Thursday 25 June 2020

दृष्टिक्षेपात भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत

1)भारत सरकार कायदा, १९३५

संघराज्यीय शासनपद्धती, राज्यपालाचे पद, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग,
आणीबाणीसंबंधी तरतुदी व प्रशासनिक तपशील.

2)ब्रिटिश राज्यघटना

संसदीय शासन पद्धती, कायद्याचे राज्य, कायदेमंडळ प्रणाली, एकेरी नागरिकत्व,
आदेश (writs) पारित करण्याचे विशेषाधिकार, संसदीय विशेषाधिकार व द्विगृही
कायदेमंडळ

3) अमेरिका
मूलभूत अधिकार, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीविरुद्ध महाभियोग, सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती, उपराष्ट्रपतिपद

4) आयर्लंड
राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेत सदस्य नामनिर्देशित करणे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत.

5) कॅनडा
प्रबळ केंद्रसत्ता असलेले संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार, केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र,

6) ऑस्ट्रेलिया
समवर्ती सूची, व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही गृहांचेसंयुक्त अधिवेशन.

7) जर्मनी
आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन.

8) सोव्हिएत युनियन (आताचे रशिया) मूलभूत कर्तव्ये आणि सरनाम्यातील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श.

9) फ्रान्सची राज्यघटना
प्रजासत्ताक पद्धती आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे आदर्श.

10) दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना
घटनादुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक.

11) जपान
कायद्याने स्थापित प्रक्रिया

1 comment:

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...