Saturday 30 May 2020

सर्व सामान्य विज्ञान

💠💠सामान्य विज्ञान (इयत्ता 5 वी).💠💠

🅾शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरिंद्रिये म्हणतात.

 🅾मेंदू, फुफ्फुसे, हृदय, इ. आंतरिंद्रियांची उदाहरणे आहेत.

🅾 अन्नाचे पचन अन्न नलिकेमध्ये होते.

🅾 अन्न पचनास मदत करणार्‍या रसास पाचकरस असे म्हणतात.

 🅾तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते.

 🅾डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने अधिक असतात.

🅾 भुईमुंग, करडई यांसारख्या तेलबियात स्निग्धाचे प्रमाण अधिक असते.

 🅾पालेभाज्यांपासून क्षार व जीवनसत्वे मिळतात.

 🅾मोड येताना धान्यातील जीवनसत्वाचे प्रमाण वाढते.

 🅾आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात वाढ होऊन पौष्टिकता वाढते.

🅾 ओ.आर.एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन. याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो.

 🅾पोटॅशिअम परमॅगनेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात.

 🅾खडकापासून मातीचा 2.5 सेमी पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्ष लागतात.

 🅾डोंगर उतारावर घातलेल्या बांध्ंणा ताली किंवा ओटे म्हणतात.

 🅾पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे मत कणाद महर्षींनी मांडले.

🅾 कणाद महर्षींचा जन्म इसवी सनापूर्वी 6 व्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजेच गुजराथ राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभासपट्टम येथे झाला.

 🅾पदार्थाच्या सूक्ष्मतिसूक्ष्म कणाला महर्षीनी 'पीलव' म्हटले आहे.

🅾 उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात.
 उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणार्‍या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात.

 🅾लोखंडाप्रमाणेच कोबाल्ट व निकेल हे धातूही चुंबकाकडे आकर्षिले जातात.

 🅾पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणार्‍या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात.

 🅾बाष्पीभवन, सांद्रीभवन, विरघळणे, उत्कलन आणि विलयन हे भौतिक बदलाचे प्रकार आहेत.

🅾 लोखंडी पत्रे, नळ इ. वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावतात.

🅾 तांब्या-पितळेच्या भांड्यांना काथिलाचा लेप देऊन कल्हई करतात.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋


💠💠सामान्य विज्ञान (इयत्ता 6 वी).💠💠

🅾अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते.

 🅾चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात.

🅾प्राणी : जीवनकाळ

🅾घरमाशी - 1 ते 4 महिने
🅾कुत्रा - 16 ते 18 वर्ष
🅾शहामृग - 50 वर्ष
🅾हत्ती - 70 ते 90 वर्ष

🅾वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलेस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते.

🅾 बुरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाहीत.

 🅾वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत.

 🅾व्दिवार्षिक वनस्पती - मुळा, गाजर, बीट.वार्षिक वनस्पती - सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका.

🅾 जलचर प्राणी - मासा, जेलीफिश, ऑक्टोपस

🅾 उभयचर प्राणी - बेडूक, कासव, सुसर

🅾 वडाच्या खोडावरील पारंब्या या वडाची मुळे आहेत. कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे.

 🅾पेर आणि पान यांच्या दुबेळक्यात कोंबासारखा भाग दिसतो त्याला मुकूल म्हणतात. मूळाच्या टोकाशी मूलटोपी असते.

 🅾जायांग स्त्रीकेशराचा बनलेला असतो.

 🅾वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते, त्यांना राशी असे म्हणतात.

 🅾MKS आणि CGS या प्रचलित मापन पद्धती आहेत.

 🅾गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार प्रणालीव्दारे केले जाते.

 🅾स्थिर वस्तूला हलविण्यासाठी बलाची आवश्यकता असते.

 🅾मॅगलेव्ह ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते.

 🅾घर्षणबल गतीच्या विरोधात कार्य करते. घर्षनामुळे वीज निर्माण होणार्‍या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात.

 🅾एका दिशेने जाणार्‍या गतीला रेषीय गती असे म्हणतात.

🅾 ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.

 🅾आधाराभोवती हालणार्‍या आणि न वाकणार्‍या दांड्याला तरफ म्हणतात. हे साधे यंत्र आहे.

 🅾कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.

🅾 पदार्थाच्या ताणामुळे / स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.

 🅾गतीज ऊर्जेचा वापर करून डायनॅमोमध्ये विद्युतनिर्मिती होते.

🅾 पारंपारिक ऊर्जा स्त्रोत - कोळसा, डिझेल, पेट्रोल

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स.

🅾सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात.

 🅾चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
 प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो.
 
🅾चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात.
 एका अमावस्येपासुन दुसर्‍या आमवस्येपर्यंतचा काळ २९.५ दिवसांचा असतो.

🅾 एकूण ८८ तारकासमूह मानले जातात. त्यातील ३७ तारकासमूह उत्तर खगोलीय तर ५१ तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

 🅾प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी २७ नक्षत्रांची कल्पना केली आहे.

 🅾प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

 🅾बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त ८८ दिवस तर नेपच्यूनचा सुमारे १४६ वर्षे इतका मोठा असतो.
  
🅾बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला पहाटतारा म्हणतात.

 🅾पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना अंतर्ग्रह, तर कक्षेबाहेरील ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात. मंगळ हा पहिला बाह्यग्रह आहे.

  🅾सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरुगुरूला एकूण ६३ उपग्रह आहेत.
 शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

 🅾शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

🅾 धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.हॅले हा धूमकेतू ७६ वर्षानी दिसतो. आता २०६० मध्ये दिसेल.

 🅾भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट १९ एप्रिल १९७५ रोजी सोडण्यात आला.
 त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - १, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत. ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत २१ उपग्रह सोडण्यात आले.

 🅾GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

 🅾आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार १९७५ पासून अंमलात आला आहे.

🅾जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या १९९२ च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

 🅾 ५ मार्च १८७२ रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

🅾 चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

 🅾मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

 🅾इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अनुतील मूलकण आहेत.
 
🅾अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.
  
🅾प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
 
🅾अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.
 
🅾अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.
 
🅾 मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.
 
🅾मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला संयुजा म्हणतात.

 🅾विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.
 जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.

🅾 स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.

 🅾साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.
 संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ
 संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.

 🅾पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.

🅾 रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.

 🅾WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र  काढली आहेत. (Directly Observed Treatment) मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्‍याचा जिवाणू वाहक आहे.

🅾 लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.   

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...