१८ जून २०१९

चालु घडामोडी वन लाईनर्स , १८ जून २०१९

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१८ जून २०१९ .
● 18 June : Sustainable Gastronomy Day
● 18 June : International Picnic Day
● जे पी नड्डा यांची भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
● अमित शहा डिसेंबर २०१९ पर्यंत भाजपाच्या अध्यक्ष पदावर कायम राहतील
● शाकिब अल हसन एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६००० धावा आणि २५० विकेट्स पुर्ण करणारा सर्वात जलद खेळाडू
● शाकिब अल हसन एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६००० धावा पुर्ण करणारा बांगलादेशचा दुसरा खेळाडू
● २५ चेंडूत अर्धशतक ठोकत हेटमायरने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक लगावण्याचा विक्रम केला
● महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यातील ५३.५% पुरुष हे अविवाहित असल्याची आकडेवारी समोर आली आहे
● महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यातील ४२.५% स्त्रिया अविवाहित असल्याची आकडेवारी समोर आली आहे
● देशातील अविवाहित पुरुषांचे प्रमाण ५४.५ टक्के तर स्त्रियांचे प्रमाण ४४.८ टक्के इतके आहे
● भारत २०२७ पर्यंत चीनला मागे टाकत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश बनू शकतो : UN अहवाल
● संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार येत्या ३० वर्षांत जगातील लोकसंख्या दोन अरबांहून अधिक वाढण्याची शक्यता आहे
● इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मुर्सी यांचे निधन , ते ६७ वर्षांचे होते
● १७ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपाचे खासदार ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली
● इथेनॉल निर्मिती व पुरवठ्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर
● सिग्नल यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी रेल्वे व रेलटेल यांच्यात सामंजस्य करार झाला
● वाराणसी येथे धार्मिक स्थळांजवळ मद्य व मांसाहार विक्रीवर बंदी घालण्यात आली
● जगातील एकूण परमाणु शस्त्रांची संख्या कमी झाली : अहवाल
● गृहमंत्री अमित शहा ३० जून रोजी अमरनाथ ला भेट देणार आहेत
● चीन कनिष्ठ कॅडेट टेबल टेनिस स्पर्धा ताईकांग , चीन येथे आयोजित करण्यात आली
● मानुश शहा ने चीन कनिष्ठ कॅडेट टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदक पटकावले
● स्वास्तिका घोष आणि प्राप्ती सेन यांनी चीन कनिष्ठ कॅडेट टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदक पटकावले
● भाजपाने १७ व्या लोकसभेचे सभापती पदाचे उमेदवार म्हणून ओम बिर्ला यांची निवड केली
● अगरतला विमानतळ पुर्वोत्तर क्षेत्रातील तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ
● बंधन बँकने सूक्ष्म कर्जावरील व्याजदर ०.७ टक्क्यांने कमी केला
● फिच रेटिंग्सच्या अंदाजानुसार भारतातील जीडीपी वाढ २०१९-२० मध्ये ६.६% असेल
● फिच रेटिंग्सच्या अंदाजानुसार भारतातील जीडीपी वाढ २०२०-२१ मध्ये ७.१% असेल
● फिच रेटिंग्सच्या अंदाजानुसार भारतातील जीडीपी वाढ २०२१-२२ मध्ये ७% असेल
● आरआरबी रिसर्चने भारतातील सर्वात आकर्षक नियोक्ता ब्रँड सर्वेक्षण जाहीर केले
● अमेझाॅन भारतातील सर्वात आकर्षक नियोक्ता ब्रँड : सर्वेक्षण
● मायक्रोसॉफ्ट भारतातील दुसरा सर्वात आकर्षक नियोक्ता ब्रँड : सर्वेक्षण
● सोनी इंडिया हे भारतातील तिसरे सर्वात आकर्षक नियोक्ता ब्रँड : सर्वेक्षण
● २०१८ मध्ये भारतातील थेट विदेशी गुंतवणूकीत ६% वाढ होऊन ४२ बिलियन डाँलर्स झाली : यूएन अहवाल
● जागतिक परदेशी थेट गुंतवणूकीचा प्रवाह (एफडीआय) २०१८ मध्ये १३% कमी झाला
● आयसीसी २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने वेस्ट इंडिजला ७ विकेट्स राखून पराभूत केले
● ताज्या डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये जपानच्या नाओमी ओसाकाने अव्वल स्थान कायम राखले
● ताज्या एटीपी रँकिंगमध्ये सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हीच ने अव्वल स्थान कायम राखले
● चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग २१-२२ जून दरम्यान दक्षिण कोरीयाच्या दौऱ्यावर जणार आहेत
● कॅरल कॅलान यांची आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशन (एफआयबीए) अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली
● बर्टन शिपले यांची आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशन (एफआयबीए) ओशिनियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली
● टुर्गे डेमिरल यांची आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशन (एफआयबीए) युरोपचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली
✅ जागतिक लैंगिक समानता निर्देशांक २०१९ प्रसिद्ध
● जागतिक लैंगिक समानता निर्देशांक २०१९ मध्ये १२९ देशांचा समावेश करण्यात आला आहे
● जागतिक लैंगिक समानता निर्देशांक २०१९ मध्ये डेन्मार्कने अव्वल स्थान पटकावले
● जागतिक लैंगिक समानता निर्देशांक २०१९ मध्ये भारत ९५ व्या स्थानी विराजमान
● जागतिक लैंगिक समानता निर्देशांक २०१९ मध्ये चीन ७४ व्या स्थानी विराजमान
● जागतिक लैंगिक समानता निर्देशांक २०१९ मध्ये नेपाळ १०२ व्या क्रमांकावर
● जागतिक लैंगिक समानता निर्देशांक २०१९ मध्ये बांगलादेश ११० व्या स्थानी विराजमान
● जागतिक लैंगिक समानता निर्देशांक २०१९ मध्ये पाकिस्तान ११३ व्या क्रमांकावर .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...