Ads

26 November 2022

भारताचे संविधान

भारताचे संविधान
भारतातील सर्वोच्च कायदा

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.

भारताचे संविधान
Constitution of India.
भारतीय संविधानाची उद्देशिका
मूळ शीर्षक
भारतीय संविधान
न्यायक्षेत्र
भारत
स्वीकारल्याचा दिनांक
२६ नोव्हेंबर १९४९
अंमलबजावणीचा दिनांक
२६ जानेवारी १९५०
शासनप्रणाली
संघीय, संसदीय, घटनात्मक प्रजासत्ताक
शाखा
तीन (कार्यकारी, विधिमंडळ आणि न्यायपालिका)
वैधानिक संस्था
दोन (राज्यसभा आणि लोकसभा)
कार्यकारी
पंतप्रधान - कनिष्ठ सभागृह संसदेचे जबाबदार नेतृत्व करणारे मंत्रीमंडळ
न्यायपालिका
सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालये
संघराज्य
संघराज्य
निवडणूक गण
होय, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी
अंतर्भूत कलम

एकूण घटनादुरुस्त्या
१०५
शेवटची घटनादुरूस्ती
१५ ऑगस्ट २०२१ (१०५ वी)
दस्तऐवज जतन स्थान
संसद भवन, नवी दिल्ली, भारत
स्वाक्षरीकर्ते
‌ संविधानसभेचे २८४ सदस्य
पुनर्स्थित करा
भारत सरकारचा कायदा १९३५
भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७

१९५७ पर्यंतचे भारताचे संविधान (हिंदी)

बाबासाहेब आंबेडकर आणि २०१५ च्या भारतीय टपाल तिकिटावर भारतीय संविधान

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्यघटनेची प्रत संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपूर्द करतांना, २६ नोव्हेंबर १९४९
देशाच्या कारभारासंबंधी च्या तरतुदीत एकत्रितपणे व सुसूत्रपणे संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत संविधान हे देशाच्या राज्यकारभारात संबंधीच्या तरतुदींचा लिखित असा दस्तऐवज आहे जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी मधून शासन किंवा सरकार हे स्थापन केले जाते संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन आहे संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेल्या कायद्यानुसार शासन चालवले जाते संविधानाला विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत तसे केल्यास न्याय मंडळ हे कायदे रद्द करू शकते.

इतिहास संपादन करा
मुख्य लेख: भारताची संविधान सभा

भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीच्या इतर सदस्यांसमवेत. (बसलेल्यां पैकी डावीकडून) एन. माधवराव, सय्यद सदुल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, सर बेनेगल नरसिंह राव. (उभे असलेल्यांपैकी डावीकडून) एस.एन. मुखर्जी, जुगल किशोर खन्ना व केवल कृष्णन् (२९ जानेवारी, इ.स. १९४७
१९५० साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५ च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६ च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली तर फ्रॅंक अँथनी यांच्या उपाध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली. ११ डिसेंबर रोजी सर्व सदस्यांच्या सहमतीने डॉ. राजेंद्रप्रसाद यांची अध्यक्षस्थानी तर आशुतोष मुखर्जी यांची उपाध्यक्ष स्थानी निवड करण्यात आली. हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे. पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २११ सदस्य उपस्थित होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी या रूपात काम केले होते.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापन झाली. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होते. हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. त्यामुळे भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.[१] नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.

भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे 1 ते 51पर्यंत

भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे Important Constitutional Articles

संविधानात्मक महत्वाची कलमे Important Articles

लोकशाही प्रशासन असणाऱ्या राष्ट्रांमध्ये लोकांच्या हाती सत्ता एकवटलेली  असते.  लोकशाही प्रशासनामध्ये लोक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. 

अशा लोकांना आपले हक्क व अधिकार माहित असणे गरजेचे असते.  आणि असे हक्क-अधिकार लोकशाही राष्ट्राच्या संविधाना कडून मिळत असतात.  संविधानामध्ये हे अधिकार स्पष्ट करणारी महत्त्वाची कलमे असतात. 

