Ads

30 April 2022

भूस्खलनाचे आपत्ती व्यवस्थापन

भूस्खलनाचे आपत्ती व्यवस्थापन
आपत्तीपूर्व काळजी
आपत्तीनंतरची काळजी
उत्तराखंडमध्ये 2013 व माळीणमध्ये 2014 मध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे, दरडी कोसळल्याने तसेच जमीन खचल्याने भाविक व नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. अचानक आलेल्या या आपत्तींमुळे भाविक व नागरिक गोंधळून जाणे स्वाभाविक आहे. मात्र, अशी परिस्थिती येऊच नये व जर अशी आपत्ती आली तर त्यातून कसा मार्ग काढायचा याबद्दलची ही माहिती…
उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रिनाथ, गंगोत्री हा परिसर अत्यंत डोंगराळ असा प्रदेश आहे. पूर्वी या परिसरात दाट झाडी होती. पर्यावरणाचा समतोल बऱ्यापैकी राखला गेला होता. भाविकांचे जथ्थे‍च्या जथ्थे‍ पूर्वी इतक्‍या मोठ्या प्रमाणात येत नव्हते. मात्र, अलीकडे ट्रॅव्हल्स कंपन्या विविध पॅकेज टूर आयोजित करत असल्याने धार्मिक पर्यटनाकडे लोक आकर्षिले जाऊ लागले आहेत. पर्यटनाच्या नावाखाली चांगले रस्ते तयार झाले. मोठमोठी हॉटेल्स, लॉजेस या परिसरात उभारली गेली आहेत. छोटीमोठी धरणे, पाण्याच्या योजना सुरू झाल्या आहेत. हे सर्व करीत असताना तेथे सोयी-सुविधा देण्याच्या नावाखाली अनेक प्रकल्प उभे करण्यात आले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. डोंगर फोडून बांधकामे करण्यात आली. खोदकाम मोठ्या प्रमाणात झाल्याने जमीन भुसभुशीत झाली. त्यामुळे भूस्खलन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. डोंगरमाथ्यावर, नदीकाठी बांधकामामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडणे साहजिकच आहे. त्यामुळे ढगफुटी अथवा जोरदार पावसामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून रस्ते बंद झाले. इमारती कोसळल्या आणि मोठी जीवित व वित्तहानी झाली. नैसर्गिक आपत्ती मग ती कोणतीही असो, त्यामुळे वित्त व जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होते.
उत्तराखंडमध्ये मोठी आपत्ती येऊन संपूर्ण देश हादरला. केदारनाथ, बद्रिनाथ, गंगोत्री याक्षेत्रात ढगफुटी होऊन महाप्रलयामुळे प्रचंड पाऊस झाला. नदी-नाल्यांना पूर आले. मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. दरडी कोसळल्या. पुरात गावे नष्ट झाली. इमारती कोसळल्या, हजारो लोक मृत्यमुखी पडले. हजारो जखमी झाले, हजारो बेपत्ता आहेत. या आपत्तीची कारणे अनेक आहेत. त्यापैकीच मोठ्या प्रमाणात दरडी कोसळणे आणि भूस्खलन होणे ही होय. या दोन्ही घटना पावसाशी निगडित आहेत. पाऊस पडल्यास जमिनीत व जमिनीवर पाण्याचा प्रचंड भार व दाब तयार होतो. ओहोटी लागल्यावर या पाण्याचा वेगाने निचरा होतो. याशिवाय हे पाणी अतिरिक्त दाबामुळे खोलवर झिरपते. विदारित खडक (मुरुम, माती) व मूळ खडक यांच्या संपर्क रेषेपर्यंत पोचते. तेथून खालचा खडक एकसंध असल्याने पाझर घटतो. परिणामी हे पाणी या संपर्करेषेत राहिल्याने घर्षण कमी होते आणि संपूर्ण वरचा भाग खाली सरकून भूस्खलन होते. अशी शास्त्रीय कारणमीमांसा आहे. मुळातच पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पाण्यापेक्षा पृष्ठभागाखालून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने प्रचंड प्रमाणात भूस्खलन होते. पाणी माती आपल्याबरोबर वाहून नेते. त्यामुळे डोंगराखाली पोकळ्या तयार होतात. कडा खचतात. त्यामध्ये पाणी अधिक प्रमाणात मुरते व त्या रुंदावतात आणि स्थिरावतात. पुन्हा मोठा पाऊस झाल्यास मात्र याच भेगा पाणी खोलवर मुरण्यास मदत करतात आणि मोठ्या भूस्खलनास कारणीभूत ठरू शकतात. निसर्गामध्ये भूस्तर खाली आणण्याचे काम सातत्याने चालू असतेच. अनेक वर्षे विदारणाच्या प्रक्रियेतून तयार झालेला अवसाद साठून राहिलेला असतो. अतिवृष्टीमुळे त्यांच्या क्षरणाच्या विस्थापनाच्या प्रक्रियांना गती मिळते. त्यामुळे या घडामोडीचे आकारमान वाढते. म्हणजेच ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळेच काल स्थीर वाटणारे डोंगर आज खचलेले दिसतात.
सर्वसाधारणपणे डोंगरमाथ्यावरील भूभागाचे विघटन होऊन त्याची माती पावसाच्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर दगडगोटे घेऊन येते. याशिवाय डोंगराच्या वरच्या भागाला मोठ्या प्रमाणावर पूर्व-पश्‍चिम अशा भेगा पडतात. त्यामुळे डोंगरमाथे कमकुवत होतात. डोंगरावरची माती मोठ्या प्रमाणात खाली आल्यामुळे नैसर्गिक नाले, नद्या, माती-दगड-धोंडे यांनी भरतात. परिणामी पाण्याच्या नैसर्गिक प्रवासाची दिशा बदलते. नेमके असेच उत्तराखंडमध्ये झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती कोसळली.
उत्तराखंडमध्ये झालेली वित्त आणि मनुष्यहानी कमी करणे तसेच लोकांपर्यंत तातडीने मदत पोचविण्यासाठी पूर परिस्थितीमध्ये ठोस निर्णय घेऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी करणे, या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शोध, बचाव आणि मदतकार्य, तसेच पुरामुळे संकटात सापडलेल्यांना मदत करून वाचविणे यासाठी बिगरसरकारी संघटना आणि समुदाय यांची भूमिका अत्यंत प्रभावी ठरते. यासाठी अशा संघटना, समुदायांची स्थानिक पातळीवर बांधणी करणे अत्यंत हितावह ठरते. पुरामुळे प्रभावित झालेल्यांना तातडीने चिकित्सा साह्य उपलब्ध करून देणे, तसेच पुरानंतर येणारी महामारी-रोगराई थोपविण्यासाठी उपाययोजना करणे हे पूरपरिस्थितीचा सामना करण्यासारखे आहे. समन्वयाचा दृष्टिकोन आणि त्यानुसार प्रयत्न करण्यासाठी तांत्रिक कारणे आणि ठोस कार्यवाहीच्या हेतूने घटना नियंत्रण प्रणालीची आवश्‍यकता आहे.
पुराची पूर्वसूचना आणि सर्वांना सावध करण्याच्या प्रणालीचा विस्तार आणि तिचे आधुनिकीकरण करणे, या हेतूने अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. शैक्षणिक संस्थांच्या पाठ्यक्रमामध्ये पूरनियंत्रण व्यवस्थापनाबाबत बदल व अंतर्भाव करणे, पुनर्निरीक्षण हेतूने जलाशय शोधणे, त्या पूर क्षेत्रातील इमारतींना भविष्यात सुरक्षितता प्रदान करणे, तसेच भविष्यकाळात निर्माण होणाऱ्या इमारतींना पुरापासून सुरक्षित बनविण्यासाठी बिल्डिंग बायलॉज (इमारत बांधकाम नियमावली) मध्ये सुधारणा करणे, विस्तृत परियोजना अहवाल तयार करणे, तसेच राष्ट्रीय पूर मदतकार्य प्रशासन परियोजना स्वीकृत करणे आवश्‍यक आहे. नद्यांमधील पाण्याच्या विसर्गात असणारे अडथळे जाणणे व ते पुन्हा नद्यांमध्ये वाहून गेल्याने पूरपरिस्थिती त्वरित गंभीर होऊ शकते. अशा वेळी सर्वांना सावधान करण्यासाठी तांत्रिक विभागीय समिती स्थापना करणे, केंद्रीय मंत्रालयातून तसेच त्यांच्या विभागातून आणि राज्य सरकारची पूरनियंत्रण योजना तयार करणे, क्‍लोज कॉन्टअर-मॅपस, डिजिटल एलिवेशन मॉडेल आणि पुराच्या धोक्‍याची मानचित्रे तयार करणे आवश्‍यक आहे.
वेटलॅण्डर्स, तलाव किंवा नैसर्गिक सखल प्रदेशात रिक्‍लेमेशन (भराव घालणे) ची कामे करण्यास प्रतिबंध करण्याचा कायदा, नियम तयार करणे गरजेचे आहे. प्राधान्याने करावयाची पूर संरक्षणाची कामे, तसेच पुरातील संकटातून सुटका करण्यासाठी केली जाणारी कार्यवाही सक्षम करणे, पूरपरिस्थितीतील निवारे (फ्लड शेल्टर्स) निर्माण करणे, आंतरराज्य नद्यांवर असलेल्या धरणांची संयुक्त प्रशासकीय तांत्रिक यंत्रणा निर्माण करणेही आवश्‍यक आहे.
पुरामुळे संकटात सापडणाऱ्या क्षेत्रात जलसंचय प्रबंधन (कॅचमेंट एरिया ट्रीटमेंट) त्याचबरोबर वनरोपण योजनांचे नियोजन मान्सूनपूर्व आणि मान्सूनपश्‍चात बांधबंधारे यांची पुनर्बांधणी करणे, त्याचबरोबर पायाभूत सुविधा वापरून उपाययोजना करणे व त्यांचे निरीक्षण करणे आवश्‍यक असून पूरपरिस्थितीची पूर्वसूचना आणि सावधानतेच्या सूचना देणारा नेटवर्क आणि डिसिजन सपोर्ट सिस्टिम्सचा विस्तार आणि त्याचे आधुनिकीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
या काही नियोजनाच्या बाबी पूर्णत्वास गेल्यास पुरासारख्या आपत्तीला तोंड देण्यास आपण सज्ज राहू. उत्तराखंडसारखी परिस्थिती देशातील अनेक भागांत होऊ शकते. तेथील भौगोलिक रचना, हवामानातील बदल, मानवाने केलेले अतिक्रमण, वृक्षतोड, डोंगर नष्ट करून इमारती उभारणे अशा अनेक कारणांमुळे आपत्ती येऊ शकते. म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन अधिक सुसज्ज असणे गरजेचे आहे.
आपत्तीपूर्व जनतने काही बाबींचे पालन केले पाहिजे ते पुढील प्रमाणे -

