20 January 2022

नेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारशी विषयी माहिती.

✅ भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य लगेच मिळावे, तद्नंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील.

✅ भारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्ताता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे. राज्यकारभाराच्या विषयांची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यात व्हावी.

❇️ भारत हे निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल.

❇️ अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत.

❇️ सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतांसारखा दर्जा द्यावा.

❇️ जगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मत:च स्वतंत्र्य व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्यांचा समावेश झाला पाहिजे. (अहवालात 19 मूलभूत हक्कांची यादी देण्यात आलेले होती.)

❇️ इंग्लंडचा राजा व कायदेमंडळाची दोन गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल. प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठगृहात बसतील तर कनिष्ठगृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील.

✅ आता सध्या भारतीय संस्थानांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील. काही संघर्ष पैदा झाल्यास गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल.

❇️ गव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी.

❇️ गव्हर्नर जनरलने मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा. मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल.
प्रांतांच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल.

❇️ गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी. त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नराने कारभार करावा.

5⃣ प्रांतीय कायदेमंडळाची मुदत पाच वर्ष असावी व ती वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार गव्हर्नराला असावा.

❇️ गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी. त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा.

❇️ प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जन

“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”

🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.

🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.

🔸 पुढील १० समित्यांचे ते सदस्य होते -

१) ध्वज समिती
२) मुलभूत हक्क उपसमिती
३) अल्पसंख्यांक उपसमिती
४) संघ राज्य घटना समिती
५) घटना सुधारणा उपसमिती
६) नागरिकत्व तदर्थ समिती
७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
८) सल्लागार समिती
९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती
१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)

🔸 जुलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.

🔸 देशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.

🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

नोबेल पुरस्कार

🔸क्षेत्र : ६
१)भौतिकशास्त्र
२) रसायनशास्त्र
३) शरीरविज्ञान किंवा औषध
४) साहित्य
५)शांती
६)अर्थशास्त्र (1969 पासून)

🔹देश :
-स्वीडन (शांतता पुरस्कार वगळता सर्व पुरस्कार)
-नॉर्वे (केवळ शांतता पुरस्कार)

🔸सादरकर्ते :
-स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस (भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र)
-कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये नोबेल असेंब्ली (शरीरविज्ञान किंवा औषध)
-स्वीडिश अकादमी (साहित्य)
-नॉर्वेजियन नोबेल समिती (शांतता)
-सेंट्रल बैंक ऑफ स्विडन(अर्थशास्त्र)

🔸बक्षीस : सुवर्णपदक, डिप्लोमा आणि अंदाजे 10 दशलक्ष,   US $ 1,145,000 (2020)

🔹पहिले पारितोषिक : 1901  (120 वर्षांपूर्वी)

🔸विजेत्यांची संख्या : 962

🔹पुरस्कार विजेते : 603 पुरस्कार (2020 पर्यंत)

🔸आल्फ्रेड नोबेल या स्वीडीश शास्त्रज्ञाने 1867 मध्ये 'डायनामाईट या स्फोटकाचा शोध लावला

🔹आल्फ्रेड नोबेल
-जन्म. -21 ऑक्टो1833
-मृत्यू  -10 डिसे1896

🔸1901 पासून आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ  दरवर्षी 10 डिसेंबर रोजी  हा पुरस्कार दिला जातो

