इ. स.857 ते इ. स.1947 पर्यंत अखंड भारत सात देशांत विभागला गेला. वर्ष
इ.स.1947 मध्ये झालेली भारत पाकिस्तान फाळणी ही मागील
2500 वर्षांतील देशाची 24 वीं फाळणी होती.
इतिहासात हा उल्लेखच नाही
ज्या राजांनी, शक्तींनी मागील 2500 हजार वर्षांत
भारतावर आक्रमण केले त्यांनी अफगानिस्तान, मॅनमार,
श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप
किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्याचा उल्लेख
इतिहासातील कुठल्याच ग्रंथात नाही. त्यामुळे हे देश म्हणून
अखंड भारत असावे याला पुष्टी मिळते. पाकिस्तान आणि
बंगलादेशाची निर्मिती कशी झाली याचा इतिहास
सर्वांनाच माहिती आहे. परंतु, भारताचे तुकडे होऊन इतर देश कसे
निर्माण झाले, याची फारशी माहिती कुणाला नाही.
अशी होती अखंड भारताची सीमा
उत्तरेकडे हिमालय आणि दक्षिणेकडे हिंद महासागर या
भारताच्या सीमा होत्या, असा उल्लेख प्राचीन इतिहासात
आहे. परंतु, पूर्व आणि पश्चिमेच्या सीमेची काहीही माहिती
नाही. कैलास मानसरोवरवरून पूर्वेकडे गेले की, आताचा
इंडोनेशिया आणि पश्चिमेकडे गेले की इराण हा आर्यान प्रदेश
हिमालयाच्या अंतिम टोकाला आहे. अॅटलस यांच्या
मतानुसार, जेव्हा आपण पूर्व व पश्चिमेकडून श्रीलंका किंवा
कन्याकुमारीला पाहू तेव्हा लक्षात येईल की, हिंद महासागर
हा इंडोनेशिया व आर्यान (इराण) पर्यंतच आहे. या संगमानंतर
महासागराचे नाव बदलते. या प्रकारे हिमालय, हिंद महासागर,
आर्यान (इराण) आणि इंडोनेशियाच्या मधातील संपूर्ण भू-
भागाला हा आर्यावर्त किंवा भारतवर्ष असे म्हटले जात असे.
आतापर्यंत 24 विभाजन
राइट विंग इतिहासकारांनुसार, वर्ष 1947 मध्ये भारत-पाक
फाळणी झाली. मागील 2500 वर्षांत हे भारताचे 24 वे
विभाजन होते. इंग्रजांच्या उल्लेखानुसार इ.स.1857 ते इ.स.1947 पर्यंत
भारताची ही सातवी फाळणी आहे. इ.स.1857 मध्ये भारताचे
क्षेत्रफळ 83 लाख वर्ग किमी होते. आताचे क्षेत्रफळ 33 लाख
वर्ग किमी आहे. भारताच्या शेजारील राष्ट्रांचे क्षेत्रफळ 50
लाख वर्ग किमी आहे.
काय आहे अखंड भारत
आज भारताच्या चारही बाजूने असलेले देशांत 1800 वर्षांपूर्वी
बोली, संस्कृती, नृत्य, पूजापाठ, पंथ, वेशभूषा, संगीत सर्वच
भारतासाखरे होते. परंतु, परराष्ट्राचा संपर्क आल्याने त्यांची
संस्कृती बदलली.
2500 वर्षांत भारतावर झालेले हल्ले
मागील 2500 वर्षांत भारतावर अनेक अक्रमणे झाली. यामध्ये
यूनानी, यवन, हूण, शक, कुषाण, र्तगाली, फ्रेंच, डच आणि
इंग्रेजांचा समावेश आहे. या सर्वांत इतिसाहात उल्लेख आहे.
परंतु, या काळात अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ,
तिब्बेट, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर
आक्रमण झाल्याचा उल्लेख नाही.