आपत्तीपूर्व काळजी
1. ज्यावेळी आपण दूरच्या धार्मिक स्थळी जात असतो त्या वेळी आपण कोठे जाणार, कुठे थांबणार, कुठल्या धर्मशाळेत, लॉज-हॉटेल, होस्टेलमध्ये अथवा मंदिरात व्यवस्था केली ते प्रारंभीच जाणून घेणे गरजेचे आहे.
2. टूर्स आणि ट्रॅव्हल्सने जात असताना सोबत असणारा गाईड, वाहनचालक यांना त्या भूप्रदेशाची व्यवस्थित माहिती असल्याबद्दल खात्री करून घेणे आवश्‍यक आहे.
3. अशा ठिकाणी जाताना ट्रॅव्हल्सच्या कंपन्यांनी भाविक/प्रवाशांची नावे, पत्ता, दूरध्वनी/मोबाईल क्रमांक यांची नोंद व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे.
4. आपत्कालीन परिस्थिती केव्हाही निर्माण होऊ शकते. तेव्हा सोबत जास्तीचे अन्नधान्य, कपडालत्ता, औषधे, जास्तीचे पैसे जवळ ठेवणे आवश्‍यक आहे.
5. पावसाळ्याच्या दरम्यान जाणार असाल तर रेनकोट, छत्री, बॅटरी, मेणबत्ती अशा वस्तू सोबत ठेवणे आवश्‍यक आहे.
6. आपण ज्या भूप्रदेशात जाणार आहोत तेथे मोबाईल, दूरध्वनी यंत्रणा कार्यरत आहे, त्याची खात्री ट्रॅव्हल्स कंपनीकडून केली पाहिजे. त्यासाठी एखादे वेगळे सिमकार्ड, जास्तीची मोबाईल बॅटरी-चार्जर सोबत ठेवणे गरजेचे आहे. ज्यांना शक्‍य आहे त्यांनी सोबत क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, लॅपटॉप, रेडीओ, फ्लॅश लाईट सोबत नेणे गरजेचे आहे.
7. आपला टूर किती दिवसांचा, दररोज कोणकोणती ठिकाणे पाहणार, जाण्याचा मार्ग यांची माहिती घरच्यांना देणे गरजेचे आहे.
8. आपण ज्या ट्रॅव्हल्सने जाणार आहोत त्या ट्रॅव्हल्सची माहिती, पत्ता, दूरध्वनी क्रमांक घरच्यांकडे ठेवणे आवश्‍यक आहे.
9. प्रवासात सकाळी, दुपारी आणि रात्री झोपण्यापूर्वी घरच्यांना दूरध्वनी/मोबाईलद्वारे आपली खुशाली कळविणे आवश्‍यक आहे.
10. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढील मार्ग सुरक्षित आहे ना, दरड अथवा भूस्खलन झाले नाही ना, अतिवृष्टी होऊन नद्यांना पूर नाही ना, याची खात्री करून पुढे मार्गक्रमण करणे आवश्‍यक आहे.
11. नदीला पाणी असेल तर वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करून धोका पत्करू नये.
12. प्रवासात वाहनचालकाची पूर्ण झोप होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आपत्तीनंतरची काळजी
1. ढगफुटी अथवा मोठा पाऊस आल्यामुळे दरडी कोसळतात. डोंगर खाली येतो. मोठ्या प्रमाणात दगड-माती खाली येते. तेव्हा डोंगराच्या पायथ्याशी थांबू नका.
2. प्रचंड पावसामुळे नदीला पूर येतो. तेव्हा नदीकाठच्या हॉटेलात, घरात, मंदिरात, लॉजवर न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी अथवा उंचावर थांबावे.
3. पावसामुळे रस्त्याला तडे जातात. पूल वाहून जातात, रस्त्यावर दगड, माती मोठ्या प्रमाणात येते तेव्हा आहे तेथेच थांबून मदतीची वाट पाहा. वाहन पुढे नेऊ नका.
4. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित आहे ना, कुठलीही आपत्ती नाही ना, हे पाहिले पाहिजे.
5. आपण जेथे थांबलो त्या ठिकाणी रेडीओ, टीव्हीवरील बातम्यांकडे लक्ष ठेवून असले पाहिजे. त्याचबरोबर हवामान खात्याने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजेत.
6. प्रचंड प्रलयामुळे रस्ते वाहतूक कोलमडते, वीज जाते, मोबाईल टॉवर उद्‌ध्वस्त होतात. फोन लागत नाहीत, अशा वेळी धीराने संकटाशी सामना करा. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने उभारलेल्या मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्या.
7. अशा आपत्तीच्या काळात लुटालूट होण्याची शक्‍यता असते. अशा वेळी मोठ्या संख्येने एकत्रितपणे व ग्रुपने राहावे.
8. औषधे, अन्नाची पाकिटे, पाणी मिळण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या मदत केंद्राच्या संपर्कात राहावे.
9. आपत्तीप्रवण क्षेत्रातून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी लष्कराचे जवान मदत करीत असतात. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मदत करीत असतात तेव्हा त्यांना सहकार्य करून त्यांची मदत घ्यावी.
10. अशा आपत्तीच्या वेळी स्वत:च्या काळजीबरोबरच आपल्या सहकाऱ्यांचीही काळजी घेतली पाहिजे. पैसे नसल्यास, आजारी पडल्यास तातडीने सहकार्य केले पाहिजे.
11. ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपल्या टूर्समार्फत गेलेल्या पर्यटकांची माहिती, नावे आपत्ती व्यवस्थापन केंद्र, तहसीलदार, जिल्हाधिकारी किंवा पोलिस यंत्रणेला द्यावी.
12. आपल्या ट्रॅव्हल्सने गेलेले प्रवासी कोठे आहेत, त्यांची सद्य:स्थिती काय आहे, ते सुरक्षित आहेत ना, याची माहिती प्रवाशांच्या नातेवाइकांना देऊन त्यांना आधार द्यावा.
13. नातेवाईकांनी मदत कक्षाशी संपर्कात राहून तातडीने सुरू केलेल्या हेल्पलाइनवरून संपर्क साधण्याचा, माहिती घेण्याचा प्रयत्न करावा.
14. नातेवाईकांनी शासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य केले पाहिजे. शांतता राखून संयम पाळला पाहिजे.
15. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी, जागरूक नागरिकांनी अशा काळात मदत करताना प्रशासन, लष्कराबरोबर त्यांच्या सूचनेनुसार काम केले पाहिजे. शांतता, शिस्त पाळून सेवाभावी वृत्तीने मदतकार्यात सहभागी झाले पाहिजे.
16. प्रसारमाध्यमांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सत्य, अचूक बातम्या, वृत्तान्त देऊन नागरिकांना माहिती पोचवली पाहिजे.
17. आपत्ती काळात अनेक अडचणी येतात. मदत लवकर पोचू शकत नाही. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कुणावर दोषारोपण करणे, चुकीचे निष्कर्ष काढणे व अफवा पसरवणे टाळावे.

