20 January 2022

अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया-स्तनदा मातांच्या चौरस आहारासाठी डॉ. अब्दुल कलाम अमृत योजना

🔴प्रस्तावना

अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण 33.1 टक्के आहे.

स्त्रियांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्याने याचा परिणाम बाळाच्या वजनावर होतो. शिवाय जन्मानंतर पहिले तीन महिने बालक पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्याने या कालावधीत मातेचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर शासनातर्फे अनुसूचित क्षेत्रांतर्गत अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आहारातून उष्मांक व प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत एक वेळ चौरस आहार उपलब्ध करून देण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.

🔴योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येईल.

अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थींना 1 डिसेंबरपासून चौरस आहार देण्यात येणार आहे.

राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यात 85 एकात्मिक बाल विकासप्रकल्पांतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे.

एकूण 16 हजार 30 अंगणवाडी आणि 2013 मिनी अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळणार आहे.

🔴योजनेतील घटक

अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या योजनेनुसार एकूण सहा महिन्याच्या कालावधीसाठी एक वेळचा चौरस आहार मिळणार आहे. उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण या योजनेमुळे कमी होण्यास मदत होणार आहे. अनुसूचित क्षेत्रामधील सुमारे 1 लाख 89 हजार एवढ्या गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना या योजनेचा दरवर्षी लाभ मिळणार आहे.  

मुलांमध्ये चेतना निर्माण करण्याच्या डॉ. कलाम यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेला भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना असे नाव देण्यात आले आहे. ही योजना राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांतील 85एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा, किंमत आणि पोषण मुल्ये ठरविण्यात आली असून चौरस आहाराचा खर्च सरासरी प्रति लाभार्थी 22 रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे. या योजनांसाठी केंद्र शासनाच्या टीएचआर योजनेचा निधी (केंद्र व राज्य हिस्सा) वापरण्यात येईल. 

अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविणे आवश्यक होते. अनुसूचित क्षेत्रामध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण 33.1 टक्के एवढे आहे. आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात. तसेचबालकाच्या जन्मानंतर पहिले तीन महिने मूल पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे.

🔴आहाराचे स्वरूप

या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दुध (साखरेसह), शेंगदाणा लाडू (साखरेसह), अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गुळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश असेल. तसेच हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक अशी चार सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात येईल. या समितीला आहार घटक खरेदी करण्याचे अधिकार राहतील.

🔴अंमलबजावणी यंत्रणा

ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना नियमित मिळणाऱ्या मानधना व्यतिरिक्त या योजनेचा आहार तयार करण्यासाठी प्रतिमाह प्रत्येकी दोनशे पंन्नास रुपये देण्यात येतील.

ही योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून योजनेंतर्गत कामाचा व फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावर आदिवासी विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सनियंत्रण समिती, जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण व अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात येईल.

तसेच अंगणवाडी पातळीवर महिला सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य (अनुसूचित जमाती) यांच्या अध्यक्षतेखाली आहार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या योजनेचे वेळोवळी त्रयस्थ संस्थेमार्फत

जो. बायडेन

🔸नाव : जोसेफ रॉबिनेट बायडेन जूनियर

🔹 जन्म : नोव्हेंबर 20, 1942 (वय 78) Scranton, Pennsylvania, US

🔸Political Party : Democratic (1969 -present)

🔹इतर राजकीय संलग्नता : स्वतंत्र (1969 पूर्वी)

🔸 शिक्षण :
-डेलावेअर विद्यापीठ (बीए)
- सिरॅक्यूज विद्यापीठ (जेडी)

🔹व्यवसाय : राजकारणी, वकील, लेखक

🔸अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष :( 20 जानेवारी 2021 पासून)✅
-उपाध्यक्ष : कमला हॅरिस

🔹युनायटेड स्टेट्स सेनेटर :
( 3  जानेवारी 1973  -  15 जानेवारी 2009 )

🔸अमेरिकेचे 47 वे उपराष्ट्रपती
(20 जानेवारी 2009  -  20 जानेवारी 2017)

आयुष्मान भारत डिजिटल योजना क्रांतिकारी - पंतप्रधान मोदी.

