोर्टफ़ोलिओ) असे संबोधतात.

🅾प्रत्येक युनिटमध्ये गुंतवणूकदारांची समान मालकी असतेच, शिवाय जे उत्पन्न ही संपूर्ण रक्कम तयार करते त्यातही असते. म्युचुअल फंडांची त्यांच्या रचनेनुसार विभागणी होते.

🅾खुल्या योजना नेहमीच युनिटची विक्री व खरेदी करीत असतात. जेव्हा फंड विकतात तेव्हा  गुंतवणूकदार खरेदी करतात आणि जेव्हा गुंतवणूकदार पैसा काढतात, तेव्हा हे फंड पुन्हा युनिटची खरेदी करतात.

🅾खरेदी किंवा पैसे काढणे हे सर्व एकूण मालमत्तेच्या किमतीवर आधारीत असते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠म्युचुअल फंडांचे प्रकार.💠💠

🅾प्रत्येक म्युचुअल फंडाचे गुंतवणुकीचे एक पुर्वनिश्चित असे उद्दिष्ट असते. ज्यात त्या फंडाचे पैसे कुठल्या प्रकारच्या प्रकारात व कशा योजनांनी गुंतविले जाणार हे ठरले असते. म्युचुअल फंडाचे खालील प्रकार आहेत.

१) खुले फंड( open ended ) : अशा फंडांची कोणतीही परिपक्वता तारीख नसते.

🅾गुंतवणूकदार खुल्या फंडांचे युनिट खरेदी अथवा विक्री संपत्ति प्रबंधन करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयातून किंवा त्यांच्या गुंतवणूक सेवा केंद्रावरून किंवा शेअरबाजाराच्या माध्यमातून करू शकतात.

🅾खरेदी किंवा विक्री मूल्य हे नेहमी म्युचुअल फंडाच्या एकूण मालमत्ता किंमतीवर आधारित असते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠म्युचुअल फंडाची ठळक वैशिष्ठे .💠💠

🅾तज्ञांकडून व्यवस्थापन- पैसा हा नेहमी त्या फंडाच्या प्रबंधकाकडून गुंतविला जातो.

🅾विकेंद्रीकरण- विकेंद्रीकरण ही एक गुंतवणुकीची अशी युक्ती आहे ज्यामुळे संपूर्ण पैसा एकाच टोपलीत ठेवला जात नाही. जसे , सर्व अंडी एकाच पिशवीत असायला नकोतअसे म्हणतात !!

🅾म्युचुअल फंडाच्या माध्यमातून शेअरची मालकी घेतल्यामुळे स्वतःचे शेअर किंवा रोखेपत्र यांच्यातील जी जोखीम असते ती विभागली जाते.

🅾स्वस्त माध्यम- हे फंड एकाच वेळेस खूप शेअर्स विकत अथवा खरेदी करत असल्यामुळे जी काही व्यवहार किंमत असते, ती एखादया एकट्या व्यक्तीने केलेल्या व्यवहाराच्या तुलनेत अतिशय कमी येते .

🅾रोख उपलब्धता- जशे शेअर, म्युचुअल फंडाचे युनिट विकून लागलीच रोख रक्कम प्राप्त होऊ शकते.

🅾म्युचुअल फंडाचे युनिट घेणे सोपे आहे. पुष्कळ बॅंका त्यांचे स्वतःचे म्युचुअल फंड उपलब्ध करून देतात व  गुंतविण्याची रक्कम देखील लहान असते.

🅾गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवण्यापूर्वी या सर्व बाबींचा नीट अभ्यास करूनच पैसे गुंतवायला हवेत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠२) ठराविक काळात बंद होणारे फंड ( close ended ).💠💠

🅾हे फंड विशिष्ट कालावधीसाठीच चालतात.

🅾एका परिपक्वता तिथीला सर्व युनिटचे पैसे परत मिळतात व योजना बंद होते.

🅾याचे युनिट शेअरबाजारात नोंदणी होतात. जेणे करून रोख रक्कम पुरविता येणे सोपे होते.

🅾गुंतवणूकदार, याचे युनिट शेअर बाजारातील चढाव – उतारानुसार विकत घेऊ शकतात किंवा विकू शकतात.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠३) रोखेबंध फंड (BOND FUND).💠💠

🅾 एक स्थिर उत्पन्न देण्याचा प्रयत्न या प्रकारात होतो.

🅾गुंतवणूक ही सहसा शासकीय व वित्तीय ऋण पत्रात असते.

