Wednesday 15 December 2021

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

⚛⚛तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात राबवली गेली ?

1)    1956-61

2)   1961-66✅✅

3)    1960-65

4)    1659-64

⚛⚛राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) कोठे आहे ?

1)    बेंगलोर

2)   दिल्ली

3)    पुणे✅✅

4)    चेन्नई

⚛⚛मोरार्जी देसाई यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे

अभय घाट✅✅

एक ता स्थळ

वीरभूमी

किसान घाट

(1)ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेले ‘वज्र’ नावाचे देयक व्यासपीठ कुणी प्रस्तुत केले?
(1)पेटीएम
(2)भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI)✅✅
(3)पेयू
(4)फोनपे

⏩⏩Solution ⏩⏩व्यवहार जलद आणि सुरक्षित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) ‘वज्र’ नावाचे नवे व्यासपीठ तयार केले आहे.

 

(2)भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?
(1)चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी✅✅
(2)रजनीश कुमार
(3)अरुंधती भट्टाचार्य
(4)संजीव चड्ढा

⚛⚛Solution ⏩⏩चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी ह्यांची भारतीय स्टेट बँक (SBI) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती SBIचे विद्यमान अध्यक्ष रजनीश कुमार ह्यांच्या जागी झाली आहे.

(3)नवी दिल्ली येथून PRAGATI या व्यासपीठाच्या माध्यमातून साधल्या गेलेल्या 32 व्या संवादाचे अध्यक्ष पंतप्रधान मोदी होते. ‘PRAGATI’मधला ‘T’ हा अक्षर काय दर्शवितो आहे?
(1)टोटल
(2)तत्काल
(3)टाइमली✅✅
(4)यापैकी नाही

⚛⚛Solution ⏩⏩माहिती व दळणवळण (ICT) तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या ‘प्रो-अॅक्टिव गव्हर्नन्स अँड टाइमली इंप्लीमेंटेशन’ (प्रगती/PRAGATI) या बहुपद्धती डिजिटल आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी आतापर्यंत 32 वेळा जनसंवाद साधला आहे. 22 जानेवारी 2020 रोजी पंतप्रधानांनी 2020 या वर्षातला पहिला जनसंवाद साधला. ‘प्रो-अॅक्टिव गव्हर्नन्स अँड टाइमली इंप्लीमेंटेशन’ (प्रगती/PRAGATI) व्यासपीठ हे एक अद्वितीय एकात्मिक आणि परस्परसंवादी व्यासपीठ आहे. हे मंच सामान्य जनतेच्या तक्रारींना संबोधित करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि त्याचबरोबर योजना आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मदत करते. यामध्ये डिजिटल डेटा मॅनेजमेंट, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि भू-स्थानिक तंत्रज्ञान या तीन नवीनतम तंत्रज्ञानांना एकात्मिक केलेले आहे. ही एक तीन (PMO, केंद्र शासनाचे सचिव आणि राज्यांचे मुख्य सचिव) स्तरीय प्रणाली आहे. याचा शुभारंभ 25 मार्च 2015 रोजी झाला आणि दर महिन्याला चौथ्या बुधवारी (प्रगती दिन) हा कार्यक्रम घेतला जातो.

(4)आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भारताचा अंदाजित वृद्धीदर पूर्वीच्या 6.1 टक्क्यांवरून _______ एवढा कमी केला आहे.
(1)4.5 टक्के
(2)4.6 टक्के
(3)4.8 टक्के✅✅
(4)4.9 टक्के

⚛⚛SOLUTION ⏩⏩आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांनी त्यांच्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक’ अहवालात 2019-20 या वर्षासाठी भारताचा वृद्धीदर 4.8 टक्के एवढा असणार असा अंदाज व्यक्त केला आहे, जो यापूर्वी 6 टक्के एवढा अंदाजित केला गेला होता.

