Monday 27 January 2020

विधान परिषद बरखास्त!; मुख्यमंत्र्यांचा निर्णय


● आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत विधान परिषद बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

●  वायएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवाडा अमरनाथ यांनी याबाबत माहिती दिली. कॅबिनेटच्या बैठकीनंतर आंध्र प्रदेश सरकारचे विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

          😇  प्रकरण काय  😇
       ----------------------------------
▪ मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना 3 राजधान्या अस्तित्त्वात आणायच्या आहेत, मात्र त्याबाबतचे विधेयक बहुमताअभावी विधानपरिषदेत रखडले आहे.

▪ त्यामुळेच वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडूंना धक्का देत, थेट विधानपरिषदच बरखास्तीचा निर्णय घेतला आहे.

▪ माजी मुख्यमंत्री अन् टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाकडून सरकारच्या या प्रस्तावाचा विरोध करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

▪नायडू यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. ज्यामध्ये पक्षाचे 21 आमदार विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

▪ आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषदेत 58 सदस्य आहेत. जगन मोहन रेड्डी यांच्या हातात राज्याची सत्ता असली तरी विधान परिषदेत चंद्रबाबू नायडू यांचे बहुमत आहे.

▪ या सभागृहात टीडीपीचे 27 तर वायएसआरचे 9 सदस्य आहेत. विधान परिषदेत जगन मोहन रेड्डी यांच्या राज्याच्या 3 राजधान्या या प्रस्तावाला अडकवले गेले.

--------------------------------------------------------
  
---------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...