रशिया आणि इंग्रजांनी बनवला अफगानिस्तान
26 मे 1876 रोजी रशिया आणि ब्रिटिश शासनामध्ये 'गंडामक
संधी' नावाचा करार झाला. त्या आधारे अफगानिस्तान
नावाचा नवा देश स्थापन झाला. पूर्वी हा देश भारताचाच
भाग होता. या करारामुळे तो भारतापासून वेगळा झाला. या
प्रदेशात राहणारे प्राचीन काळात शैव पंथीय होते. नंतर त्यांनी
बुद्ध धम्म स्वीकारला. पुढे ते मुस्लीम झाले. सम्राट शाहजहान,
शेरशाह सुरी आणि महाराजा रणजित सिंह यांच्या
शासनकाळात कंधार (गांधार) चा स्पष्ट उल्लेख आहे.
इ. स.1904 मध्ये दिला स्वतंत्र देशाचा दर्जा
पृथ्वी नारायण शाह यांनी मध्य हिमालयाच्या परिरातील
लहान लहान 46 राज्यांना एकत्र करून नेपाळ नावाचे राज्य
तयार केले होते. इंग्रजांनी वर्ष 1904 मध्ये या डोंगरवस्तीतील
राजांसोबत करार करून नेपाळला स्वतंत्र देशाचा दर्जा प्रदान
केला. या प्रकारे नेपाळचे भारतापासून विभागाजन झाले.
इंग्रजांच्या खेळीमुळे भूटान भारतापासून वेगळे
1906 मध्ये इंग्राजांनी भारताच्या ज्या भागाला
भारतापासून तोडले. तोच आज भूटान. इसवी सन सहाव्या
शतकापासून या देशाने बौद्ध धर्माचा अंगीकार केला.
कसा तयार झाला तिबेट
वर्ष 1914 मध्ये तिबेटला केवळ एक पक्ष मानत भारतातील
ब्रिटिश सरकार आणि चीनमध्ये एक करार झाला. त्या अंतर्गत
तिबेटला एक बफर राज्य म्हणून मान्यता देताना हिमालयला
विभाजित करण्यासाठी मॅकमोहन रेषा निर्माण करण्याचा
निर्णय झाला. यामध्ये हिमालयाची वाटणी करण्याचाही
डाव रचण्यात आला. पुढे चीनच्या साम्रज्यवादी भूमिकेमुळे
हा भाग चीनच्या ताब्यात गेला.
इंग्रजांनी दिली मान्यता
आपल्या नौसेनेला बळ देण्यासाठी इंग्रजांनी श्रीलंका आणि
नंतर मॅनमारला वेगळा देश म्हणून मान्यता दिली. ऐतिहासिक
आणि सांस्कृतिकदृष्ट्या हे दोन्ही देश भारताचा भाग होते.
भाषिक अस्मितेमुळे बंगलादेश
धर्माच्या आधारे 1947 मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली.
मात्र, पुढे भाषिक अस्मितेमुळे बंगाल भाषिकांनी 16 डिसेंबर
1971 ला पाकिस्तानपासून तुटून बांगलादेशाच्या
नावाखाली वेगळा देश निर्माण केला..
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
Ads
05 April 2022
महत्त्वाची माहिती
राणी लक्ष्मीबाई
महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर
टोपणनाव:मनू
जन्म:नोव्हेंबर १९, इ.स. १८३५
काशी, भारत
मृत्यू:जून १७, इ.स. १८५८
झाशी, मध्य प्रदेश
चळवळ:१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
प्रमुख स्मारके:ग्वाल्हेर
धर्म:हिंदू
वडील:मोरोपंत तांबे
आई:भागीरथीबाई तांबे
पती:गंगाधरराव नेवाळकर
अपत्ये:दामोदर (दत्तकपुत्र)
लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.
बालपण
लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.
व्यक्तिमत्त्व
धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.
वैवाहिक जीवन
इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.
दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.
गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.
झाशी संस्थान खालसा
पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणार्या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणाचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.
परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.
झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.
इ.स. १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध
इ.स. १८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकार
सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले.
अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.
दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.
उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.
शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान
व्यक्ती होती.’
या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.
भारत स्वातंत्र्याचा इतिहास
वाढते अराजक :
त्रिमंत्री योजनेनुसार संविधान समिती स्थापन करण्यासाठी जुलै 1946 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. राष्ट्रीय सभेला त्यात प्रचंड बहुमत मिळाले.
संविधान समितीत सहभागी होण्यास लीगने नकार दिला. पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी जोराने पुढे मांडण्यास लीगने सुरूवात केली. इतकेच नव्हे तर सनसदशीर मार्ग सोडून पाकिस्तानच्या निर्मितीसाठी हिंसाचाराचा मार्ग पत्करण्याचा मानस लीगने जाहिर केला.
