Sunday 23 February 2020

कृषी अधिकारी म्हणून मुलींची लक्षणीय संख्येत निवड

🔰वर्धा : महिलांसाठी लांबच्या समजल्या जाणाऱ्या कृषी खात्यात प्रथमच लक्षणीय संख्येत कृषी अधिकारी म्हणून मुलींची निवड झाली आहे.

🔰महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने कृषी सेवा गट?ब अंतर्गत ८३ उमेदवारांची शिफारस कृषी खात्याकडे केली आहे. यापैकी जवळपास एक तृतियांश महिला असून परिविक्षाधीन कालावधीसाठी कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती प्रस्तावित आहे. शिक्षणात वैद्यकीय व अभियांत्रिकीपाठोपाठ कृषी शिक्षणास प्राधान्य मिळत असल्याचे कृषी महाविद्यालयातील प्रवेशासाठी चाललेल्या चढाओढीतून दिसून येते. कृषी खात्यात महिला अधिकाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी  आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने निवड झालेल्या महिला अधिकाऱ्यांमुळे आगामी काळात कृषी खात्याची सूत्रे महिलांकडे जाण्याची चिन्हे आहेत.

🔰निवडप्राप्त सर्व महिलांना एक महिन्याच्या आत रूजू व्हायचे आहे. महिला आरक्षित पदावर शिफारस झालेल्या महिला उमेदवारांच्या प्रमाणपत्राची तपासणी महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात येणार आहे. नेमणूक झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमास हजेरी लावणे अनिवार्य आहे.

🔰कृषी विभागातील ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यासंदर्भात म्हणाल्या, कृषी खात्यात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती स्वागतार्ह आहे. निवड झालेल्या ९० टक्के महिला या शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतीविषयक प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न त्या अधिक तत्परतेने सोडवण्याची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

काही महत्वाचे निर्देशांक व भारताचा क्रमांक

▪️ग्लोबल Gender Gap index 2024 • प्रथम देश - आइसलँड व  भारत - 129 वा क्रमांक ▪️"जागतिक सायबर क्राईम इंडेक्स" नुसार भारताचा क्रम...