20 January 2022

कळसुबाई बियाणे संवर्धन समितीचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

🛢कृषी मंत्रालय भारत सरकार संचलित ‘प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स व्हरायटिज अँड फार्मर्स राइट्स अथॉरिटी’ मार्फत पिकांच्या स्थानिक वाण संवर्धन आणि शाश्वात वापर यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय ‘जीनोम सेव्हियर कम्युनिटी’ पुरस्कार या वर्षी तालुक्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीला मिळाला आहे. दहा लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.

🛢नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान येथील मुख्यालयात ११ नोव्हेंबर रोजी भारताचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण डगळे, तसेच बीज माता पद्माश्री राहीबाई पोपेरे, अन्नमाता ममताबाई भांगरे, बायफ संस्थेचे विषय तज्ज्ञ डॉक्टर विठ्ठल कौठाळे, जैव विविधता तज्ज्ञ संजय पाटील, विभाग प्रमुख जितीन साठे, प्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी  हा पुरस्कार व स्वीकारला.

🛢स्थानिक वाण संवर्धन करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमांतून गेली आठ वर्ष तालुक्यात कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर शबरी आदिवासी महामंडळ नाशिक यांचे आर्थिक सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे.

🛢अकोले तालुक्यात ‘बायफ’ संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. वातावरण बदल आणि पोषण सुरक्षा यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुमारे ११४ वाणांचे संवर्धन संस्थेने केले आहे.

━━━━━━━༺༻━━━━━━━━

राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार 2020

🔰केंद्रीय क्रिडा मंत्रालयाच्यावतीने 1 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात 2020 या वर्षासाठी घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रिडा पुरस्काराच्या सर्व विजेत्यांना पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. केंद्रीय युवा कार्ये आणि क्रिडा मंत्री श्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.

🔰पुरस्कार विजेत्यांची नावे -

🔴राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार -

🔰रोहित शर्मा (क्रिकेट), मरियप्पन थांगावेलू (पॅरा-खेळाडू), मनिका बत्रा (टेबल टेनिस), विनेश फोगट (कुस्ती), राणी रामपाल (हॉकी)

🔴अर्जुन पुरस्कार –

🔰चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन), अतनु दास (तिरंदाजी), दुती चंद (मैदानी खेळ), सात्विक साईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन), विशेष भृगुवंशी (बास्केटबॉल), मनीष कौशिक (मुष्टियुद्ध)

🔴द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी) –

🔰 शिव सिंग (मुष्टियुद्ध), धर्मेंद्र तिवारी (तिरंदाजी), पुरुषोत्तम राय (मैदानी खेळ), रोमेश पठानिया (हॉकी)
द्रोणाचार्य पुरस्कार (सामान्य श्रेणी) – गौरव खन्ना (पॅरा-बॅडमिंटन), जसपाल राणा (नेमबाजी), ज्युडे फेलिक्स (हॉकी), योगेश मालवीय (मल्लखांब), कुलदीप कुमार हंडू (वुशू)

🔴ध्यानचंद पुरस्कार -

🔰एन उषा (मुष्टियुद्ध), लखा सिंग (मुष्टियुद्ध), प्रदीप श्रीकृष्ण गंधे (बॅडमिंटन), कुलदीप सिंग भुल्लर (मैदानी खेळ), जिन्सी फिलिप्स (मैदानी खेळ), तृप्ती मुरगुंडे (बॅडमिंटन)
मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) करंडक - पंजाब विद्यापीठ, चंदीगड

🔴तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार -

🔰अनिता देवी (भूमी), कर्नल सरफराज सिंग (भूमी), ताका तामुत (भूमी), केवल हिरेन कक्का (भूमी), सतेंद्र सिंग (जल), गजानंद यादव (हवाई), (मृत) मगन बिस्सा (जीवनगौरव)
Join👉

फिल्मफेअर-2021' पुरस्कार झाले घोषित; पाहा कोण ठरलेत मानकारी

🌺अभिनेता लीड रोल (मेल)

अजय देवगन (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

अमिताभ बच्चन (गुलाबो सिताबो)

इरफान खान (अंग्रेजी मीडियम)

राजुकमार राव (लूडो)

सुशांत सिंह राजपूत (दिल बेचारा)

 

🌺सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लीड रोल (फीमेल)

दीपिका पादुकोण (छपाक)

जान्हवी कपूर (गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

कंगना रनौत (पंगा)

तापसी पन्नू (थप्पड़)

विद्या बालन (शंकुतला देवी)

 

🌸सर्वोत्कृष्ट फिल्म

तान्हाजीः द अनसंग वॉरियर

थप्पड़

गुलाबो सिताबो

गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल

लूडो

 

🌺सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

ओम राऊत (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

शरण शर्मा (गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

अनुराग बसु (लूडो)

अनुभव सिन्हा (थप्पड़)

सुजीत सरकार (गुलाबो सिताबो)

 

🌺सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता

सैफ अली खान (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

दीपक डोबिरयाल (अंग्रेजी मीडियम)

गजराज राव (शुभ मंगल सावधान)

कुमुद मिश्रा (थप्पड़)

पंकज त्रिपाठी (लूडो)

 

🌺सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री

रिचा चड्ढा (पंगा)

मानवी गागरू (शुभ मंगल  सावधान)

नीना गुप्ता (शुभ मंगल ज्यादा सावधान)

तन्वी आजमी (थप्पड़)

फ़र्रुख़ जाफ़र (गुलाबो सिताबो)

 

🌺सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम

छपाक (शंकर एहसान लॉय)

दिल बेचारा (एआर रहमान)

लव आजकल (प्रीतम)

लूडो (प्रीतम)

मलंग (कई आर्टिस्ट)

 

🌺बेस्ट लिरिक्स

गुलजार: छपाक (छपाक)

शकील आजमी: इक टुकड़ा धूप (थप्पड़)

इरशाद कामिल: शायद (लव आज कल)इरशाद कामिल: मेहरमा (लव आज कल)

सैयद कादरी: हमदम हरदम (लूडो)

व्यायू: मेरे लिए तुम काफी हो (शुभ मंगल ज्यादा सावधान)

 

🌺बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल)

अरिजीत सिंह: शायद (लव आज कल)

अरिजीत सिंह: आबाद बरबाद (लूडो)

आयुष्मान खुराना: मेरे लिए तुम काफी हो (शुभ मंगल ज्यादा सावधान)

दर्शन रावल: मेहरमा (लव आज कल)

राघव चैतन्य: इक टुकड़ा धूप (थप्पड़

वेद शर्मा: मलंग (मलंग)

 

🌸बेस्ट प्लेबॅक सिंगर (फीमेल)

अंतरा मित्रा: मेहरमा (लव आज कल)

असीस कौर: मलंग (मलंग)

पलक मुंछाल: मन की डोरी (गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

श्रद्धा मिश्रा: मर जाए हम (शिकारा)

सुनिधि चौहान: पास नहीं तो फेल (शंकुतला देवी)

 

🌺क्रिटिक्स अवॉर्ड्स

गुलाबो सिताबो (सूजीत सरकार)

कामयाब (हार्दिक मेहता)

लूटकेस (राजेश कृष्णन)

सर (रोहेना गेरा)

थप्पड़ (अनुभव सिन्हा)

 

🌺सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स)

अमिताभ बच्चन (गुलाबो सिताबो)

इरफान खान (अंग्रेजी मीडियम)

राजुकमार राव (लूडो)

संजय मिश्रा (कामयाब)

शार्दुल भारद्वाज (ईब आले ऊ!)

 

🌺सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स)

भूमि पेडनेकर (डॉली किट्टी और वो चमकते सितारे)

कोकणा सेन शर्मा (डॉली किट्टी और वो चमकते सितारे)

सान्या मल्होत्रा (लूडो)

तापसी पन्नू (थप्पड़)

तिल्लोतामा शोम (सर)

विद्या बालन (शंकुतला देवी)

 

🌺बेस्ट प्रॉडक्शन डिझाईन

आदित्य कंवर (गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

अनुराग बसु (लूडो)

मानसी ध्रुव मेहता (गुलाबो सिताबो)

संदीप मेहर (पंगा)

श्रीराम कन्नड़ आयंगर, सुजीत सावंत, (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

 

🌺बेस्ट एडिटिंग

अजय शर्मा (लूडो)

चंद्रशेखर प्रजापति (गुलाबो सिताबो)

आनंद सुबैया (लूटकेस)

यश पुष्पा रामचंदानी (थप्पड़)

 

🌺बेस्ट कोरियॉग्रॉफी

फराह खान: दिल बेचारा (दिल बेचारा)

कृति महेश, राहुल शेट्टी (आरएनपी): इलीगल वेपन (स्ट्रीट डांसर 3D)

गणेश आचार्य: शंकरा रे शंकरा (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

गणेश आचार्य: भंकास (बागी 3)

 

🌺बेस्ट साऊंड डिझाईन

लोचन कांडविंड़े (लूटकेस)

अभिषेक नायर, शिजिन मेलविन हटन (लूडो)

दीपांकर जोजो चाकी, निहिर रंजन समल (गुलाबो सिताबो)

शुभम (ईब आले ऊ!)

कामोद खाराड़े (थप्पड़)

 

बेस्ट सिनमेटोग्रॉफी

केइको नकाहारा (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

अर्चित पटेल, जय आई पटेल (पंगा)

सौम्यनंद सही (ईब आले ऊ!)

सौमिक सर्मिला मुखर्जी (थप्पड़)

अविक मुखोपाध्याय (गुलाबो सिताबो)

 

🌺बेस्ट बॅकग्राउंड स्कोर

एआर रहमान (दिल बेचारा)

प्रीतम (लूडो)

समीर उद्दीन (लूटकेस)

संदीप शिरोडकर (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

मंगेश उर्मिला धाकड़े (थप्पड़)

 

🌺बेस्ट डायलॉग

प्रकाश कपाड़िया (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

भावेश मांडलिया, गौरव शुक्ला, विनय चावल, सारा बोदीनार (अंग्रेजी मीडियम)

कपिल सावंत (लूटकेस)

सम्राट चक्रवर्ती (लूडो)

जूही चतुर्वेदी (गुलाबो सिताबो)

 

🌺बेस्ट वीएफएक्स

जयेश वैष्णव (गंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

महेश बारिया (बागी 3)

प्रसाद सुतार (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

 

🌺बेस्ट स्टोरी

अनुभव सिन्हा, मृण्मयी लागू वायकुल (थप्पड़)

जूही चतुर्वेदी (गुलाबो सिताबो)

शुभम (ईब आले ऊ)

हार्दिक मेहता (कामयाब)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

GK Questions and Answers 2021


प्र. १.   नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण?

१. मदर टेरेसा
२. हरगोबिंद टागोर
३. सी. रमण
४ . रवींद्रनाथ टागोर

प्र. २. ब्रिटिश भारतातील पहिली लोकसंख्या जनगणना कधी  झाली?
१. इ.स १८८२
२. इ.स १८७२
३. इ.स १८८८
४. इ.स १९७२

प्र. ३.   जगातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या भारतात आहे?
१. १८.५%
२. १७.५%
३. २१.५%
४. १६.५%

प्र.४.  कलम १ (३)  नुसार, भारताचे राज्यक्षेत्र पुढील बाबीचे मिळून बनलेले असेल;

१) घटकराज्यांची राज्यक्षेत्रे
२) केंद्रशासित प्रदेश
३) संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे.
४) वरील पैकी सर्व

प्र.५.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे वर्णन संघराज्य असे न करता ' राज्याचा संघ' या शब्दात केले आले आहे कारण -

I) भारताचे संघराज्य अमेरिकन संघराज्याप्रमाणे घटकराज्यांतील कराराद्वारे निर्माण झालेले नाही.
II) घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही.

१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) अ आणि ब दोन्ही बरोबर
४) अ आणि ब दोन्ही चूक

प्र. ६.  सध्या भारतीय राज्यघटनेत  (डिसेंबर २०१८) पर्यंत किती कलमे आहेत ?

१) कलम ४४४
२) कलम ३२४
३) कलम ३४४
४) कलम ४७४

प्र.७.  १९५० साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे?

१) भारत सरकार कायदा, १९३५
२) भारत सरकारचा कायदा, १८३३
३) भारत सरकारचा कायदा, १८५८
४) वरीलपैकी सर्व

प्र.८.  भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली, त्याबद्दल खालील पैकी योग्य वाक्य  ओळखा.

अ ) सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली.
ब ) हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.
क) पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते.
ड) १९४६च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली.

पर्याय
१) अ,ब,
२) अ,ब आणि क
३) अ,ब,क आणि ड
४) अ, ड

प्र. ९.  कोरोना इन्फेक्शनच्या उपचारांसाठी कोणत्या देशाने अलीकडे प्लाझ्माची ऑनलाइन उपलब्धता सुरू केली आहे?

१ ) भारत
२) अमेरिका
३) बांगलादेश
४) ब्राझील

प्र. १०  कोणत्या राज्य सरकारने नुकतीच पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन वर्ग बंदी घातली आहे?

१) मध्य प्रदेश
२) कर्नाटक
३) ओडिशा
४) प. बंगाल

उत्तरे :
प्र. - १ - ४ . रवींद्रनाथ टागोर
प्र. - २ - २. इ.स १८७२
प्र. - ३ - २. १७.५%
प्र. - ४ - ४) वरील पैकी सर्व
प्र. - ५ - ३) अ आणि ब दोन्ही बरोबर
प्र. - ६ - १) कलम ४४४
प्र. - ७ - १) भारत सरकार कायदा, १९३५
प्र. - ८ - ३) अ,ब,क आणि ड
प्र. - ९ - ३) बांगलादेश
प्र. - १० - २) कर्नाटककर्नाट

भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत.

👍वर्ष २०२१ मधील तिसरी तिमाही व चौथ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न हे करोनापूर्व पातळीच्या वर गेले असून भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत झाले आहेत, असे मत निती आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी रविवारी व्यक्त केले.

👍 त्यांनी सांगितले, की अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत होण्याकडे वाटचाल करीत असली तरी कोविड १९ साथ संपुष्टात आणण्यासाठी देशात वेगाने व निर्णायक प्रयत्न झाले पाहिजेत. लसीकरणाच्या पातळीवर चांगल्या बातम्या  येत आहेत. 

👍तिसरी व चौथी तिमाही पाहिली तर वास्तव सकल राष्ट्रीय उत्पन्न हे कोविड १९ पूर्वीच्या पातळीपेक्षा वर गेले आहे. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेचे पायाभूत घटक मजबूत आहेत.  दरम्यान एप्रिल-जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ झाली असून गेल्या वर्षांत ती फारच कमकुवत होती. उत्पादन व सेवा क्षेत्रात भारताने चांगली कामगिरी केली असून कोविड १९ ची दुसरी लाट जास्त घातक होती.

👍आता भारताची गाडी रूळावर येत असून यावर्षी जास्त विकास दर गाठण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत विकास दराचा अंदाज पूर्वीच्या १०.५ टक्क्य़ांवरून ९.५ टक्के केला असून जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ८.३ टक्क्य़ांनी वाढेल असा अंदाज दिला आहे.

भारतीय सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेल्या महिला

🎯 फातिमा बीबी
✍️ कार्यकाळ : १९८९ ते १९९२

🎯 सुजाता मनोहर
✍️ कार्यकाळ : १९९४ ते १९९९

🎯 रुमा पाल
✍️ कार्यकाळ : २००० ते २००६

🎯 ज्ञानसुधा मिश्रा
✍️ कार्यकाळ : २०१० ते २०१४

🎯 रंजना देसाई
✍️ कार्यकाळ : २०११ ते २०१४

🎯 आर भानुमथी
✍️ कार्यकाळ : २०१४ ते २०२०

🎯 इंदु मल्होत्रा
✍️ कार्यकाळ : २०१८ ते २०२१

🎯 इंदिरा बॅनर्जी
✍️ कार्यकाळ : २०१८ ते २०२२ पर्यंत
═════════════

"त्रिशूल" आणि “गरुड”: तीन मालवाहू रेलगाड्यांना जोडून तयार करण्यात आलेल्या रेलगाड्या.

◼️प्रथमच, भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे (SCR) विभागाने दोन लांब पल्ल्याच्या मालवाहू रेलगाड्या चालवल्या, ज्यांना प्रत्येकी तीन मालवाहू रेलगाड्यांना जोडून तयार करण्यात आले.

◼️या नवीन मालवाहू रेलगाड्यांना "त्रिशूल" आणि “गरुड” असे नाव देण्यात आले आहेत. या गाड्यांना 177 डब्बे जोडले गेले आहेत.

◼️"त्रिशूल" गाडीने 7 ऑक्टोबर 2021 रोजी कोंडापल्ली स्थानकापासून ते पूर्व किनारी रेल्वेच्या खुर्दा विभागापर्यंत पहिला प्रवास केला.

◼️"गरुड" गाडीने 8 ऑक्टोबर 2021 रोजी गुंटकल विभागातील रायचूर ते सिकंदराबाद विभागातील मनुगुरु पर्यंत पहिला प्रवास केला.याप्रकारे मालाची वाहतूक विक्रमी पद्धतीने होणार असून त्यामागील खर्च देखील कमी येणार आहे. तसेच लागणारे मनुष्यबळ देखील कमी लागणार.

🔺🔻भारतीय रेल्वे विषयी...

◼️भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारचे कें‍द्रीय रेल्वे विभाग भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो.

◼️भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ 1853 साली झाला. 1947 सालापर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. 1951 साली या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

एअर मार्शल संदीप सिंग: भारतीय हवाई दलाचे उपमुख्य.

🔥भारतीय हवाई दलाने एअर मार्शल संदीप सिंग यांनी 01 ऑक्टोबर 2021 रोजी वाइस चीफ ऑफ एयर स्टाफ (VCAS) अर्थात भारतीय हवाई दलाचे उपमुख्य म्हणून पदभार स्वीकारला.

🔥एअर मार्शल संदीप सिंग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. ते अतिविशिष्ठ सेवा पदक आणि विशिष्ठ सेवा पदक प्राप्तकर्ता आहेत. 1983 साली ते भारतीय हवाई दलाच्या उड्डाण शाखेत लढाऊ वैमानिक म्हणून रुजू झाले.

🦋भारतीय हवाई दल (IAF) विषयी..

🔥भारतीय हवाई दल ही भारतीय लष्कराची एक महत्त्वाची शाखा आहे. 8 ऑक्टोबर हा दिवस भारतीय हवाई दल दिन म्हणून पाळला जातो.

🔥पहिल्या महायुद्धापासून युद्धशास्त्राचे एक नवे अंग निर्माण झाले, ते म्हणजे हवाई युद्ध. या युद्धाचा उपयोग जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन,रशिया व अमेरिका ह्या राष्ट्रांनी अनुक्रमे युद्धात करण्यास सुरुवात केली. 1918-38 या एकवीस वर्षांच्या (दोन जागतिक युद्धांच्या) संधिकाळात अनेक लहान-मोठ्या राष्ट्रांनी हवाई दले स्थापण्यास सुरुवात केली. 8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिशांनी भारत देशात ‘रॉयल एअर फोर्स’ याची स्थापना केली.

🔥स्थानिक भारतीय वैमानिकांची पहिली प्रशिक्षित तुकडी 1933 साली बाहेर पडली. 16 मार्च 1939 रोजी सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय अधिकारी स्क्वॉड्रन कमांडर झाले. तेच पुढे भारतीय हवाई दलाचे पहिले भारतीय प्रमुख झाले.

महात्मा गांधीचा जीवनपट

                  ❤️ महात्मा गांधी ❤️

  📌 नाव :- मोहन दास करचंद गांधी

  📌️ ️ पिता :- करमचंद गांधी

️ ️📌 माता :- पुतलीबाई

️ ️📌 जन्म :- 2 ऑक्टोबर 1869

️ 📌️ जन्म स्थान :- पोरबंदर गुजरात

️ 📌 ️ विवाह :- 1883 मध्ये कस्तूरबा गांधी सोबत

  📌 मुले :- हरिलाल, मणिलाल, देवदास रामदास

️ ️📌 राजनैतिक गुरु :- गोपाल कृष्ण गोखले

️ ️📌 प्रमुख शिष्य - इंग्लंडची मीरा बेन (महात्मा गांधी ने दिलेलं नाव) वास्तविक नाव मॅडलिन स्लेड.

  📌 कायद्याच्या अभ्यासासाठी ️️ इंग्लंडला  प्रस्थान : - 1888 मध्ये मुंबई मधून

  📌 कायद्याची पदवी :- 1891

  📌 अब्दुल्ला ह्यांचा खटला लढण्यासाठी  दक्षिण आफ्रिका  :- 1893 मध्ये प्रयाण

️ 📌 दक्षिण आफ्रीकामध्ये नाताळ कॉंग्रेसची स्थापना  :- 1894

️ 📌 दक्षिण अफ्रीका मध्ये जुलू आणि बोअर पदक : - 1899 मध्ये

  ️📌 केसर ए हिंद उपाधी  : - 9 जानेवारी 1915

  📌 पहिल्यांदा काँग्रेस अधिवेशनात सहभागी : - 1901 कोलकाता काँग्रेस अधिवेशन

  📌 ️दक्षिण आफ्रिकेच्या डार्बन मध्ये फीनिक्स आश्रमची स्थापना  :- 1904 मध्ये

  📌 सत्याग्रहाचा  प्रथम वापर  :- 1906 मध्ये साऊथ आफ्रीकामध्ये

  ️📌 ️ तुरुंगाचा जीवनात पहिला अनुभव : - 1908

  📌 ️टोलस्टाई फॉर्मची स्थापना :- 1910  जोहान्सबर्ग साऊथ अफ्रीका

  📌 महात्मा गांधी चे भारतात आगमन : - 9 जानेवारी 1915

️ 📌 साबरती आश्रमांची स्थापना : - 1915

  📌 ️कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष :- 1924 बेळगाव कर्नाटक

  📌 महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेत 22 वर्षे राहिले

  📌 आत्मकथा:- माझे सत्याचे प्रयोग

️ ️📌 अखिल भारतीय खादी मंडळाची स्थापना :-1923

️ ️📌 अखिल भारतीय चरखा संघटनेची स्थापना :- 23 सप्टेंबर 1925.

💥 प्रमुख पुस्तके :-

  ️📌 इंडिया ऑफ माई ड्रीम्स

  📌 अनासक्त योग

  📌 ️ हिंद स्वराज्य (1909)

  📌 गीता माता

📌 सप्त महाव्रत

️📌 सुनो विद्यार्थी.

सुकन्या समृद्धी योजना 2016

🌸१ हजार रुपयाच्या किमान रकमेसह सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते.

🌸 हे खाते मुलीच्या जन्मापासून केवळ १० वर्षापर्यंतच उघडता येते. एका वर्षामध्ये या खात्यात किमान हजार रुपये किंवा अधिकाधिक १.५० लाख जमा करता येतात.

🌸 एक पालक आपल्या केवळ दोन मुलीकरता हे खाते उघडू शकतो, आणि दोघींच्या खात्यात एक वर्षात १.५० लाख यापेक्षा अधिक रक्कम भरता येणार नाही.

🌸 मात्र दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्यास तिसऱ्या मुलीकरता हे खाते उघडले जाऊ शकते. मुलगी २१ वर्षे झाल्यावर हे खाते परिपक्व होते.

🌸 तथापी १८ वर्षानंतर आवशक्यता असल्यास ५०% रक्कम काढता येईल, ही योजना मुलीच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च घेऊन तयार करण्यात आली.

🌸या योजनेसाठी मुलीचे खाते काढताना मुलीचा जन्माचा दाखला, ओळखपत्र, निवासी पत्र, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

🌸खात्याच्या परिपक्वतेनंतर जमा झालेली रक्कम संबंधित मुलीच्या मालकीची होते. भारतात हे खाते कुठेही काढता येते.

🌸वयाच्या १० वर्षानंतर मुलगी स्वतः आपले खाते हाताळू शकते. किमान एक हजार रुपये दरवर्षी न भरू शकल्यास त्या वर्षासाठी ५० रुपये दंड आकाराला जाईल, मात्र दंडाच्या रकमेसह १४ वर्षापर्यंत कधीही हे खाते पुन्हा सुरु करण्याची तरतूद आहे.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना

🌸या योजनेचे मूळ उद्दिष्ट गर्भवती आणि स्तनपान कालावधीत महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देणे तसेच त्यांना पोषक आहार उपलब्ध करून त्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारणे.

🌸गर्भवती महिलेने नोंदणी केल्यानंतर तिला शासनातर्फे मिळणारे आर्थिक लाभ घेता येतात. शासनाकडून दोन हप्त्यांमध्ये एकूण रुपये ६००० मदत दिली जाते.  प्रथम प्रसुतीच्यावेळी (रुपये ३०००) आणि बालक सहा महिन्यांचे झाल्यावर (रुपये ३०००) देण्यात येतात.

🌸सद्यस्थितीत ही योजना अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित आहे.

अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया-स्तनदा मातांच्या चौरस आहारासाठी डॉ. अब्दुल कलाम अमृत योजना

🔴प्रस्तावना

अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण 33.1 टक्के आहे.

स्त्रियांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्याने याचा परिणाम बाळाच्या वजनावर होतो. शिवाय जन्मानंतर पहिले तीन महिने बालक पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्याने या कालावधीत मातेचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर शासनातर्फे अनुसूचित क्षेत्रांतर्गत अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आहारातून उष्मांक व प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत एक वेळ चौरस आहार उपलब्ध करून देण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.

🔴योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येईल.

अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थींना 1 डिसेंबरपासून चौरस आहार देण्यात येणार आहे.

राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यात 85 एकात्मिक बाल विकासप्रकल्पांतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे.

एकूण 16 हजार 30 अंगणवाडी आणि 2013 मिनी अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळणार आहे.

🔴योजनेतील घटक

अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या योजनेनुसार एकूण सहा महिन्याच्या कालावधीसाठी एक वेळचा चौरस आहार मिळणार आहे. उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण या योजनेमुळे कमी होण्यास मदत होणार आहे. अनुसूचित क्षेत्रामधील सुमारे 1 लाख 89 हजार एवढ्या गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना या योजनेचा दरवर्षी लाभ मिळणार आहे.  

मुलांमध्ये चेतना निर्माण करण्याच्या डॉ. कलाम यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेला भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना असे नाव देण्यात आले आहे. ही योजना राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांतील 85एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा, किंमत आणि पोषण मुल्ये ठरविण्यात आली असून चौरस आहाराचा खर्च सरासरी प्रति लाभार्थी 22 रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे. या योजनांसाठी केंद्र शासनाच्या टीएचआर योजनेचा निधी (केंद्र व राज्य हिस्सा) वापरण्यात येईल. 

अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविणे आवश्यक होते. अनुसूचित क्षेत्रामध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण 33.1 टक्के एवढे आहे. आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात. तसेचबालकाच्या जन्मानंतर पहिले तीन महिने मूल पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे.

🔴आहाराचे स्वरूप

या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दुध (साखरेसह), शेंगदाणा लाडू (साखरेसह), अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गुळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश असेल. तसेच हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक अशी चार सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात येईल. या समितीला आहार घटक खरेदी करण्याचे अधिकार राहतील.

🔴अंमलबजावणी यंत्रणा

ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना नियमित मिळणाऱ्या मानधना व्यतिरिक्त या योजनेचा आहार तयार करण्यासाठी प्रतिमाह प्रत्येकी दोनशे पंन्नास रुपये देण्यात येतील.

ही योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून योजनेंतर्गत कामाचा व फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावर आदिवासी विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सनियंत्रण समिती, जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण व अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात येईल.

तसेच अंगणवाडी पातळीवर महिला सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य (अनुसूचित जमाती) यांच्या अध्यक्षतेखाली आहार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या योजनेचे वेळोवळी त्रयस्थ संस्थेमार्फत