Sunday 15 December 2019

भारतातल्या शिक्षकांना डिजिटल तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण देण्यासाठी UNESCO आणि डेल कंपनीचा नवा उपक्रम


🔰शालेय शिक्षकांना वर्गात तंत्रज्ञान अवलंबण्यास सक्षम करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या डेल इंडिया या कंपनीने UNESCO MGIEP सोबत भारतातल्या शिक्षकांना डिजिटल तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण देण्यासाठी एका नवीन भागीदारीची घोषणा केली आहे.

🔰या भागीदारीद्वारे, डेल कंपनीचा ‘डेल आरंभ - ए PC फॉर एज्युकेशन’ उपक्रम आणि UNESCO MGIEP याचे ‘फ्रेमरस्पेस’ व्यासपीठ एकत्र येऊन निवडक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सहकार्य करणार आहेत.

🔴उपक्रमाविषयी

🔰UNESCO MGIEP याचे ‘फ्रेमरस्पेस’ व्यासपीठ शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी विश्लेषनाच्या अंतर्ज्ञानासह समृद्ध सामग्री निर्मिती क्षमता असलेल्या शिक्षकांना मदत करते.

🔰हा कार्यक्रम तीन टप्प्यात चालवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्या शिक्षकांनी ‘डेल आरंभ’ फाउंडेशनचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे, त्यांना सामग्री तयार करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार. द्वितीय टप्प्यात ‘फ्रेमरस्पेस’चे 200 तासांचे प्रशिक्षण दिले जाणार. तिसर्‍या टप्प्यात कार्यक्रमाचे मूल्यांकन केले जाणार आहे.

🔰प्रतिबद्धतेच्या पहिल्या वर्षात आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमधल्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

🔰शाळांमध्ये शिक्षक, पालकांना संगणकाचे महत्त्व आणि त्याचा शिक्षणामधला उपयोग समजून घेण्यासाठी मदत करण्यासाठी ‘डेल आरंभ’ कार्यक्रम आधीपासूनच भारतात चालवला जात आहे. डिजिटल साक्षरता ही भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विकासास उत्तेजन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

🔰या भागीदारीमुळे संयुक्त राष्ट्रसंघाचे डिजिटल साक्षरतेचे ‘शाश्वत विकास ध्येय 4.7’ साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

🔴UNESCO MGIEP विषयी

🔰महात्मा गांधी शांती व शाश्वत विकास शिक्षण संस्था (MGIEP) हा संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) आणि भारत सरकारचा एक संयुक्त उपक्रम आहे. या संस्थेची स्थापना नोव्हेंबर 2012 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही भारतातली पहिली UNESCO विशेषज्ञ शिक्षण संस्था आणि आशिया-प्रशांत प्रदेशातली पहिली ‘श्रेणी-1’ची संस्था आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी सराव प्रश्न    24 मे 2024

प्रश्न.1)  NS-25 मिशनच्या क्रू सदस्यांपैकी कोण पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनणार ? उत्तर – गोपी थोटाकुरा प्रश्न.2) आयपीएल मध्ये ८ हजार धाव...