Monday 16 March 2020

Current Affairs - 16/03/2020

1)GST परिषदेच्या 39 व्या बैठकीत भ्रमणध्वनी संचावरचा वस्तू व सेवा कर (GST) ____ इतका करण्यात आला.
(A) 5 टक्क्यांवरुन 12 टक्के
(B) 12 टक्क्यांवरुन 18 टक्के
(C) 12 टक्क्यांवरुन 20 टक्के
(D) 5 टक्क्यांवरुन 20 टक्के

2)प्राण्यांसाठीच्या वैद्यकीय उपकरणांच्या चाचणीसाठी कोणती सुविधा उभारण्यात आली?
(A) अॅनिमल टेस्टिंग इव्हॅल्युएशन फॅसिलिटी
(B) अॅनिमल प्रोटेक्शन अँड रेस्क्यू फॅसिलिटी
(C) अॅनिमल ट्रेनिंग इव्हॅल्युएशन फॅसिलिटी
(D) इन व्हिव्हो इव्हॅल्युएशन फॅसिलिटी.  √

3)राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने कोणत्या ओपन वॉटर राफ्टिंग व कायकिंग अभियानाचा शुभारंभ केला?
(A) गंगा लाभ अभियान
(B) गंगा नहाओ अभियान
(C) गंगा घुमाव अभियान
(D) गंगा आमंत्रण अभियान.  √

4)30 जून 2020 पर्यंत कोणत्या दोन वस्तू अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या अंतर्गत आणली गेली आहेत?
(A) मास्क आणि टिशू पेपर
(B) टिशू पेपर आणि रुमाल
(C) हँड सॅनिटायझर आणि हातमोजे
(D) मास्क आणि हँड सॅनिटायझर.  √

5)राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाची कार्ये प्रभावीपणे व्हावी यासाठी ‘भूमी राशी’ संकेतस्थळ उघडण्यात आले आहे. त्याच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

1. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 39000 हेक्टर भूमी अधिसूचित केली आहे, 2014-15 आणि 2017-18 या कालावधीत 33005 हेक्टर भूमी अधिसूचित केली होती.

2. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य पाटबंधारे विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास कंपनी यासारख्या प्राधिकरणांना एकत्र जोडणे हा या संकेतस्थळाचा हेतू आहे.

अचूक पर्याय निवडा.

(A) (1) आणि (2) बरोबर आहेत
(B) ना (1) आणि ना (2) बरोबर आहे
(C) केवळ (1) बरोबर आहे
(D) केवळ (2) बरोबर आहे. √

6)कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय कंपनी विधी अपील न्यायपीठ (NCLAT) याच्या कार्यकारी पदावर नेमणूक करण्यात आली?
(A) ज्योतिरादित्य सिंदीया
(B) सुधांशू ज्योती मुखोपाध्याय
(C) बन्सी लाल भट.  √
(D) कपिल सिब्बल

7)कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे 13 मार्च 2020 रोजी निफ्टी किती अंकांनी खाली आला?
(A) 1000
(B) 950.  √
(C) 200
(D) 5000

8)कोणत्या नोंदणी यादीत भारतातल्या सामान्य रहिवाशांची नोंद असते?
(A) राष्ट्रीय लोक नोंदणी
(B) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी.  √
(C) राष्ट्रीय नागरिक नोंदणी
(D) राष्ट्रीय व्यक्ती नोंदणी

9)भारतीय रिझर्व्ह बँकेनी टियर-1 भांडवलाच्या एकट्या कर्जदाराच्या आणि कर्जदारांच्या गटासाठी शहरी सहकारी बँकांसाठी एक्सपोजर मर्यादा अनुक्रमे 15 टक्के आणि 25 टक्क्यांपर्यंत खाली आणली. त्याच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

1. वर्तमान निकषांप्रमाणे असलेली मर्यादा ही एकट्या कर्जदारांसाठी टियर-1 आणि टियर-2 भांडवलासह बँकेच्या भांडवलाच्या 20 टक्के आणि कर्जदारांच्या गटासाठी 40 टक्के मान्य आहे.

2. भारतीय रिझर्व्ह बँकेनी प्राधान्य असलेल्या क्षेत्रासाठीचे कर्जाचे लक्ष्य देखील सुधारित केले, जे ऑफ-बॅलन्स शीट एक्सपोजरच्या समायोजित निव्वळ बँक पत किंवा पत समतुल्य रकमेच्या 40 टक्क्यांवरून 75 टक्के केले. 31 मार्च 2030 पासून हे निर्णय लागू केले जाणार.

अचूक पर्याय निवडा.

(A) (1) आणि (2) बरोबर आहेत
(B) केवळ (1) बरोबर आहे
(C) केवळ (2) बरोबर आहे
(D) ना (1) आणि ना (2) बरोबर आहे.  √

10)भारतामधल्या स्मार्ट शहरांसाठी उपाययोजना करण्यासाठी कोणत्या दोन कंपन्यांमध्ये करार झाला?
(A) इन्फोसिस आणि क्वालकॉम.  √
(B) रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अॅपल इंक.
(C) विप्रो आणि मायक्रोसॉफ्ट
(D) भारती एअरटेल आणि AT&T

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ पंजाब पोलीसांनी 'मिशन निश्चय' योजना सुरू केली आहे ◾️उद्देश : पंजाब पोलिसांनी ड्रग्जची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गो...