17 January 2022

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष.

🔰 12 जानेवारी 2022 रोजी केंद्र सरकारने प्रख्यात रॉकेट शास्त्रज्ञ एस.  सोमनाथ यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

🔰 एस .सोमनाथ के सिवन, 14 जानेवारी 2022 रोजी त्यांचा विस्तारित कार्यकाळ पूर्ण करत आहेत.  सध्या डॉ.  एस सोमनाथा हे केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSV) चे संचालक आहेत.  त्यांची नियुक्ती या पदावर रुजू झाल्यापासून 03 वर्षांच्या एकत्रित कार्यकाळासाठी आहे, ज्यामध्ये सार्वजनिक हितासाठी सेवानिवृत्तीच्या वयाच्या पुढे कार्यकाळ वाढवणे समाविष्ट आहे.

🔰सोमनाथ हे लाँच व्हेईकल डिझाइनसह अनेक विषयांमध्ये तज्ञ आहेत.  लाँच व्हेईकल सिस्टीम इंजिनीअरिंग, स्ट्रक्चरल डिझाईन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स, इंटिग्रेशन डिझाईन आणि प्रक्रिया, मेकॅनिझम डिझाइन आणि पायरोटेक्निकमध्ये त्यांचे कौशल्य आहे.  त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ते पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) च्या एकत्रीकरणादरम्यान टीम लीडर होते. 

🔰भारतीय अंतराळ संशोधन संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी झाली. 

🔰ही भारत सरकारची अंतराळ संस्था आहे आणि तिचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. 

🔰देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे जवळचे सहकारी आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नातून अवकाश संशोधनासाठी याची स्थापना करण्यात आली.  हे भारत सरकारच्या 'अंतराळ विभाग' द्वारे व्यवस्थापित केले जाते, जे थेट भारताच्या पंतप्रधानांना अहवाल देतात.  इस्रो विविध केंद्रांच्या देशव्यापी नेटवर्कद्वारे कार्य करते

नव्या वर्षातील संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर.

🔰नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे २५६ वे अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात ८ एप्रिल पर्यंत चालणार आहे.

🔰पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी पर्यंत अधिवेशन चालणार आहे. तर दुसरा टप्पा १४ मार्च ते ८ एप्रिल पर्यंतचा असणार आहे. याशिवाय १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

🔰याआधी सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरक्षित संचालनसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.

🔰सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष या दोघांनी सेक्रेटरी-जनरल यांना सद्य परिस्थितीत मागील हिवाळी अधिवेशनातील कोविड प्रोटोकॉलचा आढावा घेण्याचे आणि या संदर्भात लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.

ओमायक्रॉनमुळे भारतावर पुन्हा आर्थिक संकट येणार? संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली भिती.


🔰गेल्या दोन वर्षांपासून भारतात करोना ठाण मांडून बसला आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत पहिल्या वर्षी देशाला या विषाणूमुळे मोठा फटका बसला. लाखो जीव गमवावे लागले. मात्र, त्यासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील या संकटाचा वाईट परिणाम झाला.

🔰लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, रोजगार, आर्थिक व्यवहार हे सगळंच ठप्प झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली. मात्र, पहिली लाट ओसरल्यानंतर देशानं अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून काहीसं यश मिळतं न मिळतं, तोच पुन्हा डेल्टा व्हेरिएंटनं अर्थव्यवस्थेवर हल्ला केला! आता पुन्हा एकदा ओमायक्रॉनमुळे तेच संकट भारतावर येऊ शकतं, अशी भिती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.

🔰पहिल्या लाटेमध्ये बसलेला आर्थिक फटका भरून काढण्याचा भारताचा प्रयत्न डेल्टा व्हेरिएंटमुळे अडचणीत आला. त्यानंतर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था काहीशी सावरू लागल्याचं चित्र निर्माण झालेलं असतानाच आता ओमायक्रॉन व्हेरिएंट आणि तिसऱ्या लाटेचं संकट भारतासमोर उभं ठाकलं आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या अर्थविषयक अंदाज समितीने यासंदर्भात भारताला इशारा दिला आहे.

देशातील परदेशी चलनाच्या साठ्यात सातत्याने घट; सरकारकडील गोल्ड रिझर्व्हचे मूल्यही घसरले.