 भारतीय संघराज्याने सुद्धा लोकशाही प्रशासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. म्हणून आपल्या देशात लोकांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. 

भारतीय संघराज्यातील प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे.

अशा प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार विषयक  संविधानात्मक महत्वाची कलमे  या ठिकाणी पाहणार आहोत.

कलम 1 – संघराज्य या राज्यांचा संघ असेल असे म्हटले आहे 

कलम 2 – मध्ये भारतीय संघात योग्य वाटतील त्या अटी आणि शर्ती वर नवीन राज्यांना समाविष्ट करणे हा अधिकार कलम 2 ने संसदेला दिला 

कलम 3 – मध्ये नवीन राज्याची निर्मिती व विद्यमान राज्याच्या क्षेत्रात सिमात किंवा नावात बदल 

कलम 4 – परिशिष्ट 1 व परिशिष्ट 4 ची दुरुस्ती आणि पूरक अनुषंगिक आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या त्यासंबंधी कलम 2 व कलम 3 अंतर्गत करण्यात आलेले कायदे

राज्यघटनेतील भाग दोन मध्ये कलम 5 ते कलम 11 पर्यंतच्या तरतुदी नागरिकत्वाशी संबंधित आहेत.

कलम 5 – राज्य घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व 

कलम 6 – पाकिस्तान मधून भारतात स्थलांतरित झालेल्या विवाहित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क 

कलम 7 – पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क 

कलम 8 – मूळ भारतीय असणाऱ्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क 

कलम 9 – परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादन करणाऱ्या व्यक्ती भारताच्या नागरिक नसणे 

कलम 10 – नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे 

कलम 11 – कायद्याद्वारे संसद नागरिकत्वाच्या याचे नियमन करेल.

भारतीय राज्यघटनेच्या भाग-3 मधील तरतुदी मूलभूत हक्काचे संबंधित असून अमेरिकेच्या घटनेवरून या स्वीकारण्यात आलेल्या आहेत. कलम 12 ते 35 या कलमांचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये होतो.

*समानतेचा हक्क कलम 14 ते 18 

*स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 

*शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24 

*धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 

*सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 30 

*घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम 32

कलम 31 – (निरसित)

कलम 33 – सैन्य दलासाठी मूलभूत फक्त संसदेला अधिकार 

कलम 34 – लष्करी कायदा लागू मूलभूत हक्कावर मर्यादा 

कलम 35 – मूलभूत कशासाठी तरतुदी लागू करण्याचा कायदा

भारतीय राज्यघटनेच्या भाग-4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे कलम 36 ते 51 पर्यंत आहेत.

कलम 36 – राज्याची व्याख्या

कलम 37 – निर्देशक तत्वाचे उपयोजन

कलम 38 – लोककल्याणाच्या संवर्धनासाठी राज्याने समाजव्यवस्था प्रस्थापित करणे

कलम 39 – राज्याने अनुसरा वयाच्या धोरणाची विवक्षित तत्वे

कलम 39 a – समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य

कलम 40 – ग्रामपंचायतीचे संघटन

कलम 41 – कामाचा शिक्षणाचा आणि युवक शेत बाबतीत लोक सहाय्याचा यांची तरतुदी

कलम 42 – कामाच्या ठिकाणी न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसुती विषयक सहाय्य याची तरतूद

कलम 43 – कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी

कलम 43 A – औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग

कलम 43 B – सहकार संस्थांचे प्रवर्तन

कलम 44 -नागरिकांसाठी समान नागरी संहिता 

कलम 45 – 6 वर्षाखालील बालकांची प्रारंभिक बाल्य अवस्थेतील देखभाल व शिक्षणाची तरतूद 

कलम 46 – अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन 

कलम 47 – पोषणाचा व जीवनमानाचा स्तर उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्यांचे कर्तव्य 

कलम 48 – कृषी आणि पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था करणे 

कलम 48 A – पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व जीवसृष्टी यांचे रक्षण करणे 

कलम 49 – राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाची स्मारके ठिकाने वास्तू यांचे संरक्षण 

कलम 50 – कार्यकारी यंत्रणेने पासून न्याय यंत्रणेची फारकत

कलम 51 – आंतरराष्ट्रिय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन.

संविधान सभेबाबतच्या महत्त्वाच्या समित्या.....

💠मसुदा समिती
अध्यक्ष__डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

💠कार्यपद्धती नियम समिती
अध्यक्ष__डॉक्टर राजेंद्र प्रसाद.

💠सुकाणू समिती
अध्यक्ष__डॉक्टर राजेंद्र प्रसाद.

💠स्टाफ व वित्त समिती
अध्यक्ष__डॉक्टर राजेंद्र प्रसाद.

💠योग्यता समिती
अध्यक्ष__अल्लादी कृ.अय्यर.

💠ऑर्डर ऑफ बिझनेस समिती
अध्यक्ष__के  एम मुंशी.

💠संस्थानिकांची चर्चेसाठी समिती
अध्यक्ष__पंडित जवाहरलाल नेहरू.

💠ध्वज समिती
अध्यक्ष__डॉक्टर राजेंद्र प्रसाद.

💠संविधान सभेच्या कार्यावरील समिती
(भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याखाली)
अध्यक्ष__ग.वा. मावळणकर.

💠संघराज्य अधिकार समिती
अध्यक्ष__पंडित जवाहरलाल नेहरू.

💠प्रांतिक घटना समिती
अध्यक्ष__वल्लभाई पटेल.

2 मार्क्सचा प्रश्न नक्की पडेल खालील माहिती मधून - भारतीय संविधान आणि सर्व काही

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. आपल्या संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. आज संविधान दिनानिमित्त जाणून घेऊ आपल्या राज्यघटनेविषयी…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन (1947) झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला गेला. यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो.

⭐️ भारतीय संविधान आणि वैशिष्ट्ये :

● भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

● भारताची राज्यघटना उद्देशिका, मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.

● मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.

● सध्या राज्यघटनेत 448 कलमे (39A, 51A यांसारखे कलमे घटना दुरुस्तीद्वारा) असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

● भारतीय संविधान मुख्यत्वे 1935च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे.

● भारताने अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय शासनपद्धती न स्वीकारता ब्रिटनप्रमाणे संसदीय शासनपद्धती स्वीकारली आहे.

● घटनेने लोकसभा व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूकांसाठी सार्वत्रिक प्राैढ मतदानाची तरतूद केलेली आहे. 18 वर्षे पूर्ण असणारा प्रत्येक नागरिक या निवडणूकांमध्ये मतदान करू शकतो.

● भारत हे संघराज्य असूनही भारतीय राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे.

● भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला आहे. संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार असून प्रत्येक घटक राज्यांसाठी स्वतंत्र सरकार आहे.

भारतीय संविधान तयार करताना विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास करण्यात आला आहे. इतर देशांच्या संविधानातील चांगल्या तरतूदी भारतीय संविधानात समाविष्ठ करण्यात आल्या. त्यातील गोष्टी खालीलप्रमाणे : 

1) संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
2) मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
3) मूलभूत हक्क : अमेरिका
4) न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
5) न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिकाय
6) कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
7) सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
8) कायदा निर्मिती : इंग्लंड
9) लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
10) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
11) संघराज्य पद्धत : कॅनडा
12) शेष अधिकार : कॅनडा

भारताची राज्यघटना – भारतीय संविधान

भारताची राज्यघटना – भारतीय संविधान

भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.
भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे.
नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून राज्यघटना अंमलात आली.
1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.
ऑगस्ट 29, रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.
अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी स्वीकारला गेला.
यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.
संविधान संपूर्ण रूपानेजानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.
त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.
मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.
सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.
सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.
मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.
राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.
काही महत्वपूर्ण वैशिट्ये :

मूलभूत आधिकार
सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे
संघराज्य प्रणाली
प्रत्येक भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्ये.
विभाग :

प्रशासकीय (Executive)
विधीमंडळे (Legislative)
न्यायालयीन (Judicial)

संविधान सभेचे कामकाज


–९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली. या बैठकीला २११ सदस्य हजर होते. जेष्ठतम असलेल्या डॉ. सच्चितानंद सिन्हा यांना संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.

-११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष व H C मुखर्जी यांची उपाध्यक्षम्हणून निवड करण्यात आली.

-B N राव यांची नेमणूक संविधान सभेचेकायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून करण्यात आली.

–१३ डिसेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरूयांनी संविधान सभेत ‘उद्देशपत्रिका‘ मांडली व २२ जानेवारी १९४७ रोजी संविधान सभेने तिचा स्वीकार केला.

*महत्वाचे मुद्दे:*

– मे १९४९ मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले.

– २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने भारताच्या राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला.

– २४ जानेवारी १९४७ रोजी संविधान सभेत भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान  स्वीकृत केले.

– २४ जानेवारी १९५० रोजी झालेल्या संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत २६ जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले.

संविधान


अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवसात आपले संविधान लिहून पूर्ण केले. व
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने स्वीकारले.
खऱ्या अर्थाने संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडरांनी आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय मिळवून दिला,

विचार, अभिवेक्ती, विश्र्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य मिळून दिले,

दर्जा ची व संधीची समानता मिळवून दिली,
बंधुता निर्माण केली.
मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य , राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिली..

सर्व नागरिकांना समान अधिकार दिला.

संविधान रूपी आपल्याला त्यांनी सोन्याची तिजोरी मिळवून दिली.
हे सर्व आपल्याला सहज मिळालेलं नाही ये..
या मागे अनेक स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या क्रांती विरांचे, राष्ट्र विरांचे योगदान आहे त्यांचा संघर्ष आहे.
यांनी दिलेले योगदान, त्यांचे मूल्य आपण जोपासले पाहिजे.
ते आत्मसात केले पाहिजे.
व त्या संविधानिक मूल्यांना समोर ठेऊन त्या दिशेने आपण वाटचाल केलीच पाहिजे.
एक जागरूक नागरिक म्हणून आपले हक्क समजलेच पाहिजे.
आणि त्या साठी महत्वाचे म्हणजे संविधान हे सर्वांनी वाचलेच पाहिजे.
तरच आपला देश खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील सुदृढ लोकशाही असलेला देश होईल.

25 November 2022

पोलीस भरती ऑनलाईन सराव टेस्ट

 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १   Click Here  ( Password: 1112)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  २  Click Here  ( Password: 1113)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ३  Click Here  ( Password: 1114)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ४  Click Here  ( Password: 1115)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ५  Click Here  ( Password: 1116)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ६  Click Here  ( Password: 1117)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ७  Click Here  ( Password: 1118)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ८  Click Here  ( Password: 1119)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ९  Click Here  ( Password: 1120)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १०   Click Here  ( Password: 1121)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  ११  Click Here  ( Password: 1112)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १२  Click Here  ( Password: 1112)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १३  Click Here  ( Password: 1112)


 पोलीस भरती प्रश्नपत्रिका  १४   Click Here  ( Password: 1112)

पंचायतराज विषयी प्रश्नसंच

महाराष्ट्रातील पंचायत राज-

आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

🌻1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
==> स्थानिक स्वराज्य संस्था

🌻2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
==> 2 ऑक्टोबर 1953

🌻3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
==> 16 जानेवारी 1957

🌻4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
==> वसंतराव नाईक समिती

🔘5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
==> 27 जून 1960

🌻6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
==> महसूल मंत्री

🔘7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
==>226

🌻8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
==> जिल्हा परिषद

🔘9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

🌻10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
==>  1  मे 1962

🌻11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

🔘12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
==> 7 ते 17

🌻13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
==>जिल्हाधिकारी

🔘14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
==> जिल्हाधिकारी

🌻15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
==> 5 वर्षे

🌻16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
==> पहिल्या सभेपासून

🌻17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
==> तहसीलदार

🌻18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
==> विभागीय आयुक्त

🌻19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> सरपंच

🌻20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
=पंचायत समिती सभापती

🌻21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> दोन तृतीयांश (2/3)

🔘22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> तीन चतुर्थांश (3/4)

🌻23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> पंचायत समिती सभापती

🔘24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> संबंधित विषय समिती सभापती

🌻26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> विभागीय आयुक्त

🌻28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
==> ग्रामसेवक

🌻29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
==> जिल्हा परिषदेचा

🌻30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

🌻31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
==> ग्रामसेवक

🌻32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

🌻33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
==> राज्यशासनाला

🔘34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
==> विस्तार अधिकारी

🌻35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
==> ग्रामविकास खाते

🌻36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्ह्याचे पालकमंत्री

🔘37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
==> जिल्हाधिकारी

🌻38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)

🌻39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

🌻40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष

🌻41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
==> वसंतराव नाईक

=====================

विज्ञान प्रश्नसंच

◾️1]शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) ३६९
2) ५४७
3) ६३९ ✅✅✅
4) ९१२

2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

1) सोडियम क्लोरेट ✅✅✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन

3]  जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर

1)  त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅

4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅
2) दोन
3) चार
4) सहा

5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ
2) ब ✅✅✅
3) ड
4) ई

6]  खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅✅✅

7] २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२                                                                                                                                       2) २३५.२
3) २३०.५२
4) २.३५२ ✅✅✅

8]  त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग ✅✅✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन

9] होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1)  निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची✅✅✅

10]   हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम

अंकगणित प्रश्नसंच

11. अस्मीता सुधाकरपेक्षा 324 दिवसानी मोठी आहे व रमेशपेक्षा 456 दिवसानी लहान आहे जर रमेशचा जन्मदिवस शनीवार असेल तर अस्मीताचा जन्मदिवशी कोणता वार असेल?

शुक्रवार
रविवार .   √
सोमवार 
मंगळवार

12. अक्षय स्नेहल यांच्या वयाचे गुणोत्तर 9: 1 आहे स्नेहल दिप यांच्या वयाचे गुणोत्तर 2: 3 आहे तर अक्षय व दिप यांच्या वयाचे गुणोत्तर किती?

3: 18
6: 1     √
2: 3
9: 1

13. नागेश सचीन अनुक्रमे एका व्यवसायात 15000, 40000 रुपये गुंतवतात 6 महिन्यानंतर सचीन अर्थी रक्कम काढून घेतो त्यांना एक वर्षानंतर 12000 नफा होतो तर नागेशचा वाटा किती?

6000
4000     √
8000
10000

14. मनोज आपल्या मासीक पगाराच्या 22% घर खर्चावर 18% प्रवासावर खर्च करतो आणि मनोज 18000 बचत करतो तर प्रवासावर किती रुपये खर्च करतो?

18000
5400      √
12000
10800

15. प्रथम 24 विषम संख्यांची सरासरी किती?

24    √
12
12.5
25

16. 6 सम संख्याची सरासरी 23 आहे तर सर्वात मोठी तिसरी संख्या कोणती?

26
24    √
28
22

17. एक बुक 250 रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती बुक 270 रुपयास विकल्याने होतो तर त्या बुकची खरेदी किंमत किती?

250
255     √
260
520

18. R.S.T यांचे सरासरी वय 19 वर्ष आहे त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे 8: 5: 6 आहे तर T चे वय किती?

6
15
24
18     √

19. एका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे त्या वस्तूवर 20% नफा ठेवून राज ती वस्तू 720 रुपये विकतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

740
700
750
600     √

20. 35 मिनीटांचे 1 तासाची असलेले गुणोत्तर किती?

35: 1
1: 35
12: 17
7: 12    √