🔻आयुष्मान भारत डिजिटल योजना क्रांतिकारक बदल घडवील, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. या योजनेत लोकांना डिजिटल हेल्थ आयडी दिला जाणार असून त्यात आरोग्याविषयक नोंदी असतील  असे त्यांनी स्पष्ट केले.

🔺ही योजना कार्यान्वित करताना त्यांनी सांगितले की, आयुष्मान भारत योजनेत बदल होत गेले, त्यात हा नवा टप्पा आहे.

🔻यातील आयुष्मान भारत डिजिटल योजनेचा पथर्शक प्रकल्प हा पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्लय़ावरून १५ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर केला होता.  सध्या आयमुष्मान भारत डिजिटल योजना पथदर्शक पातळीवर सहा केंद्रशासित प्रदेशात राबवली जात होती.  आता ती देशभरात राबवण्यात येत असून त्याचवेळी राष्ट्रीय आरोग्य  प्राधिकरण आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची  तिसरी वर्षपूर्ती साजरी करीत आहे.

भारतातील लोकनृत्ये

📌 महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
📌 तामिळनाडू : भरतनाट्यम
📌 केरळ : कथकली
📌 आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
📌 गुजरात : गरबा , रास
📌 ओरिसा : ओडिसी
📌 जम्मू व काश्मीर : रौफ
📌 पंजाब : भांगडा , गिद्धा
📌 आसाम : बिहू , झूमर नाच
📌 उत्तराखंड : गर्वाली
📌 मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
📌 मेघालय : लाहो
📌 कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
📌 मिझोरम : खान्तुंम
📌 गोवा : मंडो
📌 मणिपूर : मणिपुरी
📌 अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
📌 झारखंड : कर्मा
📌 छत्तीसगढ : पंथी
📌 राजस्थान : घूमर
📌 पश्चिम बंगाल : गंभीरा
📌 उत्तर प्रदेश : कथक

वस्तुनिष्ठ महाराष्ट्र


*महाराष्ट्रातील :अष्टविनायक*
-----------------------------------------------------:
०१) महागणपती रांजणगांव (पुणे)
०२) चिंतामणी थेऊर. (पुणे)
०३) मोरेश्वर. मोरगांव. (पुणे)
०४) विघ्नहर. ओझर. (पुणे)
०५) गिरिजात्मक. लेण्याद्री (पुणे)
०६) बल्लाळेश्वर. पाली (रायगड)
०७) वरद विनायक. महाड. (रायगड)
०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक (अहमदनगर)
------------------------------------------------------------
-----------------------
*महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प*
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कोराडी, खापरखेडा नागपुर.
०२) दुर्गापूर. बल्लारपूर (चंद्रपुर)
०३) डहाणू, चोला ठाणे.
०४) एकलहरे नाशिक.
०५) बीड. परळी वैजनाथ.
०६) फेकरी भुसावळ.
०७) पारस. अकोला.
०८) ऊरण. रायगड.
------------------------------------------------------------
-----------------------
🐆🐅🐿🐇 *महाराष्ट्र : अभयारण्ये.*🐇🐿🐅🐆
------------------------------------------------------------
-----------------------
*कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*
०१) कर्नाळा, फनसाड रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.
०३) मालवण. सिंधुदुर्ग.
------------------------------------------------------------
-----------------------
*पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*
०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे
------------------------------------------------------------
-----------------------
*नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*
०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.
------------------------------------------------------------
-----------------------
*औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*
०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य.
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद
व जळगांव.
------------------------------------------------------------
-----------------------
*अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*
०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य.
अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.
नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) नागनागझिरा गोंदिया
०२) बोर. वर्घा व नागपुर
०३) अंधारी चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड.  गडचिरोली....