🔰देशामधील परदेशी मुद्रा म्हणजेच परकीय चलन गंगाजळीमध्ये मोठी घट झाली आहे. सात जानेवारी २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये भारतामधील परकीय चलनामध्ये ८७.८ कोटी डॉलर्सने घट झालीय. आता भारतामध्ये ६३२.७३६ अब्ज डॉलर एवढं परकीय चलन शिल्लक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. परदेशी गंगाजळीमध्ये सातत्याने होणारी घट ही केंद्र सरकारसाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे.

🔰यापूर्वी ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या आटवड्यामध्ये परदेशी चलन हे १.४६६ अब्ज डॉलर्सचे कमी होऊन ६३३.६१४ अब्ज डॉलर्सवर आलं होतं. तर २४ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परदेशी चलनामध्ये ५८.७ कोटी डॉलरर्सची घट झाली होती. त्यावेळी परकीय चलन ६३५.०८ अब्ज डॉलर्सपर्यंत आलेलं. १७ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा १६ कोटी डॉलर्सने घसरुन ६३५.६६७ अब्ज डॉलर्स वर आला होता.

🔰आरबीआयने शुक्रवारी जारी केलेल्या साप्ताहिक आठडेवारीनुसार सात जानेवारी रोजी जो आठवडा संपला त्यामध्ये परदेशी चलन साठ्यात मोठी घट झाली. ही घट प्रामुख्याने फॉरेन करन्सी अॅसेट (एफसीए) म्हणजेच परदेशी चलनामधून होणारी कमाई मंदावल्याने झाल्याचं सांगण्यात आलंय. एकूण परदेशी चलनाच्या साठ्यामध्ये एफसीएचा महत्वाचा वाटा असतो. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अहवालानुसार सात जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या एफसीएमध्ये ४९.७ कोटी डॉलर्सची घसरण झाली.

16 January 2022

भारताची राज्यघटना महत्त्वाचे प्रश्नसंच


1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
१. महात्मा गांधी
२. मानवेंद्र नाथ रॉय✅
३. डॉ बाबासाहेब आंबेडकर
४. जवाहरलाल नेहरू

2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?
१. डॉ राजेंद्र प्रसाद
२. एच सी मुखर्जी
३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅
४. पं मोतीलाल नेहरू

3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?
१. एच सी मुखर्जी
२. के एम मुन्शी
३. वल्लभभाई पटेल
४. जे बी कृपलानी✅

4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.
१. कलम न 1✅
२. कलम न 2
३. कलम न 3
४. कलम न 4

5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?
१. यु एस ए
२. जपान
३.जर्मनी
४. ब्रिटिश✅

6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?
१. बी एन राव
२. जवाहरलाल नेहरू
३. के एम मुन्शी
४. एच सी मुखर्जी✅

7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.
१. २२ जुलै १९४७✅
२. १७ नोव्हेंबर १९४७
३. २४ जानेवारी १९५०
४. ४ नोव्हेंबर१९४८

8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?
१. डॉ बाबासाहेब आंबेडकर
२. पं मोतीलाल नेहरू
३. डॉ राजेंद्र प्रसाद
४. जवाहरलाल नेहरू✅

9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.
१. २६/०१/१९५०✅
२. २६/११/१९४९
३. २६/०८/१९४७
४. ०४/११/१९४८

10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?
१. डॉ के एम मुन्शी
२. एन गोपालस्वामी अय्यंगार
३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर
४. बी एन राव✅

11. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
१. ४४✅
२. ४८
३. ४६
४. ५०

12. घटनाकारांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे.... हे होय.
१. घटनेचा मसुदा
२. मूलभूत अधिकार
३. घटनेचा सरनामा ✅
४. मार्गदर्शक तत्त्वे

13. ११० वे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे?
१. संसद विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण ✅
२. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण
३. लोकपाल
४. लोकायुक्त

14. विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालीलपैकी कोणती?
१. विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात✅
२. विधानपरिषदेतील प्रत्येक सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतो
३. विधान परिषदेतील काही सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते
४. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो

15. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?
१. गृहमंत्री
२. पंतप्रधान✅
३. राष्ट्रपती
४. उपराष्ट्रपती

15. भारतीय संसद महाराष्ट्र राज्य  विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीला योग्य पर्याय कोणता?
१. महाराष्ट्र विधानसभा - 278
२. महाराष्ट्र विधानपरिषद- 88
३. लोकसभा - 543
४.राज्यसभा - 250✅

16. खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा.
१. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे✅
२. हुंडा पद्धती बंद करणे
३. निरक्षरता दूर करणे
४.राष्ट्रीय नेत्यांचे मन राखणे

17. भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय.. ....या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
१. गोलकनाथ विरुद्ध पंजाब
२. मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार
३.केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार ✅
४. विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार

18. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?
१. कलम 21
२. कलम 23
३. कलम 24 ✅
४. कलम 28

19. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते?
१. कलम 350
२. कलम 368✅
३. कलम 370
४. कलम 360

20. खालील पैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे?
१. महाराष्ट्र
२. राजस्थान
३. जम्मू कश्मीर
४. आंध्र प्रदेश✅

21. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

१.19 ते 22✅
२.31 ते 35
३.22 ते 24
४.31 ते 51

22. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

१.राष्ट्रपती✅
२.उपराष्ट्रपती
३.पंतप्रधान
४.राज्यपाल

23. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

१.राष्ट्रपती
२ राज्यपाल
३.पंतप्रधान
४.सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती✅

24. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?

१.11 डिसेंबर 1946✅
२.29 ऑगस्ट 1947
३.10 जानेवारी 1947
४.9 डिसेंबर 1946

25. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

१.परिशिष्ट-1
२.परिशिष्ट-2
३.परिशिष्ट-3✅
४.परिशिष्ट-4

26. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

१.47✅
२.48
३.52
४.यापैकी नाही

27. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. आंबेडकर
२.डॉ. राजेंद्रप्रसाद✅
३.पंडित नेहरू
४.लॉर्ड माऊंटबॅटन

28. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. राजेंद्रप्रसाद
२.डॉ. आंबेडकर✅
३.महात्मा गांधी
४.पंडित नेहरू

29. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

१.लोकसभा
२.विधानसभा
३.राज्यसभा✅
४.विधानपरिषद

30. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

१. लोकसभा सदस्य✅
२.मंत्रीमंडळ
३. राज्यसभा सदस्य
४. राष्ट्रपती

31.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?

१.322
२.324
३.326✅
४.329

32. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?
१. संसद✅
२.राज्याचे राज्यपाल
३.राष्ट्रपती
४. सर्वोच्च न्यायालय

33.खालील विधानांचा विचार करा.
अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.
ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.
क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.
ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.

वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.
१.अ,ब,क,ड
२.अ,ब,ड✅
३.अ,क,ड
४.ब,क,ड

34.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत.

या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?
१.फ्रेंच राज्यक्रांती 1789
२.रशियन राज्यक्रांती 1917✅
३.जर्मनी (वायमर संविधान)
४.जपान संविधान

35. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?

१.डॉ नागेन्द्र सिंह✅
२.जी. वी. माळवणकर
३.जगदीश चंद्र बसु
४.आर. के. नारायण

36. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?
१.कलम 11✅
२.कलम 10
३.कलम 9
४.कलम 8

37. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?
१.12 महिने
२.3 वर्ष
३.5 वर्ष✅
४.7 वर्ष

38. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?
१.राष्ट्रपती
२.पंतप्रधान
३.सर्वोच्च न्यायालय
४.संसद✅

39. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?
१.केंद्रीय मंत्रिमंडळ
२.संसद✅
३.राज्य विधिमंडळ
४.संसद आणि राज्य विधिमंडळ

40. खालील विधानांचा विचार करा.

अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.

ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.

क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.

ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.
पर्याय
१.अ,ब,क,ड✅
२.अ,ब,क
३.ब,क,ड
४.अ,ब,ड

४१) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?
अ) संथानाम समिती ✅
ब) वांछू व गोस्वामी समिती
क) तारकुंडे समिती
ड) गोपालकृष्णन समिती

४२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
अ) पाच वर्षे✅
ब) सहा वर्षे
क) तीन वर्षे
ड) दोन वर्षे

४३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?
अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश✅

४४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?
अ) केंद्र सरकार
ब) राज्य सरकार
क) जिल्हाधिकारी
ड) निवडणूक आयोग✅

४५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?
अ) केंद्र
ब) राज्य✅
क) दोन्ही
ड) यापैकी नाही

४6) भारतात वृत्तपत्र स्वतंत्र चा हक्क कोणी दिला आहे?
१.प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
२.भारतीय राज्यघटना✅
३.माहिती व प्रसारण मंत्रालय
४.प्रेस कोन्सिल ऑफ इंडिया

