Tuesday 23 June 2020

रुपयाच्या नोटेचा खर्च ७८ पैसे

🅾एक रुपये मूल्याच्या नोटेची छपाई करण्यासाठी येणाऱ्या खर्चात कपात करणे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनला यश आले आहे. या नोटेचा छपाईखर्च प्रति नोट १.१४ रुपयांवरून ७८.५ पैशांवर आला आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे.

🅾सध्या १० व २० रुपये मूल्याच्या नोटांची छपाई प्रति नोट अनुक्रमे ७० व ९५ पैशांत रिझर्व्ह बँकेच्या मालकीची असलेली भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा. लि. ही कंपनी करते. याच नोटा सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन अनुक्रमे १.२२ व १.२१६ रुपयांना छापते. रुपयाची नोट छापणे खर्चिक होत असल्यामुळे १९९४पासून ही छपाई थांबवण्यात आली होती. त्यावेळी एक रुपयाची नोट छापण्यासाठी १.४८ रुपये खरच प्रतिनोट येत होता. परंतु आता अद्ययावत तंत्रज्ञानामुळे छपाई खर्च खाली आला आहे, असे आरबीआयने सांगितले आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...