Saturday 21 December 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘सजातीय’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

   1) उपजातीय      2) विजातीय   
   3) संकीर्णजातीय    4) अजातीय

उत्तर :- 2

2) ‘उचलली जीभ लावली टाळयाला’ या म्हणीचा अर्थ काय ?

   1) घशाला      2) एक सारखे बोलत राहणे
   3) मनात येईल तसे बोलणे  4) काहीच न बोलता गप्प राहणे

उत्तर :- 3

3) ‘धीर सोडणे’ हा अर्थ सूचित करणारा वाक्प्रचार ओळखा.

   1) हात टेकणे    2) हाडाची काडे करणे
   3) हातपाय गाळणे  4) हातखंडा असणे

उत्तर :- 3

4) “बोधपर वचन” या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

   1) सुभाषित    2) सुविचार   
   3) ब्रीदवाक्य    4) वरील सर्व

उत्तर :- 4

5) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता  ?

   1) नीयुक्त    2) नीयूक्त   
   3) नियुक्त    4) नियुत्क

उत्तर :- 3

6) खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोणता?
   1) र      2) ग     
   3) ज      4) यापैकी नाही
उत्तर :- 3

7) उच्छेद या जोडशब्दातील अचूक पोटशब्द ओळखा.

   1) उ + च्छेद    2) उत + च्छेद   
   3) उच् + छेद    4) उत् + छेद

उत्तर :- 4

8) शब्दाची जात बदलून वाक्यरचना करा.
     ‘त्याच्या डोळयात पाणी आले.’

   1) त्याच्या डोळयात पाणी येते    2) त्याच्या डोळयातून पाणी वाहते
   3) त्याचे डोळे पाणावले      4) त्याच्या डोळयांना धरा लागतात

उत्तर :- 3

9) ‘अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप’ ही संख्यावाचक विशेषणे विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?

   1) पूर्णासूचक संख्या विशेषण    2) अपूर्णांकसूचक संख्याविशेषण
   3) अनिश्चित संख्यासूचक विशेषण    4) साकल्यवाचक संख्याविशेषण

उत्तर :- 2

10) जा, ये, उठ, बस, खा, पी वगैरे धातूंपासून जी क्रियापदे तयार होतात त्यांना .................... म्हणतात.

   1) सिध्द क्रियापद    2) साधित क्रियापद
   3) संयुक्त क्रियापद    4) व्दिकर्मक क्रियापद

उत्तर :- 1

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...