🔹पहिले भारतीय व्यक्ती : रविंद्रनाथ टागोर

🔸पहिल्या भारतीय महिला : मदर तेरेसा

महत्वाची पुस्तकें व लेखक

01. अकबरनामा - अबुल फजल
02. अष्टाध्यायी - पाणिनी
03. इंडिका  - मेगास्थनीज
04. कामसूत्र - वात्स्यायन
05. राजतरंगिणी - कल्हण
06. स्पीड पोस्ट - सोभा-डे
07. आइने-ए-अकबरी - अबुल फजल
08. डिवाइन लाईफ - शिवानन्द
09. इटरनल इंडिया - इंदिरा गांधी
10. माई टुथ  - इंदिरा गांधी
11. मिलिन्दपन्हो - नागसेन
12. शाहनामा - फिरदौसी
13. बाबरनामा  बाबर
14. अर्थशास्त्र - चाणक्य
15. हुमायूँनामा - गुलबदन बेगम
16. विनय पत्रिका - तुलसीदास
17. गीत गोविन्द  - जयदेव
18. बुद्धचरितम् - अश्वघोष
19. यंग इंडिया - महात्मा गांधी
20. मालगुडी डेज -  आर०के० नारायण
21. काव्य मीमांसा -  राजशेखर
22. हर्षचरित -  वाणभट्ट
23. सत्यार्थ-प्रकाश -  दयानंद सरस्वती
24. मेघदूत - कालिदास
25. मुद्राराक्षस - विशाखदत्त
26.हितोपदेश - नारायण पंडित
27. अंधा विश्वास -  सगारिका घोष
28. गाइड - आर०के० नारायण
29. ए सूटेबल बाय -  विक्रम सेठ
30. लाइफ़ डिवाइन  - अरविन्द घोष

जागतिक भूगोल विशेष


1. जगातील सर्वात
मोठा महासागर - पॅसिफिक महासागर

2. महासागरातील सर्वात जास्त खोल गर्ता - मारीयाना गर्ता (पॅसिफिक महासागर)

3. सर्वात मोठे आखात - मेक्सिकोचे आखात (अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी.

4. सर्वात मोठा उपसागर - हडसन बे (कॅनडा) - 12,32,320 चौ.कि.मी.

5. सर्वात मोठा व्दिपकल्प - अरेबिया

6. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (प.बंगाल)

7. सर्वात मोठे भूखंड - युरेशिया (युरोप+आशिया)

8. सर्वात लहान भूखंड - ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी.

9. सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी.

10. सर्वात मोठे व्दिपसमूह - इंडोनेशिया (13,000) बेटे

11. सर्वात उंच शिखर - माऊंट एव्हरेस्ट (8848 मी)

12. सर्वात मोठी पर्वतरांग - हिमालय पर्वताची

13. सर्वात मोठे व उंचीवरील पठार - तिबेटचे पठार.

14. सर्वात मोठी नदी व खोरे - अॅमेझोन (द. अमेरिका)

15. सर्वात लांब नदी - नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी.

16. सर्वात लांब हिमनदी - लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402 कि.मी.

17. सर्वात उंच धबधबा - एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6 मी.

18. सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर - कॅस्पियन समुद्र (रशिया व इराण यांच्या दरम्यान) 3,93,900 चौ.कि.मी.

19. सर्वात गोड्या खार्‍या पाण्याचे सरोवर - सुपिरीयर सरोवर (अमेरिका 82,110 चौ. किमी)

20. सर्वाधिक उंचीवरील सरोवर - टिटीकाका (द.अमेरिका - पेरु व बोलव्हीया यांच्या दरम्यान)

21. सर्वात मोठे वाळवंट - सहारा (आफ्रिका) 90,65,000 चौ.कि.मी.

22. सर्वात कमी तापमानाचे ठिकाण - वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें.

23. सर्वात उष्ण ठिकाण - डेथ व्हॅली (अमेरिका)

24. सर्वात मोठा देश (आकारमान) - रशिया 1,70,75,400 चौ.कि.मी.

25. सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) - टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी.

26. सर्वात छोटा देश (आकारमान) - व्हेटिकन सिटी (44 हेक्टर)

27. सर्वाधिक शेजारी असणारा देश - चीन 13 शेजारी

28. सर्वाधिक लोकसंख्येचा देश - चीन 126 कोटी (2011)

29. सर्वात कमी लोकसंख्येचा देश - व्हेटकिन सिटी - 900 फक्त (2011)

30. सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश - मकाव (चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील पोर्तुगीज वसाहत) दर चौ.कि.मी. ला 24,411 व्यक्ती.

31. सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश - अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती)

32. सर्वाधिक वस्तीचे शहर - टोकियो (जपान) - 2 कोटी 70 लाख (2000)

33. सर्वाधिक उंचीवरील राजधानी - ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी.

34. सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) - न्यूयॉर्क

35. सर्वात गजबजलेले बंदर - रोटरडॅम (हॉलंड)

36. सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 2,95,000 कि.मी.

37. सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 62 लाख कि.मी.

38. सर्वात लांब मानवनिर्मित कालवा - सुवेझ कालवा (इजिप्त) 162 कि.मी.

39. सर्वात लांब बोगदा - न्यूयॉर्क डेलावेअर जलवाहिनी 170 कि.मी.

40. सर्वात लांब बोगदा (रेल्वे) - सेइकन रेल टनेल जपान. समुद्राखालून जाणारा 2 बेटे 53.85 कि.मी.

41. सर्वात लांब बोगदा (रस्ता) - सेंट गॉटहर्ड, स्वित्झर्लंड (16 किमी.)

42. सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन - बोलीव्हीयामधील कंडोर स्टेशन (4800 मी)

43. सर्वात मोठे रेल्वे स्टेशन - ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्यूयॉर्क)

44. सर्वाधिक उंचीवरील विमानतळ - ल्हासा विमानतळ, तिबेट उंची 4363 मी.

45. सर्वात मोठे विमानतळ - राजा खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, रियाध (अरबस्तान) विस्तार 222 चौ.कि.मी.

46. सर्वात मोठे स्टेडीयम - झेकोस्लावियातील प्राग येथील स्ट्राव्ह स्टेडीयम सुमारे

47. सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ - नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी

48. सर्वात मोठा पुतळा - हैदराबाद येथील हुसेनसागर तलावातील भगवान बुद्धाचा पुतळा, वजन सुमारे 350 टन, इंची 17.2 मीटर

49. सर्वात मोठा नियोक्ता - भारतीय रेल्वे - सुमारे 16.5 लाख कर्मचारी

50. सर्वात मोठी बँक - वर्ल्ड बँक, वॉशिंग्टन

51. सर्वाधिक शाखा असणारी बँक - भारतीय स्टेट बँक

52. सर्वात मोठे संग्रहालय - अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, न्यूयॉर्क

53. सर्वात मोठे ग्रंथालय - लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन

54. सर्वात जुनी भाषा - चीन 6000 - 7000 वर्ष जुनी.

55. सर्वाधिक लोकांकडून बोलली जाणारी भाषा - मॅडारिन (उत्तर चीनमध्ये बोलली जाणारी चीनी बोली.)

56. सर्वात मोठी संसद - नॅशनल पीपल्स काँग्रेस (चीन)

57. सर्वात मोठे लष्कर - रशियन लष्कर 50 लाख (1985)

58. सर्वात लांब भिंत - चीनची भिंत 3500 कि.मी.

59. सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म (फलाट) - खरगपूर (प.बंगाल) 820 मी.

60. सर्वात मोठा ग्रह -गुरु..

कळसुबाई बियाणे संवर्धन समितीचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

🛢कृषी मंत्रालय भारत सरकार संचलित ‘प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स व्हरायटिज अँड फार्मर्स राइट्स अथॉरिटी’ मार्फत पिकांच्या स्थानिक वाण संवर्धन आणि शाश्वात वापर यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय ‘जीनोम सेव्हियर कम्युनिटी’ पुरस्कार या वर्षी तालुक्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीला मिळाला आहे. दहा लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.

