Ads

06 May 2022

मवाळवादी युगात गोपाळ कृष्ण गोखले यांची भूमिका

Mpsc History
मवाळवादी युगात गोपाळ कृष्ण गोखले यांची भूमिका:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

प्रारंभीचे राष्ट्रवादी मवाळ म्हणून ओळखले जातात. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून साम्राज्यवादाचे केलेले विश्लेषण आणि आर्थिक प्रश्नांवर त्यांनी सतत चालविलेली चळवळ होय.

व्यापार, उद्योग व अर्थव्यवस्था या तिन्ही दृष्टींनी साम्राज्यवादी अर्थव्यवस्थेने कशी पिळवणूक केली याचे त्यांनी विश्लेषण केले.
भारतीय अर्थव्यवस्थेला ब्रिटिश अर्थव्यवस्थेची बटीक बनविणे हेच ब्रिटिश वसाहतवादाचे सार आहे हे त्यांनी पक्के ओळखले.

केवळ कच्च्या मालाचा पुरवठा करणारा देश, ब्रिटनमध्ये तयार होणार्‍या मालाला हुकमी बाजारपेठ व परकीय भांडवल गुंतवणुकीस उत्तम क्षेत्र् असे भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरुप प्राप्त करुन देण्याचा जो ब्रिटिश वसाहतवादी अर्थव्यवस्थेचा हेतू होता त्याला त्यांनी जोरदार विरोध केला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मवाळवादी युग :-

काॅंग्रेसच्या स्थापनेपासून ते 1905 पर्यत मवाळवादी नेत्यांचा प्रभाव असल्याने त्यास मवाळवादी कालखंड असे म्हणतात.
मवाळवाद्यांची कार्यपध्दत –

(1) इंग्रजांशिवाय भारताचा विकास आणि देशात शांतता सुव्यावस्था प्रस्थापित होणार नाही म्हणून मवाळवादी नेते इंग्रजांशी एकनिष्ठ होते.

(2) इंग्रजांच्या न्यायप्रियतेवर विश्र्वास असून ते न्यायानुसारच योग्य कार्य सुधारणा करतील. त्यांच्याकडील अर्ज, विनंत्या क्रमाक्रमाणे सुधारणा द्याव्यात म्हणजे त्या पेलण्याची ताकद वाढेल

(3) इंग्रजांनी आपणाला क्रमाक्रमाने सुधारणा द्याव्यात म्हणजे त्या पेलण्याची ताकद वाढेल.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

राष्ट्रीय कॉग्रसचे प्रारंभीचे कार्य –

1885-1905 या काळात मवाळद्यांनी अनेक कार्ये करून आपली उदिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला.
(1) देशातील अनेक धर्म, प्रांत, जाती, यांच्या संदर्भात पूर्वग्रह व गैरसमज होते. ते नष्ट करून सर्वाच्यामध्ये स्नेहसंबंध निर्माण करण्याचे उदिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला.

वसाहतीच्या स्वराज्याची मागणी –

र्लॉड कर्झनच्या अत्याचारी धोरणामुळे आणि आयरिश नेता मि. स्मेडले यांच्या वसाहतीच्या स्वराज्य या कल्पनेनुसार 1905 च्या बनारस अधिवेशात गोखल्यांनी वसाहतीच्या स्वराज्याचा ठराव मांडला व तशी मागणी केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

जाचक कायदे रद्दची मागणी –

भारतीयांवर अनेक जाचक कायदे लादले. प्रशासन व न्यायदानात भेदभाव विना चौकशी तुरुंगात ऑम्र्स अ‍ॅक्ट 1878 प्रेस अ‍ॅक्ट इ. जाचक कायदे रद्द करण्याची मागणी अमरावती अधिवेशनात सुरेंद्रनाथ बॅनर्जीच्या अध्यक्षतेखाली केली.
लोकजागृतीचे कार्य –

कॉग्रसने अर्ज, विनंत्या करुन जनतेची दु:खे सरकार दरबारांमध्ये मांडली. सभा ठराव लेखन या माध्यमांमधून लोकजागृतीचे कार्य केले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सरकार विरुध्द आक्रमक पवित्रा –

काँग्रेस व सरकार यांचे प्रारंभीचे मैत्रीसंबंध कोलकत्या अधिवेशनानंतर राहिले नाहित कारण काँग्रेसने आक्रमक कार्यक्रमांची सुरुवात केली. इंग्रजांविरुध्द अ‍ॅटी कॉर्नली लीनच्या चळवळीप्रमाणे चळवळ सूरु करावी असे आदेश दिले.

