तिसरा लॉकडाउन : आणखी दोन आठवडे टाळेबंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

📌देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे.

📌 ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे.

📌या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचेही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

📌दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त काही  सवलती देण्यात येतील.

📌 परंतु रेड झोनमध्ये कोणत्याही भागांना  कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

📌 रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी नव्या गृहमत्रालयानं काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत.

📌ग्रीन झोन्समध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही किंवा २१ दिवसांमध्ये करोनाचा एक नवा रुग्ण सापडला नाही, अशा भागांचा समावेश करण्यात आला आहे.

📌तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे प्रश्नसंच

241. ————— हा दिवस ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा केला जातो. A. 25 मार्च B. 25 एप्रिल C. 25 जून D. 25 जुलै ANSWER: B. 25 एप्रिल 242...