Tuesday 30 July 2019

🌹🌳🌴२९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस 🌴🌳🌹

🌹🌳🌴२९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस 🌴🌳🌹

👉जागतिक व्याघ्र दिन या नावानेही ओळखला जातो.
- स्थापना : २०१० (सेंट पिटर्सबर्ग शिखर परिषदेत)

👉IMP  : रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय व्याघ्र परिषद पार पडली.

👉 त्यामध्ये व्याघ्र संवर्धनावरील पिटर्सबर्ग घोषणापत्र स्वीकारण्यात आले. या घोषणापत्रानुसार २०२० पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

🌹🌳🌴भारतातील वाघांची संख्या🌴🌳🌹

👉जगातले ७० टक्के वाघ भारतात राहतात. २००६ मध्ये भारतात केवळ १४११ वाघ उरले होते. गेल्या दहा वर्षांत मात्र वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

👉दिनांक 29 जुलै 2019 रोजी जागतिक व्याघ्रदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'अखिल भारतीय व्याघ्र गणना अहवाल 2018' प्रसिद्ध केला.

👉अहवालानुसार, देशातल्या वाघांची संख्या वाढून ती 2,967 वर पोहोचली आहे.

👉तामिळनाडूतल्या ‘सत्यमंगलम व्याघ्र’ प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट व्याघ्र प्रकल्पाचा पुरस्कार देण्यात आला.

✅ठळक बाबी

👉आजच्या घडीला जागतिक पातळीवर तीन चतुर्थांश वाघांचा अधिवास भारतात आहे.

👉2006 सालाच्या व्याघ्रगणनेनुसार देशभरात 1,411 वाघ आढळून आले होते. 2010नुसार 1,706 वाघ होते. त्यात वाघांच्या संख्येत 30 टक्क्यांनी वाढ होत 2014 साली 2,226 वाघ आढळून आले होते. आता वाघांची संख्या वाढून ती सुमारे 2500 ते 2600 वर पोहचल्याची माहिती आहे.

👉वाघांच्या संख्येनुसार पहिल्या तीन राज्यात अनुक्रमे कर्नाटक, उत्तराखंड व मध्यप्रदेशचा समावेश आहे.

👉2022 सालापर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य सेंट पीटर्सबर्गमध्ये निश्चित करण्यात आले होते. आता हे लक्ष्य चार वर्षे आधीच गाठले गेले आहे.

👉2014 साली देशात व्याघ्र संरक्षण प्रकल्पांची संख्या 692 होती. ती पाच वर्षांत वाढून 860 हून अधिक झाली आहे. कम्युनिटी रिझर्व्हची संख्याही 43 होती, जी आता शंभरावर गेली आहे.

👉व्याघ्रगणनेनुसार, महाराष्ट्रात 2006 साली 103, 2010 साली 169 तर 2014 साली 190 वाघांचा समावेश होता. यंदा हा आकडा वाढून सुमारे 225वर जाणार असून ताडोब्याची आघाडी कायम आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि परिसरात सुमारे 86 ते 90 वाघ असल्याचे समोर येत आहे.

🌹🌳🌴व्याघ्र गणना प्रक्रिया 🌴🌳🌹

👉देशातील 18 राज्यांमध्ये सध्या व्याघ्रगणनेची प्रत्यक्ष प्रक्रिया घेण्यात आली.

👉डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने विकसित केलेल्या ट्रॅन्झिट मेथडने ही गणना करण्यात आली आहे.

👉रेषा विभाजन पद्धतीने 2006 साली प्रथमच देशभरात व्याघ्रगणना करण्यात आली होती.

👉डिसेंबर 2017 पासून देशभरातल्या वाघ असलेल्या 18 राज्यांतल्या जंगलात ही व्याघ्रगणना मोहीम राबविली गेली आहे.

👉वाघांच्या संख्येसोबत वनांची स्थिती, वनस्पती, वृक्ष, जलचर, उभयचर पक्षी, प्राणी, मानवी हस्तक्षेप आदींची माहिती मिळविण्यावर यात भर दिला गेला.

🌹🌳🌴लुप्त होण्याच्या मार्गावर🌴🌳🌹

👉वाघाच्या बहुतांश प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. २०१० मध्येच वाघांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं.

👉पारंपारिक औषधं मिळवण्यासाठी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात आली होती.

🌹🌳🌴वाघाच्या प्रजाती🌴🌳🌹

👉बंगाल टायगर: भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि दक्षिण तिबेटमध्ये ही प्रजाती आढळते.

👉इंडोचाइनीज टायगर: कंबोडिया, चीन, म्यानमार, थायलँड आणि व्हिएत्नामच्या पहाडी भागांमध्ये हा वाघ सापडतो.

👉 मलयन टायगर: मलय प्रायद्वीपवर वाघाची प्रजाती सापडते.

👉सायबेरियन टायगर: सायबेरियामध्ये वाघाची ही प्रजाती आढळते.

👉साउथ चीन टायगर: जसं नावावरून स्पष्ट होतंय तसं ही प्रजाती चीनच्या दक्षिणी प्रदेशात आढळतो.

👉सुमात्रन टाइगर: ही प्रजाती सुमात्रा बेटावर आढळतो.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...