Thursday 5 May 2022

शिवांगी सिंग राफेल उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक

#OneLiner

⚫️ शिवांगी सिंग राफेल उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक
#1st

🔰 फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग या राफेल लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक ठरल्या आहेत.

🔰 प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात त्या भारतीय वायुसेनेच्या चित्ररथामध्ये सहभागी झाल्या होत्या.


🔰 भारतीय वायुसेनेच्या चित्ररथामध्ये सहभागी होणाऱ्या त्या द्वितीय महिला वैमानिक आहेत.

🔰 भावना कांत 2021 सालच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात भारतीय वायुसेनेच्या चित्ररथामध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या होत्या.

🔰 शिवांगी सिंग या मूळच्या बिहारच्या असून 2017 मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाल्या आहेत.

त्या सध्या अंबाला येथील गोल्डन ॲरोज स्क्वाड्रनचा भाग आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...