चालू घडामोडी

1. पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
1. अमरिंदर सिंह
2. चरणजीत सिंह
3. सिद्धू
4. प्रकाशसिंह बादल

उत्तर- 2

------------------------------------------------------------

2. सिक्कीम सरकारने कोणते मासे राज्य मासे म्हणून घोषित केले?
1. भाकुरा
2. रोहू
3. कॅटली
4. भिट्टी

उत्तर- 3

-----------------------------------------------------------

3. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या आर सी सी कंपनीच्या पहिल्या महिला कमांडिंग अधिकारी म्हणून कोणाची निवड केली आहे?
1. कॅप्टन अंजना
2. मेजर आयना
3. भावना जोशी
4. विष्णू माया

उत्तर- 2

------------------------------------------------------------

4. मध्यप्रदेश मधील छिंदवाडा विद्यापीठाचे नाव बदलून......करण्यात आले.
1. राजा शंकर शाह विश्वविद्यालय
2. देवी अहिल्या विश्वविद्यालय
3. जिवाजी विश्वविद्यालय
4. राणी दुर्गावती विश्वविद्यालय

उत्तर- 1

------------------------------------------------------------

5.  सोनाली नवांगुळ यांना 2021 चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी देण्यात आला?
1. मध्यरात्रीनंतरचे तास
2. स्वच्छंद
3. प्रकाशवाटा
4. यापैकी नाही

उत्तर- 1

------------------------------------------------------------

6. मणिपूर मधील कोणत्या दोन उत्पादनांना जी.आय टॅग मिळाला आहे?
1. हाती मिर्ची ,तमनलॉंग नारंगी
2. मक्का,दलहन
3. टमाटर,मटर
4. निंबु, केला

उत्तर- 1

------------------------------------------------------------

7. जागतिक शांतता दिवस कधी साजरा केला जातो?
1. 21 सप्टेंबर
2. 22 सप्टेंबर
3. 23 सप्टेंबर
4. 24 सप्टेंबर

उत्तर- 1

------------------------------------------------------------

8.ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2021 रँकिंग मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
1. 44
2. 45
3. 46
4. 47

उत्तर- 3

------------------------------------------------------------

9. IRCTC ने भारतातील पहिली स्वदेशी लक्झरी क्रूझ लायझर सुरु केली असून तिने कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे.
1. Cordilia क्रूझ
2. जलेश क्रुझेस
3. अंगिया क्रूझ
4. ओबेरॉय वृंदा लक्झरी क्रूझ
उत्तर- 1

------------------------------------------------------------

10. अमेरिकेच्या हिंदू विद्यापीठाने हिंदू अभ्यासात मानद डॉक्टरेट पदवी कोणाला प्रदान केली?
1. अनुपम खेर
2. रतन टाटा
3. डॉ. रमेश कंवर
4. मधुकर उपाध्याय
उत्तर- 1

------------------------------------------------------------

1.पश्चिम बंगालच्या अनुठी मिठाई.......ला जीआई टॅग मिळाला आहे?

1. रसगुल्ला
2. मिहिदाना
3. मोया
4. जलेबी

उत्तर- 2

------------------------------------------------------------

2. IFC ने कोणत्या व्यक्तीला भारताने आपले प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

1. राफेल ग्रांसी
2. मिशेल बैचेलेट
3. वेंडी वर्नर
4. जेम्स डी. वोल्फेन्सॉन

उत्तर- 3

----------------------------------------------------------
3. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ( ICMR ) ने 'आय ड्रोन'  विकसित केले आहे.
ब. या साधनाचा मुख्य हेतू भारताच्या कठीण आणि अवघड प्रदेशांपर्यंत लस पोहचविणे हा आहे.
क.  ICMR ने  भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर सोबत लसी सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी आणि हस्तांतरित करण्यासाठी सहकार्य केले आहे.
1. अ, ब
2. ब, क
3. अ, ब, क
4. अ, क

उत्तर- 3

------------------------------------------------------------
4. JIMEX 2021 ही भारताची वार्षिक द्विपक्षीय सागरी सरावाची 5 वी आवृत्ती कोणत्या देशासोबत आहे.

