Monday 2 September 2019

स्मार्ट सिटीत नागपूर दुसऱ्या स्थानी

दर शुक्रवारी होणाऱ्या कामकाज तपासणी व गुणांकनात नागपूरचे दुसरे स्थान कायम आहे. अहमदाबाद ३७१.१७ गुण घेऊन पहिल्या, तर नागपूर ३६८.५५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या दोन शहरांमध्ये गेल्या वर्षभरापासून सर्वोत्कृष्टची स्पर्धा सुरू आहे.

यापूर्वी नागपूर शहर वर्षभर पहिल्या क्रमांकावर होते. उत्तरप्रदेशातील कानपूर हे शहर यापूर्वी १३ व्या क्रमांकावर होते. आता या शहराने आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. याचाच अर्थ या शहरानेही स्मार्ट सिटीच्या कामात नव्या कल्पनांचा समावेश केला आहे. नागपूर शहराचा स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामात बराच वेग आहे.

भरतवाडा, पुनापूर व पारडी या भागात स्मार्ट सिटीचे काम सुरू झाले आहे. अनेक कामांच्या निविदा प्रक्रिया निघाल्या आहेत. शहरात स्मार्ट अॅण्ड सेफ सिटीचा प्रयोगही बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेखाली आहे. पोलिसांनाही या प्रकल्पात मोठे सहकार्य मिळत आहे. ठिकठिकाणी स्मार्ट सिटी म्हणून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा लाभ मोठ्या संख्येत नागपूरकर करीत आहे. एवढेच नव्हे तर गेल्या काही दिवसात स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील अनेक उद्यानांमध्ये नागरिकांसाठी ग्रीन जीम व इतर अत्यावश्यक सेवा पुरविल्या जात आहे. यामुळे स्मार्ट सिटीच्या संकल्पना राबविण्यात उपराजधानी देशात अव्वल ठरत आहे.

केंद्र सरकारच्या नगरविकास विभागातील पथक दर शुक्रवारी देशभरातील स्मार्ट सिटी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत गुणांकन देत असते. त्यानुसार, नागपूर शहराचा क्रमांक दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. अहमदाबाद व नागपूर अशीच स्पर्धा देशपातळीवर सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकावरील रांचीला ३१३.३७ आणि चौथ्या स्थानावरील भोपाळ शराला ३१२.४५ गुण आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...