परदेशातील हिंदी जनतेसाठी कार्य –

इंग्रजांनी त्यांच्या वसाहतीमध्ये अनेक भारतीय मजुरांना पाठविले होते. त्यांच्यावर अन्याय अत्याचार डोइजड कर लादले होते. मतदानाचा व मालमता ठेवण्याचा हक्क नव्हता यासाठी कॉग्रसने संघर्ष करुन न्याय मिळवून दिला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

परदेशातील हिंदी जनतेसाठी कार्य –

इंग्रजांनी त्यांच्या वसाहतीमध्ये अनेक भारतीय मजुरांना पाठविले होते. त्यांच्यावर अन्याय अत्याचार डोइजड कर लादले होते. मतदानाचा व मालमता ठेवण्याचा हक्क नव्हता यासाठी कॉग्रसने संघर्ष करुन न्याय मिळवून दिला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

हिंदी जनतेची गार्‍हाणी मांडली –

भारतीयांच्या विविध क्षेत्रांतील अडचणींचा विचार करण्यासाठी रॉयल कमिशन नेमले.

या प्रसंगी कॉग्रेसने सरकारकडे विविध मागण्या केल्या वर्तमानपत्रांना स्वातंत्र्य, पोलिस खात्यात व प्रशासनात सुधारणा शासकीय खर्च कपात, शेतकर्‍यांना कमी व्याज दरात कर्ज, देशी उद्योगंधद्यांना संरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शेतकर्‍यांना कमी व्याज दरात कर्ज देशी उद्योगधंद्यांना संरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारात वाढ, स्पर्धा परिक्षा भारतात घ्यावी व वयोमर्यादा कमी करावी.

काॅंगे्रसचे इंग्लंडमधील कार्य –

इंग्लंडमधील जनतेचा व संसदेचा आपल्या हक्कांना पाठिंबा मिळविण्यासाठी इंग्लंडमध्ये चळवळ सुरु केली 1887 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली.
1889 मध्ये ब्रिटिश कमिटी ऑफ दी इंडियन नॅशनल काँग्रेस ही संघटना स्थापन केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सायमन कमिशन बद्दल माहिती

Mpsc History

सायमन कमिशन बद्दल माहिती -------

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

1919 च्या सुधारणा कायद्यात येणार्‍या अडचणी व निर्माण होणारे दोष यांचा विचार करण्यासाठी सर अलेक्झांडर मुडीमन यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये समिती नेमली होती.

नोव्हें. 1927 मध्ये कमिशन नेमले गेले
सात सदस्यीय या कमिशनात एकही भारतीय व्यक्ती नसल्यामुळे काँग्रेससह इतर पक्षांनी कमिशनवर बहिष्कार घातला.
.
3 फेब्रुवारी 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले.

पंजाब मध्ये सायमन कमिशनला विरोध लाला लजपतराय यांनी केला.

1930 रोजी सायमन कमिशनचा अहवाल जाहीर.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

टिळक युगातील महत्वाच्या घटना

Mpsc History

टिळक युगातील महत्वाच्या घटना:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

1. प्लेगची साथ व टिळकांना झालेली अटक :

सन 1896 ते 1899 या काळात पुण्यात ब्युबानिक प्लेगची भयंकर साथ आली होती.

शासनाने प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळविण्याकरिता रॅंड या इंग्रज अधिकार्‍याची नियुक्ती केली.
रॅंडने उपाय योजनेच्या नावाखाली जनतेवर आतोनात अत्याचार केले.
याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रॅंड व आयर्स्ट यांचा गोळ्या घालून वध केला.
ब्रिटिश शासनाने टिळकांचा रॅंडच्या खुनाशी संबंध जोडून त्यांना अटक केली.

न्यायालयाने टिळकांना दीड वर्षाची शिक्षा ठोठावली.
भारतीय जनतेने टिळकांच्या शिक्षेविरुद्ध संपूर्ण भारत बंद पाळला. हा भारतीय जनतेने पाळलेला पहिला बंद होय.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

2. बंगालची फाळणी (1905) :

लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.
बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळकम बिपीनचंद्र पाल व लाला लजपतराय यांनी रान उठविले.
बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले.

आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली.
टिळकांनी यालाच चतु:सूत्री असे नाव दिले.
सन 1905 ते 1920 नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

3. टिळकांना शिक्षा :

ब्रिटिश सरकारच्या विरोधात केसरीमध्ये जनतेच्या भावना भडकविणारे लेखन केल्याचा आरोप लोकमान्य टिळकांवर ठेवण्यात आला व त्यांना 6 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावून मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले.

4. होमरूल लीग चळवळ :

डॉ. अॅनी. बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना केली.
थिऑसॉफीकल सोसायटीच्या माध्यमातून ही चळवळ संपूर्ण भारतभर पसरली.
सन 1914 मध्ये लोकमान्य टिळक मंडालेहून शिक्षा भोगून परत आले.

लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये पुण्यातून होमरूल लीग चळवळ सुरू केली.
बॅरिस्टर जोसेफ बाप्टिस्टा हे या चळवळीचे अध्यक्ष होते. न.ची. केळकर हे सचिव होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

5. टिळकांचे निधन :

लोकमान्य टिळकांनी. या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याचा स्विकार करण्याच्या उद्देशाने प्रतीयोगिता सहकारिता हे धोरण जाहीर केले. ॰

या कायद्यानुसार घेण्यात येणार्‍या निवदणुकीत काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना केली होती.
एप्रिल 1920 मध्ये निवडणुकीचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला. परंतु दुर्दैवाने लोकमान्य टिळकांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले.
भारतीय राजकारणाच्या क्षितीजावर गांधी युगाचा उदय झाला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

शाहू महाराज सुधारणावादी समाजसुधारक होते.

🛑शाहू महाराज 🛑

(जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), 

👉कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूर राज्याचे इ.स. १८८४-१९२२ दरम्यान छत्रपती होते.

👉शाहू महाराज सुधारणावादी समाजसुधारक होते.
                

👉शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते.
                
👉कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला.
            
👉राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

👉मुंबई येथे मे ६, इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

विजयनगर व बहमनी राज्ये

Mpsc History
विजयनगर व बहमनी राज्ये:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

1. विजयनगरचे साम्राज्य :-

दिल्लीच्या सुलतान महंमद तुघलकच्या संशयित स्वभावामुळे प्रांताधिकारी नाराज झाले. या घटनेमुळे तुघलक साम्राज्याचा विघटनास सुरवात झाली.
या विघटनामधूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली.
सन 1336 मध्ये हरीहर आणि बुक्का या दोन भावांनी दक्षिणेत विजयनगरचे साम्राज्य स्थापित केले. हंपी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होत

विजयनगर साम्राज्याचे राजे :-

विजयनगर साम्राज्यात खालील पराक्रमी राजे होवून गेले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

हरीहर व बुक्का :-

हे दोन्ही बंधु पराक्रमी होते. त्यांनी दक्षिणेत तुंगभद्रा नदीपासून तेकेरळपर्यंतचा भाग आपल्या अधिकाराखाली आणला.
त्यानंतर आलेल्या बुक्काने रामेश्वरपर्यंत विजयनगर साम्राज्याचा विस्तार केला.
त्यानंतरच्या काळात त्यांना बरीचशी वर्षे बहमनी साम्राज्यासोबत संघर्ष कारअवी लागली.

कृष्णदेवराय :-

कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात पराक्रमी राजा होवून गेला.
त्याने ओडिशाच्या राजाचा पराभव करून विजयवाडा आणि राजमेहंद्रीचा प्रदेश आपल्या राज्यात सामील केला.

या राज्याच्या काळात विजयनगरचे साम्राज्य दक्षिणेस हिंद महासागरापर्यंत आणि उत्तरेस रायचूर पर्यंत पसरले होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

विजयनगर साम्राज्याच्या सांस्कृतिक विकास :-

विजयनगरचे राजे कला व साहित्याचे भोक्ते होते. तेलंगू भाषेतील साहित्याचा विकास यांच्याच काळात झाला.
आमुक्तमाल्यदा हा तेलंगू ग्रथ यांच्याच काळात निर्माण झाला.

