अमरावती प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती

अमरावती प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती -------

1. अमरावती जिल्हा :
जिल्ह्याचे मुख्य ठिकाणअमरावती
क्षेत्रफळ – 12,210 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 28,87,826 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके – 14 – अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, अमरावती, चांदुरबाजार, भातकुली, अंजनगांव (सुर्जी), नांदगांव (खं.), चिखलदरा, धारणी, वरुड, तिवसा, चांदूर रेल्वे, धामनगांव रेल्वे.

सीमाअमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस यवतमाळ जिल्हा असून पूर्वेस नागपूरवर्धा हे दोन जिल्हे आहेत. पश्चिमनैऋत्येस अकोला जिल्हा आहे.

अमरावती जिल्हा विशेष

अमरावती येथे पूर्वी उंबराची झाडे मोठ्या प्रमाणात होती. उंबराच्या या झाडांवरून उंदुबरावती असे झालेकालांतराने उमरावतीचे अमरावती असा अपभ्रंश होत जावून आजचे अमरावती हे नाव उदयास आले.

अमरावती जिल्हयातल कौंडन्यपूर हे गाव रुख्मिणीचे माहेर म्हणून प्रसिद्ध. डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांची कर्मभूमी. डॉ. पंजाबराव देशमुख, विर वामनराव जोशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजगाडगे बाबा अशा थोर

पुरुषांची जन्मभूमी.

अमरावती विधापिठाचे नामकरणसंत गाडगे बाबा अमरावती विधापीठअसे करण्यात आले.
अमरावती जिल्हयातील प्रमुख स्थळे

अमरावतीयेथील संत गाडगे महाराजांनी समाधीअंबादेवी मंदीर प्रसिद्ध आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मुख्यालय येथे आहे.

चिखलदराथंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थळ विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाते.
परतवाडा  – इमारती लाकडाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.

रिद्धपूरयेथे गोविंद्प्रभुंची समाधी आहे. महानुभावांची काशी म्हणून प्रसिद्ध.
शेडगावसंत गाडगे महाराजांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.

मोझरीसंत तुकडोजी महाराजांनी स्थापना केलेला गुरुकुंज आश्रम येथे आहे. महाराजांची समाधी येथेच आहे.

ऋणमोचनयेथील मुदगलेश्वराचे मंदीर प्रसिद्ध आहे.
बडनेराविड्याच्या पानासाठी बडनेरा परिसर प्रसिद्ध आहे.

कौंडिण्यपुरविदर्भाची पौराणिक राजधानी कुंडीनपूर या नावाने महाभारतात प्रसिद्ध असलेले आता कौंडिण्यपुर म्हणून ओळखले जाते.

प्राचीन अवशेषांकरिता विशेष प्रसिद्ध आहे.

सालबर्डीहे गाव मोर्शी तालुक्यात असून मारू नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाजवळच , बौद्ध व  हिंदू लेणी आहेत.

शिवाय नुकत्याच काळात पाशुपत पंथाच्या 2 लेण्यांचा शोध लागलाय. तसेच लंकेश्वरपंचवतार मंदिरे, डोंगरावरील शिव मंदीर प्रसिद्ध आहे.

अमरावती जिल्हयाची वैशिष्ट्ये
कुंडीनपूरचा राजा भीष्मकाची कन्या रुक्मिणी ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी असल्याचा उल्लेख महाभारतात सापडतो.

वर्धा नदीच्या काठावर कौंडण्यपुर येथे विठ्ठल-रुक्मिणी चे मंदीर विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे मोठी यात्रा भरल्या जाते.

ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी असल्याचा उल्लेख महाभारतात सापडतो.

मर्यादापुरषोत्तम रामाचे आजी अजोबा नल, दमयंतीपैकी नल यांची कौंडण्यपुर ही जन्म नगरी असल्याचा उल्लेख आढळतो.

अमरावती जिल्ह्यातून वाहणार्‍या नद्या – तापी, पूर्णा, वर्धा, पेढी, चंद्रभागा, विदर्भा, गाडगा, सिपना, शहाणूर
अमरावती जिल्ह्यामध्ये औधोगिक वसाहती – अमरावती, अंजनगाव, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, वरुड.
ढाकणे-कोलखाज वन्यप्राणी अभयारण्य अमरावती जिल्ह्यात आहे.

अमरावती विधापिठाचे नाव-संत गाडगे बाबा अमरावती विधापीठ.

अमरावती जिल्ह्यामध्ये कृषी उत्पादनाच्या प्रमुख बाजारपेठा- अमरावती, चांदूर, दार्यापूर, अचलपूर, धामनगांव, वरुड.

अमरावती जिल्ह्यामध्ये  प्रमुख औधोगिक उत्पादने – तेल गाळणे, हस्तकला, यंत्रमाग, कापड, हातमाग.
अमरावती जिल्ह्यातून गेलेला राष्ट्रीय हमरस्ताघुळे-कलकत्ता

अमरावती जिल्ह्यातील आदिवासी जमातीकोरकूगोंड

अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणचिखलदरा

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...