Wednesday 4 May 2022

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान :-


◆ गर्भवती महिलांना प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण प्रसुतीपूर्व सेवा मिळावी या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात केली.

◆ रोगनिदान चाचण्या, सोनोग्राफी तपासणी, प्रसुतीतज्ञाकडून शारीरिक आणि उदर तपासणी, अति जोखमीच्या गरोदरपणाचे वेळेवर निदान, तत्पर संदर्भसेवा हे या अभियानाचे महत्वाचे घटक आहेत.

◆ दर महिन्याच्या नऊ तारखेला या सेवा आरोग्य सुविधा केंद्रात लाभार्थ्यांना मोफत दिल्या जातात.

◆ नऊ तारखेला रविवार किंवा सार्वजनिक सुट्टी असेल तर पुढील कामकाजाच्या दिवशी या सेवा पुरविल्या जातात.

◆ नियमित प्रसुतीपूर्व सेवांव्यतिरिक्त या सेवा दिल्या जातात.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...