47) विधानपरिषदेची सदस्य संख्या विधानपरिषडेच्या सदरस्य संख्येच्या किती पट असते?
१.२/३
२.१/४
३.१/३✅
४.३/४

48.खालीलपैकी नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो?
१. नियोजन मंत्री
२.वित्तमंत्री
३.पंतप्रधान✅
४.राष्ट्रपती

49. केंद्र राज्य आर्थिक संसाधनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण करते?
१.राष्ट्रीय विकास परिषद
२.आंतरराज्य परिषद
३.नियोजन आयोग
४.वित्त आयोग✅

50. संस्थानांच्या विलीनीकरणाबाबत सर्वात महत्वाची भूमिका कोणी बजावली?
१.जवाहरलाल नेहरू
२.सरदार पटेल✅
३.महात्मा गांधी
४.मोतीलाल नेहरू

5१) राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निदेश जारी करण्याचे अधिकार ____ दिलेले आहेत.
१) सर्वोच्च न्यायालयास कलम ३२ अन्वये     २) उच्च न्यायालयास कलम २२६ अन्वये
३) सर्वोच्च न्यायालय कलम ३२ अन्वये आणि उच्च न्यायालय कलम २२६ अन्वये असे दोघांनाही✅
४) कोणतेही न्यायालयास किंवा अधिकरणास

2२) राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?
१) बिहार    २) किंद्रीय प्रांत ✅   ३) बॉम्बे    ४) पंजाब

3३) राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्त्वांचा स्वीकार केला आहे.
अ) एकेरी न्यायव्यवस्था    ब) मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता
क) समान अखिल भारतीय सेवा
१) अ, क      २) अ, ब     ३) ब, क      ४) वरील सर्व✅

5४) योग्य क्रम निवडा
अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे     ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे
क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे     ड) संविधानाचा सन्मान करणे

5५) भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो?
१) मूलभूत अधिकार   २) मूलभूत कर्तव्ये ✅   ३) प्रस्तावना     ४) राज्याच्या उद्दिष्टांची मार्गदर्शक तत्त्वे

5६) घटनेच्या मूलभूत अधिकारांतर्गत खालीलपैकी कोणते कलम योग्य पर्यावरणात प्रतिष्ठीतपणे जगण्याचा अधिकार देते?
१) २१  ✅   २) २२     ३) २३     ४) २४

5७) संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही?
समिती     -     अध्यक्ष
१) सुकाणू समिती - डॉ. राजेंद्र प्रसाद     
२) कामकाज समिती - के. एम. मुन्शी
३) मुलभूत हक्क उपसमिती - जे. बी. कृपलानी
४) अल्पसंख्याक उपसमिती - मौलाना अबुल कलाम आझाद✅

5८) राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे भारताच्या संविधानातील कोणत्या भागात वर्णन केली आहेत?
१) भाग १     २) भाग २     ३) भाग ३     ४) भाग ४✅

5९) ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले?
१) डॉ.बी.आर. आंबेडकर २) डॉ. राजेंद्र प्रसाद  ३) डॉ. सचिदानंद सिन्हा  ✅४) पंडित जवाहरशलाल नेहरू

6०) १९३५ च्या कायद्यात कशाची तरतूद होती?
१)प्रौढ मताधिकार
२)साम्राज्य अंतर्गत शासन✅
३)सापेक्ष स्वायत्तता
४)प्रांतीय स्वायत्तता

61.विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?
1. 30 वर्षे
2. 21 वर्षे
3. 25 वर्षे✅
4. 18 वर्षे

62.कोणाच्या शिफारशिशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही?
1. मुख्यमंत्री
2. राज्यपाल✅
3. राष्ट्रपती
4. यापैकी नाही

63. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?
1. पंतप्रधान व मुख्यमंत्री
2. राज्यपाल✅
3. राष्ट्रपती
4. मुख्य न्यायमूर्ती

64.जिल्ह्यातील महसूल प्रशाशनाचे प्रमुख कोण असतात?
1. तहसीलदार
2. जिल्हाधिकारी✅
3. आयुक्त
4. उपजिल्हाधिकारी
 

65. महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी पासून अमलात आणली?
1. १ मे १९६०
2. १ मे १९६१
3.  १ मे १९६२✅
4.  १ मे १९६४

66. 4G Wi= Fi   (वाय - फाय) सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती?
1. अकलूज
2. इस्लामपूर✅
3. मिरज
4. सांगली