🛢नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान येथील मुख्यालयात ११ नोव्हेंबर रोजी भारताचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण डगळे, तसेच बीज माता पद्माश्री राहीबाई पोपेरे, अन्नमाता ममताबाई भांगरे, बायफ संस्थेचे विषय तज्ज्ञ डॉक्टर विठ्ठल कौठाळे, जैव विविधता तज्ज्ञ संजय पाटील, विभाग प्रमुख जितीन साठे, प्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी  हा पुरस्कार व स्वीकारला.

🛢स्थानिक वाण संवर्धन करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमांतून गेली आठ वर्ष तालुक्यात कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर शबरी आदिवासी महामंडळ नाशिक यांचे आर्थिक सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे.

🛢अकोले तालुक्यात ‘बायफ’ संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. वातावरण बदल आणि पोषण सुरक्षा यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुमारे ११४ वाणांचे संवर्धन संस्थेने केले आहे.

━━━━━━━༺༻━━━━━━━━

राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार 2020

🔰केंद्रीय क्रिडा मंत्रालयाच्यावतीने 1 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात 2020 या वर्षासाठी घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रिडा पुरस्काराच्या सर्व विजेत्यांना पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. केंद्रीय युवा कार्ये आणि क्रिडा मंत्री श्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.

🔰पुरस्कार विजेत्यांची नावे -

🔴राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार -

🔰रोहित शर्मा (क्रिकेट), मरियप्पन थांगावेलू (पॅरा-खेळाडू), मनिका बत्रा (टेबल टेनिस), विनेश फोगट (कुस्ती), राणी रामपाल (हॉकी)

🔴अर्जुन पुरस्कार –

🔰चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन), अतनु दास (तिरंदाजी), दुती चंद (मैदानी खेळ), सात्विक साईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन), विशेष भृगुवंशी (बास्केटबॉल), मनीष कौशिक (मुष्टियुद्ध)

🔴द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी) –

🔰 शिव सिंग (मुष्टियुद्ध), धर्मेंद्र तिवारी (तिरंदाजी), पुरुषोत्तम राय (मैदानी खेळ), रोमेश पठानिया (हॉकी)
द्रोणाचार्य पुरस्कार (सामान्य श्रेणी) – गौरव खन्ना (पॅरा-बॅडमिंटन), जसपाल राणा (नेमबाजी), ज्युडे फेलिक्स (हॉकी), योगेश मालवीय (मल्लखांब), कुलदीप कुमार हंडू (वुशू)

🔴ध्यानचंद पुरस्कार -

🔰एन उषा (मुष्टियुद्ध), लखा सिंग (मुष्टियुद्ध), प्रदीप श्रीकृष्ण गंधे (बॅडमिंटन), कुलदीप सिंग भुल्लर (मैदानी खेळ), जिन्सी फिलिप्स (मैदानी खेळ), तृप्ती मुरगुंडे (बॅडमिंटन)
मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) करंडक - पंजाब विद्यापीठ, चंदीगड

🔴तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार -

🔰अनिता देवी (भूमी), कर्नल सरफराज सिंग (भूमी), ताका तामुत (भूमी), केवल हिरेन कक्का (भूमी), सतेंद्र सिंग (जल), गजानंद यादव (हवाई), (मृत) मगन बिस्सा (जीवनगौरव)
Join👉

फिल्मफेअर-2021' पुरस्कार झाले घोषित; पाहा कोण ठरलेत मानकारी

🌺अभिनेता लीड रोल (मेल)

अजय देवगन (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

अमिताभ बच्चन (गुलाबो सिताबो)

इरफान खान (अंग्रेजी मीडियम)

राजुकमार राव (लूडो)

सुशांत सिंह राजपूत (दिल बेचारा)

 

🌺सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लीड रोल (फीमेल)

दीपिका पादुकोण (छपाक)

जान्हवी कपूर (गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

कंगना रनौत (पंगा)

तापसी पन्नू (थप्पड़)

विद्या बालन (शंकुतला देवी)

 

🌸सर्वोत्कृष्ट फिल्म

तान्हाजीः द अनसंग वॉरियर

थप्पड़

गुलाबो सिताबो

गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल

लूडो

 