🅾जरी फंडाची किंमत वाढली तरी, ह्याचे मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणूकदारांना स्थिर पैसा पुरवणे हेच आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

भारतातील महत्त्वाच्या नद्या

गंगा:-गंगोत्री:-2510:-यमुना, गोमती, शोण:-बंगालच्या उपसागरास

यमुना:-यमुनोत्री:-1435:-चंबळ, सिंध, केण, बेटवा:-गंगा नदिस अलाहाबाद जवळ

गोमती:-पिलिभीत जवळ:-800:-साई:-गंगा नदिस

घाघ्रा:-गंगोत्रीच्या पूर्वेस:-912:-शारदा, राप्ती:-गंगा नदिस

गंडक:-मध्य हिमालय (नेपाळ):-675:-त्रिशूला:-गंगा नदिस पटण्याजवळ

दामोदर:-तोरी (छोटा नागपूर पठार):-541:-गोमिया, कोनार, बाराकर:-हुगळी नदिस

ब्रम्हपुत्रा:-मानस सरोवराजवळ (तिबेट):-2900:-मानस, चंपावती, दिबांग:-गंगा नदिस बांग्लादेशामध्ये

सिंधु:-मानस सरोवराजवळ (तिबेट):-2900:-झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास:-अरबीसमुद्रास

झेलम:-वैरीनाग:-725:-पुंछ, किशनगंगा:-सिंधु नदिस

रावी:-कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश):-725:-दीग:-सिंधु नदिस

सतलज:-राकस सरोवर:-1360:-बियास:-सिंधु नदिस

नर्मदा:-अमरकंटक (एम.पी):-1310:-तवा:-अरबी समुद्रास

तापी:-मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश):-702:-पूर्णा, गिरणा, पांझरा:-अरबी समुद्रास

साबरमती:-अरवली पर्वत:-415:-हायमती, माझम, मेखो:-अरबी समुद्रास

चंबळ:-मध्य प्रदेशामध्ये:-1040:-क्षिप्रा, पार्वती:-यमुना नदिस

महानदी:-सिहाव (छत्तीसगड):-858:-सेवनाथ, ओंग, तेल:-बंगालच्या उपसागरास

गोदावरी:-त्र्यंबकेश्वर:-1498:-सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती:-प्रदेशात राजमहेद्रीजवळ

कृष्णा:-महाबळेश्वर:-1280:-कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा:-बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात

भीमा:-भीमाशंकर:-867:-इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान:-कृष्णा नदिस

कावेरी:-ब्रम्हगिरी (कर्नाटक):-760:-भवानी, सुवर्णवती, कर्नावती:-बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)

तुंगभ्रद्रा:-गंगामूळ (कर्नाटक):-640:-वेदावती, हरिद्रा, वरद:-कृष्णा नदिस

राज्यतील सर्व प्रदेशिक परिवहन कार्यालय क्रमांक


• आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण ५६ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत.

• या प्रत्येक कार्यालयाअंतर्गत नोंदणी होणाऱ्या वाहनांना त्या त्या कार्यालयासाठी देण्यात आलेला नोंदणी क्रमांक देण्यात येतो.

• उदाहर्णार्थ रायगडमधील प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत नोंदणी होणाऱ्या गाड्यांचा क्रमांक MH-06 ने सुरु होतो. या क्रमांकाने सुरु होणारी गाडी ही महाराष्ट्रातील (MH) सहाव्या प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत नोंदणी करण्यात आलेली आहे असा अर्थ होतो.

• दिवसोंदिवस गाड्यांची संख्या वाढत असल्याने अनेक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयेही सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे या क्रमांकाची यादी आता ५६ वर जाऊन पोहचली आहे.

• अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर राज्यात आता MH-56 पर्यंतच्या गाड्या पहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या शहरातील गाड्यांसाठी कोणता क्रमांक वापरला जातो…