(5) ‘ग्रीनपीस इंडिया’च्या अहवालानुसार, भारतातले कोणते शहर सर्वात प्रदूषित आहे?
(1) कानपूर
(2)झारिया✅✅
(3)गाझियाबाद
(4)बरेली

⚛⚛SOLUTION ⏩⏩‘ग्रीनपीस इंडिया’ या संस्थेच्या अहवालानुसार, झारखंडचे झारिया हे शहर भारतातले सर्वात प्रदूषित शहर आहे. तर झारखंडचेच धनाबाद हे भारतातले द्वितीय क्रमांकाचे प्रदूषित शहर आहे. ही दोनही शहरे कोळशाच्या समृद्ध भांडार आणि उद्योगांसाठी प्रसिध्द आहे.

(6) कोणत्या व्यक्तीने 2019 या वर्षासाठी ‘ग्लोबल सिटिझन प्राइज: सिस्को युथ लीडरशीप अवॉर्ड’ हा पुरस्कार जिंकला?
(1)प्रिया प्रकाश✅✅
(2)सौगत गुप्ता
(3)अनिल राय गुप्ता
(4)संदीप पटेल

⚛⚛SOLUTION ⏩⏩प्रिया प्रकाश (भारतातल्या ‘हेल्थसेटगो’ कंपनीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी) ह्यांनी 2019 या वर्षासाठी ‘ग्लोबल सिटिझन प्राइज: सिस्को युथ लीडरशीप अवॉर्ड’ हा पुरस्कार जिंकला. सिस्को या कंपनीच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार लंडनमध्ये एका कार्यक्रमात दिला गेला. प्रकाश ह्यांच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या आरोग्यविषयक कार्यक्रमासाठी हा पुरस्कार दिला गेला.

(7) कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
(1)राम नाथ कोविंद✅✅
(2)एम. व्यंकय्या नायडू
(3)अमित शहा
(4)नरेंद्र मोदी

⚛⚛SOLUTION ⏩⏩राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार समारंभात भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हे पुरस्कार संशोधन, शैक्षणिक, क्रिडा, कला व संस्कृती, समाज सेवा आणि शौर्य यासह अनेक गटात दिले गेलेत.

⚛⚛‘जनगणना 2021’ विषयक परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
(A) दिसपूर
(B) नवी दिल्ली✅✅
(C) अहमदाबाद
(D) लखनऊ

⚛⚛शक्तीकांत दास हे रिझर्व बँकेचे कितवे गव्हर्नर आहेत?
A) 24
B) 25✅✅
C) 26
D) 22

⚛⚛"ISRO "ची स्थापना कधी झाली?
A)1965
B)1968
C)1959
D)1969✅✅

⚛⚛महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?
A) उद्धव ठाकरे
B) आदित्य ठाकरे
C) अनिल देशमुख✅✅
D) विलासराव देशमुख

⚛⚛मुंबई येथील डेक्कन कॉलेज येथे रा. गो. भंडारकर यांनी कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले?
A) संस्कृत✅✅
B) गणित
C) मराठी
D) इंग्रजी

⚛⚛राष्ट्रीय सभा (काँग्रेस) च्या स्थापनेच्या संबंधीत योग्य विधानांची निवड करा.

1) राष्ट्रीय सभेच्या स्थापनेआधी अॅलन ह्यूम यांनी 1883 मध्ये 'इंडियन नॅशनल युनियन' ची स्थापना केली.

2) डिसेंबर 1885 मध्ये पुण्यास कॉलऱ्याची साथ सुरु होती. म्हणून पुण्याऐवजी मुंबईस अधिवेशन घेण्याचे ठरले.

3) अध्यक्षस्थानी कानपूरचे थोर कायदेपंडित व्योमेश्चंद्र बॅनर्जी हे होते.

4) सर्व हिंदुस्थानातून एकूण 72 प्रतिनिधी राष्ट्रसभेला पहिल्या अधिवेशनास उपस्थित होते.

(1) फक्त 1 व 2✅✅
(2) 3 व 4
(3) 2 व 4
(4) 2 व 3

No comments:

Post a Comment

Latest post

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ? ⚪️ दराक्ष  ⚪️ मोसंबी  ⚪️ डाळिंब ⚫️ चिकू ☑️ महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने...