Thursday 5 May 2022

नागपुर प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती

नागपुर प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती -----

1. नागपुर जिल्हा :
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – नागपुर
लोकसंख्या – 46,53,171 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके – 15 – काटोल, सावणेर, रामटेक, हिंगणा, नागपुर (ग्रामीण), नागपुर (शहर), उमरेड, कामठी, नरखेड, कळमेश्वर, मौदा, भिवापुर, कुही, पारशीवणी, देवलापूर.

सीमा – नागपुर जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेशातील छिदवाडा व शिवणी हे जिल्हे असून वायव्येस अमरावती जिल्हा आहे. दक्षिणेस चंद्रपुर जिल्हा, पूर्वेस भंडारा जिल्हा आणि पश्चिमेस वर्धा जिल्हा आहे.

नागपुर जिल्हा विशेष----------

नाग नदीच्या काठी असलेल्या या शहराला नाग नदीवरून नागपुर हे नाव पडले. हे शहर मराठा राजवटीत भोसल्यांच्या राजधांनीचे शहर होते. येशील दीक्षाभूमी हे स्थान प्रसिध्द आहे.

महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. संत्र्यासाठी देशातच नव्हे तर विदेशात सुध्दा प्रसिध्द आहे.
4 फेब्रुवारी 2004 रोजी नागपुर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला.

नागपुर विद्यापीठाचे नामकरण ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठअसे करण्यात आले.

नागपुर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे--------

नागपुर – महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. येथील सीताबर्डीचा किल्ला पाहण्यासारखा आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ, निरी; रमन विज्ञान केंद्र प्रसिध्द आहे.

कामठी – दगडी कोळश्याच्या खाणीसाठी प्रसिध्द आहे. येथे सैनिकी शिक्षण देणारे विद्यालय असून अलीकडे येथील ड्रॅगण पॅलेस टेम्पल प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित होत आहे.

काटोल – येथे लिंबू या फळाचे संशोधन केंद्र आहे.
सावनेर – दगडी कोळश्याच्या खाणी आहेत.
रामटेक – येथेच महाकवी कालिदासांनी मेघदूत हे काव्य लिहिले होते. येथे महाकवी कालिदास स्मारक आहे.

अंभोरा – येथील चैतन्येश्वराचे व हरिहर स्वामींचे मंदिर प्रसिध्द आहे.
कळमेश्वर – संत्रा व मिरचीच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे.
भिवापुरमिरचीच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे.

नागपुर जिल्ह्याची वैशिष्ट्ये---------
14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौध्द धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतली. हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे धर्मांतर होय.)

याच स्थळाला दीक्षाभूमी म्हणून ओळखल्या जाते.
कामठी येथील सर्वदूर गाजलेले ड्रॅगण पॅलेस हे बौध्द धम्म मंदिराचे 23 नोव्हेंबर 1999 ला उद्घाटन झाले. अतिशय देखणी वास्तु असणारे हे मंदिर ड्रॅगण पॅलेस मंदिर म्हणून ओळखले जाते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...