67. भारतात महिलांसाठी .......... जागा राखीव आहेत
1. लोकसभा
2. पंचायतराज संस्था
3. राज्य विधिमंडले
4. यापैकी nahi✅

68. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती?
1.पाच
2. सात✅
3. नऊ
4. अकरा

69. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?
1. चावडी
2. पार
3.दफ्तर
4. सजा✅

70. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?
1. तहसीलदार✅
2. उपविभागीय अधिकारी
3. जिल्हाधिकारी
4. विभागीय अधिकारी

15 January 2022

ओमायक्रॉनची लागण प्रत्येकालाच होणार, बूस्टर डोसही संसर्ग थांबवू शकणार नाही; आरोग्य तज्ज्ञांची माहिती



🔰गेल्या काही दिवसांपासून भारतात पुन्हा करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. तर, करोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन ज्यामुळे अनेक देशांमध्ये करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले, त्याचा संसर्गही देशात वाढतोय. त्यामुळे सरकारने खबरदारीची पावले उचलत १५-१८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला.


🔰शिवाय आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लसीचा बूस्टर देण्याची घोषणा केली. मात्र, हा बूस्टर डोस देखील लोकांना ओमायक्रॉनची लागण होण्यापासून रोखू शकणार नाही, असं एका आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलंय.


🔰आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीमधील वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मुलायल एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले, “करोना हा आता भयानक आजार राहिलेला नाही.


🔰नवीन स्ट्रेनचा प्रभाव खूपच कमी आहे आणि खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. ओमायक्रॉन हा एक असा आजार आहे, ज्याचा आपण सामना करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना याची लागण झाल्याचेही कळणार नाही. कदाचित ८० टक्क्यांहून अधिक लोकांना कळणारही नाही की आपल्याला कधी ओमायक्रॉनची लागण झाली,” असं त्यांनी सांगितलं.


दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये बंद ; कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा आदेश ; रेस्ताराँ-बारही बंद, घरपोच सेवांना मुभा "



🔰 दिल्लीतील करोनाचा संसर्गदर २५ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे राजधानीत निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा व अपवाद केलेल्या खासगी सेवा वगळता सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश मंगळवारी राज्य सरकारने दिले असून कर्मचाऱ्यांनी घरातून कार्यालयीन कामे करण्याची सूचना करण्यात आली आहे.


🔰खासगी बँका, रिझव्‍‌र्ह बँकेशी संबंधित कार्यालये, बिगर बँक वित्तीय संस्था, सूक्ष्मवित्तीय पुरवठादार संस्था, वकिलांची कार्यालये, कुरिअर सेवा तसेच, अत्यावश्यक सेवांमध्ये औषधपुरवठासंदर्भातील कार्यालये-दुकाने, दूरध्वनी सेवा, मालवाहतूक व विमान सेवा यांची कार्यालये मात्र खुली राहतील. या सेवांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये जाण्याची मुभा देण्यात आली आहे.


🔰राज्य आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. शहरातील रेस्ताराँ व बार बंद राहतील. रेस्ताराँची घरपोच सेवा मात्र सुरू राहणार आहे. मॉल व बाजार सम-विषय तारखांनुसार खुली राहतील. रात्रीची संचारबंदी तसेच, शनिवार-रविवारची ४८ तासांची संचारबंदीही कायम राहणार आहे. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती असून उर्वरित

डेल्टाक्रॉन, सायप्रसमध्ये सापडलेला कोरोनाचा एक नवीन प्रकार

🔰 सायप्रस विद्यापीठातील एका प्राध्यापकाने कोरोनाव्हायरसचा एक नवीन प्रकार ओळखला आहे ज्याला 'डेल्टाक्रॉन' असे नाव देण्यात आले आहे.  


🔰 डल्टा जीनोममध्ये ओमी क्रॉन सारखी जनुकीय वैशिष्ट्ये ओळखल्यामुळे या प्रकाराला डेल्टाक्रॉन असे नाव देण्यात आले आहे. 


🔰 डल्टाक्रॉनला अद्याप कोणत्याही आंतरराष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने मान्यता दिलेली नाही.


🔰 या नवीन प्रकारात डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही आवृत्त्यांचे फीचर्स दिसत आहेत.

