18 April 2022

इतिहासातील महत्वाच्या घटना

इतिहासातील महत्वाच्या घटना :

क्र घटनेचे नाव वर्ष विशेष
1. प्लासीची लढाई 1757 सिराज उधौला व इंग्रज
2. भारताकडे येण्याचा सागरी मार्ग 1498 वास्को-द-गामा
3. वसईचा तह 1802 इंगज व पेशवे
4. बस्कारची लढाई 1764 शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज
5. सालबाईचा तह 1782 इंग्रज व मराठे
6. तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 1818 दुसर्‍या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट
7. अलाहाबादचा तह 1765 बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी
8. तैनाती फौज (सुरवात) 1797 गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी
9. दुहेरी राज्यव्यवस्था 1765 रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)
10. रेग्युलेटिंग अॅक्ट 1773 बंगालच्या गव्हर्नरला 'गव्हर्नर जनरल' हा किताब देण्यात आला.
11. सतीबंदीचा कायदा 1829 बेटिंग
12. भारतात इंग्रज सत्तेची सुरवात 1835 लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले
13. रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे) 1853 लॉर्ड डलहौसी
14. भारतातील पहिली कापड गिरणी 1853-54 काउसजी
15. पहिली ताग गिरणी 1855 बंगालमधील रिश्रा
16. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लॉर्ड डलहौसी
17. विद्यापीठांची स्थापना 1857 मुंबई,मद्रास,कोलकाता
18. 1857 चा कायदा 1857 भारतमंत्री पदाची निर्मिती
19. राणीचा जाहिरनामा 1 नोव्हेंबर 1858 लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला
20. वुडचा खलिता 1854 वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात
21. 1861 चा कायदा 1861 भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी
22. दख्खनचे दंगे 1875 महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन
23. शेतकर्‍याचा उठाव 1763 ते 1857 बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला</td>
24. हिंदी शिपायांचा उठाव 1806 वेल्लोर येथे झाला
25. हिंदी शिपायांचा उठाव 1824 बराकपूर
26. उमाजी नाईकांना फाशी 1832
27. संस्थाने खालसा 1848 ते 1856 डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)
28. मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी झाडली 29 मार्च 1857 बराकपूरच्या छावणीत
29. 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे 1857 ‘हर हर महादेव, मारो फिरंगी का’ अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू
30. भिल्लाचा उठाव 1857 खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली
31. गोंड जमातीचा उठाव – ओडिशा
32. संथाळांचा उठाव – बिहार
33. रामोशांचा उठाव – उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली
34. गडकर्‍याचा उठाव – कोल्हापूर
35. कोळी व भिल्लाचा उठाव – महाराष्ट्र
36. 1857 च्या उठावाचे नेतृत्व – बहादुरशाह
37. भारतातील पहिली कामगार संघटना 1890 नारायण मेघाजी लोखंडे
38. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882 लॉर्ड रिपन
39. हंटर कमिशन 1882 भारतीय शिक्षणविषयक आयोग
40. भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली 1878 लॉर्ड लिटन
41. भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली 1882 लॉर्ड रिपन

महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प प्रकल्पाची नवे व जिल्हे

महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प

क्र महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प प्रकल्पाची नवे व जिल्हे
1. महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प तुर्भ-मुंबई, खापरखेडा – नागपूर
बल्लारपूर – चंद्रपूर
चोला – ठाणे
परळी बैजनाथ – बीड
पारस – अकोला
एकलहरे – नाशिक
फेकरी – जळगाव
2. महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प खोपोली – रायगड
भिरा अवजल प्रवाह – रायगड
कोयना – सातारा
तिल्लारी – कोल्हापूर
पेंच – नागपूर
जायकवाडी – औरंगाबाद
3. महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प तारापुर – ठाणे
जैतापुर – रत्नागिरी
उमरेड – नागपूर
4. महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प जमसांडे – सिंधुदुर्ग
चाळकेवाडी – सातारा
ठोसेघर – सातारा
वनकुसवडे – सातारा
ब्रह्मनवेल – धुळे
शाहजापूर – अहमदनगर

महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय

महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय

क्र. घटना दुरूस्ती वर्ष घटना दुरूस्तीचा विषय

1. 1 ली घटना दुरूस्ती 1951 नवव्या परिशिष्टामध्ये जमीन सुधारण्याचा विषय समाविष्ट करण्यात आला.
2. 5 वी घटना दुरूस्ती 1955 राज्यांची सीमा, नावे, आणि क्षेत्रफळ यात बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला.
3. 15 वी घटना दुरूस्ती 1963 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आले.
4. 26 घटना दुरूस्ती 1971 संस्थानीकांचे तनखे बंद करण्यात आले.
5. 31 वी घटना दुरूस्ती 1973 लोकसभेचा सभासदांची संख्या 545 करण्यात आली.
6. 36 वी घटना दुरूस्ती 1975 सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला
7. 42 वी घटना दुरूस्ती 1976 मूलभूत कर्तव्यांचा समावेश, लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा करण्यात आला. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. घटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष व समाजवाद या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला.
8. 44 वी घटना दुरूस्ती 1978 संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कातून वगळण्यात आला.
9. 52 वी घटना दुरूस्ती 1985 पक्षांतर बंधी कायदा आणि 10 व्या परिशिष्टाची निर्मिती
10. 56 वी घटना दुरूस्ती 1987 गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.
11. 61 वी घटना दुरूस्ती 1989 मतदारांची वयोमर्यादा 21 वरून 18 करण्यात आली.
12. 71 वी घटना दुरूस्ती 1992 नेपाळी, कोकणी व मणिपुरी भाषांना घटनात्मक दर्जा देण्यात आला.
13. 73 वी घटना दुरूस्ती 1993 पंचायत राज, घटनात्मक दर्जा व अकरावी सूची
14. 74 वी घटना दुरूस्ती 1993 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक दर्जा व बारावी सूची
15. 79 वी घटना दुरूस्ती 1999 अनुसूचीत जाती-जमातीच्या राखीव जागांमध्ये कालावधीत वाढ 2010 पर्यंत
16. 85 वी घटना दुरूस्ती 2001 सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचीत जाती-जमातींना बढतीमध्ये आरक्षण
17. 86 वी घटना दुरूस्ती 2002 6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण
18. 89 वी घटना दुरूस्ती 2003 अनुसूचीत जाती जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना
19. 91 वी घटना दुरूस्ती 2003 केंद्रीय मंत्रिमंडळ आणि घटक मंत्रिमंडळात एकूण सभासदांच्या 15% मंत्र्यांची संख्या निर्धारित करण्यात आली.
20. 97 वी घटना दुरूस्ती – सहकारचा विकास
21. 108 वी घटना दुरूस्ती – महिलाना लोकसभा व विधानसभेमध्ये 33% आरक्षण
22. 109 वी घटना दुरूस्ती – मागासवर्गीयांची राजकारणातील आणि शासकीय नोकर्‍यांमधील आरक्षणाची मुदत 10 वर्षानी वाढवण्यात आली.
23. 110 वी घटना दुरूस्ती – महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था/ पंचायत राजमध्ये 50% आरक्षण
24. 113 वी घटना दुरूस्ती – ओडिशा राज्यातील नावातील बदल
25. 115 वी घटना दुरूस्ती 2011 जिएसटी कराच्या संदर्भात

भारतातील विभाग व त्यांची मुख्यालय

भारतातील विभाग व त्यांची मुख्यालय

विभागाचे नाव -मुख्यालय
1.मध्य विभाग -मुंबई
2.पूर्व विभाग -कोलकाता
3.उत्तर विभाग -नवी दिल्ली
4.उत्तर पूर्व -विभागगोरखपूर
5.उत्तर पूर्व -सीमा विभागगुवाहाटी
6.दक्षिण -विभागचैनई
7.दक्षिण मुख्य  -विभागसिकंदराबाद
8.दक्षिण पूर्व - विभागकोलकाता
9.पश्चिम विभाग -चर्चगेट-मुंबई
10.पूर्व मध्य  विभागहाजीपूर – बिहार
11.पूर्व किनारी - विभागभुवनेश्वर
12.उत्तर मध्य  विभाग -अलाहाबाद
13.उत्तर पश्चिम विभाग-जयपूर
14.दक्षिण पूर्व मध्य विभाग-विलासपुर
15.दक्षिण पश्चिम विभाग-हुगळी
16.पश्चिम मध्य विभाग-जबलपूर
17.मेट्रो रेल्वे झोन-कोलकाता

