Friday 13 December 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘दास’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) दाशी    2) दासी      3) माळीण    4) मादी

उत्तर :- 2

2) पुढीलपैकी अनेकवचनी नाम ओळखा.

   अ) शहारे    ब) हाल      क) केळे      ड) रताळे.

   1) अ आणि ब    2) अ आणि ड    3) अ, क आणि ड    4) फक्त ड

उत्तर :- 1

3) ‘कुत्रा’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?

   1) कुत्र्या    2) कुत्री      3) कुत्रे      4) कुत्रि

उत्तर :- 1

4) मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत ?

   1) सात    2) नऊ      3) आठ      4) दहा

उत्तर :- 3

5) विध्यर्थी वाक्य कोणते ते ओळखा.

   1) जर ढग दाटले तर पाऊस पडेल      2) पाऊस पडेल
   3) पाऊस पडला असता तर बरे झाले असते    4) पाऊस पडण्याची शक्यता आहे का ?

उत्तर :-2

6) एक विशाल मंदिर तयार झाले. या वाक्यातील अधोरेखित शब्द ................. आहेत.

   1) उद्देश्य    2) विधेय      3) उद्देश्यविस्तार    4) विधेयविस्तार

उत्तर :- 3

7) ‘राजा प्रधानाला बोलावतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्तरी    2) कर्मणी    3) भावे      4) कर्मकर्तरी

उत्तर :- 1

8) ‘नवरात्र’ या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल ?

   1) नौ रात्रीचा समूह  2) नव रात्रींचा समूह  3) नऊ रात्रींचा समूह  4) नवरात्रौत्सव

उत्तर :- 3

9) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
    “वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे ................ येतो.”

   1) अर्धविराम    2) अपूर्णविराम    3) स्वल्पविराम    4) पूर्णविराम.

उत्तर :- 4

10) ‘पाठीवरी वेणी नच, नागीणच काळी’ – या वाक्यातील अलंकार ओळखा.

   1) व्यतिरेक    2) अपन्हुती    3) उत्प्रेक्षा    4) यमक

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...