MH-01 – मुंबई (दक्षिण)
MH-02 – मुंबई (पश्चिम)
MH-03 – मुंबई (पूर्व)
MH-04 – ठाणे
MH-05 – कल्याण
MH-06 – रायगड
MH-07 – सिंधुदूर्ग
MH-08 – रत्नागिरी
MH-09 – कोल्हापूर
MH-10 – सांगली
MH-11 – सातारा
MH-12 – पुणे
MH-13 – सोलापूर
MH-14 – पिंपरी चिंचवड
MH-15 – नाशिक
MH-16 – अहमदनगर
MH-17 – श्रीरामपूर (अहमदनगर)
MH-18 – धुळे
MH-19 – जळगाव
MH-20 – औरंगाबाद
MH-21 – जालना
MH-22 – परभणी
MH-23 – बीड
MH-24 – लातूर
MH-25 – उस्मानाबाद
MH-26 – नांदेड
MH-27 – अमरावती
MH-28 – बुलढाणा
MH-29 – यवतमाळ
MH-30 – अकोला
MH-31 – नागपूर
MH-32 – वर्धा
MH-33 – गडचिरोली
MH-34 – चंद्रपूर
MH-35 – गोंदिया
MH-36 – बुलढाणा
MH-37 – वाशिम
MH-38 – हिंगोली
MH-39 – नंदूरबार
MH-40 – वाडी (नागपूर)
MH-41 – मालेगाव (नाशिक)
MH-42 – बारामती (पुणे)
MH-43 – वाशी (सानपाडा)
MH-44 – अंबेजोगाई (बीड)
MH-45 – आकलूज (सोलापूर)
MH-46 – पनवेल
MH-47 – बोरिवली
MH-48 – वसई
MH-49 – नागपूर (पूर्व) भंडारा रोड
MH-50 – कराड
MH-51 – संगमनेर (अहमदनगर)
MH-52 – परभणी (ग्रामीण)
MH-53 – पुणे (दक्षिण)
MH-54 – पुणे (उत्तर)
MH-55 – मुंबई (मध्य)
MH-56 – ठाणे (ग्रामीण)

इतिहासातील महत्वाची पुस्तके

◾️  माय इंडियन इयर्स -
✍ लॉर्ड हर्डिंग्ज

◾️   वर्तमान रणनीती -
✍ अविनाश भट्टाचार्य

◾️   बॉम्ब पोथी -
✍ सेनापती बापट

◾️   गांधीइझम:अॅन अॅनालिसिस -
✍ फिलीप स्प्रेट

◾️  द अवेकनिंग ऑफ इंडिया -
✍ रॅम्से मॅकडोनाल्ड

◾️  काँग्रेस मिनिस्ट्रीज अॅट वर्क -
✍ आचार्य जुगलकिशोर

◾️  दी वे आऊट, 1943 -
✍ सी. राजगोपालाचारी

◾️ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया -
✍ सी.पी. इल्बर्ट

◾️  इंडियन अनरेस्ट -
✍ व्हॅलंटीन चिरोल

◾️   इंडिया अॅज आय नो इट -
✍ मायकेल ओडवायर

◾️ भारतीय मुसलमान, इंडिया अंडर ड क्वीन -
✍ विल्यम हंटर

◾️ हू वेअर दी शुद्रास?, बुद्ध अँड हिस धम्म -
✍ डॉ. बाबासाहेब आंबेडकर .

लॉर्ड बेंटिक

⏩कालावधी:-1828 ते 1833

⏩गुन्हेगार ला फटके मारण्याची पद्धत बंद केली

⏩भारतीयांना न्याय खात्यात प्रवेश देण्यास सुरुवात

⏩न्यायालयात फारसी ऐवजी देशी भाषा चा वापर सुरू

👉1829 ला सती प्रथा कायदा केला

⏩मुलीच्या लग्नाला आर्थिक सह्या करण्याची प्रथा याने सुरू केली

✍ब्रिटिश पंतप्रधान चा गव्हर्नर झालेला मुलगा म्हणून एकमेव व्यक्ती

⏩नरबळी ची पद्धत बंद केली

⏩पहिले मेडिकल कॉलेज सुरू केले कलकत्ता येथे

⏩भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला

एल्फिन्स्टन यांचा शिक्षण विषयक दृष्टीकोन.

🅾ते सनातनी वृत्तीचे होते
धर्म व शिक्षण यांची फारकत असली पाहिजे असा त्यांचा विचार होता
प्रथम वरच्या वर्गातील लोकांना शिक्षण देण्यात यावे , त्यांचा सुरवातीस विचार होता.

🅾इ.स.1823 मधील त्यांच्या एका पत्रावरून त्यांचा शिक्षणाचा उद्देश स्पष्ट दिसतो.

🧩ते पुढील प्रमाणे

1)इंग्रजी भाषा जाणणाऱ्या कारकून चा पुरवठा करणे.

2)समाजातील सर्व स्तरापर्यंत ज्ञानाचा प्रसार करणे.

3)रयतवारी पद्धतीत जमिनी संबंधित मिळालेला पट्टा प्रत्यक शेतकऱ्याला  वाचता आला पाहिजे.

4) आपल्याकडे असलेल्या सावकाराच्या कर्जाची माहिती घेणे व कर्जातून सुटका करणे.

5) इंग्रज समर्थक गट किंवा वर्ग बनविणे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.
भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा