04 February 2025

नेत्ररोग (Eye Disease)

💘) रंग आंधळेपणा (Colour Blindness):

🔰 अनुवांशिक व बरा न होणारा रोग सर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही.

🔰 विशेषतः लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही .

🔰 फक्त पुरुषांनाच होतो.

======================

💘) मोतीबिंदू (Cataract):

🔰 डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अस्पष्ट बनतो, कमी प्रकाशात चांगले तर जास्त प्रकाशात कमी दिसते.

उपाय: भिंगारोपण, बहिरवर्क भिंगाचे रोपण केले जाते.

🔰 मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होते. यासाठी काही महिने ते काही वर्षे असा कालावधी असू शकतो. YAG लेसर वापरून हा द्वितीयक मोतीबिंदू काढता येतो.

======================

💘) काचबिंदू (Glaucoma):

🔰 हि व्यथा वयाच्या ४० ते ५० वर्षाच्या दरम्यान होते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

🔰 नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबुळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचबिंदू म्हणतात. 

🔰 काचबिंदूची परिणीती आंधळेपणात होऊ शकते.

🔰 डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.

======================

💘) शुष्कता (Xerophtalmia/xerosis):

🔰 व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होतो. डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा होऊ शकतो.

======================

💘) डोळे येणे (Conjuctivitis):

🔰 विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग. डोळे लाल होऊन खूप दुखू लागतात व चिकट पाणी येते.

======================

💘) खुपरी (Trachoma):

🔰 संसर्गजन्य रोग, घाणेरडया वस्तीत, दूषित हवेत, दूर व धुळीत राहणाऱ्यांना होतो.


🔰 प्रथम पापण्यांचा आतील भाग खरखरीत होतो व नंतर त्यावर साबुदाणाच्या आकाराचे उंचवटे येतात. डोळ्याच्या उघटझापीमुळे ते बुबुळावर घासले गेल्याने बुबुळावर फुले पडतात. त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.


💘) रांजणवाडी (Meibomian Cyst):


🔰 पापण्यांच्या केसांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्मस्रावक ग्रंथींमधून नेहमी एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडत असतो. 

🔰 या ग्रंथी धूलिकण, केसातील कोंडा इत्यादी कारणांमुळे बंद झाल्यास द्रव बाहेर न पडल्याने सुजतात. त्यालाच रांजणवाडी असे म्हणतात.


🔰 मानवी डोळ्यातील दृष्टिपटल अनेक प्रकाश-संवेदी (Lightsensitive) पेशींनी बनलेले असते. या पेशी दोन प्रकार / आकाराच्या असतात. (दंडाकार व शंकाकार)


🔰 प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची/ अंधुकतेची माहिती पुरवितात.


🔰 दंडाकार पेशी अंधुक प्रकाशाससुद्धा प्रतिसाद देतात परंतु शंकाकार पेशींना अंधुक संवेदना नसतात. या पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात. यामुळे रंगाची संवेदना किंवा जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच होते.


🔰 कान हे ऐकण्याचे इंद्रिय आहे. मात्र, त्याबरोबरच शरीराचा तोल सांभाळण्याचे महत्वाचे कार्य कानामार्फत केले जाते.


🔰 त्वचा हे स्पर्शाचे इंद्रिय असून शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे त्याचे महत्वाचे कार्य आहे. त्वचेच्या वरील थरामधून मेलॅनिन नावाचा द्रव स्त्रवत असतो, जो अतिनील किरणांना अपारदर्शी असतो. त्यामुळे त्वचेचा कँसर होण्याचे टळते.


🔰 जिभेला पाच प्रक्रारच्या चवी कळतात. गोड, खारट, आंबट, कडू व तुरट. 


🔰 तिखट ही खरी चव नसून तो केवळ प्रतिसाद असतो.


🔰 जिभेच्या शेंडयावर गोड चवीचे आकलन होते. तर, जिभेच्या सर्वात आतील भागावर कडू चवीचे आकलन होत असते.जिभेचे व नाकाचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी जस्त या खनिजक्षाराची आवश्यकता असते.


🔰 मानवी शरीर कमी केसाळ असल्याने त्वचेतून उष्णतेचा ऱ्हास जलद होतो.


🔰 मानवाचे वासाचे ज्ञान कुत्रा, मांजर, हरीण यांच्या तुलनेने फारच कमी आहे. तसेच नाकातील चेतांची टोके बराच काळ एकाच वासाची संवेदना ग्रहण करीत राहिल्यास त्या विशिष्ट वासासाठी ती बधिर होतात.


🔰 मानवी डोळ्यांना विधुतचुंबकीय किरणांचा फारच थोडा भाग दिसू शकतो. मानव अतिनील किरण बघू शकत नाही. मात्र फलमाशीसारखे कीटक ते बघू शकतात.


🔰 पीट वायपर जातीचा साप इन्फ्रारेड किरण बघू शकतो, म्हणूनच तो गडद अंधारातही उंदरासारखे भक्ष्य टिपू शकतो.


🔰 मानवी डोळ्यातील दृष्टिपटलात फारच कमी दंडपेशी असल्याने त्याची रात्रीची दृष्टी कमकुवत आहे. मांजर, हरीण, घुबड यांसारख्या अनेक प्राण्याच्या डोळ्यात मात्र मोठया प्रमाणात दंडपेशी असल्याने त्यांची रात्रीची दृष्टी चांगली असते.


🔰 ससा, घोडा, गुरे ही आवाजाच्या दिशेने त्यांचा बाह्यकर्ण वळवू शकतात, मात्र मानव आपला बाह्यकर्ण हलवू शकत नसल्याने त्याला कमी ध्वनिलहरी संकलित करता येतात.

कामगार संस्था/ ट्रेड युनियन चळवळी

1) मुंबई मजूर संघ, 1879

- महात्मा फुले 


2) बॉम्बे मिलहॅंड्स असोसिएशन, 1884

- एन एम लोखंडे


3) कामगार हितवर्धक सभा, 1909

- भिवजी नरे, सीताराम बोले, बॅ. हरिश्चंद्र तालचेरकर


4) सोशल सर्विस लीग, 1911 

- एन एम जोशी, नरेश अप्पाजी द्रविड, गोपाळ देवधर


5) नागपूर टेक्सटाइल युनियन

- रामभाऊ रुईकर


6) बॉम्बे पोस्टल युनियन, 1907


7) मद्रास लेबर युनियन, 1918

- बी पी वाडिया, कल्याण सुंदरम

- रजिस्टर झालेले पहिले युनियन


8) अहमदाबाद टेक्सटाइल युनियन/ मजूर महाजन संघ, 1918/20

- महात्मा गांधी यांचे मार्गदर्शनाखाली अनुसूया बेन यांनी स्थापना.

(आयोगाने महात्मा गांधी उत्तर दिलेले आहे)


9) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC), 1920

- लाला लजपतराय पहिले अध्यक्ष

- सध्या CPI चा प्रभाव


10) बॉम्बे टेक्सटाइल लेबर युनियन, 1926

- एन एम जोशी = अध्यक्ष, रघुनाथ वखले =सरचिटणीस


11) इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन (ITUF), 1929

- व्ही व्ही गिरी (जे पुढे जाऊन भारताचे राष्ट्रपती झाले), एन एम जोशी


12) हिंदुस्तान मजदुर सेवक संघ, 1934


13) इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC), 1947

- at मुंबई

- नेतृत्व =सरदार वल्लभभाई पटेल

- काँग्रेसचा प्रभाव


14) हिंद मजदुर सभा, 1948


15) भारतीय मजदुर संघ (BMS), 1955

- RSS चा प्रभाव असलेली कामगार संस्था

- दत्तोपंत ठेंगडी


16) कामगार आघाडी = दत्ता सामंत

- दत्ता सामंत यांनी 1982 मध्ये मुंबईत गिरणी कामगारांचा संप घडवून आणला.


17) महाराष्ट्र लेबर युनियन = राजन नायर


18) सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (CITU), 1970

- CPM ची कामगार संस्था


19) राष्ट्रीय मिल मजदुर संघ

- जी. डी. आंबेकर

महिला संघटना

🔺 1889 - भारत महिला परिषद (स्त्री सामाजिक परिषद) (Bharat Mahila Parishad - Ladies Social Conference)

- रमाबाई रानडे (Ramabai Ranade)


🔺 1910 - भारत स्त्री महामंडळ (Bharat Stree Mahamandal)

- सरलादेवी चौधरी (Saraladevi Chaudharani)


🔺 1917 - महिला भारत संघटना (Womens India Association)

- अॅनी बेझंट (Annie Besant) आणि मार्गारेट कझिन्स (Margaret Cousins)


🔺 1925 - राष्ट्रीय महिला परिषद (National Council of Women)

- मेहराबाई टाटा (Mehrabai Tata)


🔺 1927 - अखिल भारतीय महिला परिषद (All India Women Conference)

- मार्गारेट एलिझाबेथ कझिन्स (Margaret Elizabeth Cousins)


🔺 1937 - आंध्र महिला सभा (Andhra Mahila Sabha)

- दुर्गाबाई देशमुख (Durgabai Deshmukh)


🔺 1940 - अखिल भारतीय महिला काँग्रेस (All India Mahila Congress)

- सुचेता कृपलानी (Sucheta Kripalani)


🔺 वुमन्स स्वदेशी लीग (Womens Swadeshi League)

- अंबुजम्मल (Ambujammal)


🔺 हिंद महिला समाज (Hind Mahila Samaj)

- अवंतिका बाई गोखले (Avantikabai Gokhale)

भारताच्या बचाव मोहिमा

✅1) ऑपरेशन गंगा - रशिया युक्रेन युद्धावेळी          

भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी. 

✅2) ऑपरेशन वंदे भारत - कोविड 19 मुळे.         

परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत

आणण्यासाठी.

✅3) ऑपरेशन कावेरी - सुदान मधील

गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत

आणण्यासाठी.

✅4) ऑपरेशन राहत - येमेन देशातून

भारतीयांना सुरक्षित परत आणले.

✅5) ऑपरेशन देवी शक्ती - अफगाणिस्तान

मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.

✅6) ऑपरेशन समुद्र सेतू - कोविड 19 मुळे

परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री

मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन.

✅7) ऑपरेशन अजय - इस्राईल मध्ये अडकलेले

भारतीय यांना मायदेशी परत आणणे.

✅8) ऑपरेशन करुणा - म्यानमार या देशात

मोचा चक्रीवादळ आले त्यावेळी प्रभावीतांच्या

मदतीसाठी भारताचे ऑपरेशन. 

✅9) ऑपरेशन दोस्त - सीरिया व तुर्की येथील

भूकंप बाधितांना मदत करण्यासाठी भारताने

राबवले. 

✅10) ऑपरेशन सद्भावना - भारतीय

लष्कराद्वारे लडाखमध्ये.

लेखा व कोषागारे विभाग GS अभ्यासक्रम

१) भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी


मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी.


घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागधी भूमिका व तत्रे, घटनेची महत्वाची कलमे उळक वैशिष्टये केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे शिक्षण, युनिफॉर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ, विधानसभा, विधान परीषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विविध समित्या इत्यादी.


२) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास-


सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७) महत्वाच्या व्यक्तीचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमान पत्रे, शिक्षणाचा परीणाम, स्वातंत्र्य पूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी.


३) भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल-


महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate) पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, पठार, विविध भूरुपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्ट स्थानावरील (Destination) परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्या व त्यांचे प्रश्न ४) पर्यावरण-


मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारचे प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी ५) सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान


अ) भौतिकशास्त्र (भौतिकशास्त्र ब) रसायनशास्त्र (रसायनशास्त्र) क) प्राणिशास्त्र (प्राणीशास्त्र) ड) नियमशास्त्र (वनस्पतिशास्त्र) इ) दुर्संवेदन, व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपाययोजन (रिमोट सेन्सिंग, एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि त्याचा अनुप्रयोग इ.) फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान)


६) अर्थशास्त्र व विकास, अर्थशास्त्र


१. सर्वसमावेशक अर्थशास्व


१.१ समग्रलक्षी अर्थशास्त्र १.२. वृध्दी आणि विकास १.३. सार्वजनिक वित्त १.४. आंतरराष्ट्रीय


व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल.


२. भारतीय अर्थव्यवस्था


२.१ भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा.

२.२ भारतीय शेती व ग्रामिण विकास २.३ सहकार २.४ मौद्रिक व वित्तीय क्षेत्र २.५ सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था २.६ उद्योग व सेवाक्षेत्र २.७ पायाभूत सुविधा विकास २.८ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल २.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था


७) चालू घडामोडी


जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील


८) माहिती अधिकार अधिनियम २००५ (As updated)...

महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प 🔴

⬜️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प


🅾️खोपोली - रायगड              

🅾️भिरा अवजल प्रवाह - रायगड                              

🅾️कोयना - सातारा                

🅾️तिल्लारी - कोल्हापूर          

🅾️पेंच - नागपूर                      

🅾️जायकवाडी - औरंगाबाद



🟧 महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प

                 

🅾️तारापुर - ठाणे                    

🅾️जैतापुर - रत्नागिरी              

🅾️उमरेड - नागपूर(नियोजित)



🟨 महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प  

                   

🅾️जमसांडे - सिंधुदुर्ग             

🅾️चाळकेवाडी - सातारा           

🅾️ठोसेघर - सातारा               

🅾️वनकुसवडे - सातारा           

🅾️ब्रह्मनवेल - धुळे                 

🅾️शाहजापूर - अहमदनगर

महत्त्वाचे चालू घडामोडी नोट्स

💘 जानेवारी ते सप्टेंबर २०२४ दरम्यान, ४७६.१ दशलक्ष पर्यटकांनी कोणत्या राज्याला भेट देत पर्यटनाचे नवे विक्रम प्रस्थापित केले ?

➡️ उत्तर प्रदेश ⭐️


⚡️ डेव्हलपिंग 8 (डी-८) आर्थिक सहकार्य संघटनेची ११ वी शिखर परिषद कोठे पार पडली ?

➡️ इजिप्त ⭐️


💘 इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे ?

➡️ ६.६% ⭐️


⚡️ अमरावती प्रकल्पासाठी कोणत्या जागतिक संस्थेने $800 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे ?

➡️ जागतिक बँक ⭐️


💘 नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने कोणत्या बँकेला ₹२७.३० लाखांचा आर्थिक दंड ठोठावला आहे ?

➡️ इंडसइंड बँक ⭐️


⚡️ २०२४ च्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकात भारत कितव्या क्रमांकावर आहे ?

➡️ ३९ ⭐️


💘 भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने कोणत्या देशासोबत भागीदारी करून प्राचीन भारताचे राष्ट्रीय संग्रहालय स्थापन केले आहे ?

➡️ फ्रान्स ⭐️


⚡️ डिसेंबर 2024 मध्ये जीएसटी कौन्सिलची ५५ वी बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली ?

➡️ अर्थमंत्री निर्मला सीतारमण ⭐️


💘 २४ वी बिमस्टेक बैठक कोठे पार पडली ?

➡️ थायलंड ⭐️

नेमणुका आणि नियुक्त्या 2024

◾️ओम बिर्ला : 18 व्या लोकसभेचे अध्यक्ष

◾️डी वाय चंद्रचूड : भारताचे 50 वे मुख्य सरन्यायाधीश

◾️हिरालाल सामरिया : भारताचे मुख्य माहिती आयुक्त

◾️नरेंद्र मोदी : नीती आयोगाचे अध्यक्ष

◾️अजित दोवल : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

◾️पंकज कुमार सिंह : उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

◾️ व्ही अनंत नागेश्वरन : भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार

◾️जया वर्मा सिंह : भारतीय रेल्वे बोर्ड चे अध्यक्ष

◾️रेखा शर्मा : राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष

◾️डॉक्टर उन्नीकृष्णन नायर : विक्रम साराभाई अंतराळ केंद्राची संचालक आहेत

◾️हिमांशू पाठक : भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष

◾️मनोज यादव :  रेल्वे सुरक्षा बल (RPF) चे प्रमुख

◾️ पी टी उषा :भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष

◾️ सिद्धार्थ मोहंती : LIC चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

◾️धीरेंद्र ओझा : प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) चे महासंचालक

◾️न्यायमूर्ती बीआर सारंगी : झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती

◾️मसूद पेझेश्कियान : इराणचे नवे अध्यक्ष म्हणून निवड

◾️हेमंत सोरेन : तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री

◾️डॉ.बी.एन.गंगाधर : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी

◾️सुजाता सौनिक : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव

◾️IAS अधिकारी मनोज कुमार सिंह : UP चे नवे मुख्य सचिव

◾️विक्रम मिसरी : भारताचे नवे परराष्ट्र सचिव

◾️अतुल चौधरी : ट्रायचे नवे सचिव

◾️IAS राकेश रंजन : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) चे अध्यक्ष

◾️मार्क रूट्टे : NATO चे महासचिव

◾️एंटोनियो कोस्टा - युरोपियन युनियन चे अध्यक्ष

◾️नवाफ सलाम : आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष

◾️रॉजर बिन्नी : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे (BCCI) चे अध्यक्ष

◾️समीर कामत : DRDO चे अध्यक्ष

◾️दिनेश कुमार :विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष

◾️प्रवीण सूद : CBI अध्यक्ष

◾️गिरीश चंद्र मुर्मु :  नियंत्रण आणि महालेखा परीक्षक 

◾️प्रवीण गौड :रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) चे अध्यक्ष

◾️रवी सिन्हा : RAW चे अध्यक्ष

◾️इकबाल सिंग लालपुरा : राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष

◾️गौतम गंभीर : क्रिकेट पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक

◾️भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे)

◾️भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे)

◾️वायुदल प्रमुख : विवेक .राम. चौधरी (27 वे)

◾️नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे)

◾️भूदल उपप्रमुख :एनएस राजा सुब्रमण (47 वे)

◾️NSA : अजित डोवल

◾️नितीन अग्रवाल : BSF चे अध्यक्ष

◾️नलीन प्रभात :NSG चे  अध्यक्ष

◾️अरविंद पनगरिया : 16 वा वित्त आयोग अध्यक्ष

भारतीय संसदेमधील विविध प्रकारचे बहुमत


🔥 साधारण बहुमत:

- साधारण बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: सर्वसाधारण विधेयक, ठराव, नवीन राज्य निर्मिती, विधान परिषदांची निर्मिती, नागरिकत्व कायदे, इ. (कलम 2/3, कलम 368 वगळता).


🔥 प्रभावी बहुमत:

- प्रभावी बहुमत: सर्व सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.(vacancy deducted)

- वापर: अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची हटवणूक.


🔥 संपूर्ण बहुमत:

- संपूर्ण बहुमत: सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: महत्त्वपूर्ण ठराव पास करण्यासाठी आवश्यक.


🔥 विशेष बहुमत:

📌 विशेष बहुमत प्रकार 1:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3.

- वापर: सर्व भारतीय सेवा निर्मिती (कलम 312), राज्यसभेचा ठराव (कलम 249).


📌 विशेष बहुमत प्रकार 2:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 आणि सभागृहाचा एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: न्यायाधीशांची व CEC ची हटवणूक, दुरुस्ती (कलम 368(1)).


📌 विशेष बहुमत प्रकार 3:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 आणि सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक आणि साधारण बहुमताने निम्म्यापेक्षा जास्त राज्यांचे बहुमत.

- वापर: संविधानातील दुरुस्ती (कलम 368), 4था अनुसूची, 7वा अनुसूची, सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या शक्ती, राष्ट्रपती निवडणूक (कलम 54/55), केंद्र-राज्य संबंध, संसदेमध्ये राज्यांचे प्रतिनिधित्व.


🔥 राष्ट्रपती महाभियोग:

- महाभियोग: सर्व सदस्यांच्या 2/3.***

- वापर: राष्ट्रपतीच्या महाभियोगासाठी आवश्यक.

मसुदा समिती (Drafting Committee)


◆ घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती.


◆ 29 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पार पडलेल्या 5 व्या अधिवेशनामध्ये गठीत केली.


◆  मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी पार पडली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.


◆ घटना समितीचे घटनात्मक सल्लागार बी.एन. राउ यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये मसुदा घटना तयार केली होती. त्यात 243 कलमे आणि 13 अनुसूची होत्या. मसुदा समितीने या मजकुराची चिकित्सा करण्यास ऑक्टोबर 1947 मध्ये सुरुवात केली व त्यात अनेक बदल केले.


◆ पुढे 21 फेब्रुवारी 1948 रोजी मसुदा समितीने मसुदा राज्यघटना घटना समिती अध्यक्षांना आणि समितीला सादर केली. यावेळी वितरीत केलेल्या मसुदा राज्यघटनेवर घटना समिती आणि समिती बाहेर देशभरात चर्चा सुरु झाली. या मसुदा राज्यघटनेत 315 कलमे आणि 8 अनुसूची होत्या.


◆ मसुदा राज्यघटनेसाठी एकूण 7,635 दुरुस्त्या प्रस्तावित होत्या, त्यापैकी केवळ 2,473 दुरुस्त्यांचे प्रस्ताव घटना समितीत मांडण्यात आले.


❇️ मूळ समितीमध्ये एकूण 7 सदस्य (अध्यक्षासहित) होते - 


(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (या समितीचे अध्यक्ष)

(2) एन. गोपालस्वामी अय्यंगार (काँग्रेस) (3) डॉ. के. एम. मुन्शी (काँग्रेस)

(4) सईद मोहम्मद सादुल्ला (मुस्लिम लीग)

(5) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर (अपक्ष)

(6) बी. एल. मित्तर (अपक्ष)

(7) डी. पी. खैतान (अपक्ष)


❇️ मसुदा समिती सदस्यांमध्ये झालेला बदल


(1) बी. एल. मित्तर यांचे घटना समितीचे सदस्यत्व पहिल्या बैठकीनंतर संपुष्टात आले. त्यामुळे त्यांना मसुदा समितीच्या पुढील बैठकांना उपस्थित राहता आले नाही. तसेच आपल्या आजारपणामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी एन. माधव राव यांची नियुक्ती करण्यात आली.


(2) डी.पी. खैतान यांचे 1948 मध्ये निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी टी.टी. कृष्णम्माचारी (काँग्रेस) यांची नियुक्ती करण्यात आली.


❇️ मसुदा राज्यघटनेची 3 वाचने -


(1) पहिले वाचन - 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948.

(2) दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 (3) तिसरे वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949


◆ मसुदा राज्यघटनेचा विचार करण्याकरीता 114 दिवस लागले.


◆ 26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा राज्यघटना संमत आणि स्वीकृत करण्यात

आली.

साहित्य अकादमी पुरस्कार :- माहिती

◾️ साहित्य अकादमी ची स्थापना " 12 मार्च 1954 " रोजी झाली

◾️ मुख्यालय " नवी दिल्लीला " आहे

◾️ साहित्य अकादमी चे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते

◾️ भारतातील 24 भाषांच्या साठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो

◾️ भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील एकूण 22 भाषा आणि इंग्रजी व राज्यस्थानी अशा दोन भाषा या सर्व मिळून एकूण 24 भाषांच्या साठी हा पुरस्कार दिला जातो


‼️ काही महत्वाच्या गोष्टी ‼️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

◾️ मराठी साठी प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला

◾️2023 साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक हे आहेत

◾️ कृष्णात खोत यांच्या रिंगण या कादंबरीला मराठी भाषे करता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 जाहीर झाला


‼️ रिंगाण - कृष्णात खोत यांच्याविषयी ‼️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

◾️ मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत'

त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या

🔥गावठाण’ (२००५), 

🔥‘रौंदाळा’ (२००८),

🔥‘झड-झिंबड’ (२०१२), 

🔥‘धूळमाती’ (२०१४),

🔥‘रिंगाण’ (२०१८

🔥'गरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत

◾️रिंगाण ही कादंबरी प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठवलेल्या माणसांची परवड हा ‘रिंगाण’ कादंबरीचा एक धागा आहे

◾️ पुरस्काराचे वितरण 12 मार्च 2024 ला होणार आहे⭐️⭐️⭐️⭐️

PRE- INDEPENDENCE ACTS

⭕️ चार्टर अ‍क्ट 1773

- 🟢 बंगालचा गव्हर्नर-जनरल

- 🟢 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 

- 🟢 कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी खाजगी व्यापार प्रतिबंधित

- 🟢 कोर्ट ऑफ डायरेक्टर्सला अहवाल देण्याची जबाबदारी


---


⭕️ पिट्स इंडिया अ‍क्ट 1784

- 🟢 बोर्ड ऑफ डायरेक्टर्स (BOD) आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स (COD)

- 🟢 दुहेरी सरकार


---


⭕️ चार्टर अ‍क्ट 1813

- 🟢 व्यापार मक्तेदारी रद्द

- 🟢 ख्रिस्ती धर्मप्रसारकांना भारतात येण्याची परवानगी

- 🟢 पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात


---


⭕️ चार्टर अ‍क्ट 1833

- 🟢 भारताचे गव्हर्नर-जनरल (लॉर्ड विल्यम बेंटिक)


---


⭕️ चार्टर अ‍क्ट 1853

- 🟢 विधायी आणि कार्यकारी कार्यांचे विभाजन

- 🟢 खुल्या स्पर्धेतून निवड

- 🟢 भारतीय विधीमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व


---


⭕️भारत सरकार 1858

- 🟢 गव्हर्नर-जनरल ते व्हाइसरॉय

- 🟢 कंपनीचे शासन समाप्त

- 🟢 नवीन कार्यालय - भारतासाठी राज्य सचिव

- 🟢 15 सदस्यांची भारताची परिषद


---


⭕️ भारतीय परिषद अ‍क्ट 1861

1. 🟢 व्हाइसरॉयने काही भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून नामांकित करणे (राजा ऑफ बनारस, महाराजा ऑफ पटियाला, आणि सर दिनकर राव)

2. 🟢 बॉम्बे आणि मद्रासला विधायी अधिकार देऊन विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू केली

3. 🟢 बंगाल, उत्तर-पश्चिम प्रांत आणि पंजाबसाठी नवीन विधीमंडळाची स्थापना

4. 🟢 विधानसभेत व्यवसायाची अधिक सोयीची व्यवस्था करण्यासाठी व्हाइसरॉयला नियम आणि आदेश जारी करण्याचा अधिकार दिला ('पोर्टफोलिओ' प्रणाली)

5. 🟢 व्हाइसरॉयला अध्यादेश जारी करण्याचा अधिकार दिला (सहा महिने)


---


⭕️ भारतीय परिषद अ‍क्ट 1892

- 🟢 आकार वाढवला पण अधिकृत बहुसंख्य ठेवली

- 🟢 बजेटवर चर्चा आणि प्रश्न विचारण्याची परवानगी

- 🟢 (मर्यादित आणि अप्रत्यक्ष निवडणुकीची तरतूद)


---


⭕️ भारतीय परिषद अ‍क्ट 1909 (मॉर्ले-मिंटो सुधारणा)

- 🟢 विधीमंडळाच्या आकारात वाढ (16 ते 60)

- 🟢 केंद्रीय विधीमंडळात अधिकृत बहुसंख्य, प्रांतीय विधीमंडळात अशासकीय बहुसंख्य

- 🟢 पुरवणी प्रश्न विचारण्याची आणि बजेटवर प्रस्ताव सादर करण्याची परवानगी

- 🟢 कार्यकारी परिषदेत भारतीयांची नियुक्ती (सत्येंद्र प्रसाद सिन्हा - कायदा सदस्य)

- 🟢 मुस्लिमांसाठी सांप्रदायिक प्रतिनिधित्व

- 🟢 प्रेसिडेंसी कॉर्पोरेशन, चेंबर्स ऑफ कॉमर्स, विद्यापीठे आणि जमीनदारांचे प्रतिनिधित्व


---


⭕️ भारत सरकार अ‍क्ट 1919 (मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा)

- 🟢 केंद्र आणि प्रांतीय विषयांचा वेगळा समावेश

- 🟢 प्रांतात द्वैध शासन प्रणालीचा प्रारंभ

- 🟢 विधीमंडळात द्विसदनीयता आणि थेट निवडणुका

- 🟢 व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळातील 6 सदस्य भारतीय

- 🟢 सिख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो-इंडियन आणि युरोपियनचे प्रतिनिधित्व

- 🟢 भारतासाठी उच्चायुक्ताच्या नवीन कार्यालयाची स्थापना

- 🟢 सार्वजनिक सेवा आयोगाची स्थापना

- 🟢 प्रांतीय बजेट्सना केंद्र बजेट्सपासून विभक्त करणे

- 🟢 सांविधिक आयोगाची नियुक्ती


---


⭕️ भारत सरकार अ‍क्ट 1935

- 🟢 संपूर्ण भारतीय महासंघ

- 🟢 तीन यादी - केंद्रीय यादी, प्रांतीय यादी, समवर्ती यादी

- 🟢 प्रांतात द्वैध शासन समाप्त आणि केंद्रात प्रारंभ

- 🟢 प्रांतात द्विसदनीयता

- 🟢 दबलेली वर्ग, महिला आणि श्रमिकांसाठी सांप्रदायिक प्रतिनिधित्व

- 🟢 भारतीय परिषदेचे उच्चाटन 

- 🟢 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

- 🟢 केंद्रीय, प्रांतीय आणि संयुक्त सार्वजनिक सेवा आयोग

- 🟢 फेडरल कोर्ट

महत्वाचा समित्या


👉1945 - सप्रू समिती - संस्थान आणि भारतीय संघ यांच्यातील संबंधांचे परीक्षण करणे


👉1953 - राज्य पुनर्रचना आयोग - राज्य सीमा 

पुनर्रचना करण्यासाठी


👉1964 -कोठारी आयोग - शैक्षणिक सुधारणांसाठी


👉1977 - शहा आयोग - आणीबाणी ची चौकशी करणे


👉1977 - अशोक मेहता समिती - भारतात त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था स्थापन करण्याची शिफारस केली.


👉1979 - मंडल आयोग- आरक्षण आणि कोटा विचार करणे


👉1983 - सरकारिया आयोग -केंद्र-राज्य संबंध तपासण्यासाठी


👉1985 - सुखमय चक्रवर्ती समिती - चलनविषयक धोरण आणि आर्थिक सुधारणांशी संबंधित


👉1991 - राजा चेलल्या समिती -  आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण धोरणे


👉1991 - नरसिंहंम समिती - बँकिंग क्षेत्रात सुधारणा


👉1992 - लिबरहान आयोग - बाबरी मशीद उध्वस्त प्रकरण तपासणी


👉1993 - वोहरा समिती - भारतातील गुन्हेगार-राजकारणी संबंधांचा आढावा


👉2000 नानावटी आयोग - 1984 मधील शीख विरोधी दंगलीची चौकशी साठी


👉2002 - नानावटी-शहा आयोग - गुजरात दंगल चौकशी


👉2002 - केळकर समिती - भारतातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये सुधारणा सुचविल्या


👉2004 - रंगनाथ मिश्रा आयोग -भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांच्या समस्या सोडवणे


👉2005 - सुरेश तेंडुलकर समिती - भारतातील गरिबीचा अंदाज घेण्यासाठीच्या पद्धती पाहणे


👉2007 - एम एम पुछि आयोग : केंद्र-राज्य संबंध तपासणे


👉2007 - रंगनाथ मिश्रा समिती - धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांमधील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उत्थानासाठी तपास आणि उपायांची शिफारस


👉2014 - उर्जित पटेल समिती - चलनविषयक धोरणाच्या चौकटीवर शिफारशी केल्या


👉2015 - लोंढा समिती - BCCI मध्ये संरचनात्मक सुधारणा सुचवण्यासाठी ( IPL मॅच फिक्सिंग नंतर)


👉2015 - विजय केळकर समिती - भारतात सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) साठी एक फ्रेमवर्क तयार केले


👉2017 : अरविंद सुब्रमण्यम समिती - वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत रचना आणि दरांबद्दल शिफारस

वन लाइनर 20 अत्यंत महत्त्वाचे प्रश्नोत्तर


प्रश्न 1. भारताच्या प्रायद्वीपातील सर्वात उंच पर्वत peaks कोणता आहे?  

उत्तर – अनाइमुडी


प्रश्न 2. सतपुडा राणी कोणत्या टेकड्या स्थानकाला म्हणतात?  

उत्तर – पचमढी (मध्य प्रदेश)


प्रश्न 3. लोकटक एक काय आहे?  

उत्तर – झील


प्रश्न 4. सर्वात मोठा मानवनिर्मित जलाशय कोणता आहे?  

उत्तर – गोविंद सागर


प्रश्न 5. शिवसमुद्रम जलप्रपात कोणत्या नद्याच्या मार्गात आहे?  

उत्तर – कावेरी


प्रश्न 6. बालटोडा हिमनद कुठे आहे?  

उत्तर – काराकोरम पर्वत


प्रश्न 7. भारताचा सर्वात उंच जलप्रपात कोणता आहे?  

उत्तर – जोग जलप्रपात


प्रश्न 8. उंच प्रदेशांमध्ये लेटोराइट माती कशातून बनलेली आहे?  

उत्तर – आम्लीय


प्रश्न 9. लेटेराइट माती कुठे आढळते?  

उत्तर – आर्द्र आणि शुष्क हवामान असलेल्या उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये.


प्रश्न 10. भारताच्या उत्तरी मैदानांमधील माती सामान्यतः कशामुळे तयार होते?  

उत्तर – तालोचनाद्वारे


प्रश्न 11. भारतातील सर्वात लांब धरण कोणते?  

उत्तर – हीराकुंड धरण


प्रश्न 12. सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?  

उत्तर – जम्मू कश्मीर


प्रश्न 13. मुल्लईपियरियार धरणाच्या वादाचे प्रकरण कोणत्या राज्यांमधील आहे?  

उत्तर – तामिळनाडू आणि केरळ


प्रश्न 14. भारतात वीजेची लगातार कमतरता का होत आहे?  

उत्तर – कारण वीजेची मागणी वाढत आहे, पण तिचे उत्पादन आणि वितरण वाढलेले नाही.


प्रश्न 15. किशनगंगा प्रकल्प भारत आणि कोणाच्या बीचच्या वादाचा मुख्य कारण आहे?  

उत्तर – पाकिस्तान


प्रश्न 16. कोळशातून व्यावसायिकरित्या उत्पादित ऊर्जा काय म्हणतात?  

उत्तर – तापीय ऊर्जा


प्रश्न 17. तालचर कोणासाठी महत्त्वाचे आहे?  

उत्तर – भारी जल संयंत्र


प्रश्न 18. राउरकेला स्टील प्लांटच्या सर्वात जवळचा समुद्री बंदर कोणता आहे?  

उत्तर – पारादीप बंदर


प्रश्न 19. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर कोणते बंदर आहे?  

उत्तर – पारादीप आणि हल्दिया


प्रश्न 20. कांडला बंदर कुठे आहे?  

उत्तर – कच्छच्या खाडीमध्ये 


सर्व परीक्षांसाठी इतिहासाचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे

● 'ब्राह्मो समाज' ची स्थापना केव्हा झाली 

- इ.स. 1828.


● 'ब्राह्मो समाज' कोणी आणि कुठे स्थापन केला

 - कलकत्ता येथे, राजा राममोहन रॉय


● आधुनिक भारतातील हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी कोणती पहिली चळवळ होती

 – ब्राह्मो समाज


● सती प्रथेला आणि इतर सुधारणांना विरोध करणारी ब्राह्मसमाजाची विरोधी संघटना कोणती 

– धर्मसभा


● धर्मसभेचे संस्थापक कोण होते 

– राधाकांत देव


● सती प्रथा कधी संपली 

– सन १८२९.


● सती प्रथा बंद करण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न कोणी केले 

- राजा राममोहन रॉय


● 'आर्य समाज' ची स्थापना केव्हा झाली

 - इ.स. 1875, मुंबई


● 'आर्य समाज' कोणी स्थापन केला 

- स्वामी दयानंद सरस्वती


● आर्य समाज कशाच्या विरोधात आहे 

– धार्मिक विधी आणि मूर्तीपूजा


● 19व्या शतकातील भारतीय पुनर्जागरणाचे जनक कोणाला मानले जाते

 – राजा राममोहन रॉय


● राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कुठे झाला 

– राधानगर, जिल्हा वर्धमान


● स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते

 - मूळशंकर


● राजा राममोहन रॉय इंग्लंडला गेल्यानंतर ब्राह्मसमाजाची सूत्रे कोणी हाती घेतली 

- रामचंद विधावागीश


● ज्यांच्या प्रयत्नांमुळे ब्राह्मसमाजाची मुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि मद्रासमध्ये पसरली

 - केशवचंद्र सेन


● 1815 मध्ये कलकत्ता येथे 'आत्मीय सभा' ​​कोणी स्थापन केली 

- राजा राममोहन रॉय


● राजा राममोहन रॉय आणि डेव्हिड हेअर या संस्थेशी संबंधित होते.

 -हिंदू कॉलेज


● थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा आणि कोठे झाली 

– 1875 एडी, न्यूयॉर्कमध्ये


● थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना भारतात केव्हा आणि कोठे झाली 

– 1882, अड्यार, मद्रास येथे


● 'सत्यार्थ प्रकाश' कोणी रचला 

- दयानंद सरस्वती


● 'वेदांकडे परत या' असा नारा कोणी दिला

 - दयानंद सरस्वती


● 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना केव्हा झाली

 - इ.स. 1896-97, बैलूर (कलकत्ता)


● 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना कोणी केली

 - स्वामी विवेकानंद


● अलीगढ चळवळ कोणी सुरू केली 

- सर सय्यद अहमद खान


● अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची पायाभरणी कोणी केली 

– सर सय्यद अहमद खान


● 'यंग बंगाल' चळवळीचा नेता कोण होता 

- हेन्री व्हिव्हियन डेरोजिओ


● 'सत्यशोधक समाज' ची स्थापना कोणी केली 

- ज्योतिबा फुले


● भारताबाहेर कोणत्या धर्म सुधारकाचा मृत्यू झाला 

– राजा राममोहन रॉय


● वहाबी चळवळीचे मुख्य केंद्र कोठे होते

 – पाटणा


● भारतात गुलामगिरी कधी बेकायदेशीर घोषित करण्यात आली 

– 1843 इ.स.


● भारतात इंग्रजी शिक्षणाची व्यवस्था कोणी केली

 - विल्यम बेंटिक यांनी


● 'संपूर्ण सत्य वेदांमध्ये सामावलेले आहे' हे विधान कोणाचे 

- स्वामी दयानंद सरस्वती


● 'महाराष्ट्राचा सॉक्रेटिस' कोणाला म्हणतात

 - महादेव गोविंद रानडे


● विवेकानंद जागतिक धर्म परिषदेत कोठे प्रसिद्ध झाले 

– शिकागो


● 'संवाद कौमुदी' पेपरचे संपादक कोण होते

 - राजा राममोहन रॉय


● 'तत्व रंजिनी सभा', 'तत्व बोधिनी सभा' ​​आणि 'तत्व बोधिनी पत्रिका' संबंधित आहेत

 – देवेंद्र नाथ टागोर


● 'प्रार्थना समाज' कोणाच्या प्रेरणेने स्थापन झाला

 - केशवचंद्र सेन


● महिलांसाठी 'वामा बोधिनी' मासिक कोणी काढले

 - केशवचंद्र सेन


● शारदामणी कोण होती

 – रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी


● 'कुका आंदोलन' कोणी सुरू केले 

- गुरु राम सिंह


● 1956 मध्ये कोणता धार्मिक कायदा संमत झाला

 – धार्मिक अपात्रता कायदा


● महाराष्ट्रातील कोणत्या सुधारकाला 'लोककल्याणकारी' म्हणतात 

- गोपाळ हरी देशमुख


● ब्राह्मसमाज कोणत्या तत्त्वावर आधारित आहे 

- एकेश्वरवाद


● 'देव समाज' कोणी स्थापन केला

 - शिवनारायण अग्निहोत्री


● 'राधास्वामी सत्संग' चे संस्थापक कोण

 - शिवदयाल साहेब


● फॅविअन चळवळीचे समर्थक कोण होते

 – ॲनी बेझंट


● 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात सुरू झालेली चळवळ कोणती होती 

– असहकार 


● 'भारत समाज सेवक' ची स्थापना केव्हा आणि कोणी केली 

- गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 इ.स.


● शीख गुरुद्वारा कायदा केव्हा पास झाला

 – 1925 AD.


● रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव काय होते 

– गदाधर चटोपाध्याय


● डॉ. ॲनी बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा केव्हा बनल्या 

– 1917 ई.


● स्वामी विवेकानंदांनी शिकागो जागतिक धर्म परिषदेत कधी भाग घेतला

 – 1893 AD.


● 'येशूचे नियम' कोणी रचले 

- राजा राममोहन रॉय


● राजा राममोहन रॉय यांचे कोणते पर्शियन पुस्तक होते जे 1809 मध्ये प्रकाशित झाले होते 

- तुहफतुह-उल-मुवाहिदीन


● वेदांत महाविद्यालयाची स्थापना कोणी केली

– राजा राममोहन रॉय


● राजा राममोहन रॉय यांना 'युगाचे दूत' कोणी म्हटले 

- सुभाषचंद्र बोस


रेल्वे परीक्षा मध्ये (NTPC, ग्रुप D) सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत :


🔴  जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी

👉 भारतीय इतिहास : प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास (स्वातंत्र्यलढा)

👉 भारतीय राज्यव्यवस्था : संविधान, मूलभूत हक्क, संसद आणि न्यायपालिका

👉 भूगोल : भारत आणि जगातील भूगोल (नद्या, पर्वत, हवामान, इ.)

👉 अर्थशास्त्र : मूलभूत संकल्पना, भारतीय अर्थव्यवस्था आणि पंचवार्षिक योजना

👉 विज्ञान : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (मूलभूत आणि उपयोजन)

👉 चालू घडामोडी : गेल्या वर्षभरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना


------------------------------------------


🔴  गणित (Maths)

👉 संख्या पद्धत : लसावि, मसावि, दशांश, अपूर्णांक

👉 बीजगणित : मूलभूत समीकरणे, सर्वसमिका

👉 भूमिती : रेषा, कोन, त्रिकोण, वर्तुळ

👉 क्षेत्रमिती : क्षेत्रफळ, घनफळ, परिमिती   

👉 टक्केवारी, नफा-तोटा, गुणोत्तर आणि प्रमाण   

👉 वेळ, वेग आणि अंतर  

👉 सरासरी, सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज.


----------------------------------------


🔴  तर्कशक्ती (Reasoning)

👉 साधर्म्य : संख्या आणि शब्दावर आधारित 

👉 वर्गीकरण : विषम शोधा   

👉 कोडिंग-डिकोडिंग  

👉 रक्तसंबंध

👉 दिशाभान

👉 बैठक व्यवस्था

👉 वेन आकृत्या 

👉 अमौखिक तर्कशक्ती : आरसा प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, कागद दुमडणे.


-----------------------------------------


🔴  सामान्य विज्ञान

👉 भौतिकशास्त्र : गती, बल, ऊर्जा, प्रकाश, ध्वनी, विद्युत

👉 रसायनशास्त्र : मूलद्रव्य, संयुगे, आम्ल, आम्लारी, धातू, अधातू

👉 जीवशास्त्र : मानवी शरीर, रोग, पोषण, वनस्पती आणि प्राणी


-----------------------------------------

राष्ट्रीय उद्याने (एकूण ६)

१. ताडोबा राष्ट्रीय उद्यान (महाराष्ट्रतील पहिले उद्यान चंद्रपूर )

 स्थापना१९५५


२. नावेगाव बांध राष्ट्रीय उद्यान

 गोंदिया 

स्थापना १९७२


३. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान (पेंच)

(लहान )

नागपूर    स्थापना१९८३


४. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 

मुंबई उपनगर (बोरीवली) स्थापना१९६९


५. गुगामल राष्ट्रीय उद्यान

(सर्वात मोठे)

अमरावती   स्थापना १९७४


६. चांदोली राष्ट्रीय उद्यान 

सांगली सातारा कोल्हापूर रत्‍नागिरी  

स्थापना२००४

1888 (4 थे ) - जॉर्ज ज्यूल (अलाहाबाद)

1889 (5 वे) - सर विल्यम वेडरबर्न (मुंबई)

1894 (10 वे) - आल्फ्रेड वेब (चेन्नई)

1904 (20 वे) - हेन्री कॉटन (मुंबई)

1910 (26 वे) - सर विल्यम वेडरबर्न (अलाहाबाद)


👉 (सर विल्यम वेडरबर्न हे एकमेव ब्रिटिश जे 2 वेळा अध्यक्ष झाले आहेत)


--------------------------------------------------


महाराष्ट्रात स्वातंत्र्य होण्यापर्यंत झालेली काँग्रेस अधिवेशने  

1885 (1ले ) - उमेशचंद्र बॅनर्जी ( मुंबई )

1889 (5 वे) - सर विल्यम वेडरबर्न (मुंबई)

1891 (7 वे) - पी आनंद चारलू (नागपूर)

1895 (11वे) - सुरेंद्रनाथ बॅनर्जी (पुणे)

1897 (13 वे ) - सी शंकरन नायर (अमरावती)

1904 (20 वे)- सर हेन्री कॉटन (मुंबई)

1915 (31 वे) सत्येंद्र प्रसाद सिन्हा (मुंबई)

1918 : सईद हसन ईयाम (मुंबई )

👉 ( विशेष अधिवेशन )

1920 (36 वे) - सी विजयराघवाचारी (नागपूर)

👉 (असहकार चळवळ)

1924 (40 वे) - महात्मा गांधी (बेळगाव)

1934 (49 वे) - राजेंद्र प्रसाद (मुंबई)

पृथ्वीराज मोहोळ 67 वा महाराष्ट्र केसरी, अभिनंदन हार्दिक शुभेच्छा!!

🚨विजेता - पृथ्वीराज मोहोळ

🚨उपविजेता - महेंद्र गायकवाड


💥‼️महेंद्र गायकवाडचा 2-1 असा पराभव केला‼️


✔️ठिकाण - अहिल्यानगर 

✔️दिनांक - 2 फेब्रुवारी 2025

✔️अहिल्यानगर मध्ये ही चौथ्या वेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली 1968 ,1988 ,2014 ,2025


🖥महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील काही विक्रम :


🎤महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता (1961): दिनकर पाटील (दह्यारी, ता. तासगाव, जि. सांगली)

✔️सर्वाधिक तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेले मल्ल 

💥विजय चौधरी (2014, 2015, 2016)  

💥नरसिंग यादव (2011, 2012, 2013).


🔴कारकीर्दीत एकही राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा न खेळता तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी ठरलेला मल्ल : विजय चौधरी.


🔴सर्वात तरूण महाराष्ट्र केसरी ठरलेला मल्ल : युवराज पाटील (1974, 16 व्या वर्षी)


⬇️65 वा महाराष्ट्र केसरी :- शिवराज राक्षे

✔️66 वा महाराष्ट्र केसरी :- सिकंदर शेख

✔️67 वा महाराष्ट्र केसरी :- पृथ्वीराज मोहोळ


🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 :-

✅ बुद्धिबळ विश्वविजेता डी गुकेश,

✅एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर,

✅ भारतीय पुरुष हॉकी संघाचा हरमनप्रीत सिंग

✅ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले जाणार आहे.

✅ क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या एकूण 32 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 17 पॅरा अॅथलीट आहेत.

✅ महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे आणि पॅराअॅथलीट सचिन खिल्लारीला अर्जुन पुरस्कार.

✅ अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) मुरलीकांत पेटकर पॅरा-स्विमर यांना

✅ द्रोणाचार्य पुरस्कार दीपाली देशपांडे, नेमबाजी प्रशिक्षक यांना जाहीर झाला आहे.


❇️ मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराविषयी :-

✔️ सुरुवात : 1991-92

✔️ माजी PM राजीव गांधी यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार

✔️स्वरूप : प्रशस्तिपत्त्र, पुरस्कार आणि 25 लाख रुपये दिले जातात.

(2004-05 पर्यंत ते रु 5,00,000/- होते नंतर वाढून 7.5 लाख झाले.)

✔️ खेलरत्न पुरस्कार हा भारतीय खेळातील सर्वोच्च पुरस्कार आहे.

✔️ 06 ऑगस्ट 2021 रोजी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे.

✔️पहिला पुरस्कार :

• 1991-92 विश्वनाथन आनंद (बुद्धिबळ)

17 January 2025

चालू घडामोडी :- 16 जानेवारी 2025


◆ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ची वार्षिक बैठक दावोस(स्वित्झर्लंड) येथे होणार आहे.

◆ मुंबईच्या नौदल डॉकयार्ड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्ध नौका व पाणबुडींचे राष्ट्रार्पण करण्यात आले.[INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशिर]

◆ अखिल मराठा फेडरेशन चा ‘द ग्रेट मराठा’ पुरस्कार नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे.

◆ अखिल मराठा फेडरेशन ची स्थापना 2015 मध्ये झाली होती.

◆ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ देवेंद्र कुमार उपाध्याय दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी दक्षिण सुदान हा देश आहे.

◆ केंद्रीय नवीन व अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिव पदी श्रीमती निधी खरे यांची नियुक्ती झाली आहे.

◆ भारतीय रिझर्व बँकेने आपला रेपोदर 6.5 टक्के वर कायम ठेवला आहे.

◆ भारताने 2025 -26 या आर्थिक वर्षात 7.5 टक्के जीडीपी वाढीचे लक्ष ठेवले आहे.

◆ आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबाद याठिकाणी साजरा करण्यात आला आहे.

◆ आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य ओडिसा आहे.

◆ नोव्हाक जोकोविच(सर्बिया) हा खेळाडू ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे.

◆ मध्य प्रदेश राज्याने ‘स्वामी विवेकानंद युवाशक्ती मिशन’ सुरू केले आहे.


16 January 2025

चालू घडामोडी :- 15 जानेवारी 2025


◆ भारतीय सेना दिवस 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो.[2025 :- 77वा]

◆ PM मोदींनी "युवा शक्तीचे व्हिजन फॉर विकसित भारत @2047" या पुस्तकाचे प्रकाशन केले.

◆ पल्ले गंगा रेड्डी यांची राष्ट्रीय हळद मंडळाच्या पहिल्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ ICC चा प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार महिला गटात नाबेल सदरलँड(ऑस्ट्रेलिया) मिळाला आहे.(डिसेंबर 2024)

◆ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने(भारत) डिसेंबर 2024 या महिन्यासाठी आयसीसीच्या मंथ ऑफ प्लेअर हा पुरस्कार पटकावला.

◆ जसप्रीत बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज आहे ज्याने वर्षभरात दोनदा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे.

◆ भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात "मिशन मौसम" या उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

◆ मिशन मौसम ला केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर 2024 मध्ये मंजुरी दिली होती.

◆ टॉम टॉम ट्राफिक इंडेक्स 2025 च्या अहवालानुसार वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वात स्लो शहर बारंक्विंला हे आहे.

◆ टॉम टॉम ट्राफिक इंडेक्स 2025 च्या अहवालानुसार पहिल्या दहा स्लो शहरांमध्ये भारतातील तीन शहरांचा समावेश आहे.

◆ जगातील स्लो शहर म्हणून चर्चा असलेले बारंक्विंला हे कोलंबिया या देशात आहे.

◆ आयसीसी चॅम्पियन हॉकी 2025 मध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत.

◆ राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन पियुष गोयल यांच्या हस्ते झाले आहे.

◆ जगात हळद उत्पादन, वापर व निर्यात मध्ये अव्वलस्थानी भारत देश आहे.

◆ जगातील एकूण हळद उत्पादनापैकी भारतात 80% टक्के हळद उत्पादन आहे.

◆ खो-खो विश्वचषक 2025 मधील पहिला सामना भारत देशाने जिंकला आहे.

 

14 January 2025

चालू घडामोडी :- 12 & 13 जानेवारी 2025



◆ 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.[स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस :- 12 जानेवारी]

◆ भारतीय हवामान विभाग (IMD) ची स्थापना 1875 साली झाली.[यावर्षी भारतीय हवामान विभागाचा 150वा वर्धापन दिन आहे.]

◆ आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारत देश जास्त नोकरदारांचा वाटा असणारा आणि कमी पगार असणारा देश आहे.

◆ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिव पदी देवजीत सैकिया यांची निवड करण्यात आली आहे.

◆ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्ष पदी प्रभतेज सिंह यांची निवड करण्यात आली आहे.

◆ राज्य क्रीडा दिवस 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो.[15 जानेवारी हा खाशाबा जाधव या खेळाडूंचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करतात.]

◆ यावर्षीचा राजमाता जिजाऊ यांचा 457वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे.[12 जानेवारी]

◆ लेबनान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून जोसेफ आऊन यांची निवड करण्यात आली.

◆ राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासाचा दर 6.4 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

◆ 2035 या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.

◆ भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाल्यास स्पेस डॉकिंग करणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे.

◆ देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 01 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणार आहे.

◆ अमेरिकेचे 47वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प शपथ घेणार आहेत.

◆ शक्तिपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यातील 19 देवस्थानांना जोडणार आहे.[शक्तिपीठ महामार्ग हा 802 किलोमीटर लांबीचा असणार आहे.]

11 January 2025

🔷 चालू घडामोडी :- 10 जानेवारी 2025


◆ हिंदीचे जागतिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो.

◆ 1975 मध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या स्मरणार्थ 2006 मध्ये पहिला जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यात आला.[राष्ट्रीय हिंदी दिवस :- 14 सप्टेंबर]

◆ जागतिक हिंदी दिवस 2025 ची थीम "एक जागतिक आवाज: एकता आणि सांस्कृतिक अभिमान" ही आहे.

◆ Henley Passport Index 2025 मध्ये भारत 85व्या स्थानी असून भारतीय पासपोर्ट धारक 57 देशांमध्ये व्हिसा फ्री फिरू शकतात.

◆ अयोध्येत 11 ते 13 जानेवारी दरम्यान प्रतिष्ठा द्वादशी महोत्सव आयोजित केला जाईल, जो रामलल्लाच्या स्थापनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आहे.

◆ मायक्रोसॉफ्ट या संस्थेने भारताच्या AI मिशनसोबत AI-सक्षम भागीदारीची घोषणा केली आहे. [मायक्रोसॉफ्टचे सीईओ :- सत्या नडेला]

◆ युनायटेड स्टेट्समधील लॉस एंजेलिस शहरात अलीकडेच जंगलात लागलेल्या आगीमुळे आणीबाणी घोषित करण्यात आली.

◆ वित्त मंत्रालयात महसूल सचिव म्हणून तुइन कांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ जानेवारी 2025 मध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश राज्याने सर्वाधिक रूग्णालय नोंदणी केली आहे.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी केली.

◆ इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात.

◆ गोव्याने विमा सखी योजना सुरू केली आणि ती लागू करणारे हरियाणा नंतर दुसरे राज्य बनले. [ही योजना पंतप्रधान मोदींच्या "सर्वांसाठी विमा" या व्हिजन अंतर्गत आहे आणि 10वी उत्तीर्ण झालेल्या 18 ते 70 वयोगटातील महिलांना सक्षम करते.]

◆ NITI Aayog च्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म (WEP) ने अवॉर्ड टू रिवॉर्ड (ATR) कार्यक्रमांतर्गत न्यू शॉपसोबत भागीदारीत "EmpowHER Biz सपना की उडान" लाँच केले.

◆ पुंटसांगचुह हा चर्चेत असलेला जलविद्युत प्रकल्प (PHEP-II) भूतान देशात आहे.

◆ लोहाच्या कमतरतेचे मूल्यांकन करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठ, युनायटेड स्टेट्स ही संस्था ॲनिमियाफोन तंत्रज्ञान विकसित करते.

◆ भारतातील पहिली व्यावसायिक उपयुक्तता-स्केल बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) किलोकारी, दक्षिण दिल्ली या ठिकाणी आहे.

◆ फ्लेमिंगो फेस्टिव्हल 2025 आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जातो.

◆ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) संस्थेने फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025 जारी केला.

10 January 2025

इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले


1) अलीपूर कट p:- 1908
🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त,     खुदिराम बोस, अरविंद घोष

2) नाशिक कट :- 1910
🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर

3) दिल्ली कट :- 1912
🔶 रासबिहारी बोस

4) लाहोर कट :- 1915
🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस

5) काकोरी कट :- 1925
🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन

6) मीरत/मेरठ कट :- 1928
🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे

7) लाहोर कट :- 1928
🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद

8) चितगाव कट :- 1930
🔶 सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष

Poverty Measurements

✅वी. एम. दांडेकर आणि एन. रथ (1971 पद्धत)✅

- कॅलरी आवश्यकता: 
 
  - ग्रामीण आणि शहरी भाग: 2,250 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन
  
- संपूर्ण गरीबीचे पद्धत: 
-
  - कॅलरी आधारित गरीबी मोजण्याची सुरुवात



✅ वाय के अलघ समिती (1979 पद्धत)✅

- समायोजित किंमत स्तर: 
 
  - महागाईसाठी किंमत स्तर समायोजित करणे.

- राज्य-विशिष्ट गरीबीरेषा:
 
  - प्रत्येक राज्यासाठी वेगळ्या गरीबीरेषा
  - 
- कॅलरी आवश्यकता:
  - ग्रामीण भाग: 2,400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन
  - शहरी भाग: 2,100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन



✅लकडावाला समिती (1993 पद्धत) [URP]✅

- मासिक किमान खर्च (2004-2005): 
  - ग्रामीण भाग: ₹356.30 प्रति व्यक्ती
  - शहरी भाग: ₹538.60 प्रति व्यक्ती

- कॅलरी आवश्यकता:
  - ग्रामीण भाग: 2,400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन
  - शहरी भाग: 2,100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन

 2004-2005

- संपूर्ण गरीबी: 27.5%



✅तेंडुलकर समिती (2009 पद्धत) [MRP]✅

- मासिक किमान खर्च (2004-2005):

  - ग्रामीण भाग: ₹446.68 प्रति व्यक्ती
  - शहरी भाग: ₹578.80 प्रति व्यक्ती

- मासिक किमान खर्च (2011-2012):
  - ग्रामीण भाग: ₹816 प्रति व्यक्ती
  - शहरी भाग: ₹1,000 प्रति व्यक्ती
  - 
- कॅलरी आवश्यकता: 
  - कॅलरी आधारित पद्धतीपासून दूर जाऊन एक विस्तृत उपभोग आधारित पद्धत

2004-2005

- संपूर्ण गरीबी: 37.2%
2011-2012

- संपूर्ण गरीबी: 21.9%




✅रंगराजन समिती (2014 पद्धत) [MMRP]✅

- मासिक किमान खर्च (2009-2010):

  - ग्रामीण भाग: ₹972 प्रति व्यक्ती
  - शहरी भाग: ₹1,407 प्रति व्यक्ती
  
- मासिक किमान खर्च (2011-2012):

  - ग्रामीण भाग: ₹972 प्रति व्यक्ती
  - शहरी भाग: ₹1,407 प्रति व्यक्ती

- कॅलरी आवश्यकता:
  - कॅलरीसह एक विस्तृत वस्तू आणि सेवांच्या पद्धतीचा वापर

2009-2010 (सुधारित अंदाज)

- संपूर्ण गरीबी: 38.2%

2011-2012

- संपूर्ण गरीबी: 29.5%

#Economy #Poverty

09 January 2025

Combine Group B पूर्व 2 Feb च्या दृष्टीकोनातून ....

1. जे अगोदरपासून अभ्यासले आहे तेच पुस्तक (घटक/उपघटक) पुन्हा पुन्हा revise करा.

2. इथून पुढे 2 Feb पर्यंत अभ्यास Selective पाहिजे...(focus point ) 

3. पाठीमागील पेपर मध्ये केलेल्या चूकांवर जोरदार काम या 20 ते 21 दिवसात झालं पाहिजे.

4. Combine group B आणि group C चे 2017 ते 2023 Combine Prelims चे पेपर सतत Solve करा.

5. दररोज दिवसात आयोगाचा पेपर सोडून आभ्यास नको...! आयोगाचे सर्व पेपरचे बारकाईने स्वतः Analysis करा.

6. Elemination method आणि Logic या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत.कारण त्या परिपूर्ण अभ्यास आणि जास्तीत जास्त MCQ Solve करून आपोआप समजत असतात.

7. Elemination ने तुमचे प्रश्न बरोबर येण्याची शक्यता असते पण logic ने तुमचा प्रश्न चूकण्याची शक्यता जास्त असते. ( त्याच्यामुळे तुक्के मारायचे नाहीत.)

8. कोणतीही एखादी method use करताना विचारपूर्वक use करा ... शक्यतो logic वाचण्यात न आलेल्या प्रश्नांनाच apply करा.

9.आपली exam Combine पूर्व ची आहे... त्याच्यामुळे One liner प्रश्नात marks गेले नाही पाहिजेत.लक्षात असूद्या. नुसतं लक्षात नाही तर राहिलेल्या दिवसात चांगली तयारी करा.

10. Current आणि Math +reasoning च्या बाबतीत इथून पुढे आयोगाच्या Selective Points वरती Focus करा.

11. इथून पुढे जास्तीत जास्त revision अपेक्षित आहेत.(Focus area)

12. जूने लोकं इथून पुढे तुम्हाला खूप काहीही सूचत असतं ( हा शेवटचा Chance आहे..या वेळी तरी होईल का माझं..) एक गोष्ट लक्षात घ्या Mpsc मध्ये फक्त मनगटात धमक लागते ... बाकी माझा तरी इतर कारणांवरती विश्वास नाही..

13. शेवटी आयोगाचा पूर्व चा कोणताही पेपर हा syllabus आणि exam चा विचार करूनच सेट होत असतो हे इथे लक्षात घ्या.

14. जास्त Form आले म्हणून राज्यसेवा पूर्व सारखा पेपर येणे अपेक्षित आहे का तर कधीच नाही... त्याच्यामुळे आपल्याला एक तास वेळ आणि त्या एका तासाच्या दृष्टिकोनातूनच पेपर सेट होत असतो.

 15. म्हणून कितीही अर्ज आले तरी चमकणारे हिरे बोटावर मोजण्याइतकेच असतात.

इथून पुढे एकदम शांततेत स्वतःच काम करा .


चालू घडामोडी :- 08 जानेवारी 2025

◆ "नेट-झिरो बँकिंग अलायन्स" संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) या संस्थेद्वारे आयोजित केले जाते.

◆ गुजरात राज्य 74व्या वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करत आहे.

◆ मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना झारखंड राज्य सरकारने सुरू केली.

◆ जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा क्रमांक तिसरा आहे.

◆ दरवर्षी 6 जानेवारी हा जागतिक युद्ध अनाथ दिवस म्हणून साजरा केला जातो.

◆ जानेवारी 2025 मध्ये इंडोनेशिया देश अधिकृतपणे BRICS मध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला आहे.

◆ 14 जानेवारी 2024 पासून डॉ. व्ही नारायणन यांची ISRO चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा अंदाजे GDP वाढीचा दर 6.4% आहे.

◆ ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती घोषित केले.

◆ विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी आसाम सरकारने सुरू केलेल्या गुणोत्सव 2025 ची थीम "दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करणे" ही आहे.

◆ जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेल्या भारतातील पहिल्या केबल-स्टेड रेल्वे पुलाचे नाव "अंजी खड्डा पूल" आहे.

◆ "मकरविलक्कू" हा केरळमधील सबरीमाला मंदिरात मकर संक्रांतीला साजरा होणारा वार्षिक उत्सव आहे.

◆ केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी 8 जानेवारी रोजी ग्रेटर नोएडा येथे IndusFood 2025 च्या 8 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले.

◆ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील सिंहाचलम मंदिरात 13व्या शतकातील संत नरहरी तीर्थ यांची तीन फूट उंचीची मूर्ती सापडली आहे.

◆ सशस्त्र सेना न्यायाधिकरण (एएफटी) संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

◆ IIT मद्रासने थायूर येथील डिस्कव्हरी कॅम्पसमध्ये आशियातील सर्वात मोठी शॅलो वेव्ह बेसिन संशोधन सुविधा सुरू केली आहे.

◆ पोलाद आणि अवजड उद्योग मंत्रालयाने स्पेशालिटी स्टीलसाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना (PLI स्कीम 1.1) सुरू केली.

03 January 2025

चालू घडामोडी :- 02 जानेवारी 2025

◆ लीना नायर(कोल्हापूर) यांना ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (CBE) हा प्रतिष्ठेचा सन्मान लाभला आहे.

◆ भारताच्या आर. वैशाली ला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदक मिळाले आहे.

◆ जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा न्युयॉर्क येथे पार पडली.

◆ यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची संकल्पना मधाचे गाव ही असणार आहे.

◆ ICC ने जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू जसप्रीत बुमराह ने विक्रमी 907 रेटिंग गुण मिळवून आर अश्विन चा विक्रम मोडला आहे.

◆ संतोष ट्रॉफी 2024 स्पर्धेचे विजेतेपद पश्चिम बंगाल ने केरळ(उपविजेता) राज्याचा पराभव करून पटकावले आहे.

◆ संतोष ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना तेलंगणा राज्यात खेळवण्यात आला.

◆ SAIL भारतीय सार्वजनिक कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क Certificate देण्यात आले आहे.

◆ वितूल कुमार यांची CRPF संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ RBI ने 2025 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6.6 टक्के वर्तविला आहे.

◆ येमेन देशाने भारतीय नर्स निमिषा प्रिया ला मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे.

◆ वाव थराद नावाचा नविन जिल्हा गुजरात राज्यात होणार आहे.

◆ केंद्रिय संरक्षण मंत्रालयाने 2025 हे सुधारणावादी वर्षे म्हणून घोषित केले आहे
.

02 January 2025

चालू घडामोडी :- 1 जानेवारी 2025

1) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे ठरले आहेत.

2) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात ममता बॅनर्जी या मुख्यमंत्र्याकडे सर्वात कमी मालमत्ता आहे.

3) स्पेस डॉकिंग एक्सप्रिमेंट (स्पेडेक्स) या अवकाशात दोन उपग्रहांना जोडणाऱ्या देशाच्या पहिल्या मोहिमेचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. (रॉकेट: PSLV C60]

4) ISRO या संस्थेने स्पेडेक्स मोहीमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

5) Space Docking Experiment Mission Launch करणारा भारत चौथा देश ठरला आहे.

6) चीन ने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली असून तिचे नामकरण CR450 असे करण्यात आले आहे. ताशी वेग 450/Kmh]

7) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने AICTE 2025 हे वर्षे कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केले आहे.

8) सौर पंप योजनेत महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

9) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन झाले असून ते अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष होते. [भारतातील हरियाणा राज्यातील एका गावाचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.]

10) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांना 2002 या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. [100 व्या वर्षी निधन & राष्ट्राध्यक्ष (1977-81)]

11) STUMPED नावाने सय्यद किरमानी या भारतीय क्रिकेट खेळाडूने आपले आत्मचरित्राचे प्रकाशन केले आहे.

12) गुजरात राज्याने भाषासंबंधी अडचणी दूर करण्यासाठी SWAR प्लॅटफॉर्म लाँच केले आहे.

13) 53वी सिनियर राष्ट्रीय पुरूष हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद केरळ ने पटकावले आहे.

14) पुण्यात स्थापित केलेल्या भारतातील पहिल्या मेड-इन-इंडिया सर्जिकल रोबोटचे नाव "SSI मंत्र" आहे.

15) हिंदू मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वाराच्या पुजाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केलेल्या योजनेचे नाव "पुजारी ग्रंथी सन्मान योजना" आहे. Vidyarthipoint

16) AAP प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या 'पुजारी ग्रंथी सन्मान योजने'चे उद्दिष्ट हिंदू मंदिरातील पुजारी आणि दिल्लीतील गुरुद्वारा ग्रंथींना 18,000 रुपयांची मासिक मदत देण्याचे आहे.

17) कवच 4.0 ही भारतीय रेल्वेच्या रिसर्च डिझाइन अँड स्टैंडर्डस ऑर्गनायझेशन (RDSO) द्वारे विकसित केलेली प्रगत स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे.

18) 24 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत पोखरा, नेपाळ येथे पहिला आंतरराष्ट्रीय बलून महोत्सव आयोजित केला जात आहे. (हा कार्यक्रम सुंदर पाल्मे प्रदेशात होत आहे.]

19) "SAAR Initiative" हे "स्मार्ट सिटी मिशन (SCM)" शी संबंधित आहे.

27 December 2024

Just for revision

GEM (Gender Empowerment Measure)


सुरू - 1995

बंद - 2010


3 आयाम

1. राजकीय सहभाग

2. आर्थिक सहभाग + निर्णयप्रक्रिया 

3. आर्थिक स्त्रोतांवरील मालकी


GDI (Gender Development Index)


सुरू -1995

बंद - 2010

परत सुरू - 2014


GDI = महिलांचा HDI/ पुरुषांचा HDI 


GII ( Gender Inequality Index)


सुरू - 2010


3 आयाम + 5 निर्देशक

1. जनन आरोग्य 

     I) माता मर्त्यता

     II) किशोरवयीन जन्यता 

2. सबलीकरण

     I) min. माध्यमिक शिक्षण

     II) संसदीय प्रतिनिधित्व

3. श्रमबाजार


GGGI (Global Gender Gap Index)


सुरू - 2006


4 आयाम

1. आर्थिक सहभाग व संधी

2. शिक्षण ( प्राथ. +माध्य. +उच्च)

3. आरोग्य (लिंग गुणो.+आयुर्मान)

4. राजकीय सशक्तीकरण

2023 मधील लष्करातील महत्त्वाच्या पहिल्या महिला नियुक्त्या

1. कॅप्टन गितिका कौल - सियाचीन मध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी 


2. स्कवाड्रन लीडर मनीषा पाधी - भारतीय सशस्त्र दलात भारताची पहिली महिला ADC (रणांगणावरील मदतनीस) 


3. एअर मार्शल साधना सक्सेना नायर - सशस्त्र दलाच्या पहिल्या महिला महासंचालक (रुग्णालय सेवा) 


4. ग्रुप कॅप्टन शैलजा धामी - एअर फोर्स डे च्या परेडचे नेतृत्व करणाऱ्या पहिला महिला अधिकारी 


5. लेफ्टनंट शिवांगी सिंह - ओरियन सराव 2023 मध्ये भाग घेणारी पहिली महिला पायलट 


6. कॅप्टन सुरभी जाखमोला - BRO च्या परदेशी प्रकल्पावर नियुक्त झालेल्या पाहिल्या महिला अधिकारी 


7. कमांडर प्रेरणा देवस्थळी - भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पाहिल्या महिला अधिकारी 


8. दिशा नाईक - क्रॅश फायर टेंडर चालवणारी देशातील पहिली महिला फायर फायटर 


9. कर्नल सुनिता बी एस - दिल्ली येथे कमांडिंग ऑफिसर ची भूमिका स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला 


10. कॅप्टन शिवा चौहान - सियाचीन येथील कुमार पोस्ट (15,632 ft ) येथे नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी

इतिहास प्रश्नमंजुषा



०१. महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?
A. लतिका घोष ✔
B. सरोजिनी नायडू
C. कृष्णाबाई राव
D. उर्मिला देवी


०२. पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?
A. अक्स-ला-चॅपेलचा तह ✔
B. पॉंडेचेरीचा तह
C. मँगलोरचा तह
D. पॅरिसचा तह


०३. १८५७च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?
A. खान बहादूर खान
B. कुंवरसिंग ✔
C. मौलवी अहमदुल्ला
D. रावसाहेब


०४. डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केल े?
A. १८४९
B. १८५१
C. १८५३ ✔
D. १८५४


०५. १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केल े?
A. फ्री इंडिया
B. नया भारत
C. फ्री प्रेस जर्नल
D. लीडर ✔


०६. १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.
अ] उठावकर्त्यांना विशिष्ठ राजकीय उद्दिष्ट नव्हते.
ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही ✔
D. वरीलपैकी एकही नाही


०७. खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा.
अ] लॉर्ड कर्झन
ब] लॉर्ड चेम्सफर्ड
क] लॉर्ड हार्डिंग्स II
ड] लॉर्ड आयर्विन

पर्याय
A. अ-ब-क-ड ✔
B. अ-क-ब-ड
C. क-अ-ब-ड
D. अ-ड-क-ब


०८. विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे.
स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला.
पर्याय
A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ✔
B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर


०९. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?
A. भारत सरकारचा कायदा १९३५
B. भारत सरकारचा कायदा १९१९
C. भारत कौन्सिल कायदा १९०९ ✔
D. भारत कौन्सिल कायदा १८९२


१०. मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?
A. सहदरण आय्यपन
B. नारायण गुरु ✔
C. हृदयनाथ कुंजरू
D. टी.एम. नायर


१२. बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?
A. कथा
B. कादंबरी
C. काव्य
D. नाटक ✔


१३. श्री नारायण एम. लोखंडे-मजूर चळवळीचे जनक यांच्या बाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?
A. त्यांनी प्रथम मजूर संघटना 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' स्थापन केली
B. त्यांना त्यांच्या हिंदू-मुस्लीम दंग्याच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब बहाल करण्यात आला.
C. त्यांना 'जस्टीस ऑफ पीस' हा पुरस्कार देण्यात आला.
D. वरील एकही नाही ✔

१४. क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता ?
A. भारतात शस्त्रास्त्रे तयार करणे. नसल्यास बाहेरून आयात करणे.
B. श्रीमंताकडून कोणत्याही मार्गाने पैसे काढणे.
C. रेल्वे लाईन व इतर यातायात साधनांवर हल्ला बोलणे जेणेकरून ब्रिटीश साम्राज्य अडचणीत येईल.
D. वरील सर्वाचा त्यात समावेश होता ✔


१५. बापुजी आणे यांनी पुसदमध्ये १० जुलै १९३० रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शवण्यास काय केले ?
A. त्यांनी मीठ तयार केले व संविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला.
B. त्यांनी मिठाची पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या.
C. त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला. ✔
D. त्यांनी पाश्चिमात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली.


१६. भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेस मान्यता दिली ?
A. भातातीय राष्ट्रीय ट्रेड युनियन कॉंग्रेस ✔
B. अखिल भातारीय लाल ट्रेड युनियन कॉंग्रेस
C. अखिल भातारीय ट्रेड युनियन कॉंग्रेस
D. अखिल भारतीय किसान सभा

१७. सशस्त्र क्रांतिकारकांच्या आणि त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्य जोड्या लावा.
अ)  श्रीधर परांजपे                १. हैद्राबाद
ब)  डॉ. सिद्धनाथ काणे        २. अमरावती
क)  दादासाहेब खापर्डे           ३. यवतमाळ
ड)  नार्हरीपंत घारपुरे            ४. वर्धा,नागपूर

         अ)  ब)  क)  ड)
   A.   ४   ३    १    २
   B.   ४   ३    २    १ ✔
   C.   १   २   ३    ४
   D.   २   १   ४    ३


१८. शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा १९१० मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता ?
A. जी.बी.वालंगकर
B. ज्योतिबा फुले
C. वरील दोघांचाही ✔
D. वरील कोणाचाही नाही


१९. खालीलपैकी कोणती वाक्ये चुकीचे आहेत ?
A. सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार-समांतर सरकार सुरु केले.
B. याश्वाणराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला.
C. प्रभात फेऱ्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या.
D) वरीलपैकी एकही नाही ✔


२०. जहाल काळात केसरी व मराठा जनजागृतीच्या कामात आघाडीवर होते. टिळक व आगरकर त्यांच्याशी कसे संबंधित होते ?
A. त्यांनी केसरी मराठीत व मराठा इंग्रजीत १८८१ मध्ये सुरु केले.
B. आगरकरांनी मराठाचे तर टिळकांनी केसरीचे संपादन केले.
C. वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत.
D. वरील एकही विधान बरोबर नाही. ✔


२१. कोळींच्या संदर्भात कोणते विधान अयोग्य ठरेल ?
A. कोळींनी तीन टप्यांत उठाव केला १८२४, १८३९ व सुमारे १८४५ मध्ये.
B. कोळी साधे, कोळी व डोंगरी कोळी तसेच सोन कोळी व महादेव कोळी इत्यादींमध्ये विभागलेले होते.
C. इंग्रज कोलींचे उठाव आटोक्यात आणू शकले नाहीत.
D. वरील एकही नाही. ✔


२२. वासुदेव बळवंत फडकेंबद्दल काय खरे नाही ?
A. त्यांनी स्वताची ओळख लपवण्यासाठी दाढी राखली होती व साधूंच्या वेशात लोकांत जनजागृती केली होती.
B. कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ते इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत व प्रथमतः त्यांनी लष्करात नोकरी केली व तद्नंतर रेल्वेत. ✔
C. सुरवातीस रामोशांची त्यांना मदत होती पण नंतर रामोशांनी त्यांची साथ सोडली.
D. वरीलपैकी एकही नाही


२३) उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजाचे प्रयत्न का फासले ?
A. उमजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती.
B. शेतकरी व गावकरी त्यांना उद्युक्त व मदत करत होते.
C. वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. ✔
D. वरील एकही विधान बरोबर नाही.


२४. गावाचा विकास कसा साधावा हे समजून सांगण्यासाठी 'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
A. संत तुकाराम
B. संत एकनाथ
C. राष्ट्र संत तुकडोजी महाराज ✔
D. संत नामदेव


२५. संथाळांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटीश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला ?
A. संथाळ प्रदेश
B. संथाळ इलाखा
C. संथाळ प्रांत
D. संथाळ परगणा ✔

26 December 2024

समाजसुधारक व पदव्या


▪️ सरदार : वल्लभभाई पटेल


▪️ महर्षी : धोंडे केशव कर्वे / विठ्ठल रामजी शिंदे


▪️ राष्ट्रसंत : तुकडोजी महाराज


▪️ हिंदुस्थानच्या कुषक क्रांतीचे जनक : पंजाबराव देशमुख


▪️ धन्वंतरी : डॉ. भाऊदाजी लाड


▪️ राजर्षी : शाहू महाराज


▪️ वस्तीगृहाचे अद्यजनक : शाहू महाराज


▪️ असंतोषाचे जनक : लोकमान्य टिळक


▪️ जहाल राजकारणी : लोकमान्य टिळक


▪️ मराठी भाषेचे शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर


▪️ आधुनिक गद्याचे जनक : विष्णुशास्त्री चिपळूणकर


▪️ निबंधकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर


▪️ मराठी भाषेचे शिल्पकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर


▪️ मराठीतील जॉन्सन : कृष्णुशास्त्री चिपळूणकर


▪️ करांतीसिंह : नाना पाटील


▪️ सनापती : पांडुरंग महादेव बापट


▪️ सार्वजनिक काका : गणेश वासुदेव जोशी


▪️ मराठी भाषेतील पाणिनी : दादोबा पांडुरंग तर्खडकर


▪️ महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक : दादोबा पांडुरंग तर्खडकर


▪️ महाराष्ट्रातील मार्टिन ल्युथरकिंग : महात्मा ज्योतीबा फुले ‌.

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच



1. संसदेच्या दोन्ही सभागृहांसह एकत्र बसणे खालीलप्रमाणे आहे.
 [अ] भारताचे उपाध्यक्ष
 [बी] घटना दुरुस्ती विधेयक स्वीकारणे
 [सी] ज्यावर दोन्ही सभागृहे सहमत नाहीत असे विधेयक विचारात घेण्यासारखे आहे.✅✅
 [डी] भारतीय राष्ट्रपती पदाची निवडणूक

 2.जनरल विधेयकाशी संबंधित गतिरोध दूर करण्यासाठी संसदेच्या दोन सभागृहांची बैठक कोण बोलवते?
 [अ] अध्यक्ष✅✅
 [ब] मंत्रिपरिषद
 [सी] लोकसभा अध्यक्ष
 [डी] राज्यसभेचे अध्यक्ष

 3. भारतीय संसदेच्या दोन सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या संदर्भात होते?
 [अ] संविधान दुरुस्ती विधेयक
 [बी] वित्त विधेयक
 [सी] सामान्य विधेयक✅✅
 [डी] भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक

 4.संसदेच्या सलग दोन अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त वेळ किती?
 [ए] 1 महिना
 [बी] 3 महिने
 [सी] 6 महिने✅✅
 [डी] 12 महिने

 5.संसदेची किती अधिवेशने आहेत?
 [अ] बजेट सत्र
 [बी] मॉन्सून सत्र
 [सी] हिवाळी अधिवेशन
 [डी] वरील सर्व✅✅

 6.भारतीय संसदेचे सार्वभौमत्व    प्रतिबंधित आहे.
 [अ] भारतीय राष्ट्रपतींच्या अधिकारांनी
 [बी] न्यायालयीन पुनरावलोकन✅✅
 [सी] विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून
 [पंतप्रधान] भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकारांची
---------------------------------------------------

🔰 ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
-----वि.रा. शिंदे

🔰मस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?
----- ढाका

🔰 रवींद्रनाथ टागोर हे कोणत्या भाषेतील कवी आहे ?
➖ बगाली.

🔰WTO चे पूर्ण रूप काय आहे ?
➖वर्ल्ड ट्रेड आॅर्गनायझेशन.

🔰तांबे या खनिजासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
➖चद्रपूर.

🔰मळा व मुठा या नद्या कोणत्या शहरातून वाहत जातात ?
➖पणे.

🔰भारतीय गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते ?
➖ लता मंगेशकर.

🔰विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केला ?
Ans -: महर्षी धौडों केशव कर्वे

🔰सभाषचंद बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?
 Ans-: फॉरवर्ड ब्लॉक

🔰कषय : संक्रामक रोग :: कॅन्सर:.......
Ans-: असंक्रामक रोग

🔰महाराष्ट्रात......... प्रशासकीय विभाग आहेत.
Ans -: 6

🔰महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे ?
Ans-: नागपूर

🔰राधानगरी धरण.......नदीवर बांधण्यात आलेले आहे.
Ans -: भोगावती

🔰गरामगीता हा काव्य ग्रंथ.......यांनी नी रचला आहे.
Ans-:श्री तुकडोजी महाराज

🔰फसबुकचे संस्थापक कोण ?
Ans-:मार्क झुकेरबर्ग


🔰काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
Ans-:आसाम

🔰वदेमातरम हे राष्ट्रीय गान कोणी लिहिले ?
Ans-:बंकीमचंद्र चॅटर्जी

🔰यनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?
 Ans-:हेग

🔰दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Ans -: कार्ल मार्क्स

🔰भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात.
 Ans-:28 फेब्रुवारी

🔰भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ?
Ans-:प्रस्तावना

🔰महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते ?
 Ans-:इचलकरंजी


 Q1) औद्योगिक धोरणा बद्दल खालील विधान ओळखा

1) 24 जुलै 1994 रोजी केंद्र शासनाने आपले नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले.
2) देशातील उद्योगधंद्यांच्या वाढीस व तांत्रिक प्रगतीस पोषक वातावरण निर्माण करणे
3) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आत्मविश्वासपूर्वक उतरण्याची क्षमता निर्माण करणे हा हेतू

१) सर्व बरोबर
२) 1 व 2 बरोबर
३) 2 व 3 बरोबर 💐💐
४) सर्व चूक



 Q2) ____ या प्रकारच्या बेरोजगारीस 'बारमाही न्यून रोजगार' किंवा 'व्यापक प्रच्छन्न बेरोजगारी' असेही म्हटले जाते.

१) हंगामी बेरोजगारी
२) खुली बेरोजगारी
३) सुशिक्षित बेरोजगार
४) अदृश्य बेरोजगारी 💐💐



 Q3)
 समितीचे नाव                         विषय

A) सुबिमल दत्त            1) सार्वजनिक  उद्योग बाबतच्या  धोरणात सुधारणा               
                                                 
                                 

B) सेनगुप्ता                 2) लघु उद्योगांचा   दर्जा               
                               

C) अबिद हुसेन            3) कर सुधारणा

D) डॉ. राजा चेलय्या     4) औद्योगिक परवाना धोरण समिती           
                                 

       A      B      C      D
१)    1      2      3       4
२)    2      1      4       3
३)    3      4      1       2
४)    4      1      2       3💐💐


 Q4) एखाद्या देशातील स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP) वजा घसारा म्हणजे _

१) निव्वळ राष्ट्रीय उत्पादन 💐💐
२) स्थूल देशांतर्गत उत्पादन
३) निव्वळ देशांतर्गत उत्पादन
४) या पैकी नाही

     
 Q5) नॅशनल रिन्युअल फंड खालील पैकी कशाशी निगडित आहे ?

१) कारखान्याची पुनर्रचना व आधुनिकीकरण
२) असंघटित कामगारांना विमा संरक्षण
३) बेरोजगारांना बेरोजगार भत्ता
४) सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार साहाय्य

१) सर्व बरोबर
२) फक्त 2 बरोबर
३) फक्त 1 बरोबर 💐💐
४) फक्त 3 बरोबर


Q6) समावेशक आर्थिकवृद्धी (Inclussive Growth) म्हणजे

१) जलद विकास
२) औद्योगिक विकास
३) गरिबांचे जीवनमान सुधारणारा विकास 💐💐
४) समतोल प्रादेशिक विकास


Q7) महाराष्ट्र राज्यातील पहिला साखर कारखाना खालील पैकी कोठे उभा राहिला ?

१) हरेगाव (बेलापूर- अहमदनगर) 💐💐
२) प्रवरानगर (लोणी- अहमदनगर)
३) माळेगाव (बारामती- पुणे)
४) सोनई (नेवासे- अहमदनगर)

.(प्रवरानगर ला सहकारी तत्वावर उभारण्यात आलेला पहिला साखर कारखाना आहे....)


Q8)
1) निर्यात आयात बँकेची स्थापना 1 जानेवारी 1982 रोजी झाली
2) या आधी आयात निर्यातीशी निगडित पतपुरावठ्याची जबाबदारी (IDBI) भारतीय औद्योगिक विकास बँकेच्या आंतरराष्ट्रीय पतपुरवठा विभागावर होती
3) भारताच्या परराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात EXIM बँकेचे स्थान 'सर्वोच्च वित्तसंस्था' असेच आहे

१) 1 व 3 बरोबर
२) सर्व बरोबर 💐💐
३) फक्त 3 बरोबर
४) 1 व 2 बरोबर



Q9) खालील योग्य विधान ओळख

1) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स ची स्थापना ऑक्टोबर 1976 मध्ये झाली
2) रेल्वे आणि रक्षा मंत्रालय यांच्या अंतर्गत येत नाही
3) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स यांनी ठेवलेले हिशेब व त्यांच्या अहवालाची भारताचे सरहिशेबतपासनीस यांच्या कडून तपासणी केली जाते
4) कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते

१) सर्व बरोबर 💐💐
२) 1 व 4 बरोबर
३) फक्त 1 व 2 बरोबर
४) सर्व चूक


Q10)

वित्त आयोग                        अध्यक्ष
A) 12 वा वित्त आयोग   1) ऐन के सिंग
B) 13 वा वित्त आयोग   2) वाई वि रेड्डी
C) 14 वा वित्त आयोग   3) विजय केळकर
D) 15 वा वित्त आयोग   4) सी रंगराजन
       A    B    C     D
१)   1     2     3    4
२)   4     2    3     1
३)   4     3    2     1 ✅
४)   1     3    2     4

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

इतिहास :- लॉर्ड आणि वहाइसरॉय


👉 लॉर्ड एल्गीन – (१८६२-१८६३) :

सिंधू नदीच्या पलीकडील हिंदुकुश पर्वतातील वहाबीविरुद्ध लढाई केली. भारतात आल्यावर धर्मशाला येथे अवघ्या २० महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला.



👉 लॉर्ड जॉन लॉरेन्स (१८६३-१८६९) :

सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी अ‍ॅक्ट फॉर पंजाब अ‍ॅण्ड अवध संमत केला. १८६८ मध्ये पंजाब अवधसाठी कूळ कायदा लागू केला. त्याच्या काळात दोन दुष्काळ पडले. पहिला १८६८ साली ओरिसातील व दुसरा १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड व राजपुतान्यात. तेव्हा फेमीन कमिशनची स्थापना केली. दुष्काळासाठी जॉर्ज कॅम्पेबल समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले. सिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ठरविली.


👉 लॉर्ड मेयो (१८६९-१८७२) :

सर जॉन लॉरेन्सच्या निवृत्तीनंतर व्हाइसरॉय १८६९ मध्ये मेयोची नियुक्ती झाली. डिसेंबर १८७० मध्ये रिचर्ड स्ट्रचीने वित्त विकेंद्रीकरणाची घोषणा केली. स्ट्रचीने तूट भरून काढण्यासाठी विकास कार्यात कपात, आयकरात वाढ, मीठ करात सुधारणा केल्या. १८७० चा विकेंद्रीकरणाचा ठराव प्रांती स्वायत्ततेची सनद म्हणून ओळखला जातो. बजेटमध्ये उत्पन्न खर्चात समतोल मेयोने निर्माण केला. स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मेयोने १८७० मध्ये स्थानिक स्वतंत्र शासन समित्या स्थापल्या. संस्थानिकांच्या, सरदारांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज अजमेर येथे काढले. सर्वप्रथम भारतात जनगणना १८७२ मध्ये मेयोच्या काळात झाली. मेयोस आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा व्हाइसरॉय म्हणतात. जानेवारी, १८७२ मध्ये अंदमान येथे कैद्यांची पाहणी करत असताना एका पठाणाकडून मेयोची हत्या झाली.


👉 वहाइसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक (१८७२-१८७६) :

१८५३ मध्ये लॉर्ड नॉर्थब्रुक हा चार्ल्स वुडचा सचिव होता. १८७२ मध्ये नॉर्थब्रुक व्हाइसरॉय झाला. लॉर्ड नॉर्थब्रुक हा अनियोजित खाजगी आर्थिक व्यवहार आणि मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कर्ता होता. बिहार, बंगाल प्रांतात दुष्काळ निवारणार्थ (१८७३-७४) ब्रम्हदेशातून तांदूळ आयात केला. बंगाल-बिहार दुष्काळ निवारणार्थ नॉर्थब्रुकने ६६ लक्ष पौंड खर्च केले. त्याच्या काळात पंजाबातील कुका चळवळीचा सामना करावा लागला. त्याच्याच कारकिर्दीत मुंबईत १८७५ साली आर्य समाज व थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली. नॉर्थब्रुकची कारकीर्द अफगाण संदर्भात विरोधी धोरणामुळे प्रसिद्ध आहे. इंग्लंड सत्ताधीशांच्या मतभेदामुळे एक वर्ष आधी मुदतपूर्व राजीनामा दिला.


👉लॉर्ड लिटन (१८७६-१८८०) 


लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता. म्हणून डिझरायलीने त्याची भारताच्या व्हाइसरॉयपदी १८७६ मध्ये नेमणूक केली. त्याच्या काळात १८७६-७७ मध्ये मद्रास, मुंबई, पंजाब या भागात दुष्काळ पडला. या काळात दुष्काळाने ५० लाख व्यक्ती मृत्यू पावल्या व २० लाख हेक्टर जमीन नापीक झाली. व्हाइसरॉयने दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनेच्या हेतूने स्ट्रची दुष्काळ निवारण समिती नेमली. (अहवाल १८८०). तिचा अहवाल स्वीकारून सरकारने १८८३ साली दुष्काळ संहिता जाहीर केली. लिटनच्या उद्दाम धोरणामुळे दुसरे अफगाण युद्ध उद्भवले. १८७७ साली पहिला दिल्ली दरबार भरवण्यात येऊन राणी व्हिक्टोरियाने भारत सम्राज्ञी हा किताब धारण केल्याचे जाहीर केले. त्याच्यावर देशी वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवल्याने देशी वृत्तपत्रांवर र्निबध टाकणारा देशी कायदा मार्च, १८७८ मध्ये पास करून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी केली. अमृतबझार पत्रिका हे देशी वृत्त तेव्हापासून इंग्रजी भाषेत सुरू आहे. १८७८ मध्ये शस्त्रबंदी कायदा करून विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी. लिटनच्या काळात भारतीय मुलकी सेवा कायदा १८७९ पास केला. आयसीएस परीक्षेचे वय २१ वरून १९ वर्षांवर आणले. त्याविरुद्ध सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची (आयसीएस पास प्रथम भारतीय व्यक्ती) इंडियन असोसिएशनच्या वतीने जनजागरण मोहीम.


👉 वहाइसरॉय लॉर्ड रिपन (१८८०-१८८४) 


भारतीयांसाठी उदारमतवादी व्हाइसरॉय म्हणून ओळखला जातो. इ.स. १८३२ च्या इंग्लंडमधील फॅक्टरी अ‍ॅक्टप्रमाणे रिपनने १८८१ मध्ये कामगारांसंबंधी फॅक्टरी अ‍ॅक्ट पास केला. इ.स. १८३५ मध्ये चार्ल्स मेटाकाफ व लॉर्ड मेकॉलेने भारतातील वृत्तपत्रांना स्वातंत्र्याची मागणी केली होती. १९ जानेवारी, १८८२ रोजी रिपनने (Vernacular) रद्द केला. रिपनने शिक्षणपद्धतीच्या पाहणीकरिता १८८२ मध्ये हंटर समिती १८५४ च्या वुड्स खलित्याप्रमाणे नेमली. हंटर समितीच्या शिफारशी स्वीकारून लाहोर येथे पंजाब व अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना केली. १८८२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कायदा पास केला. रिपनने स्थानिक भारतीयांना नियुक्त केले. त्यामुळे रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून संबोधतात. भारतातील पहिली दशवर्षीय जनगणना १८८१ मध्ये रिपनच्या कारकिर्दीत झाली. १८८४ मध्ये इलबर्ट बिल मंजूर केले. या कायद्यान्वये भारतीय सत्र न्यायाधीशांना युरोपियन लोकांवर खटले चालविण्याची मुभा देण्यात आली. १८८४ मध्ये रिपनने राजीनामा दिला.


👉 लॉर्ड डफरिन (१८८४-१८८८) 


रिपनच्या मुदतपूर्व राजीनाम्यामुळे लॉर्ड डफरिनची व्हाइसरॉयपदी नियुक्ती झाली. डफरिनच्या काळात उत्तर ब्रम्हदेश जिंकून संपूर्ण ब्रम्हदेश (१८८६) इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणला. मुलकी सेवेत भारतीयांना समाविष्ट केले जावे म्हणून व्हाइसरॉयने चार्ल्स अ‍ॅचिसन समिती नेमली. चार्ल्स अ‍ॅचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोग (पब्लिक सर्व्हिस कमिशन)ची स्थापना झाली. १८८७ मध्ये अ‍ॅचिसनने लोकसेवा आयोगाच्या शिफारशी (अहवाल) सादर केल्या. डफरिनच्या काळात अ‍ॅलन ‘ाुम (निवृत्त आय.ए.एस. अधिकारी) ने इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापण्यास पुढाकार घेतला. डिसेंबर १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबईत तेजपाल संस्कृत महाविद्यालयात झाली. लॉर्ड डफरिनने इंपेरियल सर्व्हिस क्रॉप्सची स्थापना केली. बंगाल, पंजाब, औंधमध्ये नवीन कुळकायदे व कुळासाठी अधिक उदार धोरण स्वीकारले.


👉 लॉर्ड लॅन्सडाऊन (१८८८-१८९४) 


भारतीयांना शासनात सहभाग मिळावा म्हणून भारतीय विधिमंडळ कायदा, १८९२ संमत झाला.     सर डय़ुरांड यांनी पूर्व व दक्षिण अफगाणिस्तानची सीमा निश्चित केली. हिला डय़ुरांड रेषा म्हणतात. १८९१ साली कामकरी महिला व बालके यांच्या संरक्षणासाठी दुसरा फॅक्टरी अ‍ॅक्ट मंजूर केला गेला. समाजसुधारक बेहरामजी मलबारी यांच्या प्रयत्नामुळे व्हाइसरॉय लॅन्सडाऊनने एज ऑफ कन्सेंट अ‍ॅक्ट (संमतिवयाचा कायदा) १८९१ मध्ये संमत केला.


👉 लॉर्ड एल्गीन – २ (१८९४-१८९९) 


यांच्या कारकिर्दीत १८९६ चा भीषण दुष्काळ पडला. १८९६-९७ दुष्काळग्रस्तांसाठी व्हाइसरॉय एल्गीनने अन्नधान्य हाँगकाँगकडून मुंबई बंदरात आणले. या अन्नधान्यासोबत ब्युबॉनिक नावाचा भयंकर प्लेग भारतात आला.


