Wednesday 29 May 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , २९ मे २०१९ .


चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२९ मे २०१९ .
● २९ मे : जागतिक पचन स्वास्थ्य दिन
● संकल्पना २०१९ : " Early Diagnosis & Treatment Of GI Cancer "
● २९ मे : संयुक्त राष्ट्र जागतिक शांतता सैनिक दिवस
● संकल्पना २०१९ : “ Protecting Civilians , Protecting Peace ”
● प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वाला २० जुलैपासून सुरुवात होते आहे
● राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत नीलम घोडके यांनी महिलांच्या गटात विजेतेपद पटकावले
● राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत झैद अहमद ने पुरुषांच्या गटात विजेतेपद पटकावले
● विश्वचषक सराव सामन्यात भारताने बांगलादेशला ९६ धावांनी पराभूत केले
● रशियाच्या मिग कॉर्पोरेशनने भारताला अत्याधुनिक मिग-३५ विमाने देण्याची तयारी दर्शवली आहे
● सिक्कीम चे नवीन मुख्यमंत्री पीएस गोले यांनी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना कामासाठी पाच दिवसांचा आठवडा घोषित केला
● सलग पाचव्यांदा ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी नवीन पटनायक विराजमान झाले आहेत
● कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेसाठी ब्राझीलच्या कर्णधारपदी एल्वेस ची नियुक्ती करण्यात आली
● ८ वी सिनियर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली
● ८ व्या राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले
● ८ व्या राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत दिल्ली संघाने विजतेपद पटकावले
● ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या हस्ते ‘ डिजिटल डायलेमा ’ या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन
● ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली ५६ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
● टीआरए रिसर्च या कंपनीने टीआरएज मोस्ट ट्रस्टेड पर्सनॅलिटीज- २०१९ हा अहवाल प्रकाशित केला
● टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांना इंडियाज मोस्ट ट्रस्टेड बिझनेस पर्सनॅलिटी म्हणून स्थान देण्यात आले
● अमिताभ बच्चन यांना इंडियाज मोस्ट ट्रस्टेड पर्सनॅलिटीच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थान देण्यात आले
● विराट कोहली ला मोस्ट ट्रस्टेड स्पोर्ट्स पर्सनॅलिटीच्या यादीमध्ये अव्वल स्थान देण्यात आले
● इंडियन एअर फोर्सच्या परुल भारद्वाज , अमन निधी व हिना जैस्वाल या ' MI-17 V 5 ' हेलिकॉप्टर उडवणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला 'क्रू' बनल्या आहेत
● होमलेस वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा २७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान इंग्लंड येथे आयोजित करण्यात येणार
● ओकला या कंपनीने एप्रिल २०१९ साठी स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स अहवाल जाहीर केला
● सिंगापूर फिक्स्ड ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये अग्रस्थानावर आहे : ओकला अहवाल
● भारत जागतिक फिक्स्ड ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये ६८ व्या स्थानावर आहे
● नॉर्वे जागतिक मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये अग्रस्थानावर आहे : ओकला अहवाल
● भारत जागतिक मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये १२१ व्या स्थानावर आहे
● रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमानुसार ग्राहकांना १ जूनपासून बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा व्यवहार करता येणार
● बांग्लादेशचे राष्ट्रपती अब्दुल हामिद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी ला हजर राहणार
● स्कॉट मॉरिसन यांनी आँस्टेलियाच्या  प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली
● सुरेश कुमार यांची वाँलमार्टच्या चिफ टेक्नॉलॉजी आँफीसर पदी नियुक्ती करण्यात आली
● पाकीस्तान स्टाँक एक्सचेंज चे मुख्य कार्यकारी अधिकारी रीचर्ड मोरीन यांनी राजीनामा दिला
● निचिरवन बरझानी यांची इराकी कुर्दिस्तानचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली
● संयुक्त राष्ट्रसंघाने २२ आँगस्ट हा दिवस " International Day For Victims Of Religious Violence " म्हणून घोषित केला
● जगातील सर्वात स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत सिंगापूरने अमेरिकेला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले
● जगातील सर्वात स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत हाँगकाँग दुसऱ्या स्थानावर आहे
● जगातील सर्वात स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे
● जगातील सर्वाधिक स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत भारत ४३ व्या स्थानावर आहे
● भारतीय लेखिका एनी झायदी यांना नॅशनल डॉट्स पुरस्कार जाहीर
● ओला इलेक्ट्रिकने स्वतंत्र संचालक म्हणून अरुण सरीन यांची नियुक्ती केली
● ५६ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले
● राजीव गौबा यांना पुढील कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्त केले जाऊ शकते
● कोमेरोसला भारताचे पुढील राजदूत म्हणून अभय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली
● इस्लामिक सहकार संघटना (ओआयसी) च्या १४ वे शिखर परिषद मक्का येथे आयोजित करण्यात येणार
● भारतीय चॅनल " टी-सीरीज " १०० मिलियन युट्युब सबस्क्राइबर्स पुर्ण करणारे जगातील पहिले चॅनल बनले
● पाकितानचे प्रधानमंत्री इम्रान खान १४ व्या इस्लामिक सहकार संघटनेच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार .

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...