०३ जून २०१९

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०२ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०२ जून २०१९ .
● ०२ जून : तेलंगाना स्थापना दिन
● ०२ जून : आंतरराष्ट्रीय वेश्या कामगार दिन 
● मे २०१९ मध्ये वस्तु व सेवा कर (जीएसटी) संकलन १,००२८९ कोटी कोटी रुपयांपर्यंत पोहोचले 
● २०१९ क्रिकेट विश्वचषक सामन्यात न्युझीलंडने १० गडी राखून श्रीलंकेवर मात केली
● हॉकी इंडियाने भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघाच्या जर्सीमध्ये बदल केला
● उत्तर प्रदेशमध्ये सरकारने आता कॅबिनेटच्या बैठकीत मंत्र्यांना मोबाइल आणण्यास प्रतिबंध केला
● अमेरिकेने भारताला मिळालेला व्यापार अग्रक्रम दर्जा काढला असुन , याची अंमलबजावणी ५ जून पासून होणार आहे
● केंद्रीय मंत्रिमंडळाने व्यापाऱ्यांसाठी निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी दिली
● केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोट्यवधी शेतकऱ्यांना निवृत्तिवेतनाच्या कक्षेत आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय
● देशातील महत्वाच्या ९१ धरणांमधील पाणीसाठ्यात १ टक्क्याने घट
● प्रकाश जावडेकर यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला
● २०१९ क्रिकेट विश्वचषक सामन्यात आँस्ट्रेलियाने ०७ गडी राखून अफगाणिस्तानवर मात केली
● मध उद्योगास चालना मिळावी यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ' मध योजना ' या महत्वकांक्षी योजनेस मंजुरी देण्यात आली
● अॅन्टोन आदित्य सुबोवो यांची पुन्हा बॅडमिंटन एशियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली
● संरक्षण सचिव संजय मित्रा यांचा कार्यकाळ 3 महिन्यासाठी वाढविण्यात आला
● वृध्द पेंशन योजनेसाठी बिहार कॅबिनेटकडून ३८४ कोटी रुपये मंजूर
● ' आपकी बेटी ' योजने अंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत राजस्थान सरकारने वाढविली
● अरुण कुमार यांची नागरी विमानचालन महामंडळाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● सेरेना विलियम्स फ्रेंच ओपन टेनिस टूर्नामेंट २०१९ मधून बाहेर
● आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत
● ६ भारतीय-मूळ असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित २०१९ स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली
● राजीव गौबा यांची पुढील कॅबिनेट सचिव पदी नियुक्ती करण्यात आली
● लिव्हरपूल ने सहाव्यांदा युरोपियन चॅम्पियन्स फुटबॉल स्पर्धा जिंकली
● अनुभवी उद्योजक बी. एम. खेतान यांचे नुकतेच निधन झाले
● आरबीआय देशभरात जूनचा पहिला आठवडा ' आर्थिक साक्षरता आठवडा ' म्हणून साजरा करत आहे
● भारतामध्ये प्रति १०,००० लोकांसाठी फक्त २० आरोग्य कर्मचारी आहेत : अहवाल
● ०२ दिवसीय योग महोत्सवाचे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले
● राज्यसभा टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनोज कुमार पांडे यांची नियुक्ती करण्यात आली
● गल्फ ऑइलने एमएस धोनी व हार्दिक पांड्यासह " चीअर विथ प्राईड " मोहिमेचा शुभारंभ केला
● ऑस्ट्रियाने प्रथम महिला चांसलर म्हणून ब्रिगिटे बियरलेन यांची नियुक्ती केली
● भाजपच्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षपदी जे पी नड्डा यांची नियुक्ति केली जाऊ शकते
● ८ व्या फिफा महिला विश्वचषक २०१९ स्पर्धेचे आयोजन फ्रान्स येथे करण्यात येणार
● ८ व्या फिफा महिला विश्वचषक २०१९ स्पर्धेत २४ संघ सहभागी होणार आहेत
● फिफा महिला विश्वचषक २०१९ साठी अधिकृत शुभंकर " एटी " लॉन्च करण्यात आले
● निहात ओझदेमीर यांची तुर्की फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ति करण्यात आली
● बिरेन्द्र प्रसाद बैश्य (एजीपी) यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली
● कामख्या प्रसाद तासा (भाजपा) यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली
● भारताचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह कार्यभार स्वीकारला
● संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुरक्षेची पाहणी करण्यासाठी उद्या सियाचिन ग्लेशियर ला भेट देणार आहेत
● कँटोर फिट्झगेराल्ड अंडर-२१ आंतरराष्ट्रीय ४ देशांची हाँकी स्पर्धा डबलिन येथे आयोजित करण्यात आली
● कँटोर फिट्झगेराल्ड अंडर-२१ आंतरराष्ट्रीय हाँकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने आयर्लंड वर २-१ ने क्षात केली
● अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ०३ जूनपासून ब्रिटनच्या दौऱ्यावर असणार आहेत
● रिझर्व्ह बॅंके ६ जून रोजी द्वितीय द्वि-मासिक चलनविषयक धोरण जाहीर करणार आहे
● चंदीगडचे अॅडव्होकेट जनरल म्हणून सतीश चंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली
● महाराष्ट्र व राजस्थान सरकारने ई-सिगारेट , व्हॅप व ई-हुक्का वर पुर्णपणे बंदी घातली
● आयुष मंत्रालयाने योगा केंद्रे शोधण्यासाठी " योगा लोकेटर " अॅप लाँच केले
● शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखू उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी मणिपूरने " यलो लाइन " मोहीम सुरू केली
● मेघालय सरकार " एक नागरिक एक झाड ' मोहिम ५ जून रोजी सुरू करणार आहे
● ओप्पो ने विश्वचषक २०१९ साठी " बिलियन बीट्स " मोहिम सुरु केली
● फोर्ड मोटरने मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून टिम स्टोन यांची नियुक्ती केली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...