Wednesday 2 March 2022

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:

१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती

३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

४. आर्द्र-पानझडी वनस्पती

५. शुष्क पानझडी वनस्पती

६. रूक्ष काटेरी वनस्पती

७. खाजण वनस्पती

◾️उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग भागात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित वने पाहायला मिळतात. ज्या प्रदेशात २०० सें. मी. पेक्षा जास्त पाऊस पडते त्या भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने असतात.साचा:ए बी सवडी या प्रदेशातील आर्द्रतेचे जास्त प्रमाण व जमिनीमध्ये हुयमसचे प्रमाण जास्त असल्याने या वृक्षांची उंची ४५ ते ६० मी. दरम्यान असते. सदाहरित वृक्षांचे नागचंपा, पांढरा सीडार, फणस, कावसी, जांभूळ अशी उदाहरणे आहेत.

आर्थिक महत्त्व- या वनाचा आर्थिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो. त्याचे कारण या वनस्पतीपासून तयार होणारे लाकूड अतिशय कठीण असल्याने ते टिंबर म्हणून वापरण्यास योग्य असत नाही.

उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने

वार्षिक पर्जन्य २०० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित अरण्ये आढळतात. सदाहरित वने पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पाहायला मिळतो. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात काही वनस्पती व आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या परिसरात निमसदाहरित वने आढळतात. हे वृक्ष सदाहरित अरण्यापेक्षा जास्त उंचीचे असते. निमसदाहरित अरण्यात किंडल, रानफणस, नाना, कदम, शिसम, बिबळा हे वृक्ष आढळतात.

◾️उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने

महाराष्ट्रात हि अरण्ये प्रामुख्याने २५० से मी पर्जन्य पडणाऱ्या भागात आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान  आणि भीमाशंकरच्या परिसरात उपउष्ण सदाहरित अरण्ये आहेत. पावसाचे भरपूर प्रमाण, तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे तापमान दीर्घकाळ पाऊस आणि आद्रता सर्व घटकामुळे सदाहरित वृक्ष आढळतात. सदाहरित अरण्यात जांभळा, आंबा, हिरडा, बेहडा, कारवी हे वृक्ष आढळतात. हिरडा या झाडाचे वृक्ष टणक आहेत.थंड हवेच्या ठिकाणी अशी वने आढळतात.

◾️उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी अरण्ये

सातपुडा पर्वत आणि अजिंठा डोंगररांगात वृक्ष पानझडी अरण्ये आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० ते १२९ से मी अरण्यात हि अरण्ये कमी प्रमाणात आढळून येतात. उष्ण कटिबंधीय वृक्ष, धावडा, शिसम, तेंदू, पळस, लेडी, हेडी, बबेल, खैर, अंजन इ. या अरण्यातील वनस्पतीचा उपयोग हा टीबर म्हणून व्यापारी दृष्टीने केला जातो. खैर वनस्पतीचा उपयोग कात करण्यासाठी केला जातो.

◾️उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने

ही वने प्रामुख्याने विदर्भाच्या पश्चिम भागात वर्धा-वैनगंगा नद्यांच्या खोर्‍यात आढळतात. वार्षिक पर्जन्य 80 ते 120 से. मी. दरम्यान ही वने आढळतात. या वृक्षांची उंची 25 ते 30 सें.मी.असते. ही वृक्ष आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची असतात. यामध्ये सागवान, खैर, तेंदू, बैल, बीजसाल, कुसुम, तीवस, रोहन, सावन, चारोळी, इ.

◾️उष्ण कटिबंधीय काटेरी वने

दख्खनच्या पठारावर मध्य महाराष्ट्रात नद्यांच्या खोऱ्यात लागवडीच्या परिसरात असणाऱ्या डोंगरावर आणि कमी उंचीच्या पठारावर काटेरी वने आढळतात. संपूर्ण महाराष्ट्रात काटेरी वने आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात हि वने आढळतात. बाभूळ, खैर, हिवर हे वृक्ष आढळतात. तारवड सारख्या झुडुपचा उपयोग केला जातो.महाराष्ट्रात खूप ठिकाणी काटेरी झुडपे आढळून येतात.

सदाहरित वने

महाराष्ट्रात सदाहरित वने तुरळक प्रमाणात आढळतात. विपुल पर्जन्याच्या प्रदेशात पठारी अथवा दऱ्याखोऱ्यात हिरवीगार वने आढळतात. या भागात ३०० ते ६०० से.मी पर्जन्य असते. या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान,भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात. पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात. या वनांत खालील सदाहरितवृक्ष मुख्यत्वेकरुन आढळतात. जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरेआढळतात. विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ गारबी,पळसवेल, वाटोळी,वगैरे अजस्त्र वेली आढळतात.

आद्र पानझडी वने

घाटमाथ्यावरुन खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, व सपाट भागावर या प्रकारची वने आढळतात. पर्जन्यमान 150 ते 200सेंमी निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवान वृक्ष असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची 30 - 35 मी.पर्यंत असू शकते व्यापारी दृष्टया अशा वनांचे महत्त्व फार आहे. वृक्षांमध्ये सागवान वत्याच्याबरोबरच शिसम, सावर, बीजा, हळदू कळंब, ऐन बोंडारा, शिरीष अर्जुनसादडा, धावडाइ. उपयुक्त वृक्ष सापडतात.

शुष्क पानझडी वने

शुष्क पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते.उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात. अशारानात सागवान वृक्षही आढळतात. असाणा, तिवस,सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण, टेंबुणीर वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा,तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. इमारती लाकडाच्या दृष्टीनेया प्रकारच्या वनांना कमी महत्त्व असले, तरी भरपूर जळाळु लाकडाचा पुरवठा करणारीजंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात. अशा रानातील वृक्षांची वाढ अतिशय हळू असल्याने जर अनिर्बंध लाकूडतोड सुरु झाली तर सर्व प्रदेश वैराण होण्यासवेळ लागत नाही. अशा वनात दुय्यम उत्पन्न देणाऱ्या वनस्पती म्हणजे तेंदू, गवते,औषधी वनस्पती, इ. लावून अशा जंगलाचे महत्त्व वाढविता येईल.

झुडपी व काटेरी वने

पठारी प्रदेशातील 80 सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळ आहेत. या भागातील कमी व नापीक जमीन ही अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडाव पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. काटेरी खुज्या वनस्पती वत्यांच्याबरोबर गवताळ माळराने असे दृश्य सर्वत्र दिसते. बाभूळ, बोर, खैर, निंब हे वृक्ष आणि तरवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते त्या भागात मात्र पानझडी जातीचे वृक्ष आढळतात

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...