विजयनगरमधील हजार राम मंदिर आणि पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर याच काळात बांधल्या गेले.
तालिकोटची लढाई (सन 1565) :-

कृष्णदेवरायनंतर विजयनगरच्या साम्राज्याला उतरली कळा लागली. सन 1565 मध्ये कर्नाटकच्या तालीकोट येथे विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निझामशाही, गोवळकोंड्यांची कुतूबशाही आणि बिरुदची बिरुदशाही या चारही सत्तेने एकत्र येवून विजयनगरच्या राजा रामरामराचा पराभव केला आणि हंपी शहराचा विध्वंस केला.

आजही हंपी येथे असलेले उध्वस्त अवशेष विजयनगरच्या प्राचीन वैभवाची साक्ष देते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

2. बहमनी साम्राज्याची स्थापना –

महमंद-बिन-

तुघलकच्या संशयी स्वभावामुळे त्याच्या बर्‍यास सुभेदारांनी त्याच्या विरूद्ध बंड केले. त्यापैकी हसन गंगू बहमनशाह एक होता.

त्याचे सन 1347 मध्ये स्वत:ला दौलताबाद येथे स्वत:चा राज्याभिषेक करून राजा म्हणून घोषित केले बहमनी वंशाची स्थापना केली.
हसन गंगूने सत्ता स्थापित केल्याबरोबर दौलताबादची राजधानी गुलबर्गा येथे नेली.
बहमनी वंशात खालील राजे होवून गेले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

हसन गंगू (1347 ते 1358) –

गंगू हसन या राजाने बहमनी वंशाची स्थापना केली.
मुहंमदशहा पहिला (1358 ते 1373) –

हा राजा कलेचा चाहता होता. गुलबर्गामधील शाही मशीद, व उस्मानाबादमधील शमशूद्दिनची कबर बांधली व प्रशासकीय सुधारणा केल्या.

या राजाला इजिप्तच्या खलिफाने दक्षिण भारताचा सुलतान अशी मान्यता दिली होती.
मुहंमदशहा दूसरा (1377 ते 1997) –

सन 1377 मध्ये महंमदशाह दूसरा सत्ताधीश झाला.
त्याला दक्षिणेचा ऑरिस्टॉटल असे म्हणतात आणि प्रसिद्ध इराणचा कवी हाफिज त्याच्या दरबारात होता.

फिरोजशहा (सन 1397 ते 1422) –

या काळात विजयनगर आणि बहमनी साम्राज्यामध्ये सतत लढाया होत असे.

यानंतरच्या काळात बहमनी वंशामध्ये अहमदशहा (1422 ते 1435), अल्लाउद्दीन दुसरा (1435 ते 57) इत्यादि सुलतान होवून गेले.

याचा कार्यकाल विजयनगर साम्राज्याचा संघर्षात गेला.
हुमायू (1457 ते 1461) –

सन 1457 मध्ये महमुद गवान नावाचा वजीर बहमनी वंशामध्ये आला. त्यास हुमायूने आपला वजीर म्हणून नेमले. यानंतरच्या काळात सन 1481 पर्यंत बहमनी वंशाची राज्यकारभाराची सूत्रे महंमद गवानच्या हातात होती.

बहमनी राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रामध्ये विजापूर(आदिलशाही), अहमदनगरची (निझामशाही), गोवळकोडयांची (कुतुबशाही), बिदरची (बिदरशाही) आणि वर्‍हाडची (इमानशाही) ही पाच स्वतंत्र राज्ये उदयास आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मौर्यकालीन भारत

Mpsc History

मौर्यकालीन भारत:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मौर्य साम्राज्याची स्थापना :

नंद घराण्यातील शेवटचा राजा धनानंद हा अत्यंत जुलमी होता. त्याने चाणक्य नावाच्या ब्राम्हण व्यक्तीचा भर दरबारात अपमान केला.

त्याचा बदला म्हणून आर्य चाणक्यने चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वाखाली राजे लोकांना एकत्र करून धनानंदाचा पराभव केला आणि चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्याची स्थापना केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

चंद्रगुप्त मौर्य :

चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक असून भारताचा पहिला सम्राट होय. त्याने आपल्या राज्याचा विस्तार काबूल, कंदाहार, हेरात ते पश्चिमेकडील सौराष्ट्रपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता.
बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा) ही त्याच्या राज्याची राजधानी होती.
.
ग्रीकचा राजा सेल्युकस निकोटरने आपला राजदूत म्हणून मेगॉस्थनिस यास राजदूत म्हणून चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठविले होते. त्यांने मेगॉथिसने तत्कालीन परिस्थितिचे वर्णन इंडिका नावाच्या ग्रथांत केले होते.
चंद्रगुप्ताने आपला मुलगा बिंदुसार याचेकडे राज्य सोपवून संन्यास घेतला. त्याचे श्रवणबेळगोळा येथे निधन झाले.

बिंदुसार नंतर मौर्य वंशात सम्राट अशोक हा पराक्रमी राजा आला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सम्राट अशोक :

चंद्रगुप्तानंतर मौर्य साम्राज्यातील सम्राट अशोक हा दूसरा पराक्रमी राजा होय.
त्याने पूर्वेस बंगालचा उपसागर ते पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस काबूल नदीपर्यंत आणि उत्तरेस नेपाळ ते दक्षिणेस कावेरी नदीपर्यंत मगध साम्राजाच्या विस्तार केला होता.

कलिंगच्या युद्धाच्या घटनेमुळे सम्राट अशोकाच्या जिवनास वेगळेच वळण लागले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

कलिंग युद्ध (इसवी सन पूर्व 261) :

सम्राट अशोकाने साम्राज्य विस्ताराच्या उद्देशाने कलिंगवर स्वारी केली.
या युद्धात भयंकर रक्तपातानंतर अशोकाला विजय मिळाला.

या घटनेमुळे व्यथित होवून अशोकाने पुढे युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि बौद्ध धर्माचा स्विकार केला.

बौद्ध धर्माचा प्रसार :

बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला.
बौद्ध धर्माच्या प्रसारातील पाटलीपुत्र येथे बौद्धधर्म परिषद बोलविण्यात आली होती.

जागोजागी शिलालेख आणि स्तंभ उभे केले सांची बौद्ध स्तूप व अशोक स्तंभ याच काळात उभारले गेले.
आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यास श्रीलंकेस बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता पाठविले होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मौर्यकालीन राज्य व्यवस्था :

मौर्य कालामध्ये राजाला सल्ला देण्याकरिता मंत्रीपरिषद निर्माण करण्यात आली होती.
जिल्ह्याचा प्रमुख रज्जुक, तालुक्याचा प्रमुख गोप व गावा प्रमुख ग्रामणी म्हणून ओळखला जात असे.

मौर्य कालीन लोकजीवन :

मौर्य काळातील लोकजीवन कृषिप्रधान होते. त्याचबरोबर चकाकी असलेली भांडी तयार करणे, नौकाबांधणी, कापड तयार करणे, व्यापार इत्यादी उद्योग भरभराटीस आले होते.

विविध व्यापार्‍यांचे संघ स्थापन करण्यात आले होते, त्यांना श्रेणी असे म्हणत.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मौर्यकालीन कला व साहित्य :

सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर शिल्पकलेस राजाश्रय दिला.

यामुळे सारनाथ येथील स्तंब व सांची येथील बौद्ध सतूपासारखे स्मारके बांधली गेली. मौर्य काळामध्ये संस्कृत भाषेबरोबर पाली आणि अर्धमागधी भाषेत बरेच साहित्य लिहिले गेले.

चाणक्याचे अर्थशास्त्र, पाणिणीचे व्याकरण आणि बौद्ध धर्मातील त्रिपिटक याच काळात लिहिले गेले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वैदिक संस्कृतीबद्दल माहिती

Mpsc History

वैदिक संस्कृतीबद्दल माहिती:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वैदिक संस्कृतीचा उदय :

सुमारे चार हजार वर्षापूर्वी वायव्यकडील खैबर खिंडीमधून अनेक टोळ्या भारतात सप्तसिंधुच्या प्रदेशात आल्या. या टोळ्या आग्नेय युरोपातील कॉकेशस पर्वतच्या भागातून भारतात आल्या असाव्यात असे म्हटले जाते. या लोकांना आर्य म्हणून ओळखले जात असे. या लोकांना गुरांना चारण्याकरिता मोठमोठी कुरणे हवी असत. गुरे ही त्यांची संपत्ती होती.

सप्तसिंधुच्या भूमी ही त्याच्या ईच्छेला पूरक अशी होती म्हणून त्यांनी तेथेच वसाहत स्थापन केली. त्यानंतरच्या काळात आलेल्या टोळ्या गंगा-यमुनेच्या परिसरात स्थिर झाल्या.

