Saturday 21 March 2020

रंगनाथ मिश्रा ex-CJI चीही झाली होती राज्यसभेवर नियुक्ती

📌 न्या बहरुल इस्लाम
📌 न्या रंगनाथ मिश्रा
📌 न्या रंजन गोगोई

◾️ चार महिन्यांपूर्वी निवृत्त झालेले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नामांकित केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

◾️पण माजी सरन्यायाधीशांना राज्यसभेवर पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाही.

◾️ यापूर्वीही काँग्रेसने माजी सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. तर इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाही अशीच घटना घडली होती.

🔰 कोण होते रंगनाथ मिश्रा ?

◾️रंगनाथ मिश्रा हे २५ सप्टेंबर १९९० ते २४ नोव्हेंबर १९९१ या काळात सरन्यायाधीश राहिले

◾️ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

◾️१९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेत काँग्रेसचे खासदार राहिले.

◾️बहरुल इस्लाम यांच्यानंतर राज्यसभेत जाणारे ते दुसरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ठरले होते. इस्लाम यांनाही काँग्रेसनेच राज्यसभेवर पाठवलं होतं.

🔰 इंदिरा गांधींकडून पहिल्यांदा नियुक्ती

◾️बहरुल इस्लाम हे सुप्रीम कोर्टातून नियुक्त होताच त्यांची राज्यसभेवर इंदिरा गांधी यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, भारतीय न्यायव्यवस्थेतील ही अभूतपूर्व घटना होती.

◾️कारण, बहरुल इस्लाम हे १९५६ पासून काँग्रेसचे सदस्य होते. १९६२ आणि १९६८ ला दोन वेळा त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. पण आश्चर्यकारकरित्या त्यांनी १९७२ ला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते तत्कालीन आसाम आणि नागालँड (सध्याचे गुवाहटी) हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनले.

◾️१९८० मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◾️ जस्टिस एम हिदायतुल्ला यांची निवृत्तीनंतर ९ वर्षांनी उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

◾️ माजी सरन्यायाधीश पी सदाशिवम यांची २०१४ मध्ये केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...