Saturday, 1 February 2020

‘संप्रीती-9’: भारत आणि बांग्लादेश यांच्यातला संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव

3 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2020 या कालावधीत मेघालयाच्या उमरोई गावात ‘संप्रीती-9’ नावाचा भारत आणि बांग्लादेश यांच्या भूदलांचा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित करण्यात आला आहे.

भारत आणि बांग्लादेश यांच्या भूदलांचा ‘संप्रीती’ या नावाने संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित केला जातो. यावर्षीचा कार्यक्रम हे या मालिकेतले नववे संस्करण आहे.

सरावादरम्यान कमांड पोस्ट एक्सरसाइज (CPX) आणि फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज (FTX) घेण्यात येणार आहे. दोन्ही देश दहशतवादविरोधी कारवाईच्या बाबतीत त्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान करणार आणि योग्य पद्धतींचा सराव करणार.

No comments:

Post a Comment

Latest post

सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या

◾️5 जून 2024 - ला अंतराळात गेल्या होत्या ◾️26 जून 2024 - ला परत येणार होत्या  ◾️18 मार्च 2025 - ला प्रत्यक्षात परत आल्या (भारतीय वेळेनुसार 1...