Tuesday 13 August 2019

डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेत परतणार.

✍माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे दोन महिन्यांच्या कालखंडानंतर पुन्हा राज्यसभेत परतणार आहेत. राजस्थानमध्ये एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता डॉ. सिंग हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

✍डॉ. सिंग यांनी १९९१ ते २०१९ अशी २८ वर्षे आसाममधून राज्यसभेचे सदस्यत्व केले होते. जून महिन्यात त्यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत संपुष्टात आली. आसाम विधानसभेत काँग्रेसकडे पुरेशी मते नसल्याने डॉ. सिंग यांचा राज्यसभेचा मार्ग बंद झाला होता. डॉ. सिंग यांच्यासारखे  नेते राज्यसभेत आवश्यक असल्याने काँग्रेसने तमिळनाडूतून डॉ. सिंग यांना निवडून आणण्याची योजना आखली होती.

✍याच दरम्यान राजस्थान भाजप अध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनाने राजस्थानमध्ये एक जागा रिक्त झाली होती.  २०० सदस्यीय राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे १०० आमदार असून, अपक्ष आणि बसपाचा काँग्रेसला पाठिंबा आहे. यामुळे डॉ. सिंग यांना निवडून येण्यात काही अडचण येणार नाही.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...