Thursday 6 February 2020

१० पैकी एका भारतीयाला होणार कर्करोग

👉 भारतात २०१८ मध्ये कर्करोगाचे ११ लाख ६० हजार नवे रुग्ण असणार असून, १० पैकी एका भारतीयाला आयुष्यात कर्करोग होऊन १५ पैकी एकाचा मृत्यू होईल,अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ)व्यक्त केली आहे.

👉जागतिक कर्करोग दिनी डब्लूएचओ आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरसी)ने दोन पाहणी अहवाल प्रसिद्ध केले. भारतात २०१८ मध्ये ११ लाख ६० हजार नवे रुग्ण आढळले असून, सात लाख ८४ हजार ८०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २२ लाख सहा हजार रुग्ण पाच वर्षे उपचार घेत आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.

👉भारतात स्तनाच्या कर्करोगााचे सर्वाधिक रुग्ण असून, ही संख्या एक लाख ६२ हजार आहे.त्यापाठोपाठ तोंडाचा (१.२०लाख), सर्व्हिकल (९७ हजार), फुफ्पुस (६८ हजार), पोट (५७ हजार) आणि आतड्यांचा कर्करोग होणाऱ्यांची संख्या ५७ हजार आहे.

👉स्तनांचा आणि आतड्यांचा कर्करोग होण्याचा संबंध अतिवजन आणि स्थूलपणा, शारिरीक हालचालींचा अभाव आणि चुकीची जीवनशैली असून, यामुळे आर्थिक आघाडीवरही संकट असून,त्यातून सामाजिकआर्थिक बदल मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

👉जर कर्करोगावर गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत उपाय योजले गेले नाहीत तर जगात पुढील २० वर्षांत कर्करोगात ६० टक्क्यांनी वाढ होईल असेही डब्लूएचओने म्हटले आहे. या देशांपैकी फक्त १५ टक्के देशांनी कर्करोगावर सरकारी रुग्णालयात व्यापक स्वरूपात उपचार दिले आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here