Sunday 9 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०९ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०९ जून २०१९ .
● आयसीसी २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रंगणार
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मालदीवच्या सर्वोच्च नागरी " निशान इजुद्दीन " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
● आयसीसी २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने बांग्लादेशला १०६ धावांनी पराभूत केले
● आयसीसी २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्युझीलंडने अफगाणिस्तानला ७ विकेट्स राखून पराभूत केले
● अॅशले बार्टी ने २०१९ फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले
● डोमिनिक थिमने नोवाक जोकोविचला पराभूत करत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली
● राँजर फेडरर व डोमिनिक थिम २०१९ फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झुंजणार
● फिफा महिला विश्वचषक २०१९ स्पर्धेत जर्मनीने चीनवर १-० ने मात केली
● २ रा भारतीय चित्रपट महोत्सव सप्टेंबर २०१९ मध्ये बोस्टन येथे आयोजित केला जाणार
● जपान संघ पहिल्यांदाच अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्र ठरला
● २ री इंडिया ओपन इंटरनॅशनल तायक्वोंडो चॅम्पियनशिप स्पर्धा हैदराबाद येथे आयोजित करण्यात येणार
● नव्या सरकारच्या स्थापनेनंतर नरेंद्र मोदी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी मालदीव ला रवाना
● ए एन ३२ या बेपत्ता विमानाची ठोस माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा भारतीय वायु दलाने केली
● वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला
● १२ जून रोजी कर्नाटक सरकार कॅबिनेटचा विस्तार करणार
● भारतातील पहिल्या डायनासोर संग्रहालयाचे उद्घाटन गुजरात येथे करण्यात आले
● आंध्रप्रदेशच्या उपमुख्यमंत्री म्हणून पी पुष्पा श्रीवाणी यांची नियुक्ती करण्यात आली
● विदेश मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर लवकरच बांग्लादेशला भेट देणार आहेत
● अमेरिकेने भारताला सशस्त्र ड्रोनची विक्री करण्यास परवानगी दिली
● एफआयएच महिला सीरीज फाइनल टूर्नामेंट हिरोशिमा , जपान येथे आयोजित करण्यात आले
● हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी हाती समाजाला आदिवासी दर्जा देण्यांची मागणी केली
● जी-शॉक इंडियाने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून टाइगर श्रॉफ ची नियुक्ती केली
● एक्स १ रेसिंग लीग ने रवी कृष्णन यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली
● योग मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणार्या मीडिया सदस्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार
● पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवमध्ये कॉस्टल वॉच रडार सिस्टमचे उद्घाटन केले
● शाकिब-अल-हसन विश्वचषकाच्या इतिहासात शतक झळकावणारा बांगलादेशचा दुसरा खेळाडू ठरला आहे
● भारत - मालदीवने दोन देशांना जोडणारी फेरी सेवा सुरू करण्यास मान्यता दिली आहे
● भारत व मालदिवने जलविद्युत क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला
● मालदिवच्या संसदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले
● भारत-बांग्लादेश बॉर्डर वार्तालाप बैठक पुढील आठवड्यात ढाका येथे आयोजित करण्यात येणार
● किंग्स कप फुटबॉल स्पर्धा थायलंड मध्ये आयोजित करण्यात आली
● किंग्स कप फुटबॉल स्पर्धेत भारताने थायलंडला १-० ने पराभूत केले
● केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२० लीग सुरू केली
● पर्यावरण क्षेत्रामध्ये रेल्वे व्हील फॅक्टरीला सर्वोत्कृष्ट परफॉर्मिंग उत्पादन युनिट म्हणून गौरविण्यात आले
● जम्मु-कश्मीर बँकचे अध्यक्ष परवेझ अहमद यांना पदावरून हटविण्यात आले
● आर के चिब्बेर यांची जम्मु-कश्मीर बँकचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली
● बिजिंग इंटरनॅशनल ऑडिओलॉजी कॉन्फरन्स २०१९ बिजिंग , चीन येथे आयोजित करण्यात आली
● ईस्टर हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख सिसीरा मेंडिस यांनी राजीनामा दिला
● जपान येथे आयोजित जी-२० व्यापार व डिजिटल अर्थव्यवस्थेवरील मंत्रिमंडळाच्या बैठकीला पियुष गोयल उपस्थित
● चेन्नई वाहतूक पोलिसांनी ' GCTP Citizen Service ' अॅपचे अनावरण केले
● उत्तर मध्य रेल्वेने प्रवांशाच्या सोयीसाठी नवीन अॅप " नमन " सुरू केले
● दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल यांनी पदभार स्वीकारला .

No comments:

Post a Comment

Latest post

PRE- INDEPENDENCE ACTS

⭕️ चार्टर अ‍ॅक्ट 1773 - 🟢 बंगालचा गव्हर्नर-जनरल - 🟢 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना - 🟢 कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी खाजगी व्यापार प्रतिबंधि...