Thursday 25 June 2020

वातावरण

पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरणाचे खालील स्तर पडतात.

1. तपांबर

भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो. या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.
समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. या थरामधील हवेत खालील वायु आढळतात.

हवेतील घटक घटकाचे प्रमाण

नायट्रोजन 78.03%

ऑक्सीजन 20.99%

कार्बडायक्साईड 00.03%

ऑरगॉनवायु 00.94%

हैड्रोजनवायु 00.01%

पाण्याची वाफ, धुळ व इतर घटक 0.01%

एकूण हवा 100.00%.

2. तपस्तब्धी

भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते. त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.

3. स्थितांबर

तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे. या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते. स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते.
ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.
मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.

4. आयनाबंर

मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे. सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.
इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.
एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.

5. बाहयांबर

आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...