Thursday 7 November 2019

स्मृती मानधनाचा नवा विक्रम

◾️कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने तिसरी वन-डे सामन्यात विंडीजवर मात केली.

◾️ स्मृती मानधनाने या सामन्यात
74 धावांची अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

◾️या कामगिरीदरम्यान स्मृतीने
आणखी एक विक्रम केला आहे.

◾️वन-डे क्रिकेटमध्ये 2 हजार धावांचा टप्पा सर्वात जलद पार करणाऱ्या
खेळाडूंच्या यादीत स्मृती दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे.

◾️23 वर्षीय स्मृती मानधनाने 51 डावांमध्ये अशी कामगिरी करून दाखवली.

◾️याआधी भारताच्या शिखर
धवनने 48 डावांमध्ये ही कामगिरी करून दाखवली
होती.

◾️याचसोबत महिला क्रिकेटमध्ये
अशी कामगिरी करून दाखवणारा फलंदाजांच्या यादीत स्मृती तिसऱ्या स्थानी आहे.

◾️ स्मृतीच्या आधी
📌ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क ने
  (41 डाव) आणि
📌वेग लेनिंग (45 डाव) यांनी सर्वात जलद 2 हजार धावांचा पल्ला पूर्ण केला आहे.

◾️स्मृती मानधना च्या खात्यात सध्या 2 हजार 25 धावा जमा आहेत. 51 वन-डे सामन्यांच्या कारकिर्दीत

◾️स्मृतीने आतापर्यंत 43 च्या सरासरी धावा काढल्या आहेत.

◾️तिच्या नावावर
📌 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 शतके
📌 17 अर्धशतकेही जमा आहेत.

◾️पुरुषांच्या क्रिकेट मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाच्या
नावावर वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2 हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम आहे. त्याने 40
डावांमध्ये अशी कामगिरी केली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...