घटनादुरूस्ती 91 ते 103 पर्यंत

91 घटनादुरूस्ती
मंत्रीमंडळाच्या आकार मर्यादित ठेवणे, सार्वजनिक पदे धारण करण्यापाससून, पक्षांतर करणाऱ्यांना रोखणे आणि पक्षांतर बंदी कायदाबळकट करणे या उद्देशाकरिता पुढील तरतुदी केल्या.

१) प्रधानमंत्र्यासहित, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभेच्या एकुण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असूनये (अनु. ७५ क)

२) संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही सभागृहातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे आपात्र धोषितकेले असेल तर, तो व्यक्ती मंत्रिपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल (अनु. ७५’ १ ख)

३) मुख्यमंत्र्यासहित, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या संबंधित राज्याच्या विधानसभेतील एकुण सदस्यसंख्येच्या १५टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. परंतु मुख्यमंत्र्यांसहित, एकूण मंत्र्यांची संख्या १२ पेक्षा कमी असू नये. (अनु. १६४ क)

४) राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्या सभागृहातील, कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्रघोषित केले असेल तर तो व्यक्ति मंत्रिपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल (अनु. १६४ ‘१ ख’)

५) संसदेच्या किंवा राज्यविधिमंडळाच्या सदस्यापैकी, कोणत्याही पक्षाचा सदस्य असणाऱ्याला पक्षांतराच्या आधारे अपात्र घोषितकेलेले असेल तर, तिला इतर कोणतेही मोबदला प्राप्त राजकीय पद भुषविता येणार नाही. मोबदला प्राप्त (मेहताना) राजकीयपद म्हणजे -क) केंद्र वा राज्य शासनाच्या अखत्यारीतील असे कोणतेही पद.

जिल्हा संबंधित शासनाच्या सार्वजनिक महसुलाूतून वेतन वामोबदला दिला जातो.ख) एखाद्या संस्थांतर्गत वा मंडळांतर्गत पद, जिचा समावेश शासनामध्ये केलेला असेल आणि त्या पदासाठी ते मंडळ/संस्था वेतनवा मोबदला देत असेल (अपवाद, असे वेतन वा मोबदल्याचे स्वरूप नुकसान भरपाईचे असेल तर (अनु. ३६१ ख).

६) १० व्या परिशिष्टामधील पक्षांतरबंदी कायद्यामध्ये तरतूद केली होती की, विधिमंडळीय (मुळच्या) पक्षापासून विभक्त झाल्यास तेपक्षांतरामुळे अपात्र ठरणार नाही. या घटनादुरूस्तीने ही तरतूद रद्द केली. याचाच अर्थ पक्षांतर करणाऱ्यांना फुटीचा आधार घेऊनकोणतेही संरक्षण उपलब्ध नाही.

92 घटनादुरूस्ती
१) ८ व्या परिशिष्टामध्ये आणखी चार नव्या भाषांचा समावेश आला.त्या भाषा- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली होत. अशाप्रकारे घटनेची मान्यता असलेल्या भाषांची संख्या २२ झाली.

93 घटनादुरूस्ती
१) अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचा अपवाद करून खाजगी शैक्षणिक  संस्थासह (राज्याकडून निधी मिळणाऱ्या वा न मिळणाऱ्या) इतर शैक्षणिक संस्थां ध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी किंवा अनुसूचित जाती वा जमातींसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला दिला.