दुष्काळ

दुष्काळ

दुष्काळ म्हणजे पाण्याची व त्यायोगे अन्नस्रोतांची अनुपलब्धता किंवा तीव्र टंचाई असलेला, अनेक महिन्यांचा वा वर्षांचा दीर्घ कालखंड होय. दुष्काळ येण्यास वातावरणातील आकस्मिक बदल, वृक्षतोड किंवा ज्वालामुखींचे उद्रेक किंवा वणवे इत्यादी कारकांनी उद्भवलेले पर्यावरणीय जलचक्रातील दोष कारण असू शकतात. दुष्काळात अन्नपाण्याच्या अभावी माणसांसह बहुसंख्य सजीवांना प्राणसंकटास तोंड द्यावे लागते.जेथे दुष्काळ पडतो, त्या ठिकाणची उत्पादकता, वसणूक पुन्हा सावरणे खूप कठिण असते. तेथे जीवन पूर्ववत होण्यास,अनेक वर्षे लागू शकतात. २०१६ मध्ये लातूर महानगरपालिका असलेल्या शहरालासुद्धा आगगाडीने पाणी आणावे लागले

दुष्काळात पाण्याअभावी भेगाळलेली जमीन.
जलसंधारण
संपादन करा
धरणांचे मोठे प्रकल्प बनवून त्यावर अधारीत सिंचन करून पाण्याचा प्रश्न सोडवला जातो. परंतु या प्रकल्पांना अनेक मर्यादा असतात. तसेच विस्थापन नियोजन करणे अवघड असते. म्हणून आधुनिक काळात विकेंद्रित व क्षेत्रीय जलसंधारण राबवले जाते. हा तुलेनेने कमी खर्चाचा व सोपे तंत्रज्ञान असलेला उपाय आहे. पावसाचे पाणी जास्तीतजास्त गावाच्या शिवारात अडवून विकेंद्रित स्वरूपाचे पाणीसाठे निर्माण करणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे असे उपाय यामध्ये आहेत. नद्यानाल्यांच्या खोलीकरण, रुंदीकरणातून जलसंधारण साधले जाते. शिरपुर येथे अशी योजना प्रथम राबवली गेली होती ती आता शिरपुर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्यात पन्नास टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचे विकेंद्रित साठे तयार करावे लागतील. जलसंधारण व मृदसंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खरा विकास होवू शकतो. विकेंद्रित जलसाठे तयार करून पाण्याचा योग्य वापर करणे आवश्‍यक आहे. पाण्याचेच विकेंद्रित गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र राज्यात जी लहान-मोठी तलावे तुटलेली व गाळाने भरलेली आहेत त्यांची दुरूस्ती व गाळ काढने आवश्यक आहे.

शिरपुर पॅटर्न हा प्रयोग त्या त्या भागातील भूगर्भाची रचना पाहून राबविला पाहिजे.

सरकारी प्रयत्न
संपादन करा
जलयुक्त शिवार आणि विकेंद्रित जलसंधारण योजना यांचा त्यात समावेश आहे. प्रधानमंत्री कृषिसिंचन योजनेखाली दहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाईल असे सरकारने इस २०१६ मध्ये सांगितले. राज्य सरकारच्या या पुढाकाराला जनतेनी छान साथ दिलेली असुन, मोठ्या प्रमानावर कामे होत आहेत.