अशाप्रकारे आर्य लोकांनी उत्तर भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्या. हे लोक निसर्गप्रेमी होते. त्यांनी वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्याकरिता अनेक कवणे रचली. या कवनाचा संग्रह म्हणजे वेद होय.

आर्यांनी वेदांची रचना केली म्हणून ही संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते.
वैदिक वाड्मय जगातील सर्वात प्राचीन वाड्मय म्हणून ओळखले जाते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वैदिक संस्कृतीची वैशिष्टे :

आर्य हे शस्त्रधारक असून त्यांनी टोळ्यांच्या रूपाने भारतात प्रवेश केला.

गुरे ही त्यांची प्रमुख संपत्ती होती. गुरांना आवश्यक असलेली कुरणे आणि पाण्याची सोईमुळे हे लोक सप्तसिंधुच्या खोर्‍यात स्थायिक झाले.

हे टोळ्याच्या रूपाने राहत असे आणि आपआपसात लढाया करीत असे. यापैकी भरत नावाची टोळी सर्वात पराक्रमी होती. या टोळीच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे नाव पडले.

सप्तसिंधुचा प्रदेश अपूर्ण पडल्यामुळे, यापैकी काही टोळ्या लोक गंगा-यमुनेच्या खोर्‍यात सरकल्या. व त्यांनी त्या भागात वस्ती केली. या प्रदेशाला आर्यवर्त असे नांव पडले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वैदिक वाड्मयाची रचना :

आर्य लोक निसर्गप्रेमी आणि अनेक देव-देवतांचे पूजक होते.
सूर्य, अग्नी, पर्जन्य, मरुत आणि इंद्र या त्यांच्या प्रमुख देवता होत्या. या देवतांना प्रत्यांना प्रसन्न करण्यासाठी ते प्रार्थना करीत व स्तुति करण्याकरीता मंत्र म्हणीत असे.
या मंत्राना सूक्त म्हणतात या मंत्राचा समूह म्हणजे वेद होय. यामधून आर्यांनी खालील ग्रथसंपदेची रचना केली.

वेद : आर्यानी निर्माण केलेली पहिली ग्रंथरचना म्हणजे वेद होय. वेद चार प्रकारचे आहेत.
ऋवेद : हा आर्यांचा पहिला ग्रंथ असून यामध्ये देवतांना प्रसन्न करण्याकरीता रचलेल्या ऋचांचा समावेश आहे.
यजुर्वेद : हा ग्रंथ यज्ञाविषयी माहिती देणारा आहे.
सामवेद : या ग्रंथामध्ये ऋचांचे तालासुरात कसे गायन करावे याबाबतची माहिती आहे.

यजुर्वेद : हा ग्रंथ यज्ञाविषयी माहिती देणारा आहे.
सामवेद : या ग्रंथामध्ये ऋचांचे तालासुरात कसे गायन करावे याबाबतची माहिती आहे.
.
अर्थवेद : या ग्रंथामध्ये दैनंदिन जीवनातील संकटे निवारण करण्याकरीता आणि उत्तम आरोग्य कराव्या लागणार्‍या उपायाची माहिती आहे.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

इतर ग्रंथसंपदा :

ब्राम्हण्यके : यामध्ये यज्ञवेदीमध्ये वेदांचा वापर कसा करावा याबाबतची माहीती आहे.
आरण्यके : वानप्रस्थाश्रम घेतल्यानंतर अरण्यात जावून रचलेल्या ग्रंथाचा समावेश होतो.

उपनिषदे : उपनिषधे यांचा अर्थ गुरुजवळ बसून मिळविलेले ज्ञान होय. यामध्ये अनेक प्रश्नावर जीवनातील अनेक प्रश्नावर सखोल चिंतन करण्यात आलेले आहे.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वैदिक कालीन राज्यव्यवस्था :

वैदिक कालीन राज्यव्यवस्था एक प्रकारे ग्रामीण व्यवस्थेची होती.
राजा : राजा हा राज्याचा प्रमुख असून प्रजेचे रक्षण करणे ही त्याची प्रमुख जबाबदारी असे. राज्याचा कारभार चालविण्याकरीता त्यास पूरोहित, सेनापती आणि कर गोळा करणारा  भागदुध मदत करीत असे.
सभा व समिती : राज्य सत्तेवर नियंत्रण ठेवण्याकरिता सभा व समिती अशा दोन संस्था होत्या.
सभा : ही ज्येष्ठ लोकांचे मंडळ होते.