इनामदार खटल्यामध्ये (२००५) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला या घटनादुरूस्तीनेनिकालात काढले. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते की, राज्यसंस्था तिचे आरक्षण धोरण, व्यावसायिक महाविद्यालयासह, अल्पसंख्यांक आणि बिगर अल्पसंख्यांक विना अनुदानित खाजगी महाविद्यालयासह, अल्पसंख्यांक आणि बिगर अल्पसंख्यांक विना  अनुदानित खाजगी महाविद्यालयांवर लादू शकत नाही. खाजगी, विना अनुदानित शिक्षण संस्थांध्ये आरक्षण ही बाब बिगर घटनात्मकअसल्याचे न्यायालयाने घोषित केले.

94 घटनादुरूस्ती
१) आदिवासी कल्याणमंत्री असण्याच्या  आबंधनातून बिहार राज्याला वगळण्यात आले आणि ही तरतूद झारखंड व छत्तीसगड या राज्यांना लागू केली. या शिवाय ही तरतूद मध्यप्रदेश आणि ओरिसा (या दोन राज्यांत अंलात होतीच. अनु. १६४ (१)) या राज्यांना देखील लागू असेल

95 घटनादुरूस्ती
१) अनुसूचित जाती आणि जमाती तसेच आंग्ल-भारतीय समाजाच्या  प्रतिनिधीत्वासाठी लोकसभा आणि विधानसभांध्ये आरक्षित जागांची मुदत १० वर्षांकरिता (२०२० पर्यंत) वाढविली.

96 घटनादुरूस्ती
१) इंग्रजी भाषेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या ‘उरिया’ (जीळूर) भाषेचा उच्चार बदलवून ‘उडिया’ करण्यात आले.

97 घटनादुरूस्ती
या घटनादुरूस्तीद्वारे सहकारी संस्थांना एक घटनात्मक दर्जा आणि संरक्षण प्रदान करण्यात आले. या घटनादुरूस्तीद्वारे संविधानामध्ये खालील तीन बदल करण्यात आले.१) सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश मुलभूत अधिकारात करण्यात आला.२) राज्याच्या नीतीमध्ये सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी एका नवीननीती निर्देशक तत्वाचा समावेश करण्यात आला. (अनुच्छेद ४३ ख)३) सहकारी संस्था या नावाने एक नवीन भाग ९ (ख) संविधानातजोडण्यात आला (अनु. २४३ यज ते २४३ यन)

98 घटनादुरूस्ती
कर्नाटक राज्यातील हैद्राबाद-कर्नाटक क्षेत्रासाठी विशेष तरतूदी करण्यात आली. या क्षेत्राच्या विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निधीचे न्यायवाटप व्हावे,तसेच मानवी संसाधनाचा प्रोत्साहन मिळावेआणि सेवांध्ये स्थानीकांना संधी देऊन आणि शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षणातून आरक्षण देऊन रोजगाराला चालना देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा स्थापन करावी, हा या विशेष तरतूदींचा उद्देश आहे. (अनुच्छेद ३७१-ण)

99 घटनादुरूस्ती
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची कॉलेजियम पद्धत रद्द करून त्याऐवजी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची (NJAC) रचना करण्यात आली. परंतु १६ ऑक्टोबर २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही घटना दुरूस्ती घटनाबाह्य ठरविली. तसेच पुर्वीची न्यायिकनियुक्तीची कॉलेजियम पद्धत पुन्हा प्रस्थापित झाली आहे.

100 घटनादुरूस्ती
या घटनादुरूस्तीन्वये बांग्लादेशमधील काही प्रदेश भारतात समाविष्ट करण्यात आला तर भारतातील काही प्रदेश बांग्लादेशला देण्यात आला. (आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय व त्रिपुरा या चार राज्यांच्याप्रादेशिक क्षेत्रात बदल करण्यात आले आहेत)

101 घटनादुरूस्ती
आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्याच्या प्रक्रियेतील पुरवठ्यावर भारत सरकार कडून वस्तु व सेवाकर लावला जाईल व गोळा केला जाईल आणि असा कर वस्तु व सेवा कर परिषदेच्या शिफारशी नंतरसंसदेने कायदा करून विहित केलेल्या पद्धतीनुसार केंद्र व राज्यांध्ये विभागला जाईल. तसेच संविधानामध्ये २७९-क अनुच्छेदानुसारवस्तु व सेवा परिषदेचे स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे. (अनुच्देद २४६क, २६९ क आणि २७९ क) यांचा नव्याने समावेश करून २६८-क रद्द करण्यात आले आहे)

102 घटनादुरूस्ती
या घटनादुरूस्तीन्वये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने घटनात्मक दर्जा देण्यात आला.

