Monday 27 December 2021

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘डोंगर कोसळणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.

   1) आनंद होणे      2) अतिदु:ख होणे   
   3) डोंगर खाली येणे    4) सुख:द घटना घडणे

उत्तर :- 2

2) ‘मूर्खपणाचा सल्ला देणारा’ या शब्दसमूहाला खाली दिलेल्या शब्दसमूहातील लागू न पडणा-या शब्दांचा पर्याय द्या.

  1) अकलेचा कांदा    2) अरण्य पंडित   
   3) उंटावरचा शहाणा    4) कळीचा नारद

उत्तर :- 4

3) पुढीलपैकी शुध्द शब्दरूप ओळखा.

   1) नीस्तेज    2) नि:स्तेज   
   3) निस्तेज    4) नि:तेज

उत्तर :- 3

4) पुढील समूहात न बसणारा शब्द शोधा.

   1) चंपक – चम्पक    2) छंद – छन्द   
   3) अंबुज – अम्बुज    4) धुवून – धुऊन

उत्तर :- 4

5) खालील पर्यायी उत्तरांतून ‘पररूप संधी’ ओळखा.

   1) सदाचार      2) जगदीश   
   3) करून      4) काहीसा

उत्तर :- 3

6) ‘संस्कार’ हा शब्द कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे?

   1) सामासिक    2) अभ्यस्त   
   3) प्रत्ययघटित    4) उपसर्गसाधित

उत्तर :- 4

7) ‘समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे’ या वाक्याव्दारे व्यक्त होणारा अर्थ कोणता ?

   1) वाच्यार्थ    2) लक्ष्यार्थ   
   3) तात्पयार्थ    4) व्यंगार्थ

उत्तर :- 4

8) ‘झुंबड’ या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा.

   1) झोंबाझोंबी    2) झांज     
   3) गर्दी      4) यापैकी कोणताच नाही

उत्तर :- 3

9) ‘अरी’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ?

   1) अमृत    2) विष     
   3) सखा    4) रवी

उत्तर :- 3

10) ‘पळसाला पाने तीन’ या म्हणीतून कोणते सत्य सूचित केले आहे ?

   1) निसर्गाविषयीचे मानवी आकर्षण      2) निसर्ग – माणूस यांच्यातील नाते
   3) स्वभावाला औषध नाही      4) मानवी स्वभावाची सार्वत्रिकता

उत्तर :- 4

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...