1. जर्मनी
2. थायलंड
3. इटली
4. जपान

उत्तर- 4

------------------------------------------------------------

5. सेशेल्स कर निरीक्षकांविना बॉर्डर (TIWB) साठी भागीदार प्रशासन म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे कोणत्या संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे?

1. FATF
2. युनेस्को
3. जागतिक बँक आणि WTO
4. UNDP आणि OECD

उत्तर- 4

------------------------------------------------------------

6. 'चांगली समरिटन्स योजना' कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे?

1. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
2. आयुष मंत्रालय
3. महिला आणि बालविकास मंत्रालय
4. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय

उत्तर- 1

------------------------------------------------------------

7. हिमाचल प्रदेशने ......या  उत्पादनाची संघटित लागवड सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे.

1. लवंग
2. वेलची
3. काळी मिरी
4. खरे दालचिनी

उत्तर- 4

------------------------------------------------------------

8. कोणत्या भारतीय संस्थेला 2021 च्या आजीविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

1. सुलभ इंटरनॅशनल
2. स्वच्छ भारत ट्रस्ट
3. गिव्ह मी ट्रीज ट्रस्ट
4. लीगल इनिशिएटिव्ह फॉर
फॉरेस्ट अँड इन्व्हर्नमेंट (एल आय एफ इ)

उत्तर- 4

------------------------------------------------------------

9. ओमानला धडकलेल्या चक्रीवादळाचे नाव काय आहे, आणि गुलाब चक्रीवादळाचे अपत्य आहे.

1. तेज
2. शाहीन
3. फकीत
4. गुलमोहर

उत्तर- 2

------------------------------------------------------------

10. स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आणि 2022 च्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचे प्रदर्शन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने www. indiyanrdc. mod. gov. in ह्या नव्या संकेतस्थळाची सुरुवात कोणी केली आहे.

1. राजनाथ सिंग
2. अजय कुमार
3. आरोही पटेल
4. अमित शहा

उत्तर- 2

==========================
==============================

दिवस नि रात्र समान असणारा दिवस

दरवर्षी २१ मार्च आणि २३ सप्टेंबर हा विषुवदिन म्हणून ओळखला जातो. या दोन्ही दिवशी सूर्य विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. आज ही स्थिती तयार होऊन समान दिवस-रात्र अनुभवता येणार आहे. उत्तर आणि दक्षिण गोलार्धात मात्र समान दिवस-रात्र वेगवेगळे राहणार आहेत.

पृथ्वीच्या परिवलनाचा अक्ष तिच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाच्या संदर्भात सुमारे २३.५ अंशाने वळलेला आहे. त्यामुळे तिचा उत्तर वा दक्षिण गोलार्ध सूर्याकडे कमी-अधिक झुकलेला राहतो. यामुळे पृथ्वीवरील दिवस-रात्री लहान वा मोठ्या होतात. ऋतु उद्भवतात. तसेच सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन घडते.

वर्षांतून दोनदा २२ डिसेंबर व २१ जून महिन्यात, अशी स्थिती येते. दिवस-रात्र समान ही अवस्था त्या ठिकाणाच्या स्थानावर, विशेषत: अक्षवृत्तावर अवलंबून असते. अक्षवृत्तीय स्थानानुसार हा फरक कमी-अधिक काही आठवड्यांचाही असू शकतो. अंशावर २३ सप्टेंबरला दिवस-रात्र समान असते. सर्वसामान्यांना २३ सप्टेंबर, २१ मार्चला आपल्याकडे सुद्धा दिवस-रात्र समान असते, असेच वाटत असते.

