Saturday 21 December 2019

अफगाणिस्तानने ‘इंडियन फार्माकोपीया’ (IP) पुस्तकाला मान्यता दिली

अफगाणिस्तान इस्लामिक प्रजासत्ताक या देशाने ‘इंडियन फार्माकोपीया’ या पुस्तकाला मान्यता दिली असून या पुस्तकाला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.

देशाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय औषधी व आरोग्य उत्पादने नियमन विभागाने ‘इंडियन फार्माकोपीया’ या पुस्तकाला औपचारिक मान्यता दिली.

‘इंडियन फार्माकोपीया’ पुस्तक

🔸इंडियन फार्माकोपीया भारताच्या ‘औषधी व सौंदर्यप्रसाधने कायदा-1940’ अन्वये असलेल्या मानकांचे अधिकृत असे मान्यताप्राप्त पुस्तक आहे.

🔸हे पुस्तक औषधांची ओळख, शुद्धता आणि क्षमता यांच्या बाबतीत भारतामध्ये उत्पादित आणि विक्री केली जाणार्‍या औषधांची मानके निर्दिष्ट करते.

🔸औषधांची गुणवत्ता, क्षमता आणि सुरक्षितता राखण्याच्या उद्देशाने भारतीय फार्माकोपीया आयोग (IPC) औषधी निर्मितीसाठी कायदेशीर व वैज्ञानिक मानके तयार करते आणि त्याची लिखित स्वरुपात नोंद करते.

🔸दरवर्षाच्या अखेरीस ‘इंडियन फार्माकोपीया’ पुस्तक प्रकाशित केले जाते.

भारतीय फार्माकोपीया आयोग (IPC) विषयी

भारतीय फार्माकोपीया आयोग (IPC) भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. भारत देशात तयार होणार्‍या औषधांची मानके ठरवण्यासाठी IPCची स्थापना करण्यात आली आहे. प्रदेशात असलेल्या रोगांवरच्या उपचारासाठी सामान्यत: आवश्यक असलेल्या औषधांचे मानके नियमितपणे अद्ययावत करणे, हे या संस्थेचे मूलभूत कार्य आहे. संस्थेची स्थापना 1956 साली झाली.

No comments:

Post a Comment

Latest post

सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त

➡️सोशल मीडियावर घोषणा : ६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना 🔖छेत्रीचा जलवा  :- 💡२००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय स...