देशातील करोना मृत्युदर जगात सर्वात कमी.

🔰इतर देशांपेक्षा भारतात करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे सुमारे ३.२ टक्के इतके आहे. काही राज्यांमध्ये तर हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. या तुलनेत जागतिक करोना मृत्युदर ७.५ टक्के राहिलेला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी दिली.

l🔰जगभरात ४१ लाख लोक करोनाग्रस्त झाले असून त्यापैकी आत्तापर्यंत २ लाख ८५ हजार रुग्ण दगावले. भारतात २२९३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

🔰केंद्रीय आरोग्यमंत्री राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मंगळवारी हर्षवर्धन यांनी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, देशात केवळ मृत्यूचा दर कमी आहे असे नव्हे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. हे प्रमाण आता ३१.७० टक्क्यांवर पोहोचलेले आहे.

🔰देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या २२,४५५ इतकी आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १५३८ रुग्ण बरे झाले. मात्र देशभरातील करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ७० हजाराच्या घरात गेली असून मंगळवारी ती ७०,७५६ इतकी झाली. सोमवारी एका दिवसात चार हजारहून अधिक रुग्णांची भर पडली होती. गेल्या चोवीस तासांमध्ये ३६०४ नवे रुग्ण आढळले व ८७ रुग्णांचा मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...