या मार्गावरील पहिले पाऊल म्हणून 16 ऑगस्ट, 1946 हा प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून घोषित केला.
लीगच्या या निर्णयानुसार 16 ऑगस्ट रोजी लीगच्या अनुयायांनी लुटालुट, जाळपोळ, सशस्त्र हल्ले यांचे सत्र सुरू केले. कोलकता शहरात तर रस्तोरस्ती चकमकी झाल्या.
त्यात केवळ तीन दिवसांत चार हजार लोक मृत्युमुखी पडले.
बंगाल प्रांतातील नोआखालीच्या भागात भीषण हत्या झाल्या.
हा राक्षसी हिंसाचार थांबवण्यासाठी वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले गांधीजी बंगालच्या दौर्यावर गेले.
जातीय दंगलीचा भयानक वणवा पेटलेला असताना प्राणाची पर्वा न करता गावोगावी पदयात्रा करत लोकांची मने त्यांनी शांत केली.
परंतु देशातील परिस्थिती चिघळतच गेली.
देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात हिंसाचाराचे थैमान चालूच राहिले.
देशात असुरक्षिततेचे, तणावाचे व दहशतीचे वातावरण वाढत गेले.
हंगामी सरकारची स्थापना :
अशा अराजकाच्या परिस्थितीत गव्हर्नर जनरल र्लॉड वेव्हेल यांनी भारतीय प्रतिनिधींचे हंगामी सरकार स्थापन केले.
पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वा खालील मंत्रिमंडळाने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.
सुरूवतीला हंगामी सरकारमध्ये सामील होण्यास लीगने नकार दिला होता. परंतु तो निर्णय बदलून ऑक्टोबरमध्ये लीगचे सदस्य हंगामी सरकारमध्ये सामील झाले.
मंत्रिमंडळात शिरून अडवणुकीचे धोरण स्वीकारावे आणि हंगामी सरकारला कामकाज करणे अशक्य करावे. असा लीगचा निर्धार होता.
यामुळे मंत्रिमंडळात सतत खटके उडू लागले. सरकारचे कामकाज ठप्प होऊ लागले.
देशातील वाढत्या अराजकाला व हिंसाचाराला आवर घालणे हंगामी सरकारला जड जाऊ लागले. राजकीय तणाव पराकोटीला गेला.
'भारतावरील आपला ताबा इंग्लंड जून 1948 पूर्वी सोडून देईल', असे ब्रिटिश पंतप्रधान अॅटली यांनी जाहिर केले.
त्याचबरोबर भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे भारतीयांच्या हाती लवकर सोपवण्यासाठी र्लॉड माउंटबॅटन यांची नेमणूक भारताचे नवे गव्हर्नर जनरल म्हणून केल्याचेही त्यांनी घोषणा केले.
भारत स्वातंत्र्याचा इतिहास
1945 सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुध्द थांबले. त्यात इंग्लंडला विजय मिळाला खरा परंतु युध्दामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्य हानी फार मोठया प्रमाणावर झाली. त्यामुळे इंग्लंडची शक्ती कमी झाली.
तशातच सर्वसामान्य भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावरील ब्रिटीश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकत्र्यांना झाल्यामुळे भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला.
दुसरे महायुध्द संपता संपताच इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. विन्स्टन चर्चिल यांचे सरकार जाऊन क्लेमंट अॅटली यांच्या नेतृत्वा खालील मजूर पक्षाचे सरकार अधिकारावर आले.
भारताला शक्य तितक्या लवकर स्वातंत्र्य देण्याचा मानस पंतप्रधान अॅटली यांनी जाहिर केला.
तसेच तीन ब्रिटिश मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ भारताच्या भवितव्याबाबत भारतीयांशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवत असल्याचेही त्यांनी घोषित केले.
त्रिमंत्री योजना :
मार्च 1946 मध्ये इंग्लंड चे त्रिमंत्री मंडळ भारतात आले.
र्लॉड पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स व अलेक्झांडर हे या मंडळाचे सदस्य होते.