🌺सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

ओम राऊत (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

शरण शर्मा (गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

अनुराग बसु (लूडो)

अनुभव सिन्हा (थप्पड़)

सुजीत सरकार (गुलाबो सिताबो)

 

🌺सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता

सैफ अली खान (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

दीपक डोबिरयाल (अंग्रेजी मीडियम)

गजराज राव (शुभ मंगल सावधान)

कुमुद मिश्रा (थप्पड़)

पंकज त्रिपाठी (लूडो)

 

🌺सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री

रिचा चड्ढा (पंगा)

मानवी गागरू (शुभ मंगल  सावधान)

नीना गुप्ता (शुभ मंगल ज्यादा सावधान)

तन्वी आजमी (थप्पड़)

फ़र्रुख़ जाफ़र (गुलाबो सिताबो)

 

🌺सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम

छपाक (शंकर एहसान लॉय)

दिल बेचारा (एआर रहमान)

लव आजकल (प्रीतम)

लूडो (प्रीतम)

मलंग (कई आर्टिस्ट)

 

🌺बेस्ट लिरिक्स

गुलजार: छपाक (छपाक)

शकील आजमी: इक टुकड़ा धूप (थप्पड़)

इरशाद कामिल: शायद (लव आज कल)इरशाद कामिल: मेहरमा (लव आज कल)

सैयद कादरी: हमदम हरदम (लूडो)

व्यायू: मेरे लिए तुम काफी हो (शुभ मंगल ज्यादा सावधान)

 

🌺बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल)

अरिजीत सिंह: शायद (लव आज कल)

अरिजीत सिंह: आबाद बरबाद (लूडो)

आयुष्मान खुराना: मेरे लिए तुम काफी हो (शुभ मंगल ज्यादा सावधान)

दर्शन रावल: मेहरमा (लव आज कल)

राघव चैतन्य: इक टुकड़ा धूप (थप्पड़

वेद शर्मा: मलंग (मलंग)

 

🌸बेस्ट प्लेबॅक सिंगर (फीमेल)

अंतरा मित्रा: मेहरमा (लव आज कल)

असीस कौर: मलंग (मलंग)

पलक मुंछाल: मन की डोरी (गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

श्रद्धा मिश्रा: मर जाए हम (शिकारा)

सुनिधि चौहान: पास नहीं तो फेल (शंकुतला देवी)

 

🌺क्रिटिक्स अवॉर्ड्स

गुलाबो सिताबो (सूजीत सरकार)

कामयाब (हार्दिक मेहता)

लूटकेस (राजेश कृष्णन)

सर (रोहेना गेरा)

थप्पड़ (अनुभव सिन्हा)

 

🌺सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स)

अमिताभ बच्चन (गुलाबो सिताबो)

इरफान खान (अंग्रेजी मीडियम)

राजुकमार राव (लूडो)

संजय मिश्रा (कामयाब)

शार्दुल भारद्वाज (ईब आले ऊ!)

 

🌺सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स)

भूमि पेडनेकर (डॉली किट्टी और वो चमकते सितारे)

कोकणा सेन शर्मा (डॉली किट्टी और वो चमकते सितारे)

सान्या मल्होत्रा (लूडो)

तापसी पन्नू (थप्पड़)

तिल्लोतामा शोम (सर)

विद्या बालन (शंकुतला देवी)

 

🌺बेस्ट प्रॉडक्शन डिझाईन

आदित्य कंवर (गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

अनुराग बसु (लूडो)

मानसी ध्रुव मेहता (गुलाबो सिताबो)

संदीप मेहर (पंगा)

श्रीराम कन्नड़ आयंगर, सुजीत सावंत, (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

 

🌺बेस्ट एडिटिंग

अजय शर्मा (लूडो)

चंद्रशेखर प्रजापति (गुलाबो सिताबो)

आनंद सुबैया (लूटकेस)