पेपर मध्ये खालील शब्द लक्षपूर्वक वाचणे

अचूक  : म्हणजे बरोबर  ( Correct, true, right)

बिनचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true)

बिनचूक नाही : म्हणजे चूकीचे ( incorrect) ( is not correct)

अयोग्य  : म्हणजे चूक ( incorrect)

योग्य नाही : म्हणजे चूक ( incorrect)

असत्य : चूक (incorrect)

सत्य नाही  : म्हणजे चूक

कोणते विधान असत्य नाही : म्हणजे बरोबर कोणते. ( is not incorrect)

काय खरे नाही : (not true)

पेपर सोडवताना वरील शब्द 👆काळजीपूर्वक वाचल्यास तुमच्या चूका नक्कीच कमी होतील.

English मधून वाचल्यास थोडे सोपे जाईल

उज्ज्वला 2.0” योजना..

❗️19 सप्टेंबर 2021 रोजी मध्य प्रदेश राज्यात “उज्ज्वला 2.0” (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना) योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जबलपूरमध्ये आयोजित केलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जवळपास 5 लक्ष महिलांना मोफत स्वयंपाकाचा गॅसच्या (LPG) जोडण्या देवून शुभारंभ करण्यात आला.

👍उज्ज्वला 2.0 योजनेचे वैशिष्ट्य..

❗️खेड्यातून अनेकजण कामासाठी शहरात स्थलांतरीत होतात. तिथे त्यांना अधिवासाचा पुरावा दाखवण्याबाबतच्या अडचणींचा सामना करावा लागतो. आता कामगारांना अधिवासाचा पुरावा सिद्ध करण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नाही. गॅस जोडणी मिळवण्यासाठी त्यांना फक्त आपल्या पत्त्याबाबत स्वघोषणापत्र सादर करावे लागणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

❗️प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक कल्याणकारी योजना आहे. वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे 2016 रोजी उत्तरप्रदेशाच्या बलिया या शहरात पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे उद्घाटन केले गेले होते. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना पुढील 3 वर्षांत प्रत्येक जोडणीसाठी 1600 रुपये इतका आधार निधी देऊन 5 कोटी LPG जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाची हमी देण्याच्या हेतूने विशेषत: ग्रामीण भारतात LPG जोडणी कुटुंबातल्या महिलेच्या नावाने दिले जाते. सध्या जवळपास 6.28 कोटींपेक्षा जास्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना विनामूल्य LPG टाकी मिळत आहे.

आजचे प्रश्नसंच

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
नाईल (4,132 मैल)

2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
आशिया

3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?
रशिया

4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
थ्री गोर्जस डँम (three gorges dam)

5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?
राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)

6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
ग्रीनलँड (Greenland)

7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?
अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)

8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
माउंट एव्हरेस्ट

9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?
मौसीमराम

10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
जेफ बेझोस

11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?
बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)

12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?
बुर्ज खलिफा

13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
व्हॅटिकन सिटी

14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 
5

15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?
वॉल-मार्ट

16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
कतर

17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?
कांगो

18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 
एंजल फॉल्स

19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?
जपानमधील बुलेट ट्रेन

20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)

21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
चीन

22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 
इनलंड ताईपान

23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
गुरु

24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?
बुध

25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?
21 जून

26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?
22 डिसेंबर

27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?
पॅसिफिक समुद्र

28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?
आर्टिक समुद्र

29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
बी हमिंग बर्ड

30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?
शहामृग

31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?
नील आर्मस्ट्रॉंग

32) विमानाचा शोध कोणी लावला?
राईट बंधू

33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?
सनातन धर्म

34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?
हिरोशिमा

35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?
एस. भंडारनायके (लंका)

36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
टोकियो

37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?
महाभारत

38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?
द टाइम्स ऑफ इंडिया

39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?
नार्वे सुरंग

40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?
ग्रेट वॉल ऑफ चीन

41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?
चीन

42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?
पंडित जवहरलाल नेहरू

43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?
युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका

44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?
सिकंदर

45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?
दयाराम साहनी

46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?
गुरुगोविंद सिंग

47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?
रझिया सुलतान

48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?
राजा हरिश्चंद्र

49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?
झाशीची राणी

50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?
लॉर्ड मेकॉले

माझी कन्या भाग्यश्री योजना

 

🎯1 ऑगस्ट 2017 पासून महिला आणि बाल विकास, महाराष्ट्र शासनातर्फे सर्वप्रथम 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

🎯या योजने अंतर्गत, शासन खालील प्रमाणे आर्थिक सहाय्य प्रदान करेल

या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

✍एक मुलगी: 18 वर्षे कालावधीसाठी रु. 50,000

✍दोन मुली: प्रत्येक मुलीचे नावे 25 हजार रुपये

🎯7.5 लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि फक्त कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभ

🎯प्रत्येक सहा वर्षांनंतर कुटुंब जमा व्याज काढून घेऊ शकते

IIT मद्रास ही भारतातील सर्वोत्तम संस्था आहे: NIRF इंडिया रँकिंग 2021..

💦केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘नॅशनल इंस्टीट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF)’ अंतर्गत ‘इंडिया रँकिंग 2021’ जाहीर करण्यात आली आहे.

💦चेन्नई (तामिळनाडू) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT मद्रास) याने ‘एकूणच’ तसेच ‘अभियांत्रिकी’ श्रेणीत प्रथम क्रमांक पटकवला आहे. सलग तिसऱ्या वर्षी या संस्थेने अव्वल स्थान मिळवले आहे.

🌈इतर श्रेणी -

🌤विद्यापीठ तसेच संशोधन संस्था श्रेणीत प्रथम क्रमांक – भारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू.
🌤व्यवस्थापन श्रेणीत प्रथम क्रमांक – भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) अहमदाबाद.
🌤वैद्यकीय श्रेणीत प्रथम क्रमांक – अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS), नवी दिल्ली.
🌤औषधीनिर्मिती / फार्मसी श्रेणीत प्रथम क्रमांक - जामिया हमदर्द.
🌤महाविद्यालय श्रेणीत प्रथम क्रमांक - मिरांडा कॉलेज.
🌤वास्तुकलाशास्त्र श्रेणीत प्रथम क्रमांक - IIT रुडकी.

💦विधी श्रेणीत प्रथम क्रमांक - नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळुरू.
दंत चिकित्सा श्रेणीत प्रथम क्रमांक - मणिपाल दंत विज्ञान महाविद्यालय, मणिपाल.

IIT मद्रास ही भारतातील सर्वोत्तम संस्था आहे: NIRF इंडिया रँकिंग 2021.


🧩केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘नॅशनल इंस्टीट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF)’ अंतर्गत ‘इंडिया रँकिंग 2021’ जाहीर करण्यात आली आहे.

🧩चेन्नई (तामिळनाडू) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT मद्रास) याने ‘एकूणच’ तसेच ‘अभियांत्रिकी’ श्रेणीत प्रथम क्रमांक पटकवला आहे. सलग तिसऱ्या वर्षी या संस्थेने अव्वल स्थान मिळवले आहे.

💥इतर श्रेणी -

🧩विद्यापीठ तसेच संशोधन संस्था श्रेणीत प्रथम क्रमांक – भारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू.
व्यवस्थापन श्रेणीत प्रथम क्रमांक – भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) अहमदाबाद.
वैद्यकीय श्रेणीत प्रथम क्रमांक – अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS), नवी दिल्ली.
औषधीनिर्मिती / फार्मसी श्रेणीत प्रथम क्रमांक - जामिया हमदर्द.
महाविद्यालय श्रेणीत प्रथम क्रमांक - मिरांडा कॉलेज.वास्तुकलाशास्त्र श्रेणीत प्रथम क्रमांक - IIT रुडकी.

🧩विधी श्रेणीत प्रथम क्रमांक - नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळुरू.
दंत चिकित्सा श्रेणीत प्रथम क्रमांक - मणिपाल दंत विज्ञान महाविद्यालय, मणिपाल.