राज्य सरकारचा जलयुक्त शिवार अभियान हा कार्यक्रम टॅकर मुक्त गावे करण्यासाठी खूपच लाभदायी ठरला आहे.आज दुष्काळावर सरकार प्रयतन करते आहे असे त्यांना वाटते पण ते लोकांपर्यंत किती पोचले ते पाहत नाहीत.

वनीकरण
संपादन करा
दुष्काळ निवारणासाठी पाणलोट क्षेत्र विकासात छोटी झाडे, गवत आणि झुडूपवर्गीय झाडांची लागवड इत्यादीआवश्यक असते. वनीकरण आाणि वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा लागतो. सामाजिक वनीकरण योजना विभागाच्यावतीने वनीकरण प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रम यासाठी अर्थ सहाय्य देते.[१] महाराष्ट्र शासन पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबवित आहे. त्या अंतर्गत शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था किंवा व्यक्तींना रोपे पुरवठ्याची कामे सुद्धा वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग करत आहे. या अनुसार इ.स.२०१६ पासून दोन कोटी वृक्ष लागवड केली जात आहे. यासाठी विविध शासकीय विभागांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिलेले आहे.[२]

पाऊस कमी होत आहे ज्यामुळे नेहमी दुष्काळ जन्य परीस्थिती दिसते. आज आपण पाहतो की, वृक्षांची संख्या कमी होत आहे. वृक्षतोड होऊन त्याठिकाणी मोठ मोठ्या इमारतींचा विस्तार होत आहे . सर्व जण झाडे लावण्याचे काम करत आहे पण लावलेली झाडे जागवण्याची जबाबदारी कोणी घेत नाही. लावलेली झाडे जगवली तरच पावसाचे प्रमाण नक्की वाढेल. त्यामुळे आकडेवारीत न अडकता लावलेली झाडे जगवली पाहिजेत.

चालू घडामोडी

★ *चालू घडामोडी*★

Q1) कोणत्या देशात भारताच्या ‘रुपे कार्ड’ प्रकल्पाच्या द्वितीय टप्प्याचे उद्घाटन केले गेले?
उत्तर :- भूतान

Q2) कोणत्या व्यक्तीची आंतर-संसदीय संघासाठी (IPU) बाह्य लेखा परीक्षक या पदासाठी निवड झाली?
उत्तर :- गिरीश चंद्र मुर्मू

Q3) कोणत्या राज्यात 'महा आवास योजना' याचे उद्घाटन झाले?
उत्तर :- महाराष्ट्र

Q4) कोणत्या विषयाच्या संदर्भात मोहंती समिती नेमण्यात आली आहे?
उत्तर :- मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांना बँक परवाना देणे

Q5) कोणत्या तारखेला राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) यांनी 72 वा वर्धापनदिन साजरा केला?
उत्तर :- 22 नोव्हेंबर 2020

Q6) कोणत्या राज्यात भारतातले पहिले ‘शेवाळ उद्यान’ (मॉस गार्डन) उभारले जात आहे?
उत्तर :- उत्तराखंड

Q7) कोणत्या योजनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘आवास दिन' साजरा करतात?
उत्तर :- प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण

Q8) कोणत्या व्यक्तीला 2020 साली बुकर पारितोषिक दिला गेला?
उत्तर :- स्‍टुअर्ट डग्लस

Q9) कोणत्या देशाच्या राजदूताच्या परिचय पत्राचा राष्ट्रपती कोविंद यांनी स्वीकार केला?
उत्तर :- ताजिकिस्तान

Q10) ‘राष्ट्रीय नवजात सप्ताह 2020’ याचा विषय काय आहे?
उत्तर :- प्रत्येक आरोग्य सुविधा केंद्रावर आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नवजात बालकासाठी गुणवत्ता, समता, गौरव.