यश पुष्पा रामचंदानी (थप्पड़)

 

🌺बेस्ट कोरियॉग्रॉफी

फराह खान: दिल बेचारा (दिल बेचारा)

कृति महेश, राहुल शेट्टी (आरएनपी): इलीगल वेपन (स्ट्रीट डांसर 3D)

गणेश आचार्य: शंकरा रे शंकरा (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

गणेश आचार्य: भंकास (बागी 3)

 

🌺बेस्ट साऊंड डिझाईन

लोचन कांडविंड़े (लूटकेस)

अभिषेक नायर, शिजिन मेलविन हटन (लूडो)

दीपांकर जोजो चाकी, निहिर रंजन समल (गुलाबो सिताबो)

शुभम (ईब आले ऊ!)

कामोद खाराड़े (थप्पड़)

 

बेस्ट सिनमेटोग्रॉफी

केइको नकाहारा (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

अर्चित पटेल, जय आई पटेल (पंगा)

सौम्यनंद सही (ईब आले ऊ!)

सौमिक सर्मिला मुखर्जी (थप्पड़)

अविक मुखोपाध्याय (गुलाबो सिताबो)

 

🌺बेस्ट बॅकग्राउंड स्कोर

एआर रहमान (दिल बेचारा)

प्रीतम (लूडो)

समीर उद्दीन (लूटकेस)

संदीप शिरोडकर (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

मंगेश उर्मिला धाकड़े (थप्पड़)

 

🌺बेस्ट डायलॉग

प्रकाश कपाड़िया (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

भावेश मांडलिया, गौरव शुक्ला, विनय चावल, सारा बोदीनार (अंग्रेजी मीडियम)

कपिल सावंत (लूटकेस)

सम्राट चक्रवर्ती (लूडो)

जूही चतुर्वेदी (गुलाबो सिताबो)

 

🌺बेस्ट वीएफएक्स

जयेश वैष्णव (गंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

महेश बारिया (बागी 3)

प्रसाद सुतार (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

 

🌺बेस्ट स्टोरी

अनुभव सिन्हा, मृण्मयी लागू वायकुल (थप्पड़)

जूही चतुर्वेदी (गुलाबो सिताबो)

शुभम (ईब आले ऊ)

हार्दिक मेहता (कामयाब)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

GK Questions and Answers 2021


प्र. १.   नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण?

१. मदर टेरेसा
२. हरगोबिंद टागोर
३. सी. रमण
४ . रवींद्रनाथ टागोर

प्र. २. ब्रिटिश भारतातील पहिली लोकसंख्या जनगणना कधी  झाली?
१. इ.स १८८२
२. इ.स १८७२
३. इ.स १८८८
४. इ.स १९७२

प्र. ३.   जगातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या भारतात आहे?
१. १८.५%
२. १७.५%
३. २१.५%
४. १६.५%

प्र.४.  कलम १ (३)  नुसार, भारताचे राज्यक्षेत्र पुढील बाबीचे मिळून बनलेले असेल;

१) घटकराज्यांची राज्यक्षेत्रे
२) केंद्रशासित प्रदेश
३) संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे.
४) वरील पैकी सर्व

प्र.५.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे वर्णन संघराज्य असे न करता ' राज्याचा संघ' या शब्दात केले आले आहे कारण -

I) भारताचे संघराज्य अमेरिकन संघराज्याप्रमाणे घटकराज्यांतील कराराद्वारे निर्माण झालेले नाही.
II) घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही.

१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) अ आणि ब दोन्ही बरोबर
४) अ आणि ब दोन्ही चूक

प्र. ६.  सध्या भारतीय राज्यघटनेत  (डिसेंबर २०१८) पर्यंत किती कलमे आहेत ?

१) कलम ४४४
२) कलम ३२४
३) कलम ३४४
४) कलम ४७४

प्र.७.  १९५० साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे?