👉 लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५) 


👉 लॉर्ड कर्झन १८९९ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आला. कर्झन भारतास आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजत. व्हाइसरॉयपदी येण्यापूर्वी कर्झन भारतात चार वेळा आलेला होता. १८९९-१९०० दरम्यान भारतात दुष्काळाबरोबर एन्फ्ल्युएंझा व मलेरियाची साथ पसरली. दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्र व गुजरातमध्ये होती. दुष्काळ निवारणार्थ व्हाइसरॉय कर्झनने १९०१ मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली. १९०१ मध्ये वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला. १९०० चा कलकत्ता कॉर्पोरेशन कायदा केला. कर्झन स्थानिक स्वराज्य संस्थांचा कट्टर शत्रू समजला जात होता. १८९९ मध्ये कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्णप्रमाण स्वीकारले. पोलीस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गरकारभाराची चौकशी करण्यासाठी अ‍ॅन्ड्र फ्रेझर समिती १९०२ मध्ये नेमली. कर्झनने १९०५ मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली. १९०२ साली सर रॅली यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नियुक्त केले व या कमिशनच्या शिफारशीनुसार १९०४ मध्ये हिंदी विद्यापीठाचा कायदा संमत केला. १९०१ मध्ये संस्थानिक राजपुत्रांकरिता इंपीरिअल कॅडेट कोअरची स्थापना केली. १९०१ मध्ये इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू झाला. १९०३ मध्ये दुसरा दिल्ली दरबार भरवून अमाप पसा खर्च केला. कर्झनने पुराणवस्तू संशोधन खाते निर्माण केले. त्यासाठी प्राचीन स्मारक कायदा संमत करून घेतला. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे ७ जुल १९०५ रोजी केलेली बंगालची फाळणी ही होय. तिचा मुख्य उद्देश प्रशासकीय कारणापेक्षा हिंदू-मुस्लीम फूट पाडणे हा होता. सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी एक नियमावली तयार करून त्याने राजकारणात कार्यक्षमता या बाबीला महत्त्व दिले. कर्झनने भारतात आल्यानंतर १२ खाती नेमून विविध समित्या नेमल्या. त्यामुळे त्याची कारकीर्द समिती प्रशासन म्हणतात. लष्कर सरसेनापती, परंतु फाळणी प्रकरणामुळे तो बराच वादग्रस्त ठरला.


👉 कर्झनच्या शेती सुधारणा :


👉 १९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला. ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली. १९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली. त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा केला. कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले. रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली. कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले. ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला. कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली. 


👉 लॉर्ड मिंटो-२ (१९०५-१९१०) 


👉 १९०८-१० या काळात बंगाल फाळणी आंदोलनास तोंड दिले व फाळणीविरोधी आंदोलनाबाबत कायदे मिंटोने तयार केले. १९०७ मध्ये लॉर्ड मिंटोने चीनशी अफूचा व्यापार बंद केला. मुसलमानांना मिंटोने चिथावणी दिली. स्वतंत्र मतदारसंघाचे सिमला येथे १९०६ मध्ये वचन दिले. १९०९ मध्ये इंडिया कौन्सिल अ‍ॅक्ट, ज्याला मोल्रे मिंटो सुधारणा म्हणतात हा कायदा पास झाला. 



👉 वहाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज (१९१०-१९१६) 


👉 भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाइसरॉय म्हणून लॉर्ड हार्डिंग्जला ओळखतात. व्हाइसरॉय हार्डिंग्जने जॉर्ज पंचमच्या स्वागतार्थ दिल्लीत १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली दरबार भरवला. त्या वेळी पंचम जॉर्जने बंगाल फाळणी रद्द केली. २३ डिसेंबर, १९१२ रोजी राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस हलविली. त्या शाही मिरवणुकीत हार्डिंग्ज बॉम्बहल्ल्यात जखमी झाला. रासबिहारी बोस यांच्यावर खटला भरला. तो खटला दिल्ली खटला म्हणून ओळखतात.

डिसेंबर, १९१४ मध्ये प्रथम महायुद्धास सुरुवात झाली. भारतीयांनी त्यास बिनशर्त पाठिंबा दर्शविला.


👉 लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६ – १९२१) 


👉 लॉर्ड चेम्सफोर्डने भारतात येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियात गव्हर्नर जनरलपदी कार्य केले होते. १९१९ चा माँटेग्यू- चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा भारत अधिनियम कायदा संमत झाला. १९१९ मध्ये पंजाब प्रांतात रौलेट कायदा (काळा कायदा) लागू केला. १३ एप्रिल, १९१९ रोजी जालियानवाला बाग हत्याकांड झाले. (जनरल डायर). १९२०-२१ मध्ये खिलाफत चळवळ व असहकार चळवळ .


👉 लॉर्ड रिडिंग (१९२१-१९२६) 


👉 लॉर्ड रिडिंग यहुदी होता. परंतु स्वगुणाने इंग्लंडचे मुख्य न्यायाधीश व भारताचा व्हाइसरॉय म्हणून नेमणूक झाली. काँग्रेसमध्ये फेरवादी व नाफेरवादी गट पडले. स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. रिडिंगच्या काळात दुहेरी प्रशासन व्यवस्था व मुडिमन समितीचा अहवाल सादर झाला. 



👉 लॉर्ड आर्यविन (१९२६-१९३१) 


👉 आर्यविन काळातच सायमन कमिशन (१९२८) भारतात आले. डिसेंबर १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली व सविनय कायदेभंग चळवळ (१९३०) चालू केली. २६ जानेवारी, १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळला गेला. आर्यविन काळातच सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद भरवली गेली. ५ मार्च, १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला. गांधी गोलमेज परिषदेस गेले. सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली.


👉 लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६) 


👉 वहाइसरॉय नियुक्तीपूर्वी विलिंग्डन मुंबई-मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता. दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे विलिंग्डनच्या काळात झाली. १६ ऑगस्ट, १९३२ रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्डने श्वेतपत्रिका घोषित केली. तिलाच जातीय निवाडा म्हणतात. गांधीजींचे उपोषण व येवरडा तुरुंगात २४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. सविनय कायदेभंग चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यास तोंड द्यावे लागले. भारत सरकार अधिनियम, १९३५चा कायदा पास झाला. विलिंग्डन त्याच्या दडपशाहीच्या कृत्यांमुळे भारतीयांचा नावडता राहिला. 


👉 वहाइसरॉय लिनलिथगो (१९३६-१९४३) 


👉 सटॅनलेकडून लिनलिथगोने व्हाइसरॉयपदाची सूत्रे हाती घेतली. लिनलिथगोने भारतीय कृषी राज आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. लिनलिथगो भारतीय घटनात्मक सुधारणांच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष होता. १९३५ च्या कायदा निर्मितीत लिनलिथगोचा सहभाग होता. १९३५ च्या कायद्याने केंद्रीय भागाऐवजी प्रांतीय तरतुदी मान्य करुन १९३७ मध्ये निवडणुका झाल्या. काँग्रेसने आठ प्रांतांत सरकार स्थापित केले. दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहमतीशिवाय युद्धास पाठिंब्याची व्हाइसरॉयने १९३९ मध्ये घोषणा केली. सदर घटनेच्या निषेधार्थ प्रांतीय शासनाने १९३९मध्ये राजीनामे दिले. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला. १९४२च्या चले जाव चळवळीस दडपशाहीने बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 

सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले. १९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले. 



👉 लॉर्ड वेव्हेल (१९४३-१९४७) 


👉 ऑक्टोबर, १९४३ मध्ये लॉर्ड वेव्हेलने व्हाइसरॉय पदाची सूत्रे घेतली. वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त झाले. वेव्हेलने राजकीय पेचप्रसंग  सोडविण्यासाठी जून १९४५ मध्ये सर्वपक्षीय बठक सिमला येथे बोलवली. इंग्लंडच्या मजूर पक्षाने भारतात १९४६ मध्ये कॅबिनेट मिशन पाठविले. कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने निवडणुका होऊन २ सप्टेंबर, १९४६ रोजी नेहरूंचे हंगामी सरकार स्थापन झाले. भारतात घटना समितीच्या बठकांस सुरुवात झाली. आझाद हिंदी सेनेच्या सनिकांच्या फाशीच्या शिक्षा जनमताच्या दबावामुळे व्हाइसरॉय वेव्हेलला रद्द कराव्या लागल्या. पंतप्रधान अ‍ॅटलीने भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा लागला. 



👉 वहाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन (मार्च १९४७ ते ऑगस्ट १९४७- जून १९४८) 


👉 मार्च १९४७ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आले. मे १९४७ मध्ये ब्रिटन संसदेशी चर्चा करण्यास लंडनला गेले. २ जून, १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. ३ जून, १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची तारीख जाहीर केली. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचा तिरंगा प्रथम व्हाइसरॉय माऊंटबॅटनच्या हस्ते फडकविण्यात आला. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व इंग्रज सरकारचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन ठरले. माऊंटबॅटन जून, १९४८ पर्यंत स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल होते. 




स्वतंत्र भारताची राज्यघटना

🔅लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला. ३० मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. त्यानुसार महायुध्द समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्र्वासन देण्यात आले व १९४६ च्या कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.


🔅 तरिमंत्री योजनेनुसार १० लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात प्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेमध्ये सर्वसामान्य २१० मुस्लीम ७८ शीख ४ इतर ४ अशा २९६ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा निवडले गेले. त्यांच्या अध्याक्षतेखाली अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणुन डॉ. एच. सी. मुखर्जी यांची तर समितीचे सल्लागार म्हणून डॉ. बी. एन. राव यांची निवड झाली. याचबरोबर सा समितीमध्ये प्रमुख सदस्य म्हणुन पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, डॉ. राधाकृष्णन, के.एम. मुन्शी डॉ. जयकर इत्यादींचा सहभाग होता.


🔅 घटना परिषदेमार्फत २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसूदा समितीची निवड झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मसूदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर बी. एन. राव, एस, एन. मुखर्जी, इ. मसुदा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले घटनेच्या मसुद्यामध्ये ३१५ कलमे व ७ परिशिष्टे आहेत. घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली. तर गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्य विधाता, या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी नवीन राज्यघटनेला मंजूरी देण्यात आली. राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.


🔅 महणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. २६ जानेवारी १९५० पासून नवीन राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. म्हणून हा दिवस सर्व देशभर साजरा केला जातो. भारताचे संविधान हा राज्यघटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. घटनेची ध्येये आणि उद्दिष्टे यात प्रतिबिंब्ंिात झाली आहेत. भारताचे संविधान खालीलप्रमाणे.


🔶 भारताचे संविधान


🔅 आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्र्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता:

निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्र्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन,

आमच्या संविधान सभेस आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.



💠 भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-



(१) लिखित घटना


भारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे. इंग्लंडच्या घटनेप्रमाणे ती अलिखित नाही. राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आयली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.



(२) जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना


भारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.



(३) लोकांचे सार्वभौमत्व


घटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सज्ञ्ल्त्;ाा आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फ़त राज्यकारभार चालविते राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणुन साजरा केला जातो.


(४) संसदीय लोकशाही


स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. घटनाकारांनी इंग्लंडचा आदर्श समोर ठेवून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती, मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.


(५) संघराज्यात्मक स्वरूप


भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.



(६) घटना अंशत परिवर्तनीय व अंशत परिदृढ


लिखित व अलिखित याप्रमाणेच परिवर्तनीय व परिदृढ असे घटनेचे प्रकार आहेत. इंग्लंडची राज्यघटना अतिशय लवचीक तर अमेरिकेची राज्यघटना अतिशय ताठर स्वरूपाची आहे. भारतीय राज्यघटना इंग्लंइतकी लवचीक नाही व अमेरिकेइतकी ताठरही नाही. भारतीय घटनादुरुस्तीची पध्दत कलम ३६८ मध्ये देण्यात आलेली आहे. एखाद्या साधारण मुद्यावर संसदेच्या साध्या बहुमताने घटनेत दुरुस्ती करण्यात येते मात्र राष्ट्रपतीची निवडणूक पध्दत केंद्र व प्रांत यांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इ. महत्वपूर्ण बाबीविषयी घटनेत दुरुस्ती करताना संसदेच्या २/३ सदस्यांची अनुमती निम्म्याहून अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाची अनुमती आवश्यक असते. त्यामुळे भारतीय घटना अंशत, परिवर्तनीय व अंशत परिदृढ अशा स्वरुपाची बनविण्यात आली आहे.


(७) मूलभूत हक्क


भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क्ांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.


(८) धर्मनिरपेक्ष राज्य


भारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्माना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.



(९) एकेरी नागरिकत्व


अमेरिकन व स्वित्झर्लंड या देशामध्ये केंद्र व प्रांत यांचे दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेले आहे. भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेल आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली .


(१०) एकच घटना


ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे



(११) राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ


देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.


(१२) जनकल्याणकारी राज्याची निर्मिती


भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फ़त चालतो. भारताचा राष्ट्रपती हा इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेनुसार नसतो, तर अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीने निवडण्यात येतो. जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते.


(१३) मार्गदर्शक तत्वे


व्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते. मूलभूत हक्कांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही. मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला कल्याणासाठी असली तरी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते. मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे


(१) जीवनावश्यक गोष्टी सर्वाना मिळाव्यात 

(२) राज्यातील सर्वासाठी एकच मुलकी कायदा असावा 

(३) राज्यातील सर्व स्त्री -पुरुषांना समान वेतन असावे. 

(४) १४ वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे 

(५) संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये 

(६) देशातील साधनसंपज्ञ्ल्त्;ा्ीचे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे. 

(७) दारुबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे.



(१४) स्वतंत्र न्यायालय व्यवस्था


लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. भारतास एकेरी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, जिल्हा, कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाब येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारीमंडळ यांच्या पासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणूक बदली, बढती, पगार, या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे.



(१५) राष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार


भारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे. त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पध्दतीने होत असते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सज्ञ्ल्त्;ाा केंदि्रत झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयी घटक राज्याविषयक, न्यायविषयक व संकटकाल विषयक अशा सहा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाल विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आह


(१६) हिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा


भारतीय राज्यघटनेत भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ३४३ मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की, भारत या संघराजयाची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालविण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणार्या राज्यांना केद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल.


(१७) प्रौढ मताधिकार


भारतीय लोकशाहीने प्रौढ मतदार पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. १८ वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आलेला. आहे निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्या व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताताधिराने लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. सनदी नोकरांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन (लोकसेवा अयोग मंडळ) ची स्थापना करण्यात आली आह