Thursday 5 May 2022

भारताची स्वर कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जीवन चरित्रावर एक नजर


*_🎙️भारतरत्न लता मंगेशकर स्वर कोकिळा भारताच्याच नाही तर अखिल विश्वातील सर्वात सुप्रसिध्द आणि अनमोल अश्या गायिका आहेत. त्यांच्या आवाजाची किमया केवळ भारतियांवरच नव्हें तर विदेशातील नागरिकांवर देखील आजतागायत पसरलेली आपल्याला दिसते…_


▪️पर्ण नाव : लता दिनानाथ मंगेशकर

▪️जन्म :28 सप्टेंबर 1939 इन्दौर

▪️वडिलांचे नाव :पंडित दिनानाथ मंगेशकर

▪️आईचे नाव :वंती मंगेशकर

▪️बहिणी :आशा भोंसले, उशा मंगेशकर, मीना मंगेशकर

▪️भाऊ : हृदयनाथ मंगेशकर

▪️विवाह:अविवाहित

▪️राष्ट्रीयत्व :भारतिय

▪️वयवसाय :प्लेबॅक सिंगर, म्युझिक कंपोजर


📸`किती हसाल' या १९४२ सालच्या चित्रपटातले `नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी' हे सदाशिव नेवरेकरांनी संगीतबद्ध केलेले मराठी गीत गाऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

वसंत जोगळेकरांच्याच १९४६ सालच्या `आप की सेवा में' या हिंदी चित्रपटात संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या `पा लागू कर जोरी' हे पहिले गीत दीदींनी गायले.


 📸`मधुमती' या चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेल्या *`आजा रे परदेसी'* या गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. 


🎙️लताजींना गायनासाठी 1958, 1960, 1965, आणि 1969 ला फिल्म फेयर अवाॅर्ड प्राप्त झाले आहेत. *‘गिनीज बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्डस्’* तर्फे देखील त्यांचा विशेश सन्मान करण्यात आला आहे.


▪️मध्यप्रदेश सरकार तर्फे त्यांच्या नावे प्रत्येक वर्षी 1 लाखाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 1989 ला लतादिदींना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


👉तयांना मिळालेले विशेष,प्रमुख बहुमान


🎖️फिल्मफेअर पुरस्कार

(1958, 1962, 1965, 1969, 1993 आणि 1994)


🎖️राष्ट्रीय पुरस्कार

 (1972, 1975 आणि 1990)


🎖️महाराष्ट्र शासन पुरस्कार

(1966 आणि 1967)

१९६९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


🎖️1989 मध्ये त्यांना चित्रपट जगतातील सर्वोच्च सन्मान ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ देण्यात आला.


🎖️1993 मध्ये त्यांना फिल्मफेअरचा ‘लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ देण्यात आला.


🎖️1996 मध्ये त्यांना स्क्रीनच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


🎖️1997 मध्ये त्यांना ‘राजीव गांधी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.


🎖️1999 मध्ये पद्मविभूषण N.T.R. आणि झी सिनेच्या ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ने सन्मानित.


🎖️2000 साली I.I.A. F. (IIFA) च्या ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ने सन्मानित.


🎖️2001 मध्ये त्यांना स्टारडस्टचा ‘जीवनगौरव पुरस्कार’, नूरजहाँ पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2001 मध्ये, भारत सरकारने तुमच्या कामगिरीचा गौरव करताना तुम्हाला देशातील सर्वोच्च पुरस्कार *“भारतरत्न”* देऊन गौरविले.


🏆महाराष्ट्र शासनाने त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव म्हणून त्यांच्या नावे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दिला जातो.



लता मंगेशकर सुरांची राणी, भारत देशातील खास रत्नापैकी एक आहे.  लता दीदी देश विदेशात सर्व ठिकाणी त्यांच्या सुरांमुळे  ज्ञात  आहेत.  लता दीदी यांचे नाव गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील प्रविष्ट केले आहे,  लता दीदींनी जवळपास 30 हजार गाणे 20 भाषां मध्ये  1948-87 पर्यंत गायले आहे,  आता तोच आकडा  ४० हजार पर्यंत पोहचला आहे.


No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...