भारतातील राष्ट्रीय उद्याने नसलेले राज्य व केंद्रशासित प्रदेश

🔰भारतातील राष्ट्रीय उद्याने नसलेले राज्य व केंद्रशासित प्रदेश 🍀🍀

◾️ चंदीगड,
◾️ दादरा नगर हवेली,
◾️दमन व दीव ,
◾️लक्षद्वीप,
◾️पद्दुचेरी,
◾️ दिल्ली
याठिकाणी एकही राष्ट्रीय उद्यान नाही✍

🔰भारतामध्ये एकूण 104 राष्ट्रीय उद्याने आहेत

🔰 राष्ट्रीय उद्याने भारतातील 40500 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापली आहे

🔰देशाच्या एकूण क्षेत्र  1.23 टक्के  

🔰 भारतात सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने ⛰⛰🏝

◾️ मध्य प्रदेश( 10 )
◾️अंदमान निकोबार (9) ,
◾️केरळ महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल प्रत्येकी 6,
◾️आसाम कर्नाटक हिमाचल प्रदेश तामिळनाडू तेलंगणा प्रत्येकी 5

🔰 भारत सरकारने 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू केला सध्या भारतात 50 व्याघ्र प्रकल्प आहेत

◾️ त्यापैकी महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प आहेत

◾️प्रत्येक चार वर्षांनी वाघांची 🐅🐅
जनगणना होते 2018 च्या व्याघ्र जनगणनेनुसार भारतात 2967 वाघ आहेत  त्यापैकी महाराष्ट्रात 312 वाघ आहेत.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1)"डू यू नो" ट्विटर शृंखला _ याच्याशी संबंधित आहे.
(A) बँकिंगविषयी जागृती
(B) कौटुंबिक निवृत्तीवेतन.  √
(C) भारताविषयी जाणून घेण्यासाठी
(D) यापैकी नाही

2)भारतीय रेल्वेनी  या शहरात त्याचे पहिले ‘फिरते उपहारगृह’ उघडले.
(A) असनसोल स्थानक.  √
(B) नवी दिल्ली स्थानक
(C) जयपूर स्थानक
(D) लखनऊ स्थानक

3)2020 या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना काय आहे?
(A) विमेन एम्पोवरमेन्ट अँड जेंडर इक्वलिटी
(B) जेंडर इक्वलिटी अँड विमेन एम्पोवरमेन्ट
(C) आय एम जेनेरेशन इक्वलिटी: रियलाईजिंग विमेन्स राइट्स.  √
(D) आय एम रियलाईजिंग विमेन्स राइट्स: जेनेरेशन इक्वलिटी

4)संशोधकांना ‘हेनेगुया साल्मीनिकोला’ नावाचा जीव आढळला. ‘हेनेगुया साल्मीनिकोला’ हा __ आहे.
(A) ऑक्सिजनद्वारे जीवंत राहू शकणारा प्राणी
(B) ऑक्सिजनशिवाय जीवंत राहू शकणारा प्राणी.  √
(C) विषाणूचा एक प्रकार
(D) जिवाणूचा एक प्रकार

5)“RAISE 2020” कार्यक्रम _ या शहरामध्ये आयोजित केला जाणार आहे.
(A) लखनऊ
(B) नोएडा
(C) शिमला
(D) नवी दिल्ली.  √

6)‘राष्ट्रीय तपास संस्था’ (NIA) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. ही केंद्रीय दहशतवादरोधी कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून काम करते.

2. ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेला पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही.  √
(D) ना (1), ना (2)

7)कोणत्या राज्याने भारतीय विमानतळ प्राधिकरणासोबत सहा उपकरणे व्यवस्थापन केंद्रांची उभारणी करण्यासाठी सामंजस्य करार केला?
(A) मेघालय
(B) त्रिपुरा.  √
(C) आसाम
(D) उत्तरप्रदेश

8)‘ऑफशोअर पेट्रोल व्हसेल-6’ या जहाजाचे _ येथे अनावरण झाले.
(A) गोवा
(B) चेन्नई.  √
(C) मुंबई
(D) केरळ

9)अकरावी ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषद 2020’ _ या शहरात आयोजित करण्यात आली.
(A) पुणे
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) नवी दिल्ली.  √

10)29 फेब्रुवारी 2020 रोजी _ या शहरात ‘पेन्शन अदालत’ आणि ‘नॅशनल पेन्शन सिस्टम’ (NPS) जागृती व तक्रार निवारण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
(A) जम्मू.  √
(B) दिल्ली
(C) हैदराबाद
(D) चेन्नई

__________________________ 

Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.
1 १९ जुलै √√√√
2 ३१ आॅक्टोबर
3  २३ एप्रिल
4 १ व ३

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.
1  २००७
2  २००४
3  २००५√√√√√√
4  २०१३