भारताबाबतची इंग्लंडची योजना त्यांनी भारतीय नेत्यांपुढे मांडली.तिला 'त्रिमंत्री योजना' असे म्हणतात.
ब्रिटिशांच्या शासना खालील प्रांत व संस्थाने यांचे मिळून भारतीय संघराज्य स्थापन केले जावे, या संघराज्याचे संविधान भारतीयांनीच तयार करावे, हे संविधान तयार होईपर्यंत भारताचा राज्यकारभार व्हाइसरॉयच्या सल्ल्याने भारतीयांच्या हंगामी सरकारने करावा असे या योजनेचे स्वरूप होते.
या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मंजूर नव्हत्या.
तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत नाही म्हणून लीगही असंतुष्ट होती.
यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णत: मान्य झाली नाही.
भारत स्वातंत्र्याचा इतिहास
माऊंटबॅटन योजना :
मार्च 1947 मध्ये र्लॉड लुई माउंटबॅटन भारतात आले.
त्यांनी सर्व प्रमुख भारतीय नेत्यांशी बोलणी केली त्यानंतर भारताची फाळणी करून भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या निर्मितीची योजना त्यांनी तयार केली.
भारतीय फाळणी होण्याची कल्पना भारतीयांना दु:सह होती.
देशाचे ऐक्य हा तर राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता.
परंतु पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास लीगने धरला. त्यासाठी हिंसाचाराचे थैमान देशात सुरू केले.
यामुळे फाळणी शिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी राष्ट्रीय सभेची खात्री झाली.
अतिशय नाइलाजाने फाळणीचा निर्णय राष्ट्रीय सभेला मान्य करावा लागला.
भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा :
माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै, 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला.
15 ऑगस्ट, 1947 रोजी भारताने विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील, त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताच अधिकार राहणार नाही, अशी तरतूद या कायद्याने केली.
भारत स्वातंत्र्याचा इतिहास
भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले :
भारताचे संविधान तयार करण्याचे काम संविधान समितीने 1947 साली सुरू केले.
या समितीत डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारखे ज्येष्ठ राष्ट्रीय पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बॅ. जयकर यांच्यासारखे प्रख्यात कायदेपंडित; तसेच सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता यांसारख्या कर्तबगार महिलाही होत्या.
संविधान समितीने तयार केलेले संविधान 26 जानेवारी, 1950 रोजी अमलात आले.
ब्रिटिश साम्राज्यवादाविरुध्द लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता व लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या.
या मूल्यांच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली.
संस्थानांचे भारतात विलीनीकरण :
भारतावरील ब्रिटिश सत्तेचा शेवट होताच भारतातील संस्थाने स्वतंत्र होतील अशी तरतूद भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यात केली होती.
संस्थानांनी स्वतंत्र राहायचे की भारत किंवा पाकिस्तान यांपैकी एका राज्यात विलीन व्हायचे हा निर्णय त्यांनी घ्यायला होता.
संस्थाने स्वतंत्र राहिली तर भारत शेकडो तुकडयांत विभागला जाणार होता. देशाची एकात्मता व सुरक्षितताही धोक्यात येणार होती.
संस्थानी प्रजा मात्र भारतात सामील होण्यास उत्सुक होती.
या पेचातून त्या वेळचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला.
भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे त्यांनी संस्थानिकांना पटवून दिले.
तसेच संस्थानिकांच्या प्रतिष्ठेला व मानमरातबाला धक्का लावला जाणार नाही असे आश्वासनाही त्यांनी दिले.
भारत सरकारशी करार करून संस्थानिकांनी फक्त संरक्षण, परराष्ट्रीय संबंध आणि दळणवळण या बाबी भारत सरकारच्या हाती सोपवाव्यात असे त्यांनी सुचवले.
याला संस्थानिकांनी मान्यता दिली. जूनागड, हैदराबाद व काश्मीर सोडून बहुतेक सर्व संस्थाने 15 ऑगस्ट, 1947 पूर्वी भारतात विलीन झाली.
जूनागडचे विलीनीकरण :
जूनागड हे सौराष्ट्रातील एक लहानसे संस्थान होते.
तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते, तर जूनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता.
त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला.
त्यानंतर फेब्रुवारी 1948 मध्ये जूनागड भारतात विलीन झाले.