समिती : लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती म्हटले जात असे.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

इतर शासन व्यवस्था :

ग्रामणी : गावाच्या प्रमुखास ग्रामणी असे म्हटले जात असे व ग्रामवादी हा ग्रामणीच्या मदतीने गावाची न्यायविषयक जाबबदारी सांभाळत असे.
विशपती : गावाच्या समूहाला विश आणि त्याच्या प्रमुखास विश्पती म्हटले जात असे.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

दैनंदिन जिवनप्रणाली :

अन्न : वैदिक काळातील लोकांच्या आहारात दूध व दुधापासून बनलेल्या पदार्थाचा वापर असे. त्याचबरोबर मांस, फळे, तांदूळ आणि सातू इत्यादी धान्याचा उपयोग होत असे.

वस्त्र व प्रावरणे : वैदिक काळातील लोक स्तुती आणि लोकरीच्या कापडाचा वापर करीत असे.
घरे : वैदिक संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती. आर्य लोक झोपडी वजा मातीच्या घरात राहत असे.

अलंकार : वैदिक काळातील लोक फुलांच्या माळा, सोन्याचे दागिने, वेगवेगळ्या प्रकारचे मणी व त्यांच्या माळा अलंकार म्हणून वापरीत असे. निष्क हा त्यांचा आवडता दागिना होता.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वैदिक कालीन सामाजिक व्यवस्था :

वर्णव्यवस्था : वर्णव्यवस्था ही भारतीय जाती व्यवस्थेचा उगमस्थान आहे. सुरुवातीच्या काळात व्यवसायावरून ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य व शूद्र असे वर्ण निर्माण झाले. उत्तर वैदिक काळात वर्णव्यवस्था संपुष्टात येवून जन्मावरून जात ठरू लागली.

कुटुंबव्यवस्था : भारतात पितृसत्ताक कुटुंबपद्धतीचा जन्म वैदिक काळामध्ये झाला. समाजव्यवस्थेत स्त्रीयांचे स्थान दुय्यम असले तरी स्त्रियांना वेदाभ्यास करण्याचा अधिकार होता. गार्गी, लोपमुद्रा व मेत्रेयी या विद्वान स्त्रियांचा उल्लेख वैदिक काळातील वाड्मयात आढळतो. नंतरच्या काळात स्त्रियांवर कडक बंधने लादली गेली.

आश्रमव्यवस्था : जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या काळात मानवाला जीवनाचे शंभर वर्षे आयुष्य कल्पून त्याचे चार भागात विभाजन करण्यात आले. या प्रत्येक भागाला खालीलप्रमाणे कर्तव्य सोपविण्यात आले. ही जीवनाची आखणी म्हणजे आश्रमव्यवस्था होय.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

ब्रम्हचर्याश्रम : आयुष्याच्या पहिल्या भागात व्यक्तीकडे गुरुच्या सानिध्यात अभ्यास करून ज्ञान ग्रहण करून विद्या संपादन करण्याचे कर्तव्य त्याच्यावर सोपविण्यात आले.

गृहस्थाश्रम : या काळात व्यक्तीने विवाह करून त्याचेकडे कुटुंबाचे पालन व पोषण करण्याची आणि आपली संसारीक जाबाबदारी पार पाडण्याचे कर्तव्य त्याच्यावर सोपविण्यात आले आहे.

वानप्रस्थाश्रम : या काळात व्यक्तीने आपल्या मुलांकडे जबाबदारी सोपवून संसाराच्या सर्व कर्तव्यातून मुक्त होणे म्हणजे वानप्रस्थाश्रम होय.

संन्यासाश्रम : यात व्यक्तीने वनात जावून ईश्वर चिंतनात आपला उर्वरित काळ कंठावा असे मानले जाई.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

धार्मिक संकल्पना :

वैदिक काळातील लोक निसर्गपूजक होते.
सूर्य, वारा व पानी या शक्ति प्रसन्न राहाव्यात म्हणून आर्य लोक त्यांची प्रार्थना करीत असे.

अशा देवतांना नैवैद्य प्रदान करण्यात येत असे आणि हा नैवैद्य शक्तिपर्यंत पोहचविण्याचे कार्य अग्नी करतो अशी त्याची संकल्पना होती.
.
अग्नीस प्रसन्न करण्याकरीता यज्ञ ही संकल्पना उदयास आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