Sunday 12 May 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , १२ मे २०१९ .


चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१२ मे २०१९ .
● १२ मे : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन
● आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन २०१९ संकल्पना : " Nurses - A Voice To Lead - Health For All "
● छत्तीसगढ पोलिसांनी " दंतेश्वरी लडाके " नावाच्या पहिल्या नक्षलवादी महिला कमांडो युनिटची तैनाती केली
● टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) बाजार भांडवलाद्वारे भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण कंपनी बनली
● बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने लडाख भागातील गयाच्या डोंगराळ खेड्यात १४००० फूट उंचीवर भारतातील पहिले बर्फाचे कॅफे तयार केले
● सॅमसंग कंपनीने ६४ मेगापिक्सेलचा जगातील पहिला सर्वोच्च रिझोल्यूशन प्रतिमा सेन्सर लॉन्च केला आहे
● उत्तेजक चाचणीत कुस्तीपटू दोषी आढल्यास त्याचे प्रशिक्षक आणि अन्य साहाय्यक मार्गदर्शकांवर बंदीची कारवाई करण्यात येणार
● जागतिक कुस्ती स्पर्धा सप्टेंबर २०१९ मध्ये कझाकस्तान येथे आयोजित करण्यात येणार
● सुपरनोव्हाज ने महिलांच्या ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट लीग चे सलग दुसरे विजेतेपद पटकावले
● लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे
● मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात आज अंतिम सामना होणार आहे
● आयटीसी कंपनीचे अध्यक्ष वाय सी देवेश्‍वर यांचे निधन , ते ७२ वर्षांचे होते
● अभिनेत्री दीप्ती नवल यांचे आत्मचरित्र ' अ कंट्री कॉल्ड चाईल्डहूड ' लवकरच प्रकाशित होणार
● सुप्रसिद्ध मॉडेल लिसा रे यांचे आत्मचरित्र ' क्लोज टू द बोन ' लवकरच प्रकाशित होणार
● मार्च महिन्यात औद्योगिक उत्पादन वाढण्याऐवजी ते 0.1 टक्‍क्‍याने कमी झाले : अहवाल
● अमेरिकेने चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या २०० अब्ज डॉलरच्या वस्तूंवरील आयात शुल्क १० टक्‍क्‍यांवरून २५ टक्‍के इतके केले आहे
● पेप्सीने दिशा पटानी ला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले
● आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा हनोवर , जर्मनी मध्ये आयोजित करण्यात आली आहे
● कलावती जी व्ही यांना भारतातील फिलिप्स इनोवेशन कॅम्पसचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आले
● अमेझाॅनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी मून लँडर प्रोजेक्ट ' ब्लू मून ' चे अनावरण केले
● बेकायदेशीर वाळू खननांमध्ये भारत व चीन अव्वल स्थानी : संयुक्त राष्ट्र अहवाल
● सुभाष चंद यांना इरिट्रिया मध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे
● कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून ए. एस. ओका यांनी शपथ घेतली

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...