सर्व दुकानांना मराठीत नामफलक बंधनकारक ; अन्य भाषांनाही मुभा, पण अक्षरांचा आकार मराठीपेक्षा मोठा नको

🔰राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


🔰कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आस्थापनेचा नामफलक हा मराठीबरोबरच इतर भाषेतही लिहिता येईल.


🔰परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा दुकानास, बार, रेस्टॉरंटला महापुरुष किंवा आदरणीय महिलांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असाही निर्णय घेण्यात आला आहे.

इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा - मालविकाचा सायनावर सनसनाटी विजय

नागपूरची उदयोन्मुख बॅडिमटनपटू मालविका बनसोडने इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत गुरुवारी तिची प्रेरणास्थान असलेल्या सायना नेहवालवर सनसनाटी विजय मिळवला. मालविकासह ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय यांनी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.


🔰२० वर्षीय मालविकाविरुद्धच्या लढतीत सायनाने १७-२१, ९-२१ अशी हार पत्करली. जागतिक क्रमवारीत १११व्या क्रमांकावरील मालविकाने फक्त ३४ मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात आणले. आकर्षी कश्यपने केयुरा मोपाटिनला २१-१०, २१-१० असे हरवले.


🔰सिंधूने इरा शर्मावर २१-१०, २१-१० असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत तिची अश्मिता छलिहाशी गाठ पडणार आहे. अश्मिताने फ्रान्सच्या याईली होयॉक्सचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला.


🔰परुष एकेरीत मिथुन मंजुनाथने माघार घेतल्याने प्रणॉयला पुढे चाल मिळाली. लक्ष्य सेनने स्वीडनच्या फेलिक्स ब्यूरेस्टेडचा २१-१२, १२-१५ असा पराभव केला. कॅनडाच्या ब्रायन यँगविरुद्धची लढत समीर वर्माने दुखापतीमुळे अर्धवट सोडली.


🔰परुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने श्याम प्रसाद व एस. संजित जोडीला २१-९, २१-१८ असे पराभूत केले.

ओमायक्रॉननंतर दुसऱ्या व्हेरिएंटसाठी तयार राहा”; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींची सूचना

🔰देशातील सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.


🔰पतप्रधान मोदींची या वर्षातील मुख्यमंत्र्यांसोबतची ही पहिलीच बैठक आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला बळकटी देण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी, ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा, असे म्हटले आहे.


🔰पतप्रधानांसोबतच्या आभासी बैठकीत गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे या बैठकीसाठी उपस्थित होते.

भारत-चीनदरम्यान आता पुन्हा चर्चा

🔰भारत व चीन यांच्या लष्करांदरम्यानच्या चर्चेची चौदावी फेरी निर्णायक ठरली नाही, मात्र उर्वरित मुद्दय़ांबाबत ‘परस्परमान्य तोडगा काढण्यासाठी’ लष्करी व राजनैतिक माध्यमातून संवाद सुरू ठेवण्याबाबत दोन्ही बाजूंचे एकमत झाले.सीमाविषयक चर्चेची पुढील फेरी लवकरात लवकर व्हावी याबद्दल आपले मतैक्य झाले असल्याचे दोन्ही देशांनी एका संयुक्त निवेदनात सांगितले.


🔰पर्व लडाखमधील पॅट्रोलिंग पॉइंट १५ (हॉट स्प्रिंग्ज) येथून सैन्य माघारी घेण्याशी संबंधित मुद्दय़ांचे चर्चेच्या १५व्या फेरीत निराकरण करण्याबाबत भारत आशावादी आहे, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी म्हटले होते.


🔰पर्व लडाखमधील पँगाँग सरोवरावर पूल बांधल्याबद्दल भारताने चीनवर टीका केल्यानंतर चर्चेची ही ताजी फेरी पार पडली आहे. याच वेळी, हा भाग सुमारे ६० वर्षे चीनच्या अवैध कब्ज्यात असल्याचेही भारताने म्हटले होते.


🔰भारत-चीन कॉर्प्स कमांडर स्तरीय चर्चेची चौदावी फेरी बुधवारी पूर्व लडाखमधील चुशुल- मोल्दो सीमेवर प्रत्यक्ष ताबा रेषेच्या चीनकडील बाजूला पार पडली. दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार खात्यांचे प्रतिनधी या चर्चेदरम्यान उपस्थित होते, असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.


