Saturday 4 April 2020

पहिल्यांदाच पृथ्वीवर इतकी शुद्ध हवा

👉🏻 कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे पृथ्वीला मोठा दिलासा मिळाला आहे. पृथ्वी आता अधिक स्वच्छ हवेचा श्वास घेत आहे.

👉🏻 अशी स्वच्छ हवा 75 वर्षानंतर पृथ्वीवर आढळते आहे. यापूर्वी, दुसर्‍या महायुद्धानंतर इतकी स्वच्छ हवा होती.

👉🏻 कोरोनामुळे बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जगभरात प्रदुषणाचं प्रमाण कमी झालं आहे.

👉🏻 ग्लोबल कार्बन प्रोजेक्टचे प्रमुख रॉब जॅक्सन यांनी म्हटलं की, यावर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये 5 टक्के घट झाली आहे.

👉🏻 याआधी  2008 च्या आर्थिक मंदीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी झालं होतं. त्यामुळे 1.4 टक्के घट पाहायला मिळाली होती.

👉🏻 संयुक्त राष्ट्राने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक अहवाल प्रकाशित केला होता. प्रत्येक वर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये 7.6 टक्के घसरण झाली तरच ग्लोबल वॉर्मिंगमध्ये 1.5 डिग्री सेल्सियसची कमतरता येईल.

👉🏻 वैज्ञानिकांच्या मते, कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे कार्बन उत्सर्जनमध्ये 10 ते 20 टक्के घट झाली आहे.

👉🏻 पण हे जास्त काळ नसणार आहे. कारण 2021 च्या सुरुवातीला हे पुन्हा वाढायला लागेल. त्यामुळे चिंता पुन्हा वाढायला लागतील.

No comments:

Post a Comment

Latest post

WORLD AIR QUALITY REPORT 2023

🔶जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२३ • अहवाल जाहीर करणारी संस्था : IQAIR स्वित्झर्लंड (स्थापना 1963) • एकूण देश : 134 ☑️या अहवालानुसार 👇👇 ...