Thursday 16 January 2020

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा फेब्रुवारीत भारत दौरा

🔰 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपला पहिला भारत दौरा करणार असल्याचे निश्चित झाले आहे. पुढील महिन्यात डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

🔰 डोनाल्ड ट्रम्प भारत दौरा करणार असल्याचे निश्चित झाले असून ते फेब्रुवारी महिन्यात येणार आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. गेल्यावर्षी गणराज्य दिनाच्या समारंभासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने निमंत्रण दिले होते. परंतु, ते या समारंभाला आले नव्हते.

🔰 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा निश्चित होत असल्याने भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे.

🔰 भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांमध्ये या विषयी चर्चा सुरु आहे. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

🔰 २००९ नंतर भारताचा विकास दर खाली आला आहे. तसेच भारतात सीएए आणि एनआरसीवरून देशभरात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. देशात वातावरण असे असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा दौरा होत आहे. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

🔰 गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा केला होता. 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमानंतर डोनाल्ड ट्रम्प भारताचा दौरा करणार आहेत.

🔰 ह्युस्टमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ट्रम्प मोदीसोबत व्यासपीठावर दिसले होते. तसेच या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ पंजाब पोलीसांनी 'मिशन निश्चय' योजना सुरू केली आहे ◾️उद्देश : पंजाब पोलिसांनी ड्रग्जची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गो...