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही
1  कामगारांची वाढती संख्या
2  अयोग्य तंत्रज्ञान
3  प्रभावी मागणीची     
कमतरता
4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?
1  १९४८-४९
2  १९३१-३२√√√√
3  १९११-१२
4  १८६७-६८

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?
1   चलन निश्चलीकरन
2   रुपयाचे अवमूल्यन√√√√
3   १ व २  दोन्ही घडले
4  १ व २ दोन्ही घडले नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?
1   बँकदर
2  रोख राखीव प्रमाण
3  वैधानिक रोखता प्रमाण
4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.
1  "से" चा बाजार विषयक नियम
2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम
3  एंजल चा नियम√√√√√
4  फिलिप्स वक्ररेषा

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.
1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक
2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक
3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√
4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?
1  अन्नधान्य उत्पादन
2  राष्ट्रीय उत्पन्न
3  दरडोई उत्पन्न
4  किमतीचा निर्देशांक√√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?
अ. ग्रामीण शिक्षण
ब. ग्रामीण आरोग्य
क. ग्रामीण पाणीपुरवठा
ड. ग्रामीण रस्ते
1   अ आणि ब  √√√√√
2   ब आणि क
3   क आणि ड
4  अ आणि ड

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते?
1  चीन -भारत युध्द
2  भारत पाकिस्तान संघर्ष
3  आर्थिक मंदी
4  राजकीय अस्थिरता √√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.
1  मुद्रा अवपात
2  मुद्रा संस्फीती√√√√√
3  स्टगफ्लेशन
4  स्टगनेशन

📖📖📖📖📖📖📖📖📖

[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?
1  यु एस ए √√√√√√ 
2  यु के 
3  चीन  
4  सिंगापूर

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?
अ इंदिरा गांधी
ब  मोरारजी देसाई
क जयप्रकाश नारायण
ड  रिझर्व्ह बँक
1  अ आणि क
2  ब आणि  ड√√√√√√
3  ब आणि  क
4  क आणि ड

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.
1  अन्नधान्य उत्पादन
2  राष्ट्रीय उत्पन्न
3  परकीय चलन साठा
4  किमतीचा निर्देशांक√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती?
1   हिल्टन यंग आयोग
2   चेंबर्लिन आयोग
3   फौलर समिती
4   मॅकलेगन समित✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.
1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.
2  मद्रास फर्टिलायझर ली.
3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√
4  वरील सर्व

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?
1  १९४६
2  १९३८√√√√√
3  १९२९
4  १९२५

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?
1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे
2  नवीन चलन निर्मिती
3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे
4  जमा झालेले महसूल√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.
1  रोख
2  बहुआयामी
3  शून्याधारीत√√√√√
4  यापैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?
1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√
2 प्रो पिगु
3 डॉ मार्शल
4 वरील पैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?
1  पुरोगामी
2  न्याय्य
3  प्रतिगामी√√√√√√
4  प्रमाणशीर

📖📖📖📖📖📖📖📖

सामान्य माहिती

1. कौन सा यंत्र दूध में पानी की मात्रा मापने के लिए प्रयोग किया जाता है ?

उतर - लैक्टोमीटर

2. नासिक किस नदी के किनारे स्थित है ?
उतर - गोदावरी

3. राष्ट्रपति को शपथ कौन दिलाता है ?
उतर - सर्वोच्च न्यायालय का मुख्य न्यायधीश

4. जापान की मुद्रा कौनसी है ?
उतर - येन

5. इंडियन मिलेट्री अकादमी कहाँ स्थित है ?
उतर - देहरादून

6. हाइड्रोजन बम्ब किस सिद्धांत पर आधारित है ?
उतर -नाभिकीय संलयन

7. पैलाग्रा रोग किस विटामिन की कमी से होता है ?
उतर -विटामिन B-3

8. मछलियों के यकृत-तेल में किसकी प्रचुरता होती है ?
उतर - विटामिन D

9. भूस्थिर उपग्रह की पृथ्वी से ऊँचाई कितनी होती है ?
उतर - 36,000 किलोमीटर

10. मनुष्य के शरीर का तापमान कितना होता है ?
उतर - 37° C या 98.4 F

════════════════════

28 April 2022

महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:

🔴 महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:

1)  कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.

2) पुणे प.महाराष्ट्र 
(57268 चौ.किमी) : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

3) नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.

4) औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

5) अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.

6) नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.