103 घटनादुरूस्ती
आर्थिक मागासवर्गासाठी केेंद्रिय पातळीवर शैक्षणिक संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्था (अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था सोडून) आणि केंद्रिय नोकऱ्यांध्ये १० टक्के जागा राखीव ठेवणे बाबत तरतूद.

घटनादुरूस्ती 61 ते 90 पर्यंत

61 घटनादुरूस्ती
१) लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूकींध्येमतदारांचे वय २१ वरून १८ वर्षे करण्यात आले. तसेच पहिल्यांदादोन अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात आली.

62 घटनादुरूस्ती
१) अनुसूचीत जाती आणि जमाती तसेच, आंग्ल-भारतीय समाजाच्याप्रतिनिधीत्वासाठी लोकसभा आणि विधानसभांध्ये आरक्षित जागांचीमुदत १० वर्षाकरिता (२००० पर्यंत) वाढविली.

63 घटनादुरूस्ती
१) ५९ व्या घटनादुरूस्तीने (१९८८) पंजाब राज्या बाबदकेलेले बदल मागे घेतले. दुसऱ्या शब्दांत, आणीबाणी तरतुदींच्या संदर्भात पंजाब राज्याला इतर राज्याच्या समकक्ष आणले.

64 घटनादुरूस्ती
१) पंजाबमधील आणीबाणीचा एकूण कालावधी ३ वर्षे ६ महिण्यापर्यंत विस्तारीत केला.

65 घटनादुरूस्ती
१) अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी विशेष अधिकारीनेण्याच्या तरतुदी ऐवजी त्यांच्याकरिता बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्याची तरतूद केली.

66 घटनादुरूस्ती
१) ९ व्या परिशिष्टामध्ये विविध राज्यांच्या आणखी  ५५ जमीन सुधारणा कायद्यांचा समावेश.

67 घटनादुरूस्ती
१) पंजाब मधील राष्ट्रपती  राजवटीचा एकुण कालावधी ४ वर्षापर्यंत वाढविला.

68 घटनादुरूस्ती
१) पंजाबमधील राष्ट्रपती राजवटीचा एकुण कालावधी पुन्हा ५ वर्षापर्यंत वाढविला.

69 घटनादुरूस्ती
१) दिल्ली राष्ट्रीय राजधानी भुप्रदेश अशी पुनर्रचना करून दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला विशेष दर्जा दिला या दुरूस्तीने दिल्लीसाठी ७० सदस्यीय विधानसभा आणि ७ सदस्यीस मंत्रिमंडळांची देखील तरतूद केली.

70 घटनादुरूस्ती
१) राष्ट्रीय राजधानीचा भुप्रदेश (छउठ ऊशश्रहळ) असलेल्या दिल्ली आणि पाँडेचेरीया केेंद्रशासित प्रदेशांतील विधानसभा सदस्यांचा समावेश राष्ट्रपती पदाच्यानिवडणुकीसाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये करण्यात आला.

71 घटनादुरूस्ती
१) कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी भाषांचा समावेश ८ व्या परिशिष्टामध्ये करण्यात आला. यामुळे अनुसूचितभाषांची एकुण संख्या १८ झाली.

72 घटनादुरूस्ती
१) त्रिपुरा राज्यांच्या विधानसभेध्ये अनुसूचित जमातींसाठी राखीव जागा ठेवण्याची तरतूद.73 घटनादुरूस्ती

२) पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मंजूर केले.या हेतुपूर्तीसाठी पंचायत या शीर्षकाखाली संविधानामध्ये ९ व्याभागाचा समावेश करण्यात आला. याशिवाय नवीन ११ व्या परिशिष्टामध्येपंचायतीच्या २९ कार्यात्मक बाबींचा समावेश केला.

