Tuesday 11 February 2020

राष्ट्रीय अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धा : मीराबाई चानूचा राष्ट्रीय विक्रम


🏈🏈ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा असलेली आणि माजी जगज्जेती मीराबाई चानू हिने मंगळवारी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिने ४९ किलो वजनी गटात आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत २०३ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले.

🏈🏈मणिपूरच्या २५ वर्षीय मीराबाईने स्नॅच प्रकारात ८८ तर क्लिन आणि जर्क प्रकारात ११५ किलो वजन उचलत एकूण २०३ किलो वजनाचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी तिने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात थायलंड येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २०१ किलो वजनाचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.

🏈🏈रेल्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मीराबाईची सहकारी संजिता चानू हिने १८५ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले तर तेलंगणाच्या टी. प्रियदर्शिनी हिने १६८ किलो वजनासह कांस्यपदक प्राप्त केले.

🏈🏈मीराबाईने मंगळवारी साकारलेल्या या कामगिरीमुळे तिने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी मजल मारली. ती चीनची जियांग हुईहुआ (२१२ किलो) आणि होऊ झिहुई (२११ किलो) आणि कोरियाची री संग गम (२०९ किलो) यांच्यानंतर चौथ्या स्थानी आहे.

🏈🏈आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी माझ्याकडे अद्याप पुरेसा वेळ आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मी २१० किलो वजन उचलेन, अशी आशा आहे. प्रत्येक दिवस माझ्या कामगिरीत सुधारणा होत असून नियोजित रणनीतीनुसार सर्व काही गोष्टी घडत आहेत. आशियाई स्पर्धेत २०६ किलो वजन उचलण्याचा माझा प्रयत्न असेल. काही तांत्रिक बाबींवर मेहनत घेत आणि स्वत:ची शक्ती वाढवत ऑलिम्पिकमध्ये देशाचा नावलौकिक उंचावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 13 JUNE 2024

1) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या 'ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स' मध्ये भारत 129 व्या स्थानावर पोहोचला आहे. 2) दरवर्षी 13 जून रो...