Saturday 21 December 2019

देशांतर्गत पर्यटन खर्चाचे सर्वेक्षण जानेवारीपासून

◾️देशांतर्गत पर्यटनासंदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील दुसरे ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षणा’स १ जानेवारी २०२०पासून प्रारंभ होणार आहे.

◾️देशभरातील १४ हजारांवर नमुने याकरिता जमा करण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि संशोधनासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे. 

◾️केंद्रीय सांख्यिकी आणि उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण विभागामार्फत देशभरात ७८ वे सर्वेक्षण ‘देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण आणि बहु निर्देशक’ विषयावर होणार आहे.

◾️१ जानेवारी २०२० पासून सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणात देशात १४,५०० नमुने, तर महाराष्ट्रात १२८८ नमुन्यांचे संकलन होणार आहे.

◾️पर्यटन उद्योगात केवळ पर्यटनच नाही, तर
📌इतर प्रवास,
📌 दूरसंवाद,
📌हॉटेल,
📌गाइड,
📌मनोरंजन,
📌पर्यटनस्थळी खरेदी आदी संलग्न क्षेत्रांचा अंतर्भाव असतो.

◾️ दर पाच वर्षांनी सर्व विभागांचे सर्वेक्षण केले जाते, देशी पर्यटन खर्च सर्वेक्षण पाच वर्षांनंतर १ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. 

◾️सर्वेक्षणानंतर डेटा संकलन आणि त्यावर प्रक्रिया (प्रोसेसिंग) केली जाते, यानंतर सर्वेक्षण जाहीर केले जाते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकरिता हे सर्वेक्षण असल्याने पर्यटन विभाग याकरिता सॅटेलाइट अकाउंट तयार करते.

◾️या कार्यपद्धतीद्वारे पर्यटन क्षेत्राचे आपल्या देशाच्या जीडीपीत (एकूण राष्ट्रीय उत्पन्नात) अथवा अर्थव्यवस्थेत किती योगदान आहे, हे मांडले जाते.

✍ असे होणार सर्वेक्षण

◾️किमान १२०० लोकसंख्या असलेला शहरी व ग्रामीण कुटुंबांकडून वर्षभरातील त्यांच्या पर्यटनाची माहिती संकलन  

◾️पर्यटन करताना येणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद घेणार प्रवास, मुक्काम, जेवण, खरेदी, मनोरंजन खर्चाचा अंतर्भाव

✍‘बहु निर्देशक सर्व्हे’

◾️पयर्टन खर्च सर्व्हेक्षणास जोडून ‘बहु निर्देशक सर्व्हे’ घेतला जाणार आहे.

◾️संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्‍वस विकास ध्येय २०३० निश्‍चितीअंतर्गत १७ उद्दिष्टे आहेत.

◾️जगभरातील १९३ देश सहभाग नोंदवीत आहेत.

◾️भारताच्या राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण विभागाद्वारे युनोकरिता पहिल्यांदाच असा सर्व्हे होणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

24 मे 2024 चालू घडामोडी

प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर - 22 मे प्रश्न – उत्तर भारतातील वायू प्रदूषण आणि आरोग्यावर होण...