🔰पश्चिम भागातील (लडाख सीमा) प्रत्यक्ष ताबा रेषेवरील संबंधित मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी मतांचे ‘मनमोकळेपणाने व सखोल’ आदानप्रदान केले, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.आपापल्या देशांच्या नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे अनुसरण करण्याचे, तसेच उर्वरित मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी काम करण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.


दारु पार्टी प्रकरण बोरिस जॉन्सन यांना भोवणार? भारतीय वंशाचा ‘हा’ नेता ब्रिटीश पंतप्रधान होण्याची दाट शक्यता



🔰ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. सन २०२० मध्ये देशात करोना निर्बंध लागू केलेले असताना त्यांनी डाउनिंग स्ट्रीट येथील गार्डनमध्ये आपल्या कार्यालयामधील कर्मचाऱ्यांसोबत पार्टी केल्याची माहिती समोर आलीय. यानंतर जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय.


🔰विरोधी पक्षाने पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय. दरम्यान ब्रिटनमधील एक प्रमुख सट्टा कंपनी असणाऱ्या ‘बेटफेअर’ने केलेल्या दाव्यानुसार या नवीन वादात अडकलेले बोरिस जॉन्सन लवकरच पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर भारतीय वंशाचे मंत्री ऋषि सुनक (Indian Origin Rishi Sunak as Next British PM Boris Johnson to Resign) यांची वर्णी पंतप्रधानपदी लागू शकते.


🔰‘बेटफेअर’ने दिलेल्या माहितीनुसार मे २०२० मध्ये करोना लॉकडाउनच्या कालावधीत पंतप्रधान कार्यालयातील डाउनिंग स्ट्रीटमध्ये झालेल्या ड्रिंक पार्टीसंदर्भात समोर आल्लेल्या माहितीनंतर बोरिस जॉन्सन अडचणीत आलेत.


🔰५७ वर्षीय बोरिस जॉन्सन यांना विरोधी पक्षाबरोबरच स्वपक्षीय नेत्यांकडूनही विरोध केला जातोय, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना पंतप्रधान केलं जाऊ शकतं अशा चर्चा ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात.


मनरेगा प्रकल्प महाराष्ट्र.


🅾देशात ग्रामीण मजुरांना अकुशल रोजगाराची हमी 1977 पासून कायद्यान्वये देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य.

🅾भारत सरकारने ग्रामीण रोजगाराचे विविध कार्यक्रम (जवाहर रोजगार योजना, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना इ.) निधीच्या उपलब्धतेनुसार राबविले होते मात्र या कार्यक्रमात रोजगाराची हमी नव्हती, तर फक्त रोजगारांची उपलब्धता होती.

🅾महाराष्ट्राचा रोहयो कायदा, त्याची यशस्वी अंमलबजावणी, माहितीच्या अधिकाराचा कायदा व सद्यस्थितीच्या अनुषंगाने अभ्यास करुन केंद्रशासनाने संपुर्ण देशासाठी दिनांक 5 सप्टेंबर 2005 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 अमलात आणला.

🅾संपूर्ण देशातील ग्रामीण कुटुंबांना वित्तीय वर्षात 100 दिवस प्रती कुटुंब अकुशल रोजगाराचा हक्क प्राप्त.

🅾राष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी दिनांक 2 फेब्रुवारी 2006 पासून टप्प्याटप्प्याने सुरु व दिनांक 1 एप्रिल 2008 पासून देशातील सर्व जिल्हयांचा समावेश.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

अर्थशास्त्रातील पुस्तके आणि लेखक

🔷पुस्तक - वेल्थ ऑफ नेशन्स
🔶लेखक - एडम स्मिथ

🔷पुस्तक - फाउंडेशन ऑफ इकॉनोमिक
                  एनालिसिस
🔶लेखक - सैम्युलसन

🔷पुस्तक - प्रिंसिपल्स ऑफ
                  इकोनॉमिक्स
🔶लेखक - मार्शल

🔷पुस्तक - नेचर एंड सिग्नीफिकेन्स ऑफ
                  इकॉनोमिक साइंस
🔶लेखक - रॉबिन्स

🔷पुस्तक - दास कैपिटल
🔶लेखक - कार्ल मार्क्स

🔷पुस्तक - द जेनरल थ्योरी ऑफ
                  इम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एंड मनी
🔶लेखक - जे.एम. कीन्स

🔷पुस्तक - हाऊ टू पे फॉर वार
🔶लेखक - कीन्स