74 घटनादुरूस्ती
१) नागरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मंजूरकेले. या हेतू पूर्तीसाठी नगरपालिका या शीर्षकाखाली संविधानामध्ये९ (क) या नविन भागाचा समावेश करण्यात आला. याशिवाय नविन१२ व्या परिशिष्टामध्ये नगरपालिकांच्या १८ कार्यात्मक बाबींचा समावेश केला.

75 घटनादुरूस्ती
१) भाडे व त्याचे नियंत्रण आणि नियमन या संबंधातील वादांच्यान्यायनिवाड्यासाठी भाडे न्यायासनाची स्थापना करण्याची तरतूद केली.याशिवाय जमीन मालक आणि कुळे यांचे हक्क शीर्षक आणि हितसंबंधांचा समावेश वहिवाट विषयामध्ये केला.

76 घटनादुरूस्ती
१) न्यायालयीन पुनर्विलोकनापासून सरंक्षण देण्यासाठी तामिळनाडू आरक्षण  अधिनियम (१९९४) याचा ८ या कायद्याने शैक्षणिक संस्था आणि राज्यसेवेतील पदांध्ये ६९ टक्के आरक्षण देऊन त्याचा समावेश ९ व्या परिशिष्टामध्ये करण्यात आला. १९९२ साली सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की एकुण आरक्षण मर्यादा ५० टक्के च्या पुढे जाऊ नये.

77 घटनादुरूस्ती
१) अनुसूचित जाती आणि जमातींना शासकीय नोकऱ्यांधील बढत्यांध्येआरक्षण देण्याची तरतूद केली. बढत्यांधील आरक्षणाबाबद सर्वोच्चन्यायालयाच्या निवाड्याला या घटनादुरूस्तीने समाप्त केले.

78 घटनादुरूस्ती
१) ९ व्या परिशिष्टामध्ये विविध राज्यांतील जमीन सुधारणाविषयक२७ कायद्यांचा समावेश केला. त्यानंतर या परिशिष्टामध्ये एकूणकायद्यांची संख्या २८४ झाली.

79 घटनादुरूस्ती
१) अनुसूचित जाती आणि जमाती तसेच आंग्ल-भारतीय समाजाच्या प्रतिनिधीत्वासाठी लोकसभा आणि विधानसभांध्ये आरक्षित जागांची मुदत १० वर्षाकरिता (२०१० पर्यंत) वाढविली.

80 घटनादुरूस्ती
१) केंद्र आणि राज्यांध्ये महसुलाच्या पर्यायी हस्तांतरणाची योजनासुरू केली. १० व्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या आधारे ही तरतूद केली. आयोगाच्या मते कर आणि शुल्कांपासून केंद्राला प्राप्त होणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी (आय) २९ टक्के रक्कम राज्यांध्ये वितरित केली जावी.

81 घटनादुरूस्ती
१) एखाद्या वर्षी भरण्यात न आलेल्या आरक्षित जागांचा विचार सरकारने (राज्याने) रिक्त पदांचा स्वतंत्र वर्ग या दृष्टीने करावा आणि पुढील वर्षाध्ये किंवा वर्षाध्ये त्या भरण्याचे अधिकार राज्याला दिले. या स्वतंत्र वर्गाचा समावेश त्यावर्षीच्या रिक्त जागांध्ये करू नये. थोडक्यात या घटनादुरूस्तीने अनुशेष रिक्त जागांच्या आरक्षणातील ५० टक्क्यांची मर्यादा संपुष्टात आणली.

82 घटनादुरूस्ती
१) अनुसूचित जाती आणि जमातींसाठी कोणत्याही परीक्षेच्या पात्रता गुणांध्ये शिथिलता देणे किंवा त्यांच्या मूल्यांकनाचा दर्जा कनिष्ठ ठेवण्याची तरतूद केली. याशिवाय केंद्र आणि राज्यांच्या लोकसेवामध्ये चालना देण्यासाठी त्यांना आरक्षण दिले.

