Thursday 5 May 2022

मौर्यकालीन भारत

Mpsc History

मौर्यकालीन भारत:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मौर्य साम्राज्याची स्थापना :

नंद घराण्यातील शेवटचा राजा धनानंद हा अत्यंत जुलमी होता. त्याने चाणक्य नावाच्या ब्राम्हण व्यक्तीचा भर दरबारात अपमान केला.

त्याचा बदला म्हणून आर्य चाणक्यने चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वाखाली राजे लोकांना एकत्र करून धनानंदाचा पराभव केला आणि चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्याची स्थापना केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

चंद्रगुप्त मौर्य :

चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक असून भारताचा पहिला सम्राट होय. त्याने आपल्या राज्याचा विस्तार काबूल, कंदाहार, हेरात ते पश्चिमेकडील सौराष्ट्रपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता.
बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा) ही त्याच्या राज्याची राजधानी होती.
.
ग्रीकचा राजा सेल्युकस निकोटरने आपला राजदूत म्हणून मेगॉस्थनिस यास राजदूत म्हणून चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठविले होते. त्यांने मेगॉथिसने तत्कालीन परिस्थितिचे वर्णन इंडिका नावाच्या ग्रथांत केले होते.
चंद्रगुप्ताने आपला मुलगा बिंदुसार याचेकडे राज्य सोपवून संन्यास घेतला. त्याचे श्रवणबेळगोळा येथे निधन झाले.

बिंदुसार नंतर मौर्य वंशात सम्राट अशोक हा पराक्रमी राजा आला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सम्राट अशोक :

चंद्रगुप्तानंतर मौर्य साम्राज्यातील सम्राट अशोक हा दूसरा पराक्रमी राजा होय.
त्याने पूर्वेस बंगालचा उपसागर ते पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस काबूल नदीपर्यंत आणि उत्तरेस नेपाळ ते दक्षिणेस कावेरी नदीपर्यंत मगध साम्राजाच्या विस्तार केला होता.

कलिंगच्या युद्धाच्या घटनेमुळे सम्राट अशोकाच्या जिवनास वेगळेच वळण लागले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

कलिंग युद्ध (इसवी सन पूर्व 261) :

सम्राट अशोकाने साम्राज्य विस्ताराच्या उद्देशाने कलिंगवर स्वारी केली.
या युद्धात भयंकर रक्तपातानंतर अशोकाला विजय मिळाला.

या घटनेमुळे व्यथित होवून अशोकाने पुढे युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि बौद्ध धर्माचा स्विकार केला.

बौद्ध धर्माचा प्रसार :

बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला.
बौद्ध धर्माच्या प्रसारातील पाटलीपुत्र येथे बौद्धधर्म परिषद बोलविण्यात आली होती.

जागोजागी शिलालेख आणि स्तंभ उभे केले सांची बौद्ध स्तूप व अशोक स्तंभ याच काळात उभारले गेले.
आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यास श्रीलंकेस बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता पाठविले होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मौर्यकालीन राज्य व्यवस्था :

मौर्य कालामध्ये राजाला सल्ला देण्याकरिता मंत्रीपरिषद निर्माण करण्यात आली होती.
जिल्ह्याचा प्रमुख रज्जुक, तालुक्याचा प्रमुख गोप व गावा प्रमुख ग्रामणी म्हणून ओळखला जात असे.

मौर्य कालीन लोकजीवन :

मौर्य काळातील लोकजीवन कृषिप्रधान होते. त्याचबरोबर चकाकी असलेली भांडी तयार करणे, नौकाबांधणी, कापड तयार करणे, व्यापार इत्यादी उद्योग भरभराटीस आले होते.

विविध व्यापार्‍यांचे संघ स्थापन करण्यात आले होते, त्यांना श्रेणी असे म्हणत.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मौर्यकालीन कला व साहित्य :

सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर शिल्पकलेस राजाश्रय दिला.

यामुळे सारनाथ येथील स्तंब व सांची येथील बौद्ध सतूपासारखे स्मारके बांधली गेली. मौर्य काळामध्ये संस्कृत भाषेबरोबर पाली आणि अर्धमागधी भाषेत बरेच साहित्य लिहिले गेले.

चाणक्याचे अर्थशास्त्र, पाणिणीचे व्याकरण आणि बौद्ध धर्मातील त्रिपिटक याच काळात लिहिले गेले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...