१) भारत सरकार कायदा, १९३५
२) भारत सरकारचा कायदा, १८३३
३) भारत सरकारचा कायदा, १८५८
४) वरीलपैकी सर्व

प्र.८.  भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली, त्याबद्दल खालील पैकी योग्य वाक्य  ओळखा.

अ ) सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली.
ब ) हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.
क) पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते.
ड) १९४६च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली.

पर्याय
१) अ,ब,
२) अ,ब आणि क
३) अ,ब,क आणि ड
४) अ, ड

प्र. ९.  कोरोना इन्फेक्शनच्या उपचारांसाठी कोणत्या देशाने अलीकडे प्लाझ्माची ऑनलाइन उपलब्धता सुरू केली आहे?

१ ) भारत
२) अमेरिका
३) बांगलादेश
४) ब्राझील

प्र. १०  कोणत्या राज्य सरकारने नुकतीच पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन वर्ग बंदी घातली आहे?

१) मध्य प्रदेश
२) कर्नाटक
३) ओडिशा
४) प. बंगाल

उत्तरे :
प्र. - १ - ४ . रवींद्रनाथ टागोर
प्र. - २ - २. इ.स १८७२
प्र. - ३ - २. १७.५%
प्र. - ४ - ४) वरील पैकी सर्व
प्र. - ५ - ३) अ आणि ब दोन्ही बरोबर
प्र. - ६ - १) कलम ४४४
प्र. - ७ - १) भारत सरकार कायदा, १९३५
प्र. - ८ - ३) अ,ब,क आणि ड
प्र. - ९ - ३) बांगलादेश
प्र. - १० - २) कर्नाटककर्नाट

भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत.

👍वर्ष २०२१ मधील तिसरी तिमाही व चौथ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न हे करोनापूर्व पातळीच्या वर गेले असून भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत झाले आहेत, असे मत निती आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी रविवारी व्यक्त केले.

👍 त्यांनी सांगितले, की अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत होण्याकडे वाटचाल करीत असली तरी कोविड १९ साथ संपुष्टात आणण्यासाठी देशात वेगाने व निर्णायक प्रयत्न झाले पाहिजेत. लसीकरणाच्या पातळीवर चांगल्या बातम्या  येत आहेत. 

👍तिसरी व चौथी तिमाही पाहिली तर वास्तव सकल राष्ट्रीय उत्पन्न हे कोविड १९ पूर्वीच्या पातळीपेक्षा वर गेले आहे. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेचे पायाभूत घटक मजबूत आहेत.  दरम्यान एप्रिल-जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ झाली असून गेल्या वर्षांत ती फारच कमकुवत होती. उत्पादन व सेवा क्षेत्रात भारताने चांगली कामगिरी केली असून कोविड १९ ची दुसरी लाट जास्त घातक होती.

👍आता भारताची गाडी रूळावर येत असून यावर्षी जास्त विकास दर गाठण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत विकास दराचा अंदाज पूर्वीच्या १०.५ टक्क्य़ांवरून ९.५ टक्के केला असून जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ८.३ टक्क्य़ांनी वाढेल असा अंदाज दिला आहे.

भारतीय सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेल्या महिला

🎯 फातिमा बीबी
✍️ कार्यकाळ : १९८९ ते १९९२

🎯 सुजाता मनोहर
✍️ कार्यकाळ : १९९४ ते १९९९

🎯 रुमा पाल
✍️ कार्यकाळ : २००० ते २००६

🎯 ज्ञानसुधा मिश्रा
✍️ कार्यकाळ : २०१० ते २०१४

🎯 रंजना देसाई
✍️ कार्यकाळ : २०११ ते २०१४

🎯 आर भानुमथी
✍️ कार्यकाळ : २०१४ ते २०२०

🎯 इंदु मल्होत्रा
✍️ कार्यकाळ : २०१८ ते २०२१

🎯 इंदिरा बॅनर्जी
✍️ कार्यकाळ : २०१८ ते २०२२ पर्यंत
═════════════