83 घटनादुरूस्ती
१) अरूणाचल प्रदेशमध्ये अनुसूचित जातींसाठी पंचायतीमध्ये आरक्षण देण्याची आवश्यकता नाही. कारण संपूर्ण राज्याची लोकसंख्या ही आदिवासी असून तेथे अनुसूचित  जाती नाहीत.

84 घटनादुरूस्ती
१) लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांधील सदस्य संख्या पुढील२५ वर्षाकरिता (२०२६ पर्यंत) पुनर्रचित करण्यावर निर्बंध घातल्या म्हणजेच,२०२६ पर्यंत लोकसभा आणि विधानसभांधील सदस्य संख्या तीच (२००१पूर्वीची) राहणार आहे. १९९१ च्या जनगणनेच्याआधारे राज्यांधील भौगोलिकमतदार संघाची पुनर्रचना करण्याची तरतूद केली. यापूर्वी १९७१ ची जनगणना आधारभूत मानली होती.

85 घटनादुरूस्ती
१) जून १९९५ पासून पुर्वानुवर्ती परिणामाद्वारा अनुसूचित जाती आणि जमातींच्या शासकीय, सेवकांसाठी असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार बढतीमध्ये अनुक्रमणात्मक सेवाज्येष्ठताहे तत्व लागू केले.

86 घटनादुरूस्ती
१) प्राथमिक शिक्षणाचा मुलभूत हक्कामध्ये  समावेश केला. यानुसार समाविष्ट केलेले  अनुच्छेद २१ (क) म्हणजे राज्यसंस्थातिने निश्चित केलेल्या रितीने ६ ते १४वयोगटातील सर्व मुला-मुलींनामोफत  आणि सक्तिचे शिक्षण पुरवेल.

२) मार्गदर्शक तत्वांधील अनुच्छेद ४५ च्या विषयामध्ये बदल केला. त्यानुसार सर्व मुलांच्या वयाची ६ वर्षे पुर्ण होईपर्यंत राज्यसंस्था त्यांना प्रारंभिक बाल्यावस्थेत संगोपन आणि शिक्षण पुरविण्याचा प्रयत्न करेल.

३) अनुच्छेद ५१ (क) अंतर्गत नवीन मुलभूत कर्तव्य (११ वे) समाविष्ट करण्यात आले त्यानुसार, ६ ते १४ वयोगटातील मुला-मुलींचे आई वडिल वा पालक असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांचे हे कर्तव्य असेल की, त्यांनी आपल्या मुलांना वा पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी.

87 घटनादुरूस्ती
१) १९९१ च्या जनगणने ऐवजी (८४ वी घटनादुरूस्ती) २००१ सालच्या जनगणने ऐवजी भौगोलिक मतदारसंघाची पुनर्रचनाकरण्यात यावी.

88 घटनादुरूस्ती
१) सेवा कराबाबत (अनु. २६८ क मध्ये) तरतूद केली. केंद्राकडून सेवांवर कर लादले जातील. परंतु, त्याची वसूली आणि वितरण संसदेने ठरवून दिलेल्या तत्वाप्रमाणे केंद्र आणि राज्यामध्ये केले जातील.

89 घटनादुरूस्ती
१) अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी पूर्वी  संयुक्त असलेल्या राष्ट्रीय आयोगाचे विभाजन करण्यात आले. त्यानुसार दोन राष्ट्रीय आयोग अनुक्रमे अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग (अनु. ३३८) आणि अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग (अनु. ३३८ क) स्थापन करण्यात आले. प्रत्येक आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर तीन सदस्य असतात. त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.

90 घटनादुरूस्ती
१) आसामच्या विधानसभेध्ये बोडोलँड टेरिटोरीयल  एजियाज डिस्ट्रिक्ट मधून अनुसूचित जमाती आणि बिगर अनुसूचित जमातींच्या पूर्वाश्रमीच्या प्रतिनिधीत्वामध्ये सातत्य राखण्याची तरतूद केली.