26 April 2022

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्रातील नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून उपलब्ध आहे. राजकीय कालखंडानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मोगल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.

महाराष्ट्र राज्यःनकाशा
प्राचीनकाळसंपादन करा
नावाचा उगमसंपादन करा
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे ह्युएनत्संग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु जे चूक आहे ! कारण महार शब्दाचा उल्लेख 12 व्या शतका आधी कोणत्याच साधनांत सापडत नाही ! महाराष्ट्र शब्दाची फोड " महा राष्ट्र " असा होतो ! महारठ्ठ हे महाराष्ट्राचे प्रकृत नाव आहे ! प्राकृत भाषेत रठ्ठ म्हणजे राष्ट्र होय ! काहींच्या मते हे नाव महा-कंतारा (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.

पहिलेसंपादन करा
मध्यपाषाणकालामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व ४०००मध्ये धान्याची लागवड तापी नदीच्या खोऱ्यात सुरू झाली. महाराष्ट्रातील जोर्वे येथे जे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमतः सापडले, ते इसवी सन पूर्व १५०० चे आहेत. या संस्कृतीचे नाव त्या गावाच्या नावावरून ठेवले आहे. त्या गावात मुख्यतः रंगवलेली व तांब्यापासून बनवलेली भांडी आणि शस्त्रे सापडली. तेथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. तेथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली होती. ते विविध पिके उगवत होते. तेथील घरे मोठी चौकोनी, चटयांपासून व मातीपासून बनवलेली असत. कोठारांत व कणगीत धान्य साठवत असत. स्वयंपाक दोन कोनी चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस

अश्ववाहक/राऊत समाजसंपादन करा
पहिले नागरिकीकरणसंपादन करा
मौर्य ते यादवसंपादन करा
(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)

मौर्य साम्राज्याचा काळसंपादन करा
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.

सातवाहन साम्राज्याचा काळसंपादन करा
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.

वाकाटकांचा काळसंपादन करा
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.

कलाचुरींचा काळसंपादन करा
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.

बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळसंपादन करा
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती व राष्ट्रकूटांचा काळ

वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.

यादवांचा काळसंपादन करा
महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्यसंपादन करा

अजिंठातल्या लेणी
महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे ३ऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगध साम्राज्याचा एक भाग झाला. सोपारा हे बंदर (हे मुंबईच्या उत्तरेस असून आज नालासोपारा या नावाने ओळखले जाते) प्राचीन भारताच्या व्यापाराचे केंद्र होते. या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचीन या ठिकाणी व्यापार होत असे. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स ७८मध्ये गौतमीपुत्र सत्कारणी (शालिवाहन) हा महाराष्ट्राचा राज्यकर्ता होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही चालू आहे. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला. दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मोहंमद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले.मोहंमद बिन तुघलक याने आपली राजधानी दिल्लीहून हलवून दौलताबाद येथे केली.बहमनी सुल्तानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले. १६व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मुघल साम्राज्यांशी संलग्न असलेल्या अनेक इस्लामी राजवटींनी मध्य महाराष्ट्र व्यापलेला होता तर किनारपट्टीवर मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराच्या हेतूने आलेल्या पोर्तुगीज यांचा अंमल होता.

मराठा साम्राज्याचा उदय

छत्रपती शिवाजी महाराज
महाराष्ट्राच्या इतिहासाला वेगळीच कलाटणी ही १९ फेब्रुवारी १६३०ला मिळाली कारण त्या दिवशी जुन्नर येथील शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला . महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मा वेळी मुघलांचे व आदिलशाहीचे राज्य होते .पण छत्रपती शिवाजी महाराज काही मुटभर मावळे घेऊन नवीन इतिहासाला सुरुवात किली. १६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजे भोसल्यांनी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणागड जिंकला आणि १७व्या शतकाच्या मध्यास पश्चिम महाराष्ट्रात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवाजीराजांमुळे प्रथमच विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मोगल साम्राज्याविरोधात स्वतंत्र मराठा राज्य(हिंदवी स्वराज्य) उदयास आले. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराजांना १६७४ मध्ये राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना औरंगजेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. मोगलांनी संभाजीराजांचे धाकटे बंधु राजाराम यांना दक्षिणेस पिटाळले. राजाराम भोसल्यांनी जिंजी किल्ल्याची दुरुस्ती १८व्या शतकाच्या सुरुवातीस केली, जेव्हा तेथील परिस्थिती सुधारली होती. राजारामांचे पुतणे शाहू भोसले हे १७०८ साली मराठी दौलतीच्या गादीवर बसले. या कामास त्यांचे पेशवे (मुख्य मंत्री) बाळाजी विश्वनाथ यांची साथ मिळाली. राजारामांची विधवा पत्नी ताराबाई यांच्याशी शाहू भोसले यांचे मतभेद होते. चार दशकांनंतर 'छत्रपतींच्या' (भोसले राजघराण्यातील) नावाने राज्यकारभार पाहणाऱ्या पेशव्यांच्या हाती मराठा साम्राज्याची सूत्रे आली. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले.

पेशव्यांचा काळसंपादन करा
बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव (पहिले) यांनी मराठा राज्य चालव‍ले. त्यांनी मोगल राज्यांकडून कर व सरदेशमुखी व चौथाई यांच्यासारखा सारा वसूल करण्याची प्रथा पाडली. पेशव्यांनी ग्वाल्हेर शिंदेंना, इंदूर होळकरांना, बडोदा गायकवाडांना तर धार पवारांना दिले. पेशव्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली (पानिपत), गुजरात (मेहसाणा), मध्य प्रदेश (ग्वाल्हेर, इंदूर), व दक्षिणेस तंजावरपर्यंत मराठी राज्य वाढविले. इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालींनी पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याचा एकसंधपणा नष्ट झाला व साम्राज्याची अनेक संस्थानांत विभागणी झाली. पेशव्यांचे माजी सरदार आपआपले राज्य सांभाळू लागले तर पुणे पेशवे परिवारांकडे राहिले. भोसल्यांची एक शाखा कोल्हापुरात शाहूच्या काळातच गेली होती तर मुख्य शाखा सातारा येथेच राहिली. कोल्हापूरचे भोसले म्हणजेच राजाराम महाराज यांचे वंशज. त्यांनी इ.स.१७०८ रोजी शाहूंचे राज्य अमान्य केले. १९व्या शतकापर्यंत कोल्हापूरच्या भोसल्यांनी छोट्या भूभागावर राज्य केले.

== ब्रिटिश """

ब्रिटिशांना विरोधसंपादन करा

लोकमान्य टिळक
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स.१७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१८मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांचे राज्य काबीज केले. सध्याच्या महाराष्ट्राचा विदर्भ आणि मराठवाडा सोडून इतर हिस्सा ब्रिटिशांच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा एक भाग होता. बॉंबे प्रेसिडेन्सीला मराठीत मुंबई इलाखा म्हणत. मुंबई इलाख्यात कराचीपासून ते उत्तर कर्नाटक(धारवाड, हुबळी, बेळगांव, कारवार, विजापूर्)पर्यंतचे भूभाग समाविष्ट होते. अनेक मराठी राजे ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य संभाळीत होते. आजचे नागपूर, सातारा व कोल्हापूर हे त्या काळात विविध राजांच्या ताब्यात होते. सातारा इ.स.१८४८ साली मुंबई इलाख्यात तर नागपूर इ.स.१८५३साली नागपूर प्रांतात (व नंतर मध्य प्रांतात) सामील करण्यात आले.. (वऱ्हाड)बेरार हा हैदराबादच्या निजामाच्या राज्याचा एक भाग होता. ब्रिटिशांनी इ.स १८५३ मध्ये बेरार काबीज केले व १९०३ मध्ये मध्य प्रांतात समाविष्ट केले. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांना सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोई-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उगारला, जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद होते.

। सामाजिक पुनर्रचना चळवळ ।संपादन करा
।।महाराष्ट्र राज्याची निर्मिती ।संपादन करा

हुतात्मा स्मारक,मुंबई
पहा संयुक्त महाराष्ट्र चळवळ

भारताला इ.स.१९४७ साली स्वातंत्र्य लाभले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरून मराठी-जनात क्षोभ उसळला. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९ व्या शतकापासून विविध मराठी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी व समाजाने सामाजिक उत्क्रांती आणि राजकीय स्वातंत्र्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोलाचे योगदान केले. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागास एकत्र आणले. स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय दृष्ट्या यशस्वी अशा सहकारी चळवळी आणि जातीय गणितातील प्रभुत्वाने काँग्रेस पक्षाचे शासनात वर्चस्व राहिले. राजकीय समीकरणात मराठा समाज व पश्चिम महाराष्ट्र सदैव अग्रणी राहिला. श्री. य. दि. फडके या इतिहासकारांनी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा काळाचा उद्बोधक आढावा घेतला आहे.

स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राचे योगदानसंपादन करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळसंपादन करा
स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली. १०७ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.

ए.पी.जे. अब्दुल कलाम

ए.पी.जे. अब्दुल कलाम
भारतातील शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती

ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक(इंजिनिअर) होते. त्यांनी डी.आर डी.ओ. मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते. डॉ. कलाम हे भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी होते. या कारणास्तव त्यांना "मिसाईल मॅन" असेही म्हणतात. २००२ मध्ये कलाम हे भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि ५ वर्षांच्या कार्यकाळानंतर ते शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेत परत गेले.

भारतरत्न , भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती. अवुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम
A. P. J. Abdul Kalam.jpg
भारताच्या ११ वे राष्ट्रपती
कार्यकाळ
जुलै २५, इ.स. २००२ – २५ जुलै २००७
पंतप्रधान
अटल बिहारी वाजपेयी
उपराष्ट्रपती
हमीद अन्सारी
पुढील
प्रतिभा पाटील
राष्ट्रीयत्व
भारतीय
राजकीय पक्ष
अपक्ष
व्यवसाय
वैज्ञानिक, एरोनॉटिकल इंजिनिअर.
शिक्षण संपादन करा
अब्दुल कलाम यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आणण्याचा व्यवसाय करीत. मुलाच्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्या काॅलेजातून अवकाशसंशोधन(एरोनाटिक्स)चा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.

कार्य संपादन करा
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल)च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.

राष्ट्रपतिपदाचा काळ .

२००२ च्या निवडणुकीच्या निवडणुकीत ९,२२,७८४ मतदारांच्या मतांनी लक्ष्मी सहगल यांनी मिळवलेल्या १,०७,३६६ मतांना मागे टाकीत कलाम यांना राष्ट्रपती केले. कलाम भारताच्या प्रजासत्ताक देशाच्या ११व्या अध्यक्षपदावर यशस्वी ठरले  आणि २५ जुलै रोजी शपथ घेण्याआधी राष्ट्रपती भवनमध्ये दाखल झाले. यांना राष्ट्रपती बनण्यापूर्वी भारत रत्न हा भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान मिळाला होता. असे कलाम हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. यापूर्वी डॉ सर्वेपल्ली राधाकृष्णन (१९५४) आणि डॉ.जाकिर हुसेन (१९६३) हे आधी भारतरत्नचे लाभकर्ते होते व नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. कलाम हे राष्ट्रपती भवनवर आलेले प्रथम शास्त्रज्ञ होते.

कलाम यांच्या अध्यक्ष म्हणून केलेल्या कामामुळे त्यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणतात.त्यांनी सांगितले की, त्यांचे कार्यकालात प्रॉफिट बिल ऑफिसवर घेण्यात आलेले निर्णय सर्वात कठीण होते.  आपल्या कार्यकाळात tyana सादर केलेल्या २१ दया याचिकापैकी २० फेटाळून लावल्यामुळे कलाम यांच्यावर टीका झाली. कलाम यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात बलात्कार करणाऱ्या धनंजय चॅटर्जी यांच्या दयायाचिकेस नकार दिला.त्यांनी २००५ मध्ये बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला.

सप्टेंबर २००३मध्ये, पीजीआय चंदीगडमधील परस्पर संवादात, कलाम यांनी देशातील लोकसंख्या लक्षात घेऊन, भारतातील समान नागरी कायदा असण्याच्यी आवश्यकता प्रतिपादित केली.

कलाम यांचा कार्यकाळ २५ जुलै २००२पासून २५ जुलै २००७ पर्यंत झाला.

राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर संपादन करा
कार्यालय सोडल्यानंतर कलाम इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलांग, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदौर येथे व्हिजिटिंग प्राध्यापक झाले. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बॅंगलोरचे मानद सहकारी; भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान संस्थान, चांसलर तिरुवनंतपुरम; अण्णा विद्यापीठात एरोस्पेस अभियांत्रिकीचे प्राध्यापक; आणि संपूर्ण भारतातील इतर शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये संलग्न. त्यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हैदराबाद येथे माहिती तंत्रज्ञान आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि अण्णा विद्यापीठात तंत्रज्ञान शिकवले.

मे २०१२मध्ये कलाम यांनी 'भ्रष्टाचाराचा पराजय करण्यासाठी मी काय करू शकतो' याबद्दल भारताच्या तरुणांसाठी एक कार्यक्रम सुरू केला.

कुडानकुलम परमाणु ऊर्जा प्रकल्पावरील कलाम यांच्या भूमिकेवर २०११मध्ये नागरी गटांनी टीका केली होती; स्थानिक लोकांशी बोलून त्यांनी परमाणु ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याचे समर्थन केले.  विरोधक त्यांच्या स्थानिक लोकांच्या भेटीला विरोध करत होते. लोकांनी कलाम यांना फक्त परमाणु शास्त्रज्ञ म्हणून पाहिले होते आणि वनस्पतींच्या सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांबद्दल त्यांनी दिलेल्या आश्वासनांशी ते अजिबात संमत नव्हते. [83][ संदर्भ हवा ]

गौरव संपादन करा
अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.[ संदर्भ हवा ]
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
पुरस्कार अथवा गौरवाचे वर्ष पुरस्कार अथवा गौरवाचे नाव प्रदत्त करणारी संस्था
१९८१ पद्मभूषण भारत सरकार
१९९० पद्मविभूषण भारत सरकार
१९९८ भारतरत्‍न भारत सरकार
१९९७ इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार भारत सरकार
१९९८ वीर सावरकर पुरस्कार भारत सरकार
२००० रामानुजम पुरस्कार मद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर[२]
२००७ किंग चार्ल्स (दुसरा) पदक ब्रिटिश रॉयल सोसायटी
२००७ डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठ, U.K
२००८ डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग (Honoris Causa) नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर
२००९ हूवर पदक ASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)
२००९ आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कार अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A
२०१० डॉक्टर ऑफ इंजिनिरिंग वॉटरलू विद्यापीठ[१०]
२०११ न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व. IEEE
डॉ. कलामांची कारकीर्द संपादन करा

मार्क हॉपकिन्स आणि अब्दुल कलाम.
जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
शिक्षण : श्वार्ट्‌झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).
१९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
१९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
१९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
१९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
१९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
१९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
१९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
१९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
१९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
१९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) हा रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
१९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
२५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
२००१ : सेवेतून निवृत्त.
२००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.
कलामांनी लिहिलेली पुस्तके[ संदर्भ हवा ] संपादन करा
अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
इग्नायटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); 'भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध' या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया - माय-ड्रीम
उन्‍नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)
एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन :
फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.
सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
टार्गेट ३ मिलियन (सहलेखक - सृजनपालसिंग)
ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्‍सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक - अरुण तिवारी)
दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक - व्ही. पोतराज, मराठी अनुवाद - अशोक पाध्ये)
ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).
बियॉंण्ड २०१० : अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक वाय.एस. राजन, मराठी अनुवाद-सकाळ प्रकाशन)
महानतेच्या दिशेने : एकत्र येऊ या बदल घडवू या (मॅजेस्टिक प्रकाशन)
स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस ( सहलेखक – अरुण तिवारी. मराठी अनुवाद : सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस – भारतीय प्रबोधनपर्व – वैभवशाली भारताची आगामी दिशा. अनुवादक : संजय माळी, बुकगंगा पब्लिकेशन्स ) अब्दुल कलाम यांचे सदर पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे व त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. भारताचे परिवर्तन सुरू असून ते कोणत्या दिशेने करणे श्रेयस्कर होईल याचे मार्मिक विश्लेषण यात आहे.
कलामांसंबंधी लिहिली गेलेली पुस्तके संपादन करा
डाॅ. अब्दुल कलाम (डाॅ. वर्षा जोशी)
असे घडले डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (प्रणव कुलकर्णी)
इटर्नल क्वेस्ट : लाइफ ॲंड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
ए.पी.जे. अब्दुल कलाम - संपूर्ण जीवन (मूळ हिंदी, अरुण तिवारी, मराठी अनुवाद ??? )
’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद - मंदा आचार्य).
ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : आर के पूर्ती)
ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी)
कर्मयोगी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (डॉ. शरद कुंटे)
कलामांचे आदर्श (डॉ. सुधीर मोंडकर)
भारतरत्न कलाम (डॉ. सुधीर मोंडकर)
रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां.ग. महाजन)
वियार्थ्यांचे कलाम (डॉ. सुधीर मोंडकर)
स्वप्न पेरणारे शास्त्रज्ञ राष्ट्रपती : डॉ. अब्दुल कलाम (डाॅ. वर्षा जोशी]])
रामेश्वरम् ते राष्ट्रपती भवन डॉ. अब्दुल कलाम, लेखक : डॉ. शां. ग. महाजन
अब्दुल कलामांना मिळालेले पुरस्कार व सन्मान संपादन करा
१९८१ : पद्मभूषण
१९९० : पद्मविभूषण
१९९७ : भारतरत्‍न
१९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
१९९८ : वीर सावरकर पुरस्कार
२००० : रामानुजन पुरस्कार
२००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक
२००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
२००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी
२००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक
२०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी
२०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व
२०१२ : आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये कलाम दुसऱ्या क्रमांकावर होते.[१२]
२०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
चरित्रपट संपादन करा
एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटात परेश रावल कलामांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

निधन संपादन करा
ए.पी.जे. अब्दुल कलाम २७ जुलै २०१५ रोजी कलाम शिलॉंग येथे भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे "पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे" या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले. पायरीवरून जात असताना त्यांना काही अस्वस्थ वाटले, परंतु थोड्या विश्रांतीनंतर सभागृहात प्रवेश करण्यास सक्षम झाले. संध्याकाळी सुमारे साडेसाहा वाजता व्याख्यान देताना ते स्टेज वरून कोसळले. त्यांना जवळच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; आगमनानंतर त्यांच्यात नाडी किंवा जीवनाची इतर चिन्हे दिसली नाहीत. आयसीयूत युनिट मध्ये ठेवण्यात आले तरी कलाम यांना ७-४५ला हृदयविकाराच्या दुसऱ्यायानंतर मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव शरीर शिलॉंग ते गुवाहाटी येथून भारतीय वायुसेना हेलिकॉप्टरमधून नेण्यात आले होते, तेथून ते 28 जुलैच्या सकाळी वायुसेना सी -130 जे हरक्यूलिसमध्ये नवी दिल्लीला गेले होते. विमान दुपारी पलामएअर बेस येथे उतरले आणि अध्यक्ष, उपराष्ट्रपती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भारतीय सशस्त्र बलोंच्या तीन सेवा प्रमुखांनी त्यांना कलामांच्या शरीरावर पुष्पहार दिला. आणि त्यांचे पार्थिव शरीर 10 राजपथ मार्ग येथे दिल्लीच्या निवासस्थानी नेण्यात आले; तेथे अनेक मान्यवरांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी श्रद्धांजली वाहिली.

29 जुलैच्या सकाळी, कलामचे पार्थिव शरीर भारतीय ध्वजात लपेटले होते, त्यांना पालम एअर बेसवर नेले आणि दुपारी मदुराई विमानतळावर आगमन करून वायुसेना सी -130 जे विमानातून मदुराई येथे नेले. कॅबिनेट मंत्री मनोहर पर्रिकर, वेंकैया नायडू, आणि तमिळनाडु आणि मेघालयाचे राज्यपाल के रोसाय्या आणि व्ही. शनमुगननाथन यांच्यासह तीन सेना प्रमुख उपस्तीत होते. थोड्या थोड्या समारंभानंतर कलामचे पार्थिव शरीर वायुसेना हेलिकॉप्टरने मांडपम शहरात नेण्यात आले होते, तेथून ते सैन्याच्या ट्रकमध्ये आपल्या मूळच्या रामेश्वरम शहरात नेले गेले. रामेश्वरम येथे पोहचल्यावर त्यांचे पार्थिव शरीर स्थानिक बस स्टेशनच्या समोर खुल्या भागामध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले.

30 जुलै 2015 रोजी पंतप्रधान, तामिळनाडुचे राज्यपाल आणि कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशचे मुख्य मंत्री यांच्यासह 